गरज विवेकी धर्मजागराची- डॉ नरेंद्र दाभोलकर

Submitted by प्रकाश घाटपांडे on 16 September, 2015 - 04:04

गरज विवेकी धर्मजागराची

[दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]

(नरेंद्र दाभोलकर)
धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.

आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्‍नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्‍वराची आज्ञा म्हणून ईश्‍वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्‍वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.

आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्‍न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.

आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.

न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.

- नरेंद्र दाभोलकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालबाह्य व तर्क-विसंगत धार्मिक रूढी फेकून द्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदू समाजाला आवाहन . ही बातमी वाचल्याने डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या दै. सकाळ मधील लेखाची आठवण झाली म्हणून हा लेख उधृत केला आहे.

>>धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे.<<

संविधानात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या/आशय आहे? खरंच जाणुन घ्यायचं आहे.

आणि असल्यास, ती राबवली जात का नाहि?

राबवली जात नाहि, यात चुक सरकारची (राजकिय पक्षांची) कि धर्ममार्तंडांची?

दाभोलकर सराची समाजकारणातली उणिव प्रकर्षाने जाणवतेय.समाजाला पुराणकाळात नेणारे, पोथिनिष्ठ ह्या विरूध्द लढा देउन त्यांनि एक आदर्श घालुन दिला.लेख आवडला.

>>त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे.<<

हे व्हायला हवंच, त्याच्बरोबर खंबीर सरकारी धोरणांची सुद्धा तेव्हढीच गरज आहे...

व्वा!!! हिंदूंनी सार्वजनिक रित्या साजरे केलेले सणवार दांभिक आणि संविधान विरोधी एव्हढाच रोख आहे या लेखाचा. बाकी इतर धर्मीयांबद्दल आणि त्यांनी रस्त्यावर येऊन साजरे करणार्‍या सणसमारंभाबद्दल अळीमिळी गुपचिळी. इतर धर्मीयांच्या अश्या वर्तनाबाबत भाष्य करण्यासाठी लेखणीतून शाई झरत का नाही?

एकदम एकांगी आणि विशिष्ट पद्धतीने एखाद्या धर्माच्या समुहाला खिजवण्यासाठी लिहिलेला लेख हे माझे ह्या लेखाबद्दल वैयक्तिक मत.

राज,

>> संविधानात धर्मनिरपेक्षतेची व्याख्या/आशय आहे? खरंच जाणुन घ्यायचं आहे.

संविधानातल्या कुठल्याही कलमात धर्मनिरपेक्ष हा शब्द आढळून येत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे.

आ.न.,
-गा.पै.

इतर धर्मीयांच्या अश्या वर्तनाबाबत भाष्य करण्यासाठी लेखणीतून शाई झरत का नाही?>> इतर धर्मांविषयी लिहो अथवा न लिहो, आत्ता जे हिंदू सणांबद्दल लिहिलेले आहे ते तर चुकीचे ठरत नाही ना...त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

जरा धर्माचा चष्मा काढून पाहायला शिका. देशात ज्या धर्माची साधारण ८०% लोकसंख्या आहे त्याचीच उदाहरणे जास्त मिळणार तुम्हाला...एवढे साधे लॉजिक कळू नये काय?

अशाप्रकारे तिसर्‍याच कुणाचा लेख चवथ्याने धागा म्हणून "उधृत" करणे माबोच्या धोरणात बसते का?
प्रताधिकार वगैरे प्रकर्णाचे काय? सकाळ / दाभोलकर यांची परवानगी घेतली आहे काय?

>>अशाप्रकारे तिसर्‍याच कुणाचा लेख चवथ्याने धागा म्हणून "उधृत" करणे माबोच्या धोरणात बसते का?<<
माबोच्या धोरणात बसत नसल्यास लेख उडवून टाकण्याचे त्यांचे अधिकार आहेतच
>>प्रताधिकार वगैरे प्रकर्णाचे काय? सकाळ / दाभोलकर यांची परवानगी घेतली आहे काय?<<
उधॄत करणे म्हणजे चोरणे नव्हे. फेअर युज मधे हे सर्व प्रकरण बसते.प्रताधिकाराचा भंग झाला म्हणुन जर तुम्हाला कायदेशीर कारवाई करावयाची असल्यास मी ती इष्टापत्ती समजतो. दाभोलकरांचे लेख संदर्भ म्हणुन देण्यास वा उधृत करण्यास मी दाभोलकरांची त्यांच्या हयातीत कायमस्वरुपी तोंडी परवानगी घेतली आहे. प्रसंगी मी ते सिद्ध करु शकतो
याच विषयावर दाभोलकरांचे वसंत व्याख्यानमालेत टिळक स्मारक मंदिरात २००७-०८ च्या दरम्यान आम्हीच खरे धार्मिक या विषयावर व्याखान ठेवले होते. त्यासाठीचा मी समन्वयक होतो.

समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता ही तत्वे इंदिरा गांधीनी आणीबाणीत संविधानात घुसवली होती हे वाचले. मागे केंद्र सरकारने १९५० मधिल संविधानाच्या प्रस्तावना छापल्याने त्यात ही तत्वे नव्हती, म्हणून गोंधळ झाला होता Proud

नरेश,

दाभोलकर हे खरे धार्मिक होते.स्वधर्माला विद्रुप करणार्या प्रथांच्या गळ्याला नख लावण्याचा त्यान्नि प्रयत्न केला माझ्या धर्मात सारे चांगलेच आहे असा झापडबंद विचार त्यानी कधिच केला नाही.इतर धर्माच्या बाबतीत ते कसे बोलणार आधी स्वताच्या घरातील घाण नको का साफ करायला.

पगारे +१

नरेश, आपल्याला आपला धर्मातील नकोश्या गोष्टी काढायच्या की दुसऱ्या धर्माच्या ... तो विचार महत्वाचा.

नरेश,

आपल्या धर्मात देवदासिची प्रथा होति अजुनही काहि ठिकाणि असेल आता ही प्रथा चांगली कि वाईट हे तुम्हि ठरवा.ह्या प्रथेविरुध्द दाभोलकराना लढताना मि पाहिले.हजारो मुलिंना देवदासी बनण्यापासुन त्यांनी वाचवले.ह्या देवदासिचा उपभोग आपल्याच धर्माचे धनिक घेत.आता दाभोलकरांनी हे जे कार्य केले ते धर्मसुधारणेचाच एक भाग होते.धर्माच्या रक्षणाचा ठेका घेणारे तेव्हा कुठे होते? माझ्या मते धर्मसुधारणा करणारा खरा धार्मिक असतो.फक्त अध्यात्मात रमणारे आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचे फक्त अंधानुकरण करत असतात.

गुडघा ठणकलाच....

बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून ती वाचनास आणि अभ्यासण्यासही त्याज्य आहे असे मानणारा एक वर्ग आहे. हा वर्ग घटना हे पार्लमेन्टरी डॉक्युमेन्ट नसून काँग्रेसी डॉक्युमेन्ट आहे असे मानतो. मात्र घटनेतली सोइस्कर स्वातंत्र्ये हा वर्ग मनःपूत उपभोगतो .ही स्वातंत्र्ये दुसर्‍या ( धर्मिया)स मिळाल्यास त्याच्या तळपायाची आग शेंडीत जाते. ती काढून घेतल्यास आकाशपाताळ एकही करतो आणि ती पुन्हा मिळाल्यास त्याला 'दुसरे स्वातंत्र्य 'वगैरे म्हणतो. त्यामुळे तो फक्त 'कलमे'च वाचतो. त्यात विषिष्ट शब्द न सापडल्यास 'जितं मया जितं मया ' म्हणत नाचूही लागतो. मग 'अगा जे घडलेचि नाही ' असे म्हणत ती संकल्पनाच घटनेत नाही असा बुद्धिभेदही करतो...

