मानाचि लेखक संघटनेतर्फे चित्रपट लेखन कार्यशाळा - सर्वांसाठी खुली.

Submitted by वेल on 27 October, 2015 - 00:55

इथे मायबोलीवर अनेक लेखक आहेत. काही खूप वर्षांपासून लिहित आहेत. काही नुकते लिहिते झालेत. काही केवळ मायबोलीमुळे लिहिते झालेत. आपल्यातले अनेक जण केवळ आनंदासाठी लेखन करतात तर लेखन हा काहींचा व्यवसाय आहे.

लेखकाला लेखनाचा खरा आनंद मिळतो तो ते लेखन जास्तीत जास्त लोकांनी वाचलं की आणि त्या लेखनासाठी जर कोणी व्हिटॅमिन एम देणार असेल तर Wink

लेखन हे जेव्हा केवळ कागदावर (किंवा ब्लॉगवर) असतं तेव्हा (comparatively) कमी लोक ते वाचतात. पण जर तेच लेखन दृक्श्राव्य माध्यमातून मालिका नाटक किंवा चित्रपट बनून सर्वांच्या समोर येतं तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि लेखकसुद्धा प्रसिद्ध होतो ( आणि व्हिटॅमिन एम सुद्धा मिळतं)

पण आपण लिहिलेलें लेखन म्हणजेच कथा जशाच्या तशा दृकश्राव्य माध्यामातून म्हणजेच नाटक मालिका अथवा चित्रपट माध्यमातून दिसतात का? दिसू शकतात का? का त्यावर काही वेगळे संस्कार करावे लागतात? आपल्या कथेचा चित्रपट बनावा ह्यासाठी आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने लिहायची आवश्यकता आहे का?

चित्रपट लेखनाचे हे तंत्र समजून घेण्यासाठी मानाचि ह्या लेखक संघटनेने चित्रपट लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे आणि आपली मायबोली ह्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन मिडिया पार्टनर आहे.

ह्या कार्यशाळेबद्दल अधिक सांगण्यापूर्वी मानाचि ह्या संघटनेबद्दल थोडसं.

मराठी मालिका, मराठी नाटक आणि मराठी चित्रपट ह्या माध्यमांसाठी लिहिणार्‍या लेखकांसाठी ह्याच माध्यमातल्या लेखकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली लेखकांची संघटना म्हणजे मानाचि.
जून २०१४ मध्ये काही मालिका लेखक whatsapp groupच्या निमित्ताने एकत्र आले आणि गप्पांच्या ओघात त्यांना जाणवले की आपल्या समस्या सामाईक आहे. ह्या समस्या सोडवणे, तसेच लेखकांचे हक्क (intellectual property and copyrights) त्यासंदर्भातील नियम कायदे, ह्याबाबतची जागरुकता मराठी लेखकांमध्येही निर्माण करणे तसेच लेखकमंडळींच्या उत्कर्षाकरीता काही उपक्रम राबवणे हे दृष्टिकोन ठेवून प्रयत्न सुरु झाले. पण त्याआधी विखुरलेल्या लेखकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्पर समन्वय प्रस्थापित करणे आवश्यक होते. याच गरजेतून प्रेरणा घेत आणि ६ मे २०१५ ह्या दिवशी मा.ना.चि. (मालिका नाटक चित्रपट) ह्या लेखक संघटनेची स्थापना केली गेली.

ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे
१. मा.ना.चि. लेखक संघटनेची घटना तयार करणे जी सर्व सदस्यांसाठी बंधनकारक असेल.
२. बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट्स संबधित हक्कांबाबत लेखकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यासंदर्भातील नियम आणि कायदे यांच्या पालनावर भर देणे.
३. मालिका नाटक आणि चित्रपट ह्या माध्यमातील लेखकांच्या कामासंदर्भात मसुदे तयार करणे व या करारांच्या पालनाकरिता आग्रही राहाणे.
४. प्रत्येक माध्यमातील लेखनकार्यासाठी किमान मानधन निश्चित करणे.
५. मालिका आणि चित्रपट लेखनसंदर्भातील मानधनासाठी असलेला 'क्रेडिट पिरियड' रद्द करून घेणे.
६. नाट्यपरिषदेचा नाटककार संघ पुनरुज्जीवित करणे
इत्यादी.

