तेचबूक ! - तुच्छता हीच श्रेष्ठता - ग्रुप

Submitted by टवणे सर on 19 September, 2015 - 19:30

रात्री तंगडतोड करत कुठल्याही रस्त्याने सिंहगडावर यावे. उदाहरणार्थ बिडी-काडी स्वतःच्या जबाबदारीवर.
अ‍ॅडमिन: पांडू सांगवीकर

प्रो. चांगो: तुमचं बरय हो. वडिलांनी तुम्हाला फेल झालं तरी जमिनीचं घबोलं ठेवलय. येणार्‍या जाणार्‍या भटक्यांच्या वह्या ऐकून तुमचे काम तृप्त. आम्हाला मराठवाडा, सीमाभाग नायतर उत्तर महाराष्ट्रात धगुरड्या पोरांना शेक्सपिअर शिकवाचे काम. पुण्याला यायचे म्हणजे ट्रेनच्या डब्यातल्या लॅटरीनचा वास नाकात भरून राहणार. त्यापेक्षा कॉटवर उंच उशी डोक्याशी घेवून कोळ्याची जाळी बघितलेली बरी.

लाइकः चंद्रकांत पाटील-नायगावकर, रंगोबा पाठारे, कमलाकर वाले

दानशूर मृत्युंजयः किती दिवस रडणार पाटील! ढ्याण ढ्याण ढ्याण! आमच्या महालातील भव्य कनाती बघा. सौंदर्य बनवावे लागते, मागून मिळत नाही. चार वर्षं एकामागोमाग एक विद्यालयातून लाथाळले तरी तुमचा स्वाभिमान दिसत नाही. बर, एक स्क्रिप्ट लिहायची आहे. हिंदीत. घेता का? त्याच्यात मागे आहे त्यामुळे सिंहगडाला पास!
डिसलाइकः चंद्रकांत पाटील-नायगावकर, रंगोबा पाठारे, कमलाकर वाले
लाइकः देसाई, देशपांडे, पुणे-पश्चिम महाराष्ट्र पांढर्‍यावर काळे असोसिएशन

तत्ववेत्ता: गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडून अपेक्षा करता आणि जास्त दु:खी होता
लाइक:१०,१२,१२३
रिप्लायः परवाना तत्त्ववेणे: सर, तुम्हीच आमची प्रेरणा, तुम्हीच आमची स्फुर्ती.

युगंधरा: सिंहगडावर नाही जमणार हो या वेळी. तुम्हाला माहितीच आहे प्रौढ कुमारीका आली एकटी गडावर तर गावात काय होईल. मात्र कोल्हापूरला आलात तर आमच्याकडे नक्की या हं! नानांना उजव्या बाजूला मागल्या वर्षी लकवा भरला तेव्हा मी ज्योतिबाला नवस बोलले होते की ते परत आपल्या हाताने खाऊ लागले तर पेढ्याचे ताट वाहीन. कालच नानांनी पहिल्यांदाच गेल्या वर्षभरात हातात चमचा धरला. मी आनंदाने ताट आणले तर लक्षात आले डाव्याच हातात होता चमचा. मी फणी करताना चुकून आरशातून बघितले ना! आता चार पेढे शेजारच्या सुलक्षणा वहिनींनी नेले, दहा बंडूने, पाच मी खाल्ले, दोन पेढ्यांना मिक्सरमधून काढून नानांना खीर भरवली. तुम्हाला पण दोन देईन.
लाइक: आशा कुलकर्णी, संयोजिता नायगावकर, मंगला गोडघाटे

रिप्लायः पांडू : म्हणजे युगंधरेकडे पेढे किती राहिले?
चांगो: यांच्या रोज उठून दैनंदिनी लिहिण्याच्या सवयींमूळेच मायमराठीच्या तेचबूकाचे डबके झाले आहे.

सखाराम: आपल्यला येला काय जमायचं नाय! था किट्ट, थोम किट्ट. आहाहा!! मृदंग बडवून बोटं दुखायला लागली. पण काय आवाज लागलावता आज.
लक्ष्मी: अरे लबाडा, इथे लपून बसला आहेस होय.
चंपा: ए भाड्या, ते डमरू बडवायचं बंद कर बघ लवकर. नायतर कमरेत लाथ हानीन
प्रो. चांगो: ओ तुमची घरातली भांडणे घरात करा. तुम्ही आलात की आमचे लाइक्स कमी होतात आणि! तुमचं कोणाला समजत नाय. सगळं दुग्ध्यात! तसेही तुम्ही जातीयवादी का नाही ते कळत नसल्याने इथे घोळ उडतोय.
गणपती: मी एन्ट्री घेऊ का? मला श्री गणराय श्री गणराय नर्तन करी ऐकू येतय.
सखारामः ए तू पलिकडल्या घरात जा. कोतवाल तिकडे हैत. सगळी चाळ एकाच मालकाची, ह्येचा तिकिट काढून तेच्यात येतात लोक आजकाल साले.
डिसलाइकः पुभावे, दाकोंडे, भगवा जाळ संघटना.
सुपर लाइकः ब्रिजेट जोन्स

