बकरी ईद..

Submitted by सचिन कुलकर्णी on 25 September, 2015 - 04:53

बकरी ईद:

हैद्राबादमध्ये गेले ४ वर्ष राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या मुस्लिमबहुल इलाक्यांमध्ये बकरीचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्याकडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे विक्रीसाठी आणले जातात. कुर्बानीसाठी भाविक लोक, मोठ्या कुटुंबातील लोक तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).

खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य दिसते. रस्त्यावरच बकऱ्या कापल्या जातात त्यामुळे त्यांच्या रक्ताचे पाट रस्त्यांवरून वाहत असतात, तिथेच मांस विक्री होते, तिथेच त्यांची कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि आरोग्याच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगल्या जातात इथे..

तुम्ही प्रथेप्रमाणे कुर्बानी करा आणि समाजातल्या एका मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावरदेखील आक्षेप नाही पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हे सारे साजरे करता येणार नाही का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही येथील मान्यवर सदस्य श्री सचिन पगारेंना संपर्क करा, माबोवरील वाचीव माहितीनुसार ते सामाजिक कार्य सुद्धा करतात.

ज्या देवस्थानाजवळ शाकाहारी जेवणावळी उठतात तिथेही हाच प्रकार असतो. उगाचच इस्लाम , इद वगैरेला झोडपू नये.

वॉर्ड स्वछ ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याना कळवावे.

मला वाटले की बकरी इद ची माहिती देणारा धागा असेल.
पण वेगळाच विषय आहे.

बकरी इद का साजरी करतात? त्या दिवशी काय काय करतात?

बकरी इद का साजरी करतात? त्या दिवशी काय काय करतात?
<<

ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला, विकिपीडीयाचा अभ्यास करुन लबाडकोल्हा अगदि व्यवस्थित देऊ शकतो. Proud

बकऱ्या मारण्यावरदेखील आक्षेप नाही पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हे सारे साजरे करता येणार नाही का ?

>>>>>

ईंटरेस्टींग !

एक जीव जातोय ते चलता है, मात्र स्वच्छता आपली प्रायोरीटी.

लोकहो, आपल्या संवेदना गोठत आहेत का?

खरंय ऋ
Sad

कणकेची बकरी करुन तिचा बळी दिला तर?
मग ती कणिक प्रसाद म्हणून खावी सर्वांनी.

हत्या पण नको नि घाण ही नाही. ईको फ्रेंडली इद Happy

कर्मकांडात पुर्वी बळी द्यायचे त्या ऐवजी आता कोहोळा किंवा भाताच्या पासुन बनवलेली आकृती वापरतातच
तसे काहिसे करता येऊ शकतो

राहुल १२३

माझे वरचे वाक्य तसे असले तरी एक नमूद करू इच्छितो की मी स्वताही एक अट्टल मांसाहारी आहे.
पण कुठल्याही शाकाहारी व्यक्तीईतकाच वा त्यापेक्षाही जास्त संवेदनशील आणि भावनात्मकही आहे.

रक्त सांडताना, मग ते माणसाचे असो, बोकड नामक खाद्याचे असो, वा रस्त्यावरच्या कुत्र्यामांजरीचे असो, मला बघवत नाही.

वर माझा मुद्दा असा होता की स्वच्छता ईथे गौण मुद्दा झाला, पण एखाद्या जीवाची हत्या सार्वजनिक जागेत होऊ नये, एखादा जीव तुमचे खाद्य असेल तर ते मारा आणि खा पण त्याला हालहाल करून मारू नका, किंवा त्याचा समारंभ करू नका.

अर्थात विषय बकरी ईद निमित्त असला तरी हेच विचार माझे हिंदू वा ईतर धर्मात दिल्या जाणार्‍या बळींबद्दलही आहेत. नेपाळमध्ये जत्रेच्या नावावर चालणार्‍या म्हशींच्या कत्तलीवर मागे मी धागाही काढला होता.

हलाल मला माहीत आहे.

मी तो शब्द हालहाल म्हणूनच वापरला होता. हलाल संदर्भात नाही तर कुठल्याही बळीबाबत. हालहाल न करता म्हणजे एकाच फटक्यात मारा आणि खा, तमाशा कशाला.
मागच्या ज्या नेपाळच्या धाग्याबद्दल मी बोलत आहे त्या बातमीतही वाचलेले की त्या म्हशींना त्या जत्रेच्या जागी जसे फरफटत नेतात त्या त्यानेच मरणोन्मुख झालेल्या असतात, ते सुद्धा हालहालच झाले.