आपल्या घटनेस एक प्रिअ‍ॅम्बल आहे . तिला तूर्त प्रस्तावना म्हणू या. या देशाच्या लोकशाहीला कोणत्या दिशेला न्यायचे आहे आणि घटनेतून काय साध्य करायचे आहे त्याचे ते एक दिशादर्शक सूत्र आहे. त्यातील प्रत्येक शब्द साध्य करण्यासाठी वेगवेगळे कायदे , नियम , धोरणे, योजना निर्माण केल्या जातात. ह्या प्रिअ‍ॅम्बल मध्ये ह्या हेतूंसहित ही घटना ( संविधान') आम्ही आम्हालाच अर्पण करीत आहोत असे बहुसंख्य भारतीय जनतेने पार्लमेन्टच्या मुखातून म्हटले आहे. ही प्रिअम्बल संविधानाचा अर्थ लावण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटले जाते.
घटनेच्या अथवा कायद्याच्या तरतुदी च्या अर्थाबाबत संदिग्धता असल्यास तिच्या उद्देशांबाबत ह्या प्रिअ‍ॅम्बलचा आधार घेतला जातो. ही प्रिअ‍ॅम्बल केवळ ओळख करून देणारी प्रस्तावना नसून तो घटनेचाच भाग आहे हे अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. घटनेचे इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहेत, कोणा रेम्या डोक्या पैलवानाना नाहीत.

असो...
ही प्रिअ‍ॅम्बल पुढील प्रमाणे आहे.

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity;
and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

यातील दुसर्‍या ओळीतील सेक्युलर हा शब्द ४२ व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केला आहे.

त्याचा अर्थ अगदी संक्शिप्त स्वरूपात विकीबाबाने दिलाच आहे .
Secular[edit]
Secular means the relationship between the government and the people which is determined according to constitution and law. By the 42nd Amendment, the term "Secular" was also incorporated in the Preamble. Secularism is the basic structure of the Indian constitution. The Government respects all religions. It does not uplift or degrade any particular religion. There is no such thing as a state religion for India. In S.R. Bommai vs UOI (1994) The SC of India held "A state which does not recognise any religion as the state religion, it treats all religions equally". Positively, Indian secularism guarantees equal freedom to all religion. it stands for the right to freedom of religion for all citizens. Explaining the meaning of secularism as adopted by India, AlexandrOwics has written, "Secularism is a part of the basic of the Indian Constitution and it means equal freedom and respect for all religions."[3]

भारतात सुप्रीम कोर्टाद्वारे सेटल झालेल्या 'डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर 'च्या तत्वानुसार पार्लमेन्टलाही घटनेचे बेसिक स्त्रक्चर बदलता येणार नाही . कॉन्स्टिट्युशनल बेंचचे मुख्य न्यायमूर्ती न्या. सर्व मित्र सिकरी ( पूर्ण नाव मुद्दम दिले आहे नुसते सिक्रि म्हतले की लगेच गेले असते त्यांचे पूर्वज शोधायला ) यांनी बेसिक स्ट्रक्चर मध्ये सेक्युलर नेचर ऑफ कॉन्स्टिट्युशनचा समावेश केला आहे.

तात्पर्य : १०० टक्के सांसद यांचे निवडून आले तरी ' ते तसे ' राष्ट्र यांना काही घोषित करता यायचे नाही.
त्यामुळे तूर्त गुडघ्याला शेक घेत बसण्यावाचून काही पर्याय नाही Happy

हो देवदासीन्ची प्रथा खरोखर वाईट होती. ज्या बायका यातुन जातात त्यानाच याचे दु:ख माहीत आहे. आपणही चार लोकात मिसळावे, शिकावे, चार लोकान्सारखा सुखी सन्सार करावा अशी स्वप्ने बाळगणार्‍याना असल्या दिव्यातुन जावे लागणे हे खरे क्लेषकारी आहे. दाभोळकरान्चे यातले कार्य उच्च परीणाम गाठणारे आहेत.

रॉहु तुमचा हा गोड गैरसमज कधीपासुन झाला की आमच्यासारखे ( हो आम्हीच कारण आम्ही मायबोलीकर असल्याने हे वाचु लिहु शकतो) लोक डॉ. बाबासाहेबाना कॉन्ग्रेसचे मानतो.:फिदी: कारण स्वार्थी कॉन्ग्रेसवाल्याना बाबासाहेबान्च्या नखाचीही सर नाही. कॉन्ग्रेसच काय, भाजपावाल्यान्च्या बाबतीत सुद्धा मी हेच म्हणेन. ती जूनी जाणती कॉन्ग्रेस कधीच विलयाला गेली. आता फक्त नाव उरले आहे.

घाटपांडेजी,
मला हा लेख इथे पाहून आनंदच झालेला आहे. अशाच प्रकारचे लेखन इथे टाकता येणे माबो धोरणात बसावे असेच म्हणतो.