उपक्रम
१. रायटर्स फार्म - इथे लेखक रुजतात.
२. बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट्स संबधित हक्कांबाबत लेखकांसाठी कार्यशाळा.
३. मराठी दृकश्राव्य माध्यमात कार्यरत असलेल्या लेखकांचे संमेलन आणि त्यांच्यासाठी पुरस्कार सोहळा.
४. लेखकांसाठी असलेल्या देशांतर्गत आणि विदेशी स्कॉलरशिप्सची माहिती मिळवून देणे आणि त्याकरीता मदत करणे.
इत्यादी.

'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात'
मानाचि ह्या संघटनेने स्थापना झाल्यानंतर 'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात' या उपक्रमाअंतर्गत जुलैमध्ये मालिका लेखन कार्यशाळा घेतली. ह्या कार्यशाळेसाठी पु. ल. देशपांडे अकादमीने साहाय्य केले. ह्या कार्यशाळेला जवळ जवळ ५०० लोकांनी प्रतिसाद दिला. ११, १२ व १८, १९ जुलै असे चार दिवस चाललेल्या ह्या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक एन.चंद्रा यांनी केले. ह्या कार्यशाळेमध्ये विवेक आपटे, शिरीष लाटकर, सचिन दरेकर, अभिजीत गुरू, चिन्मय मांडलेकर, अरूणा जोगळेकर, अंबर हडप, कौस्तुभ दिवाण, राजेश देशपांडे, आशिष पाथरे, महेंद्र कदम व सचिन मोटे यांनी कथानक, पटकथा-संवाद, विनोदी लेखन, ईत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबी व निर्मात्यांच्या दृष्टीकोनाबद्दल अतुल केतकर, मंदार देवस्थळी, सचिन गोस्वामी यांनी माहिती दिली. याचबरोबर संघटनेतील ज्येष्ठ व अनुभवी लेखकांबरोबर परीसंवाद झाला. यात पुरूषोत्तम बेर्डे, आनंद म्हसवेकर, अरविंद औंधे, सुहास कामत, राजीव जोशी, अण्णा कर्पे, संभाजी सावंत यांचा सहभाग होता. चॅनल हेड श्री.निलेश मयेकर व श्री.संजय उपाध्ये ह्यांनी या कार्यक्रमाला अजुनच रंगत आणली. समारोपाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री विजय पाटकर उपस्थित होते. सचिन गोस्वामी या निर्माता दिग्दर्शकांच्या विनंतीला मान देऊन विजय पाटकर ह्यांनी "यापुढे चित्रपटाच्या प्रसिद्धीवर लेखक, गीतकारांची नावे छापणे बंधनकारक असेल" अशी महत्वपूर्ण घोषणा केली आणि काहीच दिवसांत ती अमलात आणली.

'रायटर्स फार्म - येथे लेखक रुजतात' या उपक्रमाअंतर्गत संघटनेने ऑगस्ट महिन्यात सहा दिवसांची एकांकिका लेखन कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार, 'बोधी' चळवळीचे प्रणेते तसेच 'मानाचि'चे माननीय सदस्य श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत प्रत्यक्ष लेखनावर अधिक भर देण्यात आला व प्रत्येक शिबीरार्थीकडून एकांकिका लिहून घेण्यात आल्या. यासंबंधी शिबीरार्थिंना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.अनिल बांदिवडेकर, देवेंद्र पेम,अंबर हडप, गणेश पंडित, राजीव जोशी, अानंद म्हसवेकर, वामन तावडे, संभाजी सावंत, विश्वास सोहोनी, सुनिल हरिश्चंद्र व प्रदिप राणे ही मंडळी उपस्थित होती.समारोपाच्या वेळी सुप्रसिद्ध नाटककार व 'अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट' (मुंबई विद्यापीठ) चे संचालक श्री.शफाअत ख़ान व 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष श्री.विजय पाटकर हे उपस्थित होते. चित्रपट महामंडळाच्या नव्याने अमलात आणल्या गेलेल्या निर्णयाचे यावेळी जोरदार स्वागत झाले. मान्यवरांनी अशा कार्यशाळांची गरज अधोरेखित करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.

