अ-स्विकार

Submitted by मी मुक्ता.. on 3 September, 2015 - 09:32

रागावलेल्या माणसाने
बुद्धाला दिलेल्या शिव्या,
बुद्धाने स्विकारल्या नाहीत..
आणि कोणतीही न स्विकारलेली भेट
राहते देणार्‍याजवळ...
तसा त्या माणसाचा रागही त्याच्याच जवळ राहिला..
बुद्ध निघून गेला,
नेहमीच्या अफाट स्थितप्रज्ञतेने..
पण त्या माणसाचं काय झालं?
तो कुठे गेला त्याचा राग घेऊन?
त्याच्या मनात केवळ बुद्धासाठी जन्मलेला राग घेऊन?
पुढे जाऊन तो राग त्याने आणखी कोणावर काढला का?
दिल्या का आणखी कोणाला शिव्या?
जे कोणी स्विकारेल त्याला?
पण केवळ बुद्धासाठीच जाणवलेला राग..
आणखी कोणाला देणार तरी कसा?
मग परत कोणावर रागावलाच नाही का तो आयुष्यात कधी?
त्या माणसाचा आणि त्या कथेचा ,
खरा शेवट कळलाच नाहीये मला कधी..
आणि स्वतःचाही..
तू न स्विकारलेलं माझं प्रेम घेऊन आता मी कुठे जायचंय?
-------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे खूप खूप आभार..

बी,
logging in to olx right away. Wink Thanks a lot for a fabulous suggestion.. Proud

मुक्ता, मी ही कविता इथल्या लिंक सकट + तुझ्या ब्लॉगच्या लिंक सकट, तुझ्या आयडी सकट माझ्या थोपु वॉल वर शेअर केलीये. तुला आक्षेप नाही ना गं? खर तर आधीच विचारायला हवं होतं पण ही कविता वाचल्या वाचल्या जवळपासच्या आणखी ४ जणांना वाचून दाखवली, इथल्या २ वाहत्या बीबींवर लिंक शेअर केली. तरीही मन शांत झालं नाही म्हणून थोपुवर शेअर केली. जैसा आप चाहो जी Wink

रीया,
अगं काहीच आक्षेप नाही़. किंबहुना तुला कविता इतकी आवडली म्हणून माझ्याकडूनच धन्यवाद.. Happy

माझा आक्षेप फक्त एकाच गोष्टीला आहे.. तुझ्या सॉरी म्हणण्याला. ते एक काढून टाक... ताबडतोब.. Wink