हत्यात्या: अरे सिंहगडावर काय शिवबा रात्री चर्चा करायला जायचे? तिथे होत घमासान लढाया. तुम्ही बिड्या ओढत नुस्ते गप्पा हाणणार. छ्या!

सुर्श्या: हे हाड्
मद्राशी: ए फुट्
राधा: अगो बाई, आता इथेपण पाचकळ
बापू: राधे, अगं साकवावर नारळ पडला होता. आणला तर सागोती करशील ना? दाम्या पण येईल.
राधा: दामूभावोजी, अहो ह्यांचे ठिके पण मच्छी खाल्लेन तर तुम्हाला आई घरात घेतील का?
पांडू: पेंडसे अहो हे गुळमुळीत बंद करा. बापू खोलीत कधी जाणार राधेबरोबर? Wink
लाइकः सगळेच!
पेंडसे: स्वर्गात कोकण शोधतोय. मिळाला की लिहितो. बाकी तुमच्या लाडका खानोलकर इथे लघुकथा लिहितो.

तत्ववेत्ता: कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.. पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावं लागतं.. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही...
लाइक:१०,१२,१२३
पांडू: तरी बरं यांना गाढवाच्या उपमा नाही सुचल्या!!
लाइकः चांगो, रंगोबा!
रिप्लायः परवाना तत्त्ववेणे: सर, आजच्या युगात तुमच्यासारखी स्फुर्तीस्स्थाने उरली नाहीत हे या मायभूचे दुर्दैव. माझ्या विद्यार्थ्यांना द्यायला तुमची सोडून कुणाची अवतरणे? आता उरलो मी एक वेडा परवीन तत्ववेणे!

बाबा: ते राहूदे, सिंहगडावर मडक्यांच्या कपच्या मिळाल्या तर आण. मी मोहोंजदडोच्या आहेत म्हणुन खपवून देईल. शिष्यवृत्ती संपत आली पण अडगळीतून थांग लागेना.
पांडू: ओ बाबा, हे तुम्ही माझ्या स्टेटसवर पब्लिक रिप्लाय मध्ये टाकलय, ते ऊडवा आणि नुसती मेल करा.

होल्डन कॉलफिल्ड (रिप्लाय टू बाबा): अरे तू मला अजून रॉयल्टी दिली नाहीस, ५५ वर्षे झाली! तेव्हा म्हणालास कुलकर्ण्यांनी पैसे बुडवले. पण पुढे ५० आवृत्या निघाल्या की. आता तर तुम्हाला मानमरातब पण!
रास्कालनिकॉव्ह (रिप्लाय टू होल्डन): मी घोड्याला मारणार्‍या जुलमी गाडीवानाचे स्वप्न बघितले आणि त्याच्या भाडवलावर तुम्ही कादंबर्‍या लिहिल्यात. मलाच सगळ्यांनीच रॉयल्टी दिली पाहिजे.
चांगो: अहो तुमची बाडं वाचतय कोण? मुखपृष्ट पाहिले तरी विद्यार्थी झोपतात. आधी अ‍ॅब्रिज्ड एडिशन काढा. मग रॉयल्टी मागा. तुमच्या मुळे आम्हाला कादंब्र्या छापायला कागद मिळत नाहीत!
कस्टम्स अधिकारी: बाबांना लघुकथा लिहायला सांगा की. आमचे कस्टम्सच्या आणि सांगलीच्या भांडवलावर आयुष्य निघाले. तुमच्या बाबांना तर किती लोकांनी हाकलले, अनुभवच अनुभव.
पांडू: बाबा लघुकथेसारख्या तुच्च्छ गोष्टीला लाथाडत पण नाहीत.
सर्वांचे लाडके: सारखे लाथाडून लाथाडून आता लोक चुकून जाळचंद्र लाथाडे म्हणतात ह्यांना! ख्याख्याख्या!!
सुर्श्या: हे हाड्
मद्राशी: ए फुट्
पुणे आणि डोंबिवली अक्षरओळख संस्था (गिरगावात उपशाखा, दादरला उपकार्यालय): या असल्या हाड् आणि फुट् समीक्षेने लोकांना दुरावलात तुम्ही. आणि शिष्यवृत्त्या घेऊन लिहिलेत काय? तर मडक्याच्या कपच्यातली अडगळ. घेतो कोण विकत ती. आमचे लाडके अजून सर्वाधिक खपाचे आहेत.

