छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>एक मंदीर बांधायला जागा दिली आणि हजारो तोडले.

एका इतिहासकाराच्या मुलाखतीतला भाग.

You also examined at length the destruction of temples in this period. What did you find?
The temple discourse is huge in India and this is something that needs to be historicised. We need to look at the contemporary evidence. What do the inscriptions and contemporary chronicles say? What was so striking to me when I went into that project after the destruction of the Babri Masjid was that nobody had actually looked at the contemporary evidence. People were just saying all sorts of things about thousands of temples being destroyed by medieval Muslim kings. I looked at inscriptions, chronicles and foreign observers’ accounts from the 12th century up to the 18th century across South Asia to see what was destroyed and why. The big temples that were politically irrelevant were never harmed. Those that were politically relevant — patronised by an enemy king or a formerly loyal king who becomes a rebel — only those temples are wiped out. Because in the territory that is annexed to the State, all the property is considered to be under the protection of the State. The total number of temples that were destroyed across those six centuries was 80, not many thousands as is sometimes conjectured by various people. No one has contested that and I wrote that article 10 years ago.

Even the history of Aurangzeb, you say, is badly in need of rewriting.

Absolutely. Let’s start with his reputation for temple destruction. The temples that he destroyed were not those associated with enemy kings, but with Rajput individuals who were formerly loyal and then become rebellious. Aurangzeb also built more temples in Bengal than any other Mughal ruler.

आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला>>
पण औरंगजेबाचे नाव काढले हे मला आवडले. >> मलाही !!>>
या तो घोडा बोलो या चतुर, एक पे रैने का जी!
नाव बदलले ते आवडले आहेच पण ते सरळ मान्य करणे जीवावर येते आहे असे एकंदरीत दिसते.
औरंगजेब वाईट होता एकदम १००% वाईट, पण तो भारतीय होता का हो? आमच्या इतिहासाचा तो भाग आहे की नाही?
रस्त्याला त्याचे नाव दिले इंग्रजांनी, कदाचित दिल्ली शहराच्या इतिहासाचा भाग म्हणून, आम्हाला ते मान्य नाही.
त्याला परकीय म्हणा हवेतर पण मग त्याच्याच परक्या बापजाद्यांनी बांधलेल्या लाल किल्ल्यातून १५ ऑगश्ट्चे भाषण्ही बंद करा (ताजमहालचा उल्लेख मुद्दामून टाळला आहे कारण तो तर तेजोमहाल! लाल किल्ल्याबाबत तसा चिमित्कार अजून ऐकीवात नाही).
असो, औरंगजेब हे माझ्या देशाच्या इतिहासातील धार्मिक असहिषूण्तेचे प्रतिक आहेच पण त्याच्या नावाचा रस्ता बदलून त्याला कलामांचे नाव देणे हे कशाचे प्रतिक आहे?

भाजप सरकारने कोणताही निर्णय घेतल्यावर मग तो बरा-वाईट कसाही असो, पण तो घेतल्यावर अनेकांची फारच जळजळ होतेय आजकाल.

बर मग, वांद्रे-वरळी सागरी सेतुचा पाया घालते वेळी स्वत:स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या पुलाचे नाव "स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतु" असे जाहिर केले होते, नंतर तो पुल जनतेसाठी खुला केल्यावर त्याचे नाव बदलून 'राजीव गांधी सागरी सेतु' असे केले गेले, ते कशाचे प्रतिक होते.

कलामांचे नाव देणे हे कशाचे प्रतिक आहे? >> चुका सुधारण्याचे आणि अशा प्रकारची धार्मिक असहिष्णुता सहन केली जाणार नाही याची. एकोप्याने समानतेने रहा याची.

नंतर तो पुल जनतेसाठी खुला केल्यावर त्याचे नाव बदलून 'राजीव गांधी सागरी सेतु' असे केले गेले, ते कशाचे प्रतिक होते.
<<
<<

ते महाराष्ट्रातील कॉंग्रेजी नेत्यांच्या "चापलूसी"चे प्रतिक असावे. Happy

औरंगजेब धार्मिक असहिष्णु असुनही त्याच्याकडे बरेच सैन्य हे हिंदु होते ह्याचे नवल वाटतेय.

बघा शिका काहीतरी तुमच्या राजाकडुन.
नाहितर तुम्ही. साध्या एका टूकार रस्त्याचे नाव बदललेलेही तुम्हाला चालत नाही.त्यासाठि भलेही कृर शत्रु आक्रमकाची बाजु घ्यावी लागली तरी तुम्ही घ्याल काही रुपड्यांसाठी.
काय कामाचे असे औरंगजेबाचे समर्थक?