*

हुडोबा,
पर्फेक्ट उत्तर.
भारत हा देशच नष्ट करून नव्या राष्ट्राची उभारणी करायची असेल, तर आणी तरच नवी घटना लिहिता येईल अशा अर्थाची एक पोस्ट मागे मी लिहिली होती.
अर्थात असे धागे कुलुपबंद वा पाताळवासी होत असल्याने ती लुप्त झाली असावी असा अंदाज आहे.

*

हिंदू तत्वज्ञानात काही विचार असे आहेत की जीवन असे जगावे की अंती पुनर्जन्म व त्यातून उद्भवणारी दु:खे टाळून परमात्म्याशी एकरूप व्हा. त्या साठी निरनिराळे मार्ग पण सुचवले आहेत.

इतरहि धर्मात काही काही फार चांगले उपदेश केले आहेत.

पण ते समजण्या इतकी अक्कल आता कुणालाच नाही. त्यांनी सुचवलेले मार्ग वापरून जीवन सुखी करणे याला लागणारी अक्कल, शिस्त, बळ कुणाहि कडे नाही.

आता सर्व जगातील निदान ९० टक्के लोकांचा फक्त एकच धर्म -
१. काय वाट्टेल ते करून जास्तीत जास्त पैसे व सत्ता मिळवणे, किंवा
२. जाळपोळ, लुटालूट दंगे करून लोकांचे जीवन असह्य करायचे, किंवा
३. फुक्कट बकवास करण्यापलीकडे इतर काही करायचे नाही.
मात्र हा धर्म पाळणार्‍यांना सुद्धा या सर्वव्यापी धर्माची मात्र जाणीव नाही. या धर्माला अजून नाव नाही.

या धर्माचे आचरण करणार्‍यांना आपआपसात धर्माबद्दल वाद विवाद किंवा भांडणे करायची गरज नाही.

जे लोक जुन्या धर्माच्या नावाने भांडणे वादविवाद करतात ते खरे तर या सर्वव्यापी धर्मातील एखादे तत्वच आचरणात आणत असतात.

रॉबीनहूड, धन्यवाद प्रिअ‍ॅम्बल्करता... आता एक फॉलोअप प्रश्नः

>>Positively, Indian secularism guarantees equal freedom to all religion. it stands for the right to freedom of religion for all citizens.<<
सेकुलर्च्या व्याख्येत हे वरचं वाक्य/शब्द असताना हिदू आणि मुसल्मान यांना वेगळे कायदे का?

<हिदू आणि मुसल्मान यांना वेगळे कायदे का>

ज्या गोष्टी त्या त्या व्यक्तीच्या धर्मातील रीतिरिवाजांनुसार होतात, जसे लग्न, विभक्त होणे, दत्तक ;केवळ त्याबाबतच वेगवेगळे कायदे आहेत ना?

>>ज्या गोष्टी त्या त्या व्यक्तीच्या धर्मातील रीतिरिवाजांनुसार होतात...<<

असं असेल तर सरसकट सगळ्या रितीरिवाजांना कायद्याची संम्मती/संरक्षण का नाहि? हुंडा देण्या/घेण्यावर कायद्याने बंदि, परंतु चार-चार लग्नं करण्यावर नाहि... दोन्हि बाबतीत महिलांवर अन्याय होतो कि नाहि?

माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या पत्नीची संमती घ्यावी लागते. आता ते किती घेत असतील देव जाणे. नुकताच एका खटल्याची बातमी वाचण्यात आली की पहिल्या पत्नीस माहेरी पाठवून तलाक न घेता किंवा संमती न घेता दुसर लग्न केल म्हणून पहिल्या बायकोने व्यभिचाराचा खटला दाखल केला होता.

लींक हाताशी नाही.

पण मग हिंदूंना बहुपत्नीत्वाची का मनाई केल्या गेली, संमती घेऊन तेही करू शकले असते Proud
काय कारण असाव?

रॉहू - थोडी गडबड आहे. घटनादुरूस्तीने तो शब्द जर घालता येतो, तर काढताही येइल ना? तेवढे बहुमत असले तर? सुप्रीम कोर्ट योग्य बहुमताने केलेली घटनादुरूस्ती घटनाबाह्य ठरवू शकणार नाही.

