"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा झब्बु बसला एकदाचा. Happy
केदोबा कोल्हापुरकर धन्यवाद रे भो Happy
भाजे लेणी येथे गेलो असताना काढलेला फोटु.
हा फक्त मायबोलीच्या नियमात साइज साठी पेन्ट मध्ये स्ट्रेच & स्क्यु करुन छोटा केलाय.

flower.JPG

नंदू गुलाब मस्तंय... चल तुझं पोस्ट पडलं म्हणजे मला पुढचा झब्बू देता येईल.. इथे झब्बू द्यायला खूप आहेत माझ्याकडे..

माझ्या बाबांच्या बागेतून .. अनंत..

IMG_1858.JPG

अनंत! केवळ अप्रतिम!
>> अगदी अगदी सायुरी.. मीनु खुप मस्त आहे फोटो..
अगदी घरची आठवण आली Sad

p1010087.jpg

बोरीवली नॅशनल पार्कच्या जंगलातलं हे कुडाचं फूल (आयुर्वेदीक औषधात याचा उपयोग होतो.)

DSC00203.JPG

ललिता Happy

गुलाबासारखं दिसणारं हे एक फुल.. गुलाब नाहीये मात्र.. बुटकंस शोभेच्या फुलाचं झाड मुन्नारच्या फुलबागेतलं..

IMG_0898.JPG

तुझं केशरी फूल कॉसमॉस आहे का?

माहिती नाही गं नीरजा पण अजुन डीटेल्स साठी हा अजुन एक झब्बू पण कलर वेगळा ...
p1010089.jpg

Orchids5.JPG

वाह एक रसिक ! कसले सुंदर ऑर्किड आहे ? पक्षाने पंख पसरवल्यासारखा आकार आहे याचा !

बंगलोरच्या मल्लेश्वरम् मंडईमधे फुलांचा वेगळा विभागच आहे, मंडईच्या दाराशीच हार, वेण्या घेऊन विक्रेते बसलेले असतात. खूपच छान वाटत पहायला...

haar.jpg

धन्यवाद prakashkalel, मागच्या वर्षी ऑर्किड पुर्ण बहरला होता, त्याचा हा फोटो.

Orchids4-1.JPG

Pages