चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टेप्स वाढवण्याच्या उपक्रमात माझ्या नवर्‍याच्या ऑफिस मधे त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरच्या टिम्स केल्या आहेत. प्रत्येकाच्या स्टेप्स चा काउंट ते दर शुक्रवारी घेतात. आणि त्यान्च्या एकत्र डेटाबेस वर टाकतात.
त्याच बरोबर त्यान्नी ऑफिस मधेच आहार तज्ञ ठेवला आहे. जो दर सोमवारी येतो आणि डायेट देतो. त्यामुळे फोकस प्रयत्न होवुन नवर्‍याने गेल्या ३ महिन्यात १२ किलो वजन कमी केले !!!! त्याच्या एका कलीग ने जो फक्त ३४ वर्षांचा आहे आणि आधी १०० किलो होता (उंची ५ फुट ४ इंच) तो आता रोज नीदान १८००० स्टेप्स चालतो, आहार नियंत्रण करतो. त्याने साधारण २२ किलो वजन कमी केले!!! आर्थात त्याचे खाणे खुप होते व ते कमी करुन योग्य केल्याने हा फरक पडला आहे.

तर मित्र हो चाला, योग्य खा, सुखी रहा....

धन्यवाद मित्रहो.
मी डॉक्टरांशी बोललो.
ते म्हणाले रोज ४००० ते ५००० पाऊले डेडिकेटेड ( म्हणजे -- वॉकिंगसाठीच- जलद) करा.
हे साधारण ३-५ ते ४ कि मी होते आणि ४० ते ४५ मिनिटात करा.
उरलेल्या पाऊलांची चिंता करू नका आणि हे सातत्याने आठ्वड्यातून ५ वेळा करा.
या मुळे रोज २२५ ते २५० कॅलरीज जळतील.
मी हे गेली २० - २५ वर्षे सातत्याने करत आहे परंतु दिवसा आड किती पाऊले कधी मोजली नाहीत.
मी ६४ वर्षे वयाचा असून मला मधुमेह किंवा रक्तचाप वगैरे कही नाही.
कदाचित वॉकिंगचा परिणाम !!!!

Sakali chya evaji ratri walk kela tar chalel ka ( timings mule possible hot nahi ani thyroid mule sakali fresh vatat nahi)

रेव्यु.... मस्तच.
फक्त वाढत्या वयाबरोबर आपली आपणच काळजी घ्यावी लागते, पळतानाचा गुढग्याम्वर/घोट्यावर जास्तीचा ताण येतो तो वाढलेल्या वयात झेपु शकेलच असे नाही, इतकेच काय, माझा अनुभव (पन्नाशीतच) असा की पळताना बरगड्यांवरही ताण येतोय.
तेव्हा आपल्या शरिराचा अंदाज घेऊनच पाऊल उचलावे. अगदी तरुण पणातील बाब निराळी असते.
मात्र तुमचा आधीचा २० वर्षांचा चालण्याचा सराव उपयोगी येतोय हे नक्की. Happy कीप इट अप...

माझे रोजच्या रोज २५०० पावले चालणे तर होतेच होते.

आज आमच्या इथे जनरल मेडीकल चेकप केला कंपनीमार्फत...
बीपी ११२ / ७४ पल्स ७१
शुगर (रॅन्डम) १०६
उंची १७२ सेमी - वजन ६२ किलो
एकंदरीत ठीक असावे.......
शुगर बद्दल मात्र मी बाहेर परत तपासणी करणार आहे. मागच्या दोनही सायकल ट्रीपवेळेस मी पूर्वीपेक्षा फारच लौकर "कोलॅप्स" झालो होतो, त्यामागे "शुगर" हे कारण नाहीना ते बघायचे आहे. असो.
(बहुतेक मी धागा चुकलो तर नाही ना? Uhoh )

ऑक्टोबर ८: १३६२३
ऑक्टोबर ९: १४८१८
ऑक्टोबर १०: १०५६४
ऑक्टोबर ११: १०२४८
ऑक्टोबर १२: १२,२९२
ऑक्टोबर १३: १३,०९२
ऑक्टोबर १४: १५,८२९
एकुण: ७८,१७४

akali chya evaji ratri walk kela tar chalel ka <<< थोडे कठिण उत्तर.
सकाळच्या वेळी बहुतेक माणसे जास्त उर्जा खर्च करतात, त्यामुळे सकाळचा नाश्ता राजा सारखा करावा असे म्हणतात.
संध्याकाळी/रात्री व्यायाम करायला काहीच हरकत नाही, आणि तो करावाच.. पण त्यामुळे भूक लागली म्हणून जास्त खाल्ले जाऊ नये, व खाल्ल्यानंतर लगेच झोपू नये.
शक्यतो.. संध्याकाळी जेवल्यानंतर ५००/१००० पावले चालावेच, आणि कमीत कमी २ १/२ , तीन तासानंतर झोपावे..

ani thyroid mule sakali fresh vatat nahi >> असे असेल तर थोडा प्रयत्न करून सकाळी थोडावेळ तरी चालायचा प्रयत्न कर. पहिले १५ दिवस चालायला नको, मरगळ वाटेल. पण नंतर थायरॉईड असूनही दिवसभरात उत्साह राहील.
प्रयत्न करुन बघ पुढचे काही दिवस Happy

१० ऑक्टो - १२६८५
११ ऑक्टो - १०३२४
१२ ऑक्टो - १११५६
१३ ऑक्टो - १०२२९
१४ ऑक्टो - १०१५१
१५ ऑक्टो - १००४४
१६ ऑक्टो - १२४१४

रमड, गांधीजींच्या मिठाचा सत्याग्रह सारखा ग्रोसरी स्टोर मध्ये जाऊन डाळीचा सत्याग्रह कर आता. किती चालशील!! (प्राऊड ऑफ यू बरं).