"A state which does not recognise any religion as the state religion, it treats all religions equally". Positively, Indian secularism guarantees equal freedom to all religion. it stands for the right to freedom of religion for all citizens. Explaining the meaning of secularism as adopted by India, AlexandrOwics has written, "Secularism is a part of the basic of the Indian Constitution and it means equal freedom and respect for all religions."[3]

>>> मग मी परवा त्या बाफ वर वेगळे काय म्हणत होतो? तेथे तर मला छुपा संघिष्ट वगैरे ठरवून राहिले काही लोक (म्हणजे दीमा Happy Light 1 )

डॉक्ट्रीन ओफ बेसिक स्ट्रक्चरचे इंटरप्रिटेशन ची लै जजमेन्ट्स आलीत..
फारएन्ड तुम्ही म्हणताय त्या पार्लमेन्ट्स घटना दुरुस्तीच्या पॉवर्स ह्या लिजिस्लेटिव्ह लॉ व मर्यादित घटना दुरुस्तीपुरत्याच मर्यादित करण्यात आल्यात. अनुच्छेद ३६८ मधल्या घटना दुरुस्तीच्या पॉवर्स ४२ व्या घटनादुरुस्ती नुस्सर स्वैर केल्या होत्या त्या नन्तर सुप्रीम कोर्टाने मर्यादित केल्या म्हणण्यापेक्षा त्यातील पोट कलम ५ व ६ रद्दच केली. बहुधा केशवानन्द भारती वि केरळ राज्य केसमध्ये. त्यात कोर्टाने बेसिक स्ट्रक्चर तत्व उचलून धरले. म्हणजे असे की पार्लमेन्टाच्या दुरुस्तीच्या पॉवर्स घटनाकारानी बेसिक स्ट्रक्चरच्या 'डिस्ट्रक्शन'साठी दिलेलेया नाहीत. त्यामुळे पार्लमेन्टाला बहुमतानेही बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येणार नाही. ( अर्थात कॉन्स्टित्युशनल बेंचमधला हा निर्णय काही एकमताने झालेला नाही . त्यात अल्पमतात गेलेल्या जजेसनी विरोध केलाच होता. त्यांच्या मतानुसार घटना अशाने रिजिड होईल प्रवाही राहणार नाही. वगरे.) आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर न्या सिक्री यांनी केशवानन्द भारती केसमध्ये विशद केलेले आहे त्याप्रमाणे मूलभूत अधिकार , डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स , कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि विधीमंडळ यांच्यातील सेपरेशन ऑफ पॉवर्स , सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टित्यूशन, रिपब्लिकन अ‍ॅन्ड डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्न्मेन्ट,घटनेची संघराज्यीय रचना आणि मुख्य म्हणजे सेक्युलर कॅरॅक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन...
.... इतर जजेसनीही बेसिक स्ट्रक्चरच्या काही मुद्द्यांची भर घातली आहे. जसे की वेल्फेअर स्टेट निर्माण करण्यासाठीची डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ( मार्गदर्शक तत्वे) { यात सर्वांचे आवडते पण कोणालाही नको असलेले कॉमन सिव्हिल कोड आहे :)}, वैय्यक्तिक आत्मप्रतिष्ठेसाठीची मूलभूत तत्वे ई.

मिनर्व्हा मिल्स च्या केसमध्येही न्या. चंद्रचूड (सिनिअर) यानीही ठणकावून सांगितले की घटना दुरुस्तीची वैधता ही आर्टिकल १३ च्या निकषावर न ठरवता बेसिक स्ट्रक्चरचे उल्लांघन होते कींवा कसे यावर ठरवावे लागेल.
एस आर बोम्मई वि. केन्द्र सरकार, इस्माईल फारुकी वि. केन्द्र, अरुणा रॉय वि. केन्द्र सरकार या खटल्यांत सेक्युलॅरिझम चे तत्व विशद केले आहे. आय आर कोएल्हो वि. तामिळनाडू राज्य केसम्ध्ये न्या. कुलदीपसिंग यांनी सेक्युलॅरिझम हे घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असे स्पष्ट नमूद केले आहे....

