क्लूलेस-११

Submitted by श्रद्धा on 16 October, 2015 - 09:43

हा वीकेंड क्लूलेस वीकेंड..

आज रात्री क्लूलेस ११ची लिंक लाइव्ह होईल.
http://www.klueless.in/klueless/

सूचना नेहमीच्याच...
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.

२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.

३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.

४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.

५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.

बेस्टॉफलक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श...झालं बुवा एकदाचं पुर्ण!! दोनेक वर्षांपुर्वी इथला बाफ बघुनच खेळायला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी जरा उशीर झाला होता हॉऑफे साठी!!! यंदा ३३व्या नंबरला आहे!! बहुतेक यावेळी तरी असेन Happy Happy

चेतनः इथे दिलेले क्लु पहा! उत्तर मिळेल Happy

चैर, अभिनंदन. ३३ म्हणजे नक्कीच अस्णार हॉऑफेमध्ये. Happy किती आहेत यंदा एकूण लेव्हल्स?

नक्की....रच्याकने...श्रद्धा तुम्हाला स्पेशल धन्स...बहुतेक क्लुलेसवेड लावणारा जुना बाफ तुमचाच होता :ड

Pages