तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की
औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.
मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.
अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते.
अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.
आता शोएबच्या लेखाचे खंडन.
Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे
१. Aurangzeb built more temples than he destroyed -
हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.
औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.
Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.
काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.
त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.
जामा मशिदीच्या पायर्यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.
मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -
काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.
माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )
२ Music flourished in India during Aurangzeb’s reign
शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.
Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,
होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.
३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal
ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.
औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.
४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.
५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time
अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.
शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.
ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.
अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.
पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.
A B ग्रेडनी काय फर्क पडतो
A B ग्रेडनी काय फर्क पडतो पुराव्यानिशी सिद्ध करुन लिहिलेल आहे ना?
याच कुठे हो, केदारनाच विचारा,
याच कुठे हो, केदारनाच विचारा, त्यांच्या अगोदरच्या पण एक दोन धाग्यावर लिहिलेय.
पगारेजींच्या राहुल गांधी, भारताचे आशास्थान का कायसा आहे तिथेही माझा प्रतिसाद वाचा.
<<आणि जर पडतो, तर तसे तुम्ही पगारे, मयेकर , डॉक यांच्या धाग्यावर कधी त्यांना का नाही विचारले की कबुल करा तुम्ही पाकड्यांचे + सौदी मिठाचे समर्थक आहात म्हणून >>
ते तसे नाहीत याची मला खात्री आहे म्हणून!
मी संतुलित नाही. अँटी मोदी/अँटी कट्टर धार्मिकता/अँटी बीजेपी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
माझ्यावरचा संतुलित पणाचा आरोप ताबडतोब हटवावा ही विनंती.
आणि डॉक प्रमाणे काय म्हणता, इथे माश्या मारत असले तरिही मी डॉकच आहे.
पुरावे कशाला म्हणतात???
पुरावे कशाला म्हणतात???
जे धाग्यात दिलेत त्याला.
जे धाग्यात दिलेत त्याला.
मी संतुलित नाही. अँटी
मी संतुलित नाही. अँटी मोदी/अँटी कट्टर धार्मिकता/अँटी बीजेपी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
माझ्यावरचा संतुलित पणाचा आरोप ताबडतोब हटवावा ही विनंती.
>>
आपल्या नावाची नोंद योग्य त्या यादीत करण्यात आली आहे.
आपणही शेवटी झापड लावल्यासारखेच , स्वतःला पटेल तेच / पाहिजे तेच आणि तेवढेच पाहणारे, असंतुलीत निघालात हे बघुन खेद वाटतो.
धन्यवाद.
पुरावे कशाला म्हणतात?? >>
पुरावे कशाला म्हणतात??
>> 'गाडावे ' ला ::फिदी:
आणि डॉक प्रमाणे काय म्हणता,
आणि डॉक प्रमाणे काय म्हणता, इथे माश्या मारत असले तरिही मी डॉकच आहे. >> ते माहिती आहे हो.
पण तुम्ही कसेही लिहिले तरी कमीतकमी सरळ भाषेत तरी लिहीता. त्यांचे नेहमी सगळॅ उलटे, उद्धट आणि कुजकट.
पाहणारे नव्हे पाहणार्या! मी
पाहणारे नव्हे पाहणार्या!
मी बाईसाहेब आहे, विसरलात का!
ते तसे नाहीत याची मला खात्री
ते तसे नाहीत याची मला खात्री आहे म्हणून! >> जरा आम्हाला पण कळू द्या ना कसे ते?
तुम्ही वेगळा धागा काढा, तिथे
तुम्ही वेगळा धागा काढा, तिथे लिहिते.
तुम्ही वेगळा धागा काढा, तिथे
तुम्ही वेगळा धागा काढा, तिथे लिहिते. >> पगारेंचाच एखादा दिवाळिच्या फटाके फोडुन झाल्यनंतर रस्ता होतो तसा एखादा धागा घ्या. वि शुड रियुज अॅज मच यु नो...
सन्तुलीत म्हणजे काय? पूर्वी
सन्तुलीत म्हणजे काय? पूर्वी जुन्या मायबोलीवर सन्तु नावाचा आय डी होता.
