पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवळे काळे पडताहेत की खारासकट सगळे लोणचे काळसर हिरवट दिसतंय?
खार चांगला असेल तर लोणचं खायला हरकत नाही, पण खाराने (खारीने नव्हे) रंग बदलला असेल तर टाकून द्या.

ओके
वरच्या बाजुनेच काळपट वाटतय लोणचे खार पण वाटतो आहे.
खालच्या बाजुचा चांगला आहे पण .......त्याला बाजुला काढने अवघड आहे
टाकायलाच लागनार बहुतेक.

लेवा पाटील लोकं एका विशिष्ट चवीचं कैरीचं लोणचं करतात. नाशिकसाईडलाही अशा प्रकारचं लोणचं करतात बहुतेक. त्या लोणच्याची रेसिपी आहे का कोणाकडे? रेसिपीपेक्षाही कोणी डायरेक्ट लोणचंच करून देणारं माहित असेल तर अधिक उत्तम.

http://www.maayboli.com/node/26171

मामे हे लोणचे म्हणतेस का? मी हे खाल्लेय. थोडेसे सुके असते, पण चवीला अफलातुन लागते.

मार्केटात कैर्या यायला लागल्या. मी परवाच दोन कैर्यांचे घातले.

म्हाद्याची रेस्पी हवीय. एकदा मित्राच्या डब्यात हा पदार्थ खाल्ला होता. साधारण शेंगदाण्याच्या कुटाची भाजी असे त्याचे स्वरुप होते. खुपच आवडली त्याची चव. तस्मात पाकृची पहिलीच लापि वाजवतोय तेव्हा मदत करा लोक्स.

मोदकाच्या सारणात केळे कुस्करुन घालतात का? सारण बनवतानाच घालायचे की थंड झाल्यावर मिक्स करायचे?

Namaskar from Geeta Rane, Mumbai

Thanks for approving and accepting my membership,

I appreciated all the write-up, replies, Thanks all for being there,
I tried Malawani masala as published here, tons of Thanks,

Now, want one favour, we want to make Snaks, Lunch Dinner without using our normal Salt, can anybody, help us out, Thanks in advance,
With Love & Prayers,

सकुरा नाचणीमध्ये खूप खडे असतात. ती आधी स्वच्छ करायची. गिरणीतुन दळल्या नन्तर जे पीठ मिळते ते दुहेरी फडके भान्ड्याला बान्धुन पीठ गाळले/ चाळले की पान्ढरे पीठ मिळते अन्यथा नाचणीचे पीठ चॉकलेटीच असते,ज्यात कॅल्शियम जास्त असते.

नाचणी आदल्या रात्री पाण्यात भिजत घालायची दुसरे दिवशी सकाळी मिक्सरमधून बारीक वाटुन गाळणीने गाळुन घ्यायची. भान्डे थोडा वेळ तसेच ठेवायचे. मग वरचे पाणी फेकायचे. खाली तळाशी जे उरते ते नाचणीचे सत्व. त्याची खीर/ लापशी होते. त्यात खजूर व गुळ घालुन पुडिन्ग होते.

के सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट वापरता येते. पदार्थात वरून घालायचे, पदार्थ बनवताना नव्हे.दालचिनी पूड, आले, सैंधव, मिरपूड, लिंबाचा रस वगैरे जर पदार्थात घातलेत तर नेहमीच्या मिठाची कमतरता जाणवणार नाही.पालेभाज्या परतून करत असाल तर मीठ खूपच कमी वापरावे लागते. निसर्गोपचारांत बरेचदा मीठ टाळायला सांगतात. तेव्हा त्याजागी चवीसाठी आले, लिंबाचा रस वगैरे वापरायला सांगतात.

रश्मी, धन्यवाद.

नाचणी आदल्या रात्री पाण्यात भिजत घालायची दुसरे दिवशी सकाळी मिक्सरमधून बारीक वाटुन गाळणीने गाळुन घ्यायची. भान्डे थोडा वेळ तसेच ठेवायचे. मग वरचे पाणी फेकायचे. खाली तळाशी जे उरते ते नाचणीचे सत्व. त्याची खीर/ लापशी होते. त्यात खजूर व गुळ घालुन पुडिन्ग होते.>>>

हे सत्व लगेच वापरावे लागते का? विकत मिळते ते नाचणी सत्व पावडर असते.पॅकेट वर नाचणी सत्व असे लिहिलेल असते.

सकुरा ओले सत्व ( नाचणी भिजवुन केलेले) लगेच वापरावे. पण हेच सत्व ताटात पसरवुन कड्क उन्हात ठेवावे व सुकले की बरणीत भरुन ठेवावे हवे तेव्हा वापरता येते. गव्हाचे पण असेच करतात.

तो म्याव करेल तेव्हा थोडे दूध दे. डोळा मारा>> Lol

पाव किलो गूळ म्हणजे साधारण दीड ते दोन वाट्या असेल ना? चिंच-गुळाची चटणी करून टाका. आमटीत वगैरे वापरता येईल आणि ती उकळून ठेवायची असल्याने फ्रिजमध्येही व्यवस्थित टिकते.

Pages