वंदे मातरम चालते का तुम्हाला?
१५ की १४ ऑगस्ट?
अरेबीक की भारतातील खरी स्थानीक भाषा?
अरेबीक कपडे की पँट शर्ट?
निव्वळ भाजपेयी+आरएसएस म्हणुन मोदीला विरोध की डोळस विरोध + समर्थन?
करोडो लोकसंखेच्या देशात एकट्या मो.क. गांधी मुळे स्वातंत्र्य मिळाले की लाखो सामान्य स्वातंत्र्य"सैनिकां"च्या बलिदानामुळे?

तुम्ही कसले सहिष्णू? कलंक आहात तुम्ही एवढ्या महान औरंगजेबासारख्या "सहिष्णू" राजाच्या नावावर.

मार खाऊन खाऊन मुर्दाड झालेली माणसे होती ती Wink त्यांना काय हा बाश्हा नाय त तो काय आपल वतन वाचल पायजेल बास ... आजकालचे नेतेबी तसलेच! पैश्यापायी सब कुच्च

आमच्या गल्लीतला फोर्चुणर आधी घड्याळ मिरवत होती आता कमळ मिरवतेय

औरंगजेब धार्मिक असहिष्णु असुनही त्याच्याकडे बरेच सैन्य हे हिंदु होते ह्याचे नवल वाटतेय.
<<

त्यात नवल वाटण्यासारखे काय आहे पगारेजी, काळ बदलला तरी त्यावेळीही वतनाच्या शिळ्या तुकड्याच्या आशेने औरंग्याच्या पायावर लोळण घेणारी माणसे होती, जशी आज त्याची बाजु घेऊन लिहिणारी आहेत. फक्त हे सर्व करुन त्यावेळी किमान थोडीफार वतने, जाहागीरी तरी मिळाल्या त्या लोकांना. पण आज जी लोक त्याची बाजु घेऊन लिहितायत त्यांना फक्त एकच गोष्ट मिळू शकते आणि ती म्हणजे बाबाजी का **.

म्हणजे योगात करतात तसेच ना ? >> योगात "फक्त" हेच करत नाही.
योग करताना हाच काय तो एकमेव देव आणि जे बाकीचे हे मानत नाही त्याम्ना मारा, त्यांचे देश लुटा, इतर गुन्हे करा असे योगशास्र सांगत नाही.
योग खरी शांती आणी समानता शिकवते. शरीर सुदृढ अस्ले की मन चांगले विचार करते.

कुठलाही राजा हा अत्याचार त्याच्या सैनिकांकरवी करतो.आणि औरंगजेबाचे बरेचसे सैन्य हे हिंदु होते ह्याचा अर्थ काय होईल.गुंता वाढत चाललाय.शिवाजि राजांच्या सैन्यात बरेचसे मुस्लिम नी औरंगजेब राजांच्या पदरी बरेचसे हिंदु सैन्य.हे होते धर्मयुध्द.धर्मयुध्दात दोन्हि बाजुंकडे आपापल्या धर्माचे सैन्य हवे इथे मात्र उलटेच.

ओ उलटे.
सैन्याल्या फक्त आदेश पाळण्याची शिकवण असते.
तुम्ही कसे, फक्त एकाच बाजुने लिहिता - बाकी ख-या जगात काहीही होऊ दे.
तसे.

शिवाजि राजांच्या सैन्यात बरेचसे मुस्लिम

>>

चला पान्सारेंच्या पुस्तकातली लिस्ट उतरावा इथे आता ... नूरखान बेग ... वगैरे सुरु करा Lol

थोडक्यात धर्मापेक्षा चाकरी महत्वाची होती.म्हणजे हे धर्मयुध्द नव्हते. >> "सैन्याने" केले ते नव्हते.
भारीच स्मार्र्ट आहात हो. मी सैन्याबद्दल म्हणतो आहे.
तुम्ही लगेच औरंग्याला क्लिनचीट देऊन मोकळे?
चश्म्याचा नंबर तपासुन घ्या एकदा.
त्या सैन्याला आदेश तुमच्य "सहिष्णू" औरंग्यानेच दिला होता.

हे धर्मयुध्द नव्हते.

>>

बिच्चारे संभाजी महाराज ... उरलेलं त्याचं सैन्य, घरदार सोडून जिंजीतून लढलेले राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी वीरांगना ताराराणी ह्यांचे आत्मे निवले असतील आता ...

तुम्ही तुम्हाला वाटेल ते लिहा रे ... पण ह्या लोकांनी त्यांच्या राज्यासाठी २७ वर्षे वाया घालवली होती. प्राण घालवेल होते. किमान त्यांच्या स्मृतीस स्मरून हे लिहा की ते धर्मयुद्ध नव्हते.