बेसिक स्ट्रक्चर चॅलेन्ज करणार्‍या सगळ्या केसेस सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केल्या आहेत ( कुलदीप नय्यर वि. केंद्र सरकार)
घटनेच्याच तरतुदीनुसार सुप्रीम कोर्ट्च्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचने दिलेले निर्णय हे लॉ ऑफ लँड असतात. त्यामुळे वरच्या तरतुदीनुसार या देशातून सेक्युलॅरिझम काढून टाकणे शक्य नाही हे स्पष्ट व्हावे.

मग मी परवा त्या बाफ वर वेगळे काय म्हणत होतो? तेथे तर मला छुपा संघिष्ट वगैरे ठरवून राहिले काही लोक (म्हणजे दीमा स्मित दिवा घ्या )
<<
हे पा. तुम्ही छुसंसारखे बोलाल तर तुम्हाला छुसं म्हणू़. तुम्ही छुकाँसारखे बोलाल तर मात्र सुडोसेकुलर, सोन्याभक्त, निधर्मांध, अशी अनेकानेक सूषणे (सुयोधनाऽच्या चालीवर वाचावे) देता येतील Wink तेव्हा दिवे द्या की नका देऊ. आम्ही तसे म्हन्नारच्च.

तुम्हाला चीड कशाला लागाय्ला हवी? 36.gif

हुडोबा,

त्यांनी गेल्या दीड वर्षात काहीच केले नाही, असे नव्हे. या सरकारने कोर्टं व रिझर्व ब्यांकेबद्दल २ मोठ्या मजेदार गोष्टी केलेल्या आहेत. इतरही अनेक छोटुकल्या बाबी आहेत, त्या हळू हळू दृग्गोचर होतीलच. (दिसून येतीलच Wink )

तेव्हा कोर्टानेच जर उद्या स्वतःचाच निर्णय फिरवत उद्या घटनाच दुरुस्त करून टाकली, तर आश्चर्य करू नका.

रॉबीनहूड,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.
>> गुडघा ठणकलाच....

गुडघ्याने विचार केल्याबद्दल तुमचं हाबीणंडन.

२.
>> बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून ती वाचनास आणि अभ्यासण्यासही त्याज्य आहे असे मानणारा एक वर्ग
>> आहे. हा वर्ग घटना हे पार्लमेन्टरी डॉक्युमेन्ट नसून काँग्रेसी डॉक्युमेन्ट आहे असे मानतो. मात्र घटनेतली
>> सोइस्कर स्वातंत्र्ये हा वर्ग मनःपूत उपभोगतो .ही स्वातंत्र्ये दुसर्‍या ( धर्मिया)स मिळाल्यास त्याच्या तळपायाची
>> आग शेंडीत जाते.

शेंडीचा उल्लेख करायची गरज काय? याला निव्वळ ब्राह्मणद्वेष म्हणतात. म्हणून हे विधान माझ्याकडून दुर्लक्षित.

३.
>> त्यामुळे तो फक्त 'कलमे'च वाचतो. त्यात विषिष्ट शब्द न सापडल्यास 'जितं मया जितं मया ' म्हणत नाचूही
>> लागतो. मग 'अगा जे घडलेचि नाही ' असे म्हणत ती संकल्पनाच घटनेत नाही असा बुद्धिभेदही करतो...

तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. घटनेच्या कुठल्याही कलमात सेक्युलर हा शब्द नाही. त्याचप्रमाणे सोशालीस्ट हाही शब्द नाही. दोन्ही शब्द पूर्वपीठीकेत (=प्रीअँबल) आहेत बरं. मग सोशालीस्ट शब्दावर इतकं कानठळ्याजनक मौन (=deafening silence) का? सेक्युलर याच शब्दाला इतकं महत्त्व का म्हणून? याचं कारण मला माहितीये.

४.
>> घटनेच्या अथवा कायद्याच्या तरतुदी च्या अर्थाबाबत संदिग्धता असल्यास तिच्या उद्देशांबाबत ह्या प्रिअ‍ॅम्बलचा
>> आधार घेतला जातो.

अगदी बरोबर. पण कायद्यात जर संदिग्धता असेल तर आणि तरंच पूर्वपीठीकेचा आधार घ्यायचा असतो. जर उर्वरित घटनेत सेक्युलर या शब्दाबद्दल काहीही मार्गदर्शन वा तरतूद नसेल तर पूर्वपीठीकेतला सेक्युलर शब्द हा बुजगावण्याच्या तोडीचाही नाही.

