Submitted by जयश्री हरि जोशी on 20 October, 2015 - 12:14
फिकी होत गेली निळ्या संभ्रमात
सखीच्या गावाची अनुरक्त वाट
मनाच्या तळाशी कलंडले दिवे
दरीत ओढाळ पाखरांचे थवे
तहानकहाणी निथळत्या नभी
थेंबांची सावली गोंधळून उभी
स्मरणगावाची ओलांडता वेस
जांभळी रेशमी आठवण नेस
विरहाची वेल माझ्या अंगणात
कळीच्या रंगाचे सखी तुझे हात
मऊ अंधाराचा फुलवून प्राण
सावरीचा जन्म वेचूनिया आण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कमाल. पुन्हा पुन्हा वाचतोय
कमाल. पुन्हा पुन्हा वाचतोय सगळे शब्द.
तुमच्या कविता आवडतात, इथे प्रकाशित करत रहा. धन्यवाद.
पुन्हा एकदा तुमच्या कविता
पुन्हा एकदा तुमच्या कविता पाहून खूप छान वाटले!
मस्त!
मस्त!
>> तहानकहाणी निथळत्या नभी वा
>> तहानकहाणी निथळत्या नभी
वा वा!
वेलकम बॅक ऑन मायबोली.
वाहवा! मनापासून वेलकम
वाहवा! मनापासून वेलकम बॅक..लिहित रहा!
माहेरी परत आल्यावर
माहेरी परत आल्यावर मित्रमैत्रिणी आणि भावंडांची कशी लगबग होते, तस्सं वाटलं. खूप छान.
व्वा!! परत आल्याबद्दल धन्यवाद
व्वा!! परत आल्याबद्दल धन्यवाद
मस्त , आवडली.
मस्त , आवडली.
छान आहे कविता . आवडली. लिहित
छान आहे कविता . आवडली. लिहित राहा
वेल्कम बॅक जया !!! >>फिकी
वेल्कम बॅक जया !!!
>>फिकी होत गेली निळ्या संभ्रमात
सखीच्या गावाची अनुरक्त वाट
!!!!
Classic..!
Classic..!
अप्रतिम ..
अप्रतिम ..
सुंदर!
सुंदर!
छान आहे.
छान आहे.
मनाच्या तळाशी कलंडले
मनाच्या तळाशी कलंडले दिवे....
आहाहा...
कुठे होतिस बाई... बरं झालं परतली आहेस.. आता हरवू नकोस.. हात जोडते
दाद +१११११ लिहीत रहा
दाद +१११११
लिहीत रहा गं....
तुझी कविता पाह्यल्यावर अगोदर तारीख पाहिली.. आणि छान वाटंल!
कविता सुंदर !!