आता दिवाळीच्या मुहुर्तावर संघटनेने चित्रपट लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. पुरुषोत्तम बेर्डे, अभिराम भडकमकर, समर नखाते, अशोक राणे, संजय पवार, अनिल झणकर हे चित्रपट क्षेत्रातले मान्यवर चित्रपट लेखनाच्या विविध अंगांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

चित्रपट लेखन कार्यशाळा ६, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री ९ ह्यावेळेत पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी येथे असेल. ह्या कार्यशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील लिंकवर असलेला फॉर्म भरून पाठवावा. अपूर्ण भरलेले फॉर्म रिजेक्ट केले जातील. आपण मायबोलीवर अथवा इतर कुठेही लेखन केले असल्यास त्याची माहिती द्यावी.
http://goo.gl/forms/8hXMEPKoZw

निवडसमितीकडून फॉर्मची चाचपणी झाल्यावर उमेदवाराला कळवले जाईल. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य ह्या तत्त्वावर ह्या कार्यशाळेत प्रवेश मिळणार आहे. १ नोव्हेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ह्या कार्यशाळेसाठी मानाचिचा संपर्क क्रमांक ९१६७७६७२३८. ईमेल आयडी: manachi.upakram@gmail.com

तेव्हा मायबोलीवरील माझ्या लेखकू मित्र मैत्रिणींनो चित्रपट लिहिणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर वरील लिंकवर क्लिक करा आणि व्हा ह्या मानाचिच्या कार्यशाळेत सामील.

भेटूच ६ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता पु ल देशपांडे अकादमी मध्ये.

आपली मायबोली ह्या कार्यशाळेसाठी ऑनलाईन मिडिया पार्टनर आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा!
यावेळी नवरा पुण्याबाहेर असल्याने बेबीसिटिंग मॅनेज होणार नाही, पण पुढची बॅच असल्यास नक्की येणार.

व्वा.... छान, असे काही घडायला हवेच होते.
मानाचि ला शुभेच्छा... Happy
कार्यशाळा मुंबईला असल्याने भाग घेणे शक्य होणार नाही. मात्र मानाचि ने काही उपयुक्त टीप्स असलेली मार्गदर्शनपर पुस्तिका प्रसिद्ध केली तर ती मात्र जरुर घेईन. किंबहुना, अन्य उपक्रमांबरोबरच, लेखन कसे करावे याबाबत काहीएक पुस्तक/ग्रंथ संपादित केला गेला तर तो दीर्घकालिक उपयुक्त ठरेलच, शिवाय, कुणी सांगावे, पुढेमागे विद्यापिठीय अभ्यासक्रमातही लावला जाऊ शकेल.
वक्ट्रुत्व/भाषण कलेवर पुस्तके उपलब्ध आहेत ( पण तिथे व्यक्तिगत आत्मविश्वासाचाही संबंध असल्याने त्यांचा कितपत उपयोग होतो याबाबत मी साशंक आहे) पण लेखनाबाबत मात्र, व्यक्ति कशीही असली, तरी निव्वळ लेखनविषय व मांडणी-प्रस्तुती संदर्भाने अनेक बाजुंनी मार्गदर्शन होऊ शकते/घेतले जाऊ शकते.
असे काही पुस्तक/ग्रंथ निर्माण झाला तर मी पहिल्यांदी तो घेईन.