५.
>> घटनेचे इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहेत, कोणा रेम्या डोक्या पैलवानाना नाहीत.

घाण्याला जुंपलेल्या बैलडोक्या सरकारी नोकरांच्या तोंडी असली पाट्याटाकू विधानं शोभून दिसतात. विषयाला धरून बोलायला शिका.

६.
>> कॉन्स्टिट्युशनल बेंचचे मुख्य न्यायमूर्ती न्या. सर्व मित्र सिकरी ( ,,,) यांनी बेसिक स्ट्रक्चर मध्ये सेक्युलर नेचर
>> ऑफ कॉन्स्टिट्युशनचा समावेश केला आहे.

धडधडीत असत्य. घटनेच्या मूळ ढाच्याची अधिकृत व्याख्या अस्तित्वात नाही. वेळ येईल तसा न्यायालयाने तेव्हढ्यापुरता अर्थ लावला आहे. संदर्भ :

https://en.wikipedia.org/wiki/Basic_structure_doctrine

>> The basic features of the Constitution have not been explicitly defined by the Judiciary,
>> and the claim of any particular feature of the Constitution to be a "basic" feature is
>> determined by the Court in each case that comes before it.

बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मधून तुम्हाला अभिप्रेत अर्थ निघत नाहीये.

७.
>> (पूर्ण नाव मुद्दम दिले आहे नुसते सिक्रि म्हतले की लगेच गेले असते त्यांचे पूर्वज शोधायला)

आपण हसे लोकाला अन शेंबूड आपल्या नाकाला ! स्वत: कारण नसतांना ब्राह्मणांची शेंडी काढायची आणि दुसऱ्यांवर जातीयवादाचे बेछूट आरोप करायचे. लोका सांगे ब्रह्मज्ञान... !

८.
>> तात्पर्य : १०० टक्के सांसद यांचे निवडून आले तरी ' ते तसे ' राष्ट्र यांना काही घोषित करता यायचे नाही.
>> त्यामुळे तूर्त गुडघ्याला शेक घेत बसण्यावाचून काही पर्याय नाही

आमच्या काळज्या वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही वृथा चिंता करू नये. हाताखालच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपुढे पाजळायच्या अकलेचे तारे इथे मायबोलीवर येऊन तोडू नका.

आ.न.,
-गा.पै.

रॉहू, बेसिक स्ट्रक्चर (घटनेचा ढाचा) हा प्रिअँबलवर अवलंबून नाहिये ना? कारण प्रिअँबल बदलू शकते, ढाचा नाही (किमान या डॉक्ट्रिननुसार). बेसिक डॉक्ट्रिन हे सुप्रिम कोर्टाने विविध केसेस मधून केलेल्या इन्टरप्रिटेशनवर अवलंबून आहे ना (जे प्रिअँबल तसेच इतरही भागांवर अवलंबून आहे), हे बरोबर का? उद्या प्रिअँबलमध्ये समजा हिंदू राष्ट्र असे अ‍ॅडिशन करण्याचा प्रयत्न झाला तर ते बेसिक डॉक्ट्रिनच्या विरोधात असेल कारण आपली घटना ही सेक्युलर आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे बेसिक डॉक्ट्रिन इंटरप्रिटेशन आहे म्हणुन की प्रिअँबलमध्ये सेक्युलर शब्द आहे म्हणुन?

केसवानंद भारती वि. भारत सरकार, आणि मिनर्वा मिल वि. भारत सरकार या दोन केसिस इथे उधृत केल्याबद्दल आभार. मागे मी एका धाग्यावर याचे संदर्भ दिले होते तेव्हा मला पेडान्टिक असे शेलके संबोधन मिळाले होते. मात्र या दोन केसिस ज्यांना इन्टरेस्ट आहे त्यांनी वाचाव्यात अश्या आहेत. टी आर अंध्यारुजिना यांनी सोप्या भाषेत केसवानंद भारती केसवर पुस्त्क लिहिले आहे. त्यात बहुतेक मिनर्वाचे उल्लेखही येतात. अंध्यारुजिना तेव्हा सॉलिसिटर जनरल होते त्यामुळे इन्सायडर व्यु मिळतो तसेच एक कायदेपंडित असल्याने बेसिक डॉक्ट्रिनवर सुलभ भाष्य आहे.
http://www.goodreads.com/book/show/17301833-the-kesavananda-bharati-case

रॉहू धन्यवाद. मला दुसरी एक शंका आहे आता - घटनेचे प्रीअ‍ॅम्बल हे precise असायला हवे. म्हणजे तेथे जे शब्द आहेत तेच आणि फक्त त्याच शब्दांचे जे अर्थ होतात तेच. सेक्युलर जर मुळात त्यात नसेल तर तो तेथे आहे हे इंटरप्रिटेशन कसे काय होते त्याचे?