आज जामोप्या कुठे गेले? हे पगारे फार वात्रट आहेत, फार सिरीयसली लिहीतात. जामोप्या असले की कसे भान्डायला मज्जा येते.:फिदी:
आपणही शेवटी झापड
आपणही शेवटी झापड लावल्यासारखेच , स्वतःला पटेल तेच / पाहिजे तेच आणि तेवढेच पाहणारे, असंतुलीत निघालात हे बघुन खेद वाटतो. >> \ look who is talking!! स्वतःला आरशात बघितले तर हेच दिसेल.
आज जामोप्या कुठे गेले? >> अहो
आज जामोप्या कुठे गेले? >> अहो जुम्मा नाही का आज?
मुळ आयडीने लिहिलेतरी चालले
मुळ आयडीने लिहिलेतरी चालले असते ताई!
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातले काही उतारे दिले तर चालेल का?
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातले काही उतारे दिले तर चालेल का? <<< त्यासाठी वेगळा धागा काढा
तिथे डिस्क्लेमर काय लिहायचे ते मी सांगतो
मी औन्टी कॉन्ग्रेस आहे.
मी औन्टी कॉन्ग्रेस आहे.:फिदी: स्पॉक,सातीचा एकच हा आय डी आहे, दुसरा नाहीये. मी सातीला प्रत्यक्षात ओळखत नाही, पण खात्रीने तसे सान्गु शकते.
साती, पण ते "प्रचार" वगैरे
साती, पण ते "प्रचार" वगैरे मलाही नाही पटले. एनिवे...
मला आपली माझ्यावरील पूर्वीच्या एका आरोपाचि आठवण झाली की म्हणे हा लिम्ब्या जिथे तिथे जाउन काईबाई खरडतो अन स्वतःकडे "सहानुभूती" मिळवु पहातो...... खरे तर सहानुभुती वगैरेचा काय संबंध? मी जे सत्य तेच मांडायचो / मांडतो. पण त्यावर असा आक्षेप....
आता मला सांग साती, की हा पब्लिक फोरम असुनही येथिल आयडीज जीवाभावाच्या वाटतात, मग त्यांना काहीतरी सांगावेसे वाटते, संवाद साधावासा वाटतो, आपले मत त्यांचेसमोर मांडावेसे वाटते वगैरे वगैरे ..... अन तसे केले तर ते "प्रचारकी थाटाचे" कसे काय होते?
उद्या आमची नात शाळेतल्या गॅदरिंगमधे स्टेजवर काही करु पाहिल, तर तो देखिल एक प्रकारचा तिच्या कलागुणांचा/तिच्या पालकांचा प्रचारच ठरेल तुझ्या तत्वानुसार, नै का?
का फेसबुक सारखे फक्त कुणाच्या फोटो/ फुटकळ फॉर्वर्डेड पोस्टीन्ना लाईक करत सुटणे म्हणजेच अप्रचारकी/निरपेक्ष वगैरे थाट होणार आहे ? इतकेही फेसबुकच्या सवईंच्या आधीन जाऊ नका रे कोणी.......
मायबोली आहे तीच मुळी "मराठीभाषा वापरीत देवनागरीतुन लिहीत अस्सल मराठि बाण्याप्रमाणे आपापले विचार/निर्मिती येथिल सर्वांसमोर मांडण्याकरताच...... त्यालाच तुम्ही प्रचारकी असे कसे ठरवता?
या न्यायाने उद्या मी एखादी पाककृती लिहिली तर ती देखिल "प्रचारकीच" ठरेल.....
उद्या मी माझ्या सायकलिंगची यशस्वी/अयशस्वी गोष्ट लिहीली तर ती देखिल "प्रचारकीच" ठरेल.....
त्या आमच्या अजय पाटील सारखे वॉटरकलर चित्र मी चुकुन माकुन इथे दिले ते देखिल "प्रचारकीच" ठरेल.....
अगदीच काय, प्रेमविषयावरील एखादी कविता/चारोळी इथे टाकली .... ती देखिल "प्रचारकीच" ठरेल..... (अरे बापरे...)
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातले काही उतारे दिले तर चालेल का? >>
अहो न चालायला काय झालं. ती अमुल्य माहिती तुम्ही नविन धाग्यात लिहिली तर भविष्यात लागणारे डॉक्युमेंटशन होईल. म्हणजे गुगल वर सर्च मध्ये "शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?" हे टाकले तर डायरेक तुमचा धागा दिसेल. पण इथे तुम्ही पोस्टद्वारे माहिती दिली तर दिसणार नाही.