तत्ववेत्ता: जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही माहिती असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल ते सांगता येत नाही.
लाइक:१०,१२,१२३
रिप्लायः परवाना तत्त्ववेणे: कालच एका विद्यार्थ्याची आई त्याला घेऊन माझ्याकडे आली होती. माऊलीच्या डोळ्यात अश्रुंचा महापूर. तिला मी हेच वचन माझ्या शैलीत ऐकवले. शांत चित्ताने ती परत गेली. (मुलगा तसाच ढिम्म बसलेला).

सेम सेमः
भांडू नका, लाथू नका
पुढे मागे बघू नका
इथे काय आन् तिथे काय
रॉयल्ती मिळाली की पसरेल पाय
शेवटी पांढर्‍यावर काळे दिसते
तुमचे आमचे सेम असते
डिसलाइकः: आरती., ग्रेसफूल, ह.ना.पाखारे, भो भो जोरदार....................................... आणि अजून अजून ११६२३१४

पांडू: जेव्हडे लिहितात त्यापेक्षा कमी वाचतात! लेखकांकेक्षा वाचक कमी असला प्रकार यांचा. छापायला स्वस्त म्हणुन छापणार. कागद लाख रुपायला एक असता तर एक कविता छापली असती का कुणी?

तत्ववेत्ता: समोरचा आपल्याकडे सतत पाहतोय हे त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही!
लाइक:१०,१२,१२३
रिप्लायः परवाना तत्त्ववेणे: सर आज तुम्ही असता तर तुमच्या पादुका मी दिंडीत नाचवल्या असत्या.
रिप्लायः: तत्ववेत्ता: मी तुमच्याकडे सतत पाहतोय हे लक्षात आलं का? तेव्हडं रॉयल्टीचं बघा की, किती दिवस माझ्या कल्पनांवर तुंबड्या भरणार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय भारी लिहीलंय.

तत्त्ववेत्त्याच्या चुकून प्रेमात पडायला होईल की हो अशाने!
Wink

युगंधरेचे स्टॅटस आणि लाईक मारणारी मंडळी आवडली.

सेम सेमगावकरांची कविता पण भारी.

छान

तत्ववेत्ता जबरदस्त.
टच्याआले आणि टच्यानाले नाहीत काही. टच्याआले आणि टच्याखआले आहेत. अ‍ॅडमिनवरून पण सिद्धं होतय की Happy
"उदाहरणार्थ" लिहीलय पण "वगैरे" नाही लिहीलं म्हणून निषेध.

मी फणी करताना चुकून आरशातून बघितले ना! >>>
बाबा: ते राहूदे, सिंहगडावर मडक्यांच्या कपच्या मिळाल्या तर आण. मी मोहोंजदडोच्या आहेत म्हणुन खपवून देईल. शिष्यवृत्ती संपत आली पण अडगळीतून थांग लागेना.>>>

टू गुड. मी प्रेमतेय या तेचबुकावर Wink

जबरदस्त!! Lol

व्यक्तीरेखांची नावं एकदम सही. तत्त्ववेळे किंवा तत्त्ववेणे जे कोणी आहेत ते लै भारीयेत.

वेणे नाहीतच्च ते.
वाळे आहेत.
वेणे तोपर्यंत उगवले नव्हते.
किंवा टण्याच्या आ /न आ यादीत पोहोचायचीपण तत्त्ववेण्यांची क्षमता नाही.
Wink

बघा, सगळ्यात भाव खाऊन गेले ते कोण - तत्ववेत्ता! Proud ग्लासभर सरबतात तरंगणार्‍या चार केशराच्या काड्याच नजरेत भरतात. पिळवटून, विरघळून स्वतःचं अस्तित्वंच विसरुन गेलेल्या साखरलिंबांचं दु:खं स्वतः चव घेतल्याशिवाय कळत नाही.

पिळवटून, विरघळून स्वतःचं अस्तित्वंच विसरुन गेलेल्या साखरलिंबांचं दु:खं स्वतः चव घेतल्याशिवाय कळत नाही.
>>
जळातील मासा,
निद्रा घेतो कैसा,
खावा त्याचा रस्सा.
तेव्हा कळे !

Rofl