रमड, सही!

माझी चालः

१० ऑक्टोबरः १७७८२ : १३ किमी
११ ऑक्टोबरः १४८११ : १०.८ किमी
१२ ऑक्टोबरः १०३४७ : ७.६ किमी

१३ ऑक्टोबर : १०५८५ : ७.७ किमी
१४ ऑक्टोबर : ८६२९ : ६.३ किमी
१५ ऑक्टोबर : १३०५४ : ९.६ किमी
१६ ऑक्टोबर : ४१६७ : ३.१ किमी
१७ ऑक्टोबर : १५७२६ : ११.५ किमी

साधारण १ कि.मी. ला ५० कॅलरीज जळतात. हे प्रमाण अ‍ॅव्हरेज वजन ६५ किलो असलेल्या लोकान्ना लागु आहे. मग तुमचे वजन जर जास्त असेल तर साधारण ५० ते ६५ कॅलरीज १ कि.मी. पर्यन्त जळतात.

त्या हिशोबाने १ किमी म्हणजे साधारण २००० स्टेप्स. म्हणजे जो साधारण १० , ०००० स्टेप्स चालतो तो साधारण दिवसाला २५० ते ३०० कॅलरीज जाळतो.

माणसाला दिवसाला साधारण २०००- २५०० कॅलरीज ची गरज असते. चालुन आपण ३०० कॅ. जाळल्या, व खाण्यातुन साधारण ५०० कॅ कमी केल्या तर दिवसाला ८०० कॅ चा तुटवडा भासेल. ह्यात खाण्यातुन कमी करायच्या कॅ ह्या कार्बोहायड्रेट्स कमी करुन मिळवलेल्या असल्या तर चांगली क्वालिटी. प्रोटिन व फळे भाज्या ड्राय फ्रुट हे कमी करायचेच नाही. तेल, गहु, मैदा, भात कमी खायचा वा पुर्ण बन्द करायचा.

दिवसाला ८०० कॅ च्या तुटवड्याने साधारण १०० ग्रॅम वजन कमी होइल. व १० दिवसात १ ते १.५ किलो वजन कमी करता येइल. व महिन्याला साधारण ४ किलो. जे खुप हेल्दी आहे. मी १७ किलो कमी केले तेंव्हा हेच प्रमाण वापरले. मला त्रास झाला नाही.

आर्थात हे प्रमाण ज्याचा मेटाबोलिझम दिवसाला किमान ३००० कॅ. आहे त्यान्नाच लागु पडेल. जर मेटाबोलिझम कमी असेल तर आर्थातच १०० कॅ. दिवसाला कमी करायला जास्त कॅलरीज जाळायला लागतिल.

माझा मेटाबोलिझम २००० आहे....!!! त्या मुळे मला रोज निदान १२०० कॅ बर्न केल्या तरच १०० ग्रॅ. वजन कमी होते.

जेंव्हा वजन कमी करत होते तेंव्हा ४ महिन्यात पोळी, भात, बिस्किट खाल्ले नव्हते.

असो.....

कालचा स्कोअर = ८३४५
आजचा स्कोर = १७३२३ ( आज सकाळ पासुन नुसती भिंगरी लागली आहे पायाला !!)

४ अक्टोबर पासून सुरू केले काउंटिंग

४-१० अक्टोबर २४,४८९
११-१७ ऑक्टोबर ४५,४३९
१८ ऑक्टोबर ६,२८७
१९ ऑक्टोबर १०,१०६ आत्ता दुपारचे २ वाजले आहेत एथे सो अजुन १००० स्टेप्स तरी होतिलच अजुन

गेला आठवडा: ८०,९४८ पावले - ३६.१ मैल = १५,६२५ कॅलरी..
मेटाबोलिझम - म्हणजे पचनशक्ती - तुमच्या शरीराची अन्न पचवायची क्षमता...

गोगा फक्त चालतच फिरता का सगळीकडे? Happy Light 1

आरएमडी>> मस्त.

मी इथे रोमातच होते.
लेवल २ चे उद्दिष्ट ठेवलेय पण एन्ड ऑफ द डे ६ ते ७००० पावलेच होतात. Uhoh

ऑक्टोबर १२ : १०२७५
ऑक्टोबर १३ : १०६६८
ऑक्टोबर १४ : १०१३१
ऑक्टोबर १५ : १०५७३
ऑक्टोबर १६ : ६७०५
ऑक्टोबर १७ : १०७४६
ऑक्टोबर १८ : १०२९२

LAMarathi तुम्ही १०,०००+ च्या क्लबात नक्कीच आहात.. चालू ठेवा... Happy

पुढे थंडी आल्यावर काय करायचे ठरवावे लागेल. आजच जवळपास पाण्याचं बर्फ होतंय... ( किमान ३१, कमाल ५२)

गोगा, अश्विनी, थॅन्क्यू.....
पण त्यावर लक्ष कसे ठेवायचे? काय लक्षणे?

(गोगा म्हणले की मला आमचे गामा आठवताहेत... Proud )

चयापचय क्रिया -- ही प्रत्येकाची वेगळी असते.. आणि बहुतेक लोकांमधे वयाप्रमाणे ती कमी होते.
वयस्कर माणसांची भूक मंदावते. तरूण वयात ते जेवढं खायचे तेवढं खाऊ शकत नाहीत, किंवा खाल्ले तर वजन वाढते...
Metabolism वाढवण्यासाठी काही उपाय ऐकले आहेत, पण मला अजूनही एकही खात्रीलायक उपाय सापडला नाही.
(भरपून व्यायाम केला तरी)

Pages