अमेरिकेत कोणी गणपतीची मूर्ती बनवली आहे का?

Submitted by सानुली on 21 August, 2012 - 14:47

कोणी अमेरिकेत गणपतीची मूर्ती बनवली आहे का? असेल तर मला जरा डिटेल्स सांगणार का? कुठ्ली माती, कुठले रंग वापरलेत? कुठे फर्नेस मधे नेलीत का? त्यातल्या त्यात eco-friendly options असतील तर आवडतील, म्हणजे पाण्यात विसर्जनही करता येईल. मदतीबद्दल आगाऊ (आयडी नव्हे :)) धन्यवाद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक युक्ती देतो.
यावर्षी कोणाकडे चांगली मूर्ती विसर्जन करण्याअगोदर त्याचा साचा बनवा.साचे तीन चार तुकड्यात बनवायचे.
१)तोंडापासून गळ्यापर्यंत. पुढच्या अर्ध्या भागाला प्लास्टर लावून काढून घ्यायचे,मागच्या अर्ध्या भागाचाही बनवायचा.असा दोन भागाचा एक साचा तोंडाचा झाला. मुख्य म्हणजे तोंड सुबक यावे ही अपेक्षा पुर्ण होते.
२)उजव्या आणि डाव्या हातांचे असेच अर्धे जोडसाचे बनवा.
३)मांडी -बैठकीचा वेगळा.

http://www.amhimarathe.com/online-courses/

बहुतेक महाराष्ट्र मंडळ बे एरियातर्फे गणेश उत्सवाच्या सुमारास वरील संस्थेकडुन एक कार्यशाळा पण घेतली जाते.

गेले २ वर्श काही ना कारणाने इच्छा असुनहि मुर्ती बनवायचे राहुन जात होते, यावर्शी हिय्या करुन माती आणलि आणि केला अजुन रन्गकाम बाकी आहे. उन्दिर लेकिने बनवलाय, तिला शाळेत मातिकाम असल्याने तिने बर्‍याच सुचना दिल्या.smiley2.gif
रन्ग वाळायला किती वेळ लागतो?

image_32.jpg

धन्यवाद सानुली आणि सिन्डाक्का! अजुन एक प्र्श्न अक्रॅलिक रन्ग दिल्यावर पाण्यात मुर्ती विरघळते का लगेच? का वॉटर कलर देवु?

बाप्पा रन्गवल्यावर, अ‍ॅक्रिलिक रन्ग वापरले, मायकल मधुन सॅटिन फिनिश रन्ग आनले.
डोळे काढायला फाइन पॉइन्ट परमन्ट मार्कर वापरला.
इथल्या कलाकाराच्या मुर्ती पाहुनच प्रेरणा घेतली , बाप्पा मोरया!

image_33.jpg

काहीवेळा असे होते मुर्ती चांगली बनत नाही. किंवा बनली तर पुर्ण करायची राहून जाते. काहीवेळा अपुर्ण मुर्ती तशीच राहते. तर याचे काही परिणाम आहेत का असा प्रश्न मी नाशिकच्या गुरुजींना विचारला.

त्यांनी सांगितले की,
'कोणतीही मुर्ती किंवा प्रतिमा ही प्राण प्रतिष्ठा झाल्या नंतरच पूजनाला सिद्ध होते.
तोवर तो फक्त दगड माती यांचा कलाकृतीपूर्ण आकार असतो.
विसर्जनाच्या वेळी आपण त्या प्राणाला परत येण्याचे आवाहन करतो, म्हणजेच निरोप देतो.

त्यानंतरही उरलेली मुर्ती फक्त दगड माती यांचा कलाकृतीपूर्ण आकार असतो. त्याचे आपण विसर्जन करतो. तेव्हा घडणे आणि विसर्जित होणे हे नैसर्गिक चक्र आहे. तेच येथे ही लागू होते.'

मुर्ती बनवताना नि:शंकपणे मुर्तीकलेचा आनंद घेता यावा म्हणून हे येथे नोंदवले.

Pages