म्हणून औरंगजेबाच्या धाग्यात शिवाजीला नका टाकू. तो धागा वेगळा काढा. हां तो शब्द आहे. दस्तऐवजीकरण. ते होईल.
(मला तुमच्या पोस्ट त्या हिंदी वाल्या आवडातात. पण मराठीत टाका. )
मग पगारेंनापण उद्वेगात नको जायला. तिथे ते लिहू शकतील. मला त्यांच्या पोस्टपण आवडतात.
>>>> या पुस्तकातले काही उतारे
>>>> या पुस्तकातले काही उतारे दिले तर चालेल का? <<< <<<<< त्या पुस्तकावर सरकारने बंदी घातलेली नाहीना ते आधी तपासा...... ! हो ना, उगाच मायबोलीच्या गळ्याला तुमच्या कायदेभंगाचे नख नको लागायला....
मला तुमच्या पोस्ट त्या हिंदी
मला तुमच्या पोस्ट त्या हिंदी वाल्या आवडातात>>.धन्यवाद.
मला पण हिंदीच लिहायला आवडते पण ............जौ दे.
हिंदीत भाषांतर करुन लिहू का?
लिंबु भौ, बंदी वगैरे काय
लिंबु भौ, बंदी वगैरे काय नाही. नेटवर ते पुस्तक उपलब्ध आहे.
>>>>> हिंदीत भाषांतर करुन
>>>>> हिंदीत भाषांतर करुन लिहू का? <<<< परवानगी कसली मागताय? अगदी जपानीमधे लिहिलेत तरी चालेल. कुणाला या कानाचे (डोळ्याचे) त्या कानाला (डोळ्याला) कळणारही नाही...!
कुणाला या कानाचे त्या कानाला
कुणाला या कानाचे त्या कानाला कळणारही नाही...! >> मला येते हं वाचता.
बाकी चालुदे.
>>>मी बाईसाहेब आहे<<< >>>आणि
>>>मी बाईसाहेब आहे<<<
>>>आणि डॉक प्रमाणे काय म्हणता, इथे माश्या मारत असले तरिही मी डॉकच आहे.<<<
एकंदरीत ढेकुण आणि माश्यांचे काही खरे दिसत नाही
असो!
केदार, ज्यांना फक्त स्वतःचेच बोलणे ऐकू येते त्यांच्या विश्वात तुम्ही संवाद साधू पाहात आहात ह्याचे कौतुक वाटले.
@बेफी.
@बेफी.
रश्मी धन्यवाद! लिंबुकाका,
रश्मी धन्यवाद!
लिंबुकाका, प्रचार करण्याला बंदी नाहीच्चे!
प्रचार करूनही करत नाही म्हणतायत म्हणून माझा आक्षेप आहे.
तो ही नव्हताच.
मी फक्त 'तुम्ही ज्या उद्देशाने धागा काढलात तो पूर्ण झाला का?' असे इथली हाणामारी पाहून विचारले.
बरं हा धागा औरंगजेबावर आहे सातीजहाँवर नाही.
अहो साती मी लिहिले आहे मी
अहो साती मी लिहिले आहे मी माझ्या पोस्ट थेट आहेत. त्याचा मराठी अर्थ म्हणजे मला आडून आडून मांडायची गरज नाही पडत. त्याचे पुरावे / मुद्दे / ग्राफ असतात. तुमच्या विचारसरणीच्या विरोधी असतात त्या. मग तुम्ही खोडून काढा की ! कितीदा ते कार्ल गुळातत घोळाताय?
आपण गप्पांच्या धाग्यावर जाऊन मी प्रचारक आहे की थेट मुद्दे म्हणजे तुमच्या विरोधी मते मांडणारा आहे ते ठरवू बरं का?
तर इथे आता औरंगजेबावर काही लिहा बॉ. एकच कंसातली ओळ लिहिली आहे. म्हणजे कसं आपल्या दोघांनेही तो रस्ता बदलल्याचे बरे वाटले आहे की नाही. तो एक कॉमन धागा विनता येईल.
परत एकदा थेट मुद्दा म्हणजे आडून आडुन प्रचार करायची गरज नसते. म्हणजे मराठीत थेटचा अर्थ तसा होतो. तर आता विश्राम द्या तुमच्या घोड्याला.
(No subject)
Pages