रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिने, मेंदी धागा आटला, काढ की कैतरी आणि डकव तिकडे फोटु.. हात हवा असेल तर माझा पत्ता देते...

सायुतै मत्त आहे पिटुकली

छानच अतृप्त.. नेहमीप्रमाणे..

काल आईला घेऊन मार्केट मधे गेली होती..
तिला तिच्या शाळेसाठी साहित्य हवं होत म्हणून एका स्टेशनरी स्टोअर मधे गेलो.. दिवाळी जवळ आल्यामुळे बाहेर एका टेबलावर मस्त मेहेंद्या, रांगोळ्यांची भरपूर पुस्तक वाजवी दरातली ठेऊन होती. मी बसली चाळत.. आता जाळावर सगळ काही भेटत असल्याने सहसा हि पुस्तक खरेदी होत नाही पण तरी नविन कल्पना, शिक्के वगैरे शिकायला मिळतात म्हणून न चुकता मी हि पुस्तकं चाळत असते Wink ..

५वी ६वी पर्यंत बर्‍यापैकी जमणार्‍या आणि न चुकता काढत असलेल्या ठिपक्यांच्या रांगोळ्या शेजारच्या ताईने पानाफुलांच्या फ्रि हॅण्ड रांगोळ्या शिकवल्यानंतर त्याच काढायच्या छंद लागला.. मध्यंतरी मी ७वी ८वीत असताना ताईने शेजारच्या एका काकुंकडे संस्कारभारती रांगोळ्यांचे क्लासेस लावल्यावर लहाने लहाने म्हणून मीपन जाऊन बसायची तिच्यासोबत.. ती शिको न शिको मी मात्र शिकुन गेली Wink शेवटी त्या काकुंनी माझ येण बंद करुन टाकलं Sad Biggrin ..

असो तर गोष्ट अशी कि, त्या काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या, घालवलेल्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांनी सायलीच्या या धाग्याच्या रुपात मनात परत डोक वर काढलं. आणि काल तिथली पुस्तकं चाळता चाळता एक छानस रांगोळीचं पुस्तक मला भेटल.. १६ रु इतकी माफक किंमत असलेलं ते मी चटकन विकत घेतल आणि काल रात्री लगे पाटीवर त्यातल्या काहींची प्रॅक्टीस सुद्धा केली Proud ..

आज काढलेल्या काही टाकते जरा वेळात .. सर्वांनी आवडूनच घ्याव्या हि आशा वजा धमकी Wink Happy

टिना मैन्ये देख्या वो दसरेको काढे हुये हात, अउर प्रतिसाद भी दिया उधरीच.. एक आयड्या भी सुचव्या हय, तुमको कयसा लगता वो बता मेरेकु....

टिने हात मस्त वळतो गे तुझा... छान आल्यात दोन्ही रांगोळ्या.

टीना मी आवर्जुन विकत घेते रांगोळी आणि डिझाईनस ची पुस्तक..
दोन्ही रांगोळ्या खुप गोड आहेत.. मला तसही ठीपक्यांची रांगोळी खुप आवडते...

शेवटी त्या काकुंनी माझ येण बंद करुन टाकलं अरेरे खो खो .+++ तु पण ना Rofl

टीना..सायुतै ..मस्त!
माझ्या डोक्यावर पण तुमचा वरदहस्त ठेवा अश्या मस्त रांगोळ्या काढता येवु देत म्हणुन Happy

मस्तच सायु..

रीया, यार शिक ब्वा तू लवकर. खुप मिस होते तू फोटो न डकवल्यामूळे.. निव्वळ कल्पना करत राहावी लागते रीया न असं काढलं असणार, तसं काढलं असणार अशी Sad ...

आजची गेट समोरची ११ ते ११ :

आणि हि तुळशीसमोरची १२ ते ४ :

पूर्ण मोठ्ठी नव्हती काढायची म्हणून हा शॉर्टकट मारुन एकच पिंड काढली..
आज गेटसमोर पिंडांचीच काढणार होती पण मग म्हटलं आज नको सोमवारी काढू Wink
उद्या आणखी एखादी Happy

टीना दोन्ही रांगोळ्या जब्बरदस्त.. महादेवाची पींड आणि बेल पान छानच जमलय!
नीरा सुरेख शेडींग..
माझी आज पण पिटुकली...:)

मलापन हेच विचारायच असतं सर्वांना .. >>> टिने तुझ्या रांगोळ्यात पण शेडिंग केलेल आहे तु हा प्रश्न नै विचारायचास.. आज अतृप्तंची रांगोळी नै आली अजुन..

सायु,
तेरे वृंदावन के कडप्पे वाले ओटे को क्या हुवा ?
तु इन दिनो ग्रॅनाईट के पट्टीपेहिच निकालरेली है रांगोळ्या ...

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xfa1/v/t1.0-9/12065594_919619461457674_6561526251139018848_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=4dab89ebbb03ba465a663c85f2901043&oe=56B80A18

चनस,
हळदीकुंकवाचे बोट Happy
मला लहानपणी आई नेहमी सांगायची, 'रांगोळी निव्वळ पांढरी ठेवू नये..नसेल रंग तर निदान चिमटीने हळदकुंकू त्यावर टाकाव..'
तुझी रांगोळी बोटांनी काढलेली ना ? मस्तच..
आता मी पन काढणार मुहूर्त बोटांच्या रांगोळीचा Happy

सुरेख आहेत रांगोळ्या. लगे रहो !!!

टीना, पिंड म्हणू नये. पिंडी म्हण Happy पिंडचा अर्थ वेगळा होतो.

रांगोळी निव्वळ पांढरी ठेवू नये..नसेल रंग तर निदान चिमटीने हळदकुंकू त्यावर टाकाव..'>>> +१

अतृप्त,
एक फुकटचा पण अतिशय महत्वाचा सल्ला देते..
तुमच्या सेज अप्रतिम असतात पण प्लीज त्यावर तुमचा वॉटरमार्क टाकत जा आठवणीने..कुणी ढापून त्या स्वतःच्या नावावर खपवू नये याकरिता खबरदारी Happy

Pages