स्वताच्या धर्माविरोधि आदेशही सैन्य पाळतच असेल ना. म्हणजे त्यांना धर्मापेक्षा जास्त काळजि चाकरिचि होति.हे कसले धर्मयुद्ध.

अनिरुध्द उगाच संभाजि राजांना मध्ये आणुन फाटे कशाला फोडताय.हे धर्मयुध्द नसून स्वातंत्र्य युध्द होते.आपल्या भुभागावर आलेल्या शत्रुला प्रत्युत्तर देण्याचे युध्द होते.धर्मयुध्द हे दोन धर्मात होते इथे तसा काही प्रकार नव्हता.शिवाजि राजांनि अफझल खानाला मारले तेव्हा त्याच्या हिंदु वकिलाचाही कोथळा बाहेर काढला.

औरंगजेब हिंदूविरोधक नव्हता हे मत मांडणार्‍यांसाठी --

संभाजीराजांना पकडल्यावर तू मुस्लिम हो आणि मी तुझे राज्य तुला परत देतो ही लालूच औरंगजेबाने का दाखवली?

शिखांचे गुरु तेग बहाद्दूर यांना पकडल्यावर औरंगजेबाने त्यांना मुस्लिम होण्याची लालूच का दाखवली?

काशीचं आणि इतर अनेक देवळं औरंगजेबाने का फोडली? आर्थिक लाभ हे फसवं कारण आहे. औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा करोडोंचा खजिना घेऊन आला होता. दिल्लीवर चाल करण्यापूर्वी दख्खनचा सुभेदार असतानाच त्याने भागानगर (हैद्राबाद) लुटून अफाट संपत्ती मिळवलेली होती. सबब मंदिरं फोडण्यासाठी आर्थिक लाभ हे लटकं कारण आहे.

महाराजा अजितसिंहाच्या मृत्यूनंतर अद्याप जन्माला न आलेल्या त्याच्या राजपुत्राचा आणि गर्भवती राणीचा खून करण्याचा आदेश औरंगजेबाने का दिला? केवळ दुर्गादास राठोडामुळे राणी वाचली होती.

नेताजी पालकराला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान का केलं? त्याला हिंदू ठेवूनही आपल्या पदरी नोकरी देता आली नसती का?

औरंगजेबाच्या पदरी हिंदू का होते याचं कारण -

औरंगजेबाच्या पदरी सुरवातीला असलेले बहुतेक हिंदू राजे हे राजस्थानातले राजपूत होते. महाराजा जसवंतसिंग, मिर्झा राजा जयसिंग इत्यादी. हे औरंगजेबाच्याच नव्हे तर अकबराच्या काळापासून मुघलांचे नोकर होते. महाराणा प्रतापाचा अपवाद वगळता एकही राजपूत राजा अकबराविरुद्ध उभा ठाकला नाही ही राजस्थानची शोकांतिका आहे. अकबराने आणि पुढे औरंगजेबाने या राजपुतांना मानाची पदं देऊन आपल्या पदरी ठेवलं नसतं तर राजस्थानात अनेक ठिकाणी महाराणा प्रतापाचा आदर्श समोर ठेवून मोंगलांचं जोखड फेकून देण्यासाठी संग्राम सुरु झाला असता आणि ते अकबरच काय पण औरंगजेबालाही परवडलं नसतं. शिवाजी महाराजांना भेटून परतल्यावर बुंदेलखंडात छत्रसालाने नेमकं हेच केलं आणि स्वतंत्र राज्यं स्थापन केलं. फोडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची निती नसून पार अकबराच्या काळापासून चालत आलेली आहे.

मराठा सरदारांनी औरंगजेबापुढे लोटांगण घालण्याचं कारण अर्थातच वतनं आणि जहागिरीची लालूच आणि भोसल्यांना असलेला विरोध हेच होतं. याच कारणापायी आदिलशहाच्या पदरी मराठे नोकरी करत होते. अपवाद शहाजी राजांचा. त्यांना निजामशाही चालवण्याचा प्रयत्न फसल्यावर नाईलाज म्हणून आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली होती.

सो कॉल्ड सेकुलर लोकांची या धाग्यावरील वाटचाल, त्याला सहिष्णु, अगदि संतपदावर चढवण्यापर्यंत मारलेली मजल, रिडिकुलस्ली हिलॅरियस आहे...

<<
सो कॉल्ड सेकुलर लोकांची या धाग्यावरील वाटचाल, त्याला सहिष्णु, अगदि संतपदावर चढवण्यापर्यंत मारलेली मजल, रिडिकुलस्ली हिलॅरियस आहे...
>>

* १००

आता प्लस चे महत्त्व मायबोली वर राहिले नाही Happy

Pages