मी आजोबांना लहानपणी कोंबडी कापताना बघायचो, एका फटक्यात.
त्यानंतर एकदा एका बोकडाला अत्यंत वाईट पद्धतीने मारताना पाहिलेले, ते नाही सहन झालेले. मी जवळपास दोन वर्षे मटण खायचे बंद झालेलो. चिकन खायचो, पण मटण म्हटले की खाल्यावर छातीत कळ आल्यासारखे वाटायचे.

भले आपले खाद्य म्हणून एखादा जीव घेणे स्वार्थ म्हणा किंवा निसर्गाचा नियम. पण कारण नसताना त्याचा जीव तडफडवत घेणे याला आसुरी वृत्तीच हवी.

ऋन्मेऽऽष, मी तुझ्या बाबतित एक भविष्यवाणी करत आहे.
तु तुझ्या स्वता:हाच्या इच्छेने एक दिवस कट्टर शाकाहारी होणार.

सकुरा, तसे झाल्यास तो दिवस माझ्य आयुष्यातील शेवटचा असेल ही भविष्यवाणी करण्यास कोणी ज्योतिषीही लागणार नाही.
कारण मला मोजक्या २-४ च भाज्या आवडतात, मी मांसाहारावरच तग धरलाय, म्हणूनच कुठला सणवारही पाळत नाही Happy

ऋ, भविष्यवाणी मागे घेण्यात आली आहे.

चिंता नसावी तरी पर्याय सुचवते.

पनिर्,सोया पनिर(टोफु) सोया वडी, मश्रुम्,अंडी,राजमा,चवळी,मसुर्,दाल-मखानी,पकोडा-कढी,दाल तडका अजुन बर्‍याच भाज्या.

सकुरा तुम्ही वर शाकाहारी पदार्थांमध्ये अंडी का लिहिले ?? Uhoh

बाकी वरीलपैकी कढी पकोडा सोडले तर सार्‍या भाज्या मला बोर वाटतात Sad

पनीर आणि मश्रुम तर हॉटेलवाल्यांनी पैसे उकळायला भाव देऊन ओवरहाईप करून ठेवलेले पदार्थ आहेत.

अंड्याच्या बाबतित जिव मारल्याची भावना कमी वाटते.

पनीर आणि मश्रुम तर हॉटेलवाल्यांनी पैसे उकळायला भाव देऊन ओवरहाईप करून ठेवलेले पदार्थ आहेत.>>

हो बरोबर आहे पण रोजच्या . दुधी,दोडका,कोबी,वांगी या भाज्यांपेक्षा थोडे वेगळे ..

आपला आपला दृष्टीकोण .. एखादा जीव पुर्ण उमलायच्या आधी घेतला असेही एखाद्याला वाटू शकते..
तसेच एकावेळी दोन अंडी खाल्ली म्हणजे दोन अख्खे जीव .. अन्यथा बोकडाच्या बाबतीत तो पाचपन्नास जणांनी मिळून खाल्ला तर तेवढीच पापाची भागिदारी कमी

रोजच्या . दुधी,दोडका,कोबी,वांगी या भाज्यांपेक्षा थोडे वेगळे ..
>>>
हो पण मी यातली एकही भाजी खात नाही.
कोबी खातो, पण कच्चा कोबी. चिकन तंदूरी बरोबर सलाड म्हणून खायला बरा लागतो.. जर चिकनच सोडले तर आपसूक कोबीही बाद Happy

ऋ,
आपला आपला दृष्टीकोण >>.हो बरोबर आहे मला पण तेच वाटते.शाकाहारी सात्विक सोज्वळ व मांसाहारी वाईट असे जर कोणाला वाटत असेल तर माझा या गोष्टीवर विश्वास नाही.

माझी दोन्ही मुले मांसाहारी आहेत.एक जपान मध्ये व एक अमेरिका मधे त्यांच्या साठी हेच सोईचे व आवडिचे आहे.

सचिन कुलकर्णी - कृपया धाग्याचा विषय बदलून "ऋन्मेऽऽष ला न आवडणार्‍या भाज्या व आवडणारे पदार्थ" असा कराल का? ह्यापुढील चर्चा त्याच अनुषंगाने चालेल असं दिसतय.

ऋन्मेऽऽष, दिवे घे बर का!

चौकट राजा Proud

जोक्स द अपार्ट, जर एखादा वादग्रस्त वळणाला जाण्याची पुरेपूर शक्यता असणारा विषय हलक्याफुलक्या वाटेला लागलाय तर चांगलेच आहे की Happy

सुरुवात विषयाला धरूनच आहे, सहजपणे विषय मांसाहारावर गेला ईतकेच. जे अगदीच अवांतरही नाहीये इथे.

सध्या हे शाकाहार मांसाहारामध्ये धर्मीय राजकारण फार घुसत आहे

Pages