चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा, इतके सगळे मायबोलीकर व्यायामाबाबत सजग आहेत हे बघुन खूपच बरे वाटले.
रारने असा धागा काढला ते बरे झाले. खूपच उपयुक्त माहिति मिळत आहेच, शिवाय, इतकेजण करताहेत, आपणही करुन बघुयाच, अशा काहिशा प्रकारचे उत्तेजनही मिळते आहे. Happy

४ दिवसांमधल्या स्टेप्स

रवि: १०४८८
शनि: २१८४६
शुक्रः १५३२१
गुरू: ९२०९

आज आता परक कमी होतील कदाचीत. मिटींगडे Wink

सुंदर उपक्रम! फक्त पावले मोजत नाहीये. मैल मोजतोय!

मागच्या आठवड्यात ३ दिवस प्रत्येकी ३ मैल चालणे झाले. या आठवड्याचे टार्गेट ३.५ मैल!

हापिसाक पायी जाता की काय देसायनू? <<< रोज... २.५ मैल आहे.. एकदा जाऊन परत येईपर्यंत ५ मैल होतातच..
शनिवार/ रविवार ट्रेडमिलवर... Proud

आशुतोश, बरोबर आता हा प्रोजेक्ट Happy

ऑक्टोबर २: ७९५०
ऑक्टोबर ३: १२,६६९
ऑक्टोबर ४: ५,८००
ऑक्टोबर ५: १०,७५०

मी काल १ तास २० मिनिटे चाललो.

एका जागी सायकलिंग करताना वापरता येऊ शकेल असे काही अ‍ॅप आहे का ?

एका जागी सायकलिंग करताना वापरता येऊ शकेल असे काही अ‍ॅप आहे का ? >>

आहेत. पण मग सायकलला टर्बो ट्रेनर लावावा लागेल तरच ते स्पीड, मैल वगैरे मोजता येईल. जीम मधील सायकल चालवली तर ती नोंदवता येणे कठीण आहे. त्या सायकलाच्या डिस्प्लेवर जो डेटा असेल तो उपयुक्त ठरेल.

जीम मधील सायकल चालवली तर ती नोंदवता येणे कठीण आहे. त्या सायकलाच्या डिस्प्लेवर जो डेटा असेल तो उपयुक्त ठरेल.
>> धन्यवाद केदार . त्यावर बराच डेटा येतो पण तो बरोबर वाटत नाही Happy

रोज जमेल तितकं चालतेच. काल मुद्दाम लंच टायमातला वॉक आणि संध्याकाळी स्टेशन ते घर चालताना पावलं मोजली.

६ ऑक्टोबर - ४००० + २७०० = ६७०० (हे एवढे आतापर्यंत आठवड्यातून ४-५ दिवस होत होते). आता अजून वाढवायचा प्रयास करणार.

ऑक्टोबर १: ४,३२३
ऑक्टोबर २: १५,२०९
ऑक्टोबर ३: २,४४९
ऑक्टोबर ४: ८,९२०
ऑक्टोबर ५: १०,८१८
ऑक्टोबर ६: १६,१८८
ऑक्टोबर ७: १५,७८२
एकुण: ७३,६८९

५: ६०८८
६: १४६०२

बरं चालू आहे. काही दिवस अगदीच मिटींग असल्याने १०००० होत नाहीत पण मग दुसर्‍या दिवशी भरून काढले जातात. नेहमीच्या कम्युट मध्ये जनरली ५००० - ६००० होतात. बाकीचे मग जरा चालावे लागते.

Pages