'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.३ : मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 06:11

कांदा, बटाटा, टोमॅटो कोथिंबीर, गरम मसाला, धने-जिर्‍याची पूड इत्यादी हाताशीच असणारं साहित्य... हे पाककृतीत घालायचा क्रम थोऽडा बदलला की चवीतही काय मस्त फरक पडतो.

अशीच वेगळ्या चवीची आणि पटापट होणारी छोट्या मद्रासी सांबार कांद्यांची ही कलेजी.

साहित्य -
सांबार कांदे - वीस ते पंचवीस (साधारण २०० ग्रॅम)
मोठा टोमॅटो - एक
उकडलेले बटाटे - दोन
मूठभर स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर
फेटलेली साय - अर्धी वाटी
तूप - दोन मोठे चमचे
मसाले -
गरम मसाला - एक चमचा
धने पूड अर्धा चमचा -
जिरं पूड - एक चमचा
कांदा लसूण मसाला - अर्धा चमचा
गोडा मसाला - पाव चमचा
मीठ, साखर चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती -
1.1.jpg

१. सांबार कांदे स्वच्छ धुऊन, सोलून घ्या.
२. टोमॅटो बारीक चिरून घ्या.
३. उकडलेले बटाटे सोलून तुकडे करून घ्या.
४. एका वाटीत सगळे मसाले एकत्र करून घ्या.
५. कढईत तूप तापत ठेवा. ते गरम झालं की त्यात वाटीत एकत्र केलेले सगळे मसाले घाला, थोडं परतून त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

2.jpg

६. कोथिंबीर थोडीशी तळली गेली की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला, त्यात पाव वाटी पाणी घालून कढईवर झाकण ठेवून द्या. गॅस बारीक असू द्या.
७. टोमॅटो शिजून त्याचा रस आटत आल्यावर त्यात सोललेले कांदे घाला. नीट परतून पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून द्या.

4.jpg

८. कांदे पारदर्शक झाले की त्यात उकडलेले बटाटे आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून नीट एकत्र करून घ्या. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
९. आता फेटलेली साय घालून कलेजी व्यवस्थित परता. गॅस बारीक असू द्या, झाकण न ठेवता परतत परतत कलेजी छान खरपूस होऊ द्या.

5.jpg

फेटलेली साय घातल्यामुळे मसाल्यांची चव खुलून येते आणि उग्रपणा कमी होतो. कोरडी ग्रेव्ही असलेली ही भाजी गरम फुलके / पोळ्या / पराठे यांच्याबरोबर मस्त लागते. सोबत सुधारस किंवा गोडाचा शिरा, गाजर-टोमॅटोची किंवा कोबीची कोशिंबीर वाढली की भरलेलं ताट एकदम रसना तृप्त करतं.

या पाककृतीत बदलायचे घटक -
१. बटाटा
२. टोमॅटो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा मस्त आहे ही स्पर्धा.
मद्रासी कांदे म्हण्जे १००% नंदिनी असे वाटतेय.

सिंडरेला, फ्रेश क्रिम चालेल. फक्त पाककृतीत लिहीताना 'अपरिहार्य कारणास्तव बदल करून वापरलेला घटक' असे नमूद करावे. असा घटक फक्त अपवादानेच वापरता येईल.

Mast recipe ahe. Ahe tashich karun baghanar.

Batate replace karta yetil. Tomato replace karun tyachi ambat chav anana yakarta kharach vichar karawa lagel. Good challenge Happy

दोन्ही लोकांना आपलीच वाटावी अशी सोय नावात केलीय जेणेकरुन दोन्ही पार्ट्या धागा उघडुन बघतील तरी.
कांदा म्हटला म्हणजे आता हा धागा फक्त उच्चभ्रुंसाठीच !!!!!!

मस्त रेसिपी....
प्रश्न विचारणार्या आयडीं पैकीच कुणीतरी असणार. आपला संशय येवू नये म्हणून उगाच आपल काहीतरी विचारायच Wink
रेसिपी त कांदा लसूण मसाला आहे ...म्हणजे कोल्हापूरकर असल्याचा संशय येतोय...

शेवटच्या फोटोवरून रेस्पी मंजूडीची हे स्पष्ट. फक्त तयार पदार्थांचे फोटो क्रॉप करून त्याला बॉर्डर! Wink

सुरणाची कलेजी
मुख्य पदार्थ :-
१)दोन वाट्या सुरणाच्या फोडी
( बटाटा बदलून )
२)तीन भोपळी मिरच्या लांब तुकडे करून
( टोमॅटो बदलून )
३)मसाला :-
चार चमचे लसूण चटणी आयती अथवा केलेली ( सर्व मसाले ऐवजी,कांद्याऐवजी लसूण )
चिमुटभर आमचूर,
मीठ चवीपुरते,
तेल दोन मोठे चमचे.

*सुरणाच्या फोडी भांड्यात जरूरीइतकेच पाणी घालून उकडत ठेवा.
*एका कढईत तेल गरम करून लसूण चटणी
भाजा वास सुटला की मिरचीचे तुकडे टाकून शिजवा.मऊ पण फार लिबलिबित नको.आमचूर आणि मीठ टाका.
* हे करेपर्यंत सुरण शिजलेला असेल आणि शेवटचे पाणी आटत आले असेल.
*सुरणाचे पाणी सुकले की मिरच्यांच्या कढईत टाकून तीन मिनिटे मिसळा.

ही सुरणाची कलेजी तिखट आणि कोथिंबिर टाकलेल्या पुय्रांबरोबर खाता येईल.सोबत ताक.

( करा पटापट आणि टाका फोटो. )

शेवटच्या फोटोवरून रेस्पी मंजूडीची हे स्पष्ट. >>>योकु, इतक्या कॉन्फिडन्टली बोलतोयस जसा काही शेवटचा फोटो मंजूडीचा स्वतःचा फोटो आहे. Lol

फ्रेश क्रिम आणि फेटलेल्या सायीत काय फरक? >>>> फ्रेश क्रीम जे बाजारत मिळते, दूध न तापवता त्यावर प्रक्रिया करुन त्यातील स्निग्धांश वेगळा काढला जातो आणि फेटलेली साय ही आपली घरची, दूध तापवून झाले की त्यावर जमते ती साय जी विरजणाला वापरतात ती फेटून घेतात.

ही रेसिपी जागूची नसावी. साहित्य मांडून ठेवलेली तिची फेमस हिरवी मेलामाईनची प्लेट दिसली नाही ह्यात. Wink पण ती असती तर तिची रेसिपी लक्षात आली असतीच.

या पाकृच्या फायनल फोटोत ताट, वाटी, चमचा, ओटा, रिमोट, सजावटीच्या वस्तू, सजावट अस्स काही काहीच नाही दाखवले.
कस्सं कॉय ओळखायचं!!!

Pages