"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSCN1057-1.JPG

आज सकाळी बाप्पाला हे कशेळीच्या लक्ष्मीनारायण मंदीरातल्या झाडाचं फूल अर्पण...
म्हणतात हजारी मोगरा पण मोगर्‍यासारखा इन्फ्लोरेसन्स नाहीये. आणि फुलाचा आकार,प्रकार पण मोगर्‍यासारखा नाहीये.

kashelichya-devalatali-phule.jpg

हो गं नि. याला हजारी मोगराच म्हणतात. याच्या झुडुपाला हमखास लाल डोंगळे वारुळ करतात. चावलाय एकदा मला डोंगळा फुल काढताना.....आठवुनच अंगावर काटा आला...

मला दोन्ही वेळा हे फुल काढायचा प्रयत्न करताना पायात काटा गेलाय. एकदा मी अनवाणी होते तेव्हा हवा टाइट झाली होती माझी आणि एकदा फ्लोटर्स घालून होते पण चांगल्या जाड फ्लोटर्सच्या आरपार जाऊन मला खूपत होता.
याचं एक फूल काढून पाह्यल्यावर वरच्या पाकळ्या सोडल्या तर मोगरा जातीचं काहीच नाही या फुलात हे लक्षात येईल. पण वास मात्र अशक्य वेड असतो!

फोटो बघूनच प्राजक्ताचा वास दरवळला आणि पुण्याचा वाडा, सकाळच्या शाळेत जाताना रस्त्यात अधून मधून दरवळणारा प्राजक्त असं सगळं काही आठवलं...

वाह प्राजक्त आला का.. कालच विचार करत होते की प्राजक्त कसा नाही.. ? हे माझ्याकडून..

IMG_0868.JPG

अदिती व सखी सहीच. Happy बाकी बकुळ ती बकुळ. माझ्या लिस्टमधे १ नंबरचे हे फुल. २ नंबर पारीजातकाचा, त्याचा सडा हवाच. एकटे बघायची सवय नाही.

Pages