SOVEREIGN SOCIALIST DEMOCRATIC REPUBLIC >>> हे जे मूळ होते त्यात आपोआप सेक्युलर आहेच हे कोणत्या संदर्भाने ठरवले गेले? आणि जर इम्प्लिसिट असेल तर मग स्पेसिफिकली घटनादुरूस्ती करायची काय गरज होती? त्यावेळेस सरकारवर असा काय दबाव होता की ज्यामुळे ही दुरूस्ती करावी लागली.

अर्थात या बाबतीत कोर्टाने जे इंटरप्रिटेशन केले आहे तेच फायनल आहे. फक्त त्यामागची कारणे मी विचारतोय.

सेपरेटली:
तुम्ही छुसंसारखे बोलाल तर तुम्हाला छुसं म्हणू़. >>> दीमा मी तेथेही फक्त एवढेच बोललो होतो. छुसं पणा तुम्हाला त्यात दिसला. चिड बिड काही नाही. म्हणूनच दिवा दिला होता Happy

गुडघ्यावर टोपी लईच फिट्ट बसली...
आमच्याकडे शेंड्या बहुजन समाजातले लोकही ठेवतात Happy . आता शेंडीचेही राईट्स घेतले की क्वॉय ?::फिदी:
असो.

बेसिक स्ट्रक्चरचा ढांचा ( किती स्ट्रॅटेजिक शब्द ;)) प्रिअ‍ॅम्बलवर अवलम्बून नाही पण प्रिअ‍ॅम्बल मधला काही भाग सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट केला आहे. मुळात बेसिक स्त्रक्चरचा कन्सेप्ट मुळी न्यायालयाने आणला आहे. त्यामुळे तो जजमेन्ट्स्मधूनच स्थिर होत चालला आहे. सेक्युलर शब्द काढता येणार नाही कारण न्यायालयाने तो बेसिक स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट केला आहे. प्रिअ‍ॅम्बल अमेन्ड होऊ शकते .सेक्युलर शब्द सोडून . उदा: उद्या सोशालिस्टिक शब्द काढायचा तर पार्लमेन्टला तो काढता येईल्ही कदाचित कारण बेसिक स्ट्रक्चरम्ध्ये त्याचा (अद्याप) समावेश नाही. प्रिअ‍ॅम्बलमध्ये थेट उल्लेख नसलेल्या बाबी पण घटनेच्या तपशीलात असलेल्या अनेक बाबी बेसिक रचनेत कोर्टाने घेतल्या आहेत उदः मूलभूत अधिकार. मर्गदर्शक तत्वे.
अर्थात त्यात कन्स्ट्रक्टीव अमेन्ड्मेन्ट पार्लमेन्टला करता येतात . यचे अलिकडील उदाहरण म्हणजे फंडामेन्टल राईट्स चे आर्टिकल २१ मध्ये २१ अ ही दुरुस्ती करून प्राथमिक शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे म्हनने असे की पार्लमेन्टला या बेस्सिक रचनेत 'डिस्ट्रक्टीव्ह " बदल करता येणार नाहीत. उदा मूल्भूत हक्क काढून घेणे,

केशवानन्द भारती विरुद्ध केरळ राज्य हे फारच लँडमार्क जजमेन्ट आहे. यात कोर्टाने पार्लमेन्टच्या मर्यादा स्पष्त केल्या आहेत.
The Apex court declared that Art. 368 did not enabled Parliament to amend the basic structure or framework of the Constitution and Parliament could not use amending power under Art 368 to 'damage', 'emasculate', 'destroy' , 'abrogate','change ', or 'alter' the 'basic structure 'or framework of the constitution.

Pages