अगदी निव्वळ जुगवुन लिहायचे ठरवले तरीही लेखकास खरे तर वास्तव जगातील असंख्य घटना/स्थाने/घडामोडींची माहिती असावी लागते, तरच त्याचे जुगवुन लिहीलेले "वास्तव" भासते. जिथे सत्यकथाच आहे, तिथे तर प्रश्नच नाही. तरी, लेखाकाने त्याचे जनरल नॉलेज कुठल्या प्रांतात/भागात कशा पद्धतीने काय सोर्सेस वापरुन वाढवावे यावरही मार्गदर्शन, वा अशी काही सुची निर्माण झाल्यास ति अतिशय उपयोगी ठरेल. असो.
उपक्रमास परत एकदा शुभेच्छा देतो...

सा अर्च राखी खूप आभार.

अर्च मी असनारच एवधी चांगली संधी सोडून कसे चालेल.

लिम्बू काका शुक्र शनि रवि अहे कार्य्क्रम. पुण्याचे बरेच जन आहेत. प्रयत्न करा. इतर सूचनांवर नक्की विचार करू

अनु आपन येउ शक्क्ला असतात खूप बरे वाटले अस्ते.

मायबोलीच्या टॅलेंटेड लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा असे मनापासून वाटते.

अर्रे व्वा ! छान उपक्रम. अशा उपक्रमांची खरच गरज आहे. Happy
मला यायला नक्की आवडेल. हे मुंबई मध्ये असल्याने पाहावं लागेल जमतय का.
लिंबूकाका म्हणतात तस माहिती पुस्तिका वगेरे काढली तर मस्तच ..

हर्पेन आशिका - धन्यवाद.

प्रकु - तुम्ही नक्की प्रयत्न करा यायचा,

मालिका चित्रपट आणि नाटक ह्या माध्यमांसाठी लिहिणार्‍या अनुभवी आणि नवोदित लेखकांना भेटल्यावर त्यांच्याबरोबर बोलल्यावर जाणवले की खरच मानाचि सारख्या संघटनेची आणि अशा उपक्रमांची खूप गरज आहे.

वैयक्तिक बोलायचे तर मानाचिची सदस्य झाल्याने मला खूप काही शिकायला मिळाले आणि मानाचिमध्ये मी इंट्रोड्युस झाले तेही मायबोलीमुळे, मायबोलीवरच्या कौतुक शिरोडकर मुळे. कौतुक आणि मायबोलीवरच पूर्वी लिहिणारे निनाद शेट्ये हेदेखील मानाचिचे सदस्य आहेत.

तर मायबोलीच्या लेखकांनो स्वतःच्या लेखनाला दृकश्राव्य माध्यामात कसे आणता येईल अथवा लेखक म्हणून दृकश्राव्य माध्यमात कसे काम करता येईल हे समजून घेण्याची शिकण्याची संधी सोडू नका.

खूप छान उपक्रम ! शुभेच्छा!
जस्ट क्युरिऑसिटी म्हणून सहभागीही व्हायला आवड्लं असतं!

मायबोलीकरांच्या प्रतिसादासाठी मानाचितर्फे मायबोलीकर लेखक मित्र मैत्रिणींचे आणि मायबोली प्रशासनाचे आभार.

मानाचि तर्फे होणार्‍या ह्या चित्रपट लेखन कार्यशाळेचे उद्घाटन उद्या दुपारी ३ वाजता पु. ल देशपांडे अकादमी, प्रभादेवी इथे होणार आहे. उद्घाटनाला पु. ल. देशपांडे अकादमीचे श्री आशुतोष घोरपडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे श्री विजय पाटकर उपस्थित असतील. कार्यशाळेचे उद्घाटन श्री किरण शांताराम ह्यांच्या हस्ते होईल. उद्घाटन समारंभासाठी मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण.

उद्घाटनाला येणार्‍या आणि कार्यशाळेत सहभागी होणार्‍या मायबोलीकरांचा एकत्र फोटो काढून टाकूच.