छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार पुर्वी पहिल्यांदा जेव्हा कळले होते की दिल्लीत औरंगजेबाच्या नावाचा रस्ता आहे तेव्हा पासूनच मला वाटत होतं की नाव बदलायला हवं

रस्त्याचे नाव बदलंल हे चांगलेच केले

बदलताना कलामांचा धर्म बघीतलाच गेला नसेल / त्यात राजकारणाचा भाग नसेलच असेही मी मानत नाही.

पण औरंगजेबाचे नाव काढले हे मला आवडले.

इतिहासात जो जिता वोह सिकंदर असतोच पण म्हणून पौरसच्या वारसांनी रस्त्याला तिसर्‍याच कुणी सिकंदराचे दिलेले नाव कायमच ठेवावे की काय

For these same reasons of statecraft, Aurangzeb also patronised temples, since Hindus who remained loyal to the state were rewarded. In fact, as Katherine Butler Schofield from King's College London points out, “Aurangzeb built far more temples than he destroyed." Scholars such as Catherine Asher, M Ather Ali and Jalaluddinhave pointed to numerous tax-free grants bestowed on Hindu temples, notably those of the Jangam Bari Math at Benares, Balaji's temple at Chitrakoot, the Someshwar Nath Mahadev temple at Allahabad, the Umanand temple at Gauhati, and numerous others.

औरंगजेबाने काही मंदिरांना मदत केली खरे आहे का?

विकु - एकवेळ हे खरे असेल देखिल पण बुंद से गयी वोह भी हौद से नही आती.... हौद से गयी वोह बुंद से क्या आयेगी

औरंगजेब भलाबुरा कसा होता हा चर्चेचा मुद्दा नाही. >>

मयेकर

चुकीच्या बाफवर चर्चा करत आहात मग. मी लिहिले आहे " आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर. "

राहिला एक शतकाचा मयेकरांचा मुद्द्दा तर स्पेनवरील मुसल्मानी आक्रमनानंतर काही शतकांनंतर शहरांची ती मुसलमानी नावे परत मुळ स्पॅनिश मध्ये केली गेली. पण मुद्दा तो नाहीच आहे.

असो.

पण औरंगजेबाचे नाव काढले हे मला आवडले. >> मलाही !!

विकु तो वरचा प्यारेग्राफ शोएबच्या लेखातील आहे. असे त्याचे म्हणणे आहे. तो पुरावा नाही. तुम्ही एखादे पत्र दाखवा.

मनपातील आप सदस्यांनी निर्णयाशी असहमती दर्शवली होती>> I think NDMC don't have any AAP members as during last election of NDMC AAP wasn't existing.

दोन मिनिटांच्या गुगला गुगली नंतर. ...

http://hindi.oneindia.com/news/2012/11/23/feature-aurangzeb-built-balaji...

तो पॅरा शोएबच्या लेखातला असला तरी ते "त्याचे म्हणणे" नाही. इतर पुस्तकातून त्याने उतारा उद्धृत केला आहे.

इतिहास असा ब्लॅक एंड व्हाईट असत नाही. सतीची प्रथा बंद करायचा कदक प्रयत्न औरंगजेबानेच केला.

मंदार, Delhi Chief Minister Arvind Kejriwal and two others today(२०.०३.२०१५) took oath as member of the New Delhi Municipal Council.

NDMC chairperson Jalaj Srivastava administered the oath of membership to Mr Kejriwal, who then administered the oath to Delhi Cantonment MLA Surinder Singh and Secretary of Directorate of Education Punya Salila Srivastava at a Council meeting in New Delhi.

According to NDMC Act, Lawmakers from New Delhi and Delhi Cantonment constituencies automatically become members of the New Delhi Municipal Council. Once the Union Home Ministry notifies the NDMC of the appointment, the members are officially sworn in.

विकु,

त्या लेखात हे फर्मान आहे / ते असे होते असे कुणीही म्हणू शकतो. फर्मान दाखवले तर बरं पडते.

तरीही मी मान्य करतो की, त्याने ते बांधले. मग त्यामुळे तो विलक्षण वगैरे ठरतो की काय? त्याच लेखात ( तुम्ही दिलेल्या) जनरल ऑर्डरचा उल्लेख केला आहे आणि ते पत्र मी इथे दिले आहे.

एक मंदीर बांधायला जागा दिली आणि हजारो तोडले. पण एक बांधले ना म्हणजे तो सेक्युलर वगैरे का?

औरंगजेब वाईट होता ह्याचे जास्त पुरावे आहेत. तर तो वाईट होता म्हणणे इतके त्रासदायक व्हावे काय?
तो सेक्युलरच होता हा भाबडा आशावाद आहे.

लोकं तेच लावून धरले आहे. एक बांधले ना. मग तर झाले. टाईप.

तो वाईट नाहीच हे दाखवून देणे इतके महत्वाचे आहे का?

शिवाजी बेग्ज कोणी नाही लिहिले की ही शिवाजीची खास चाल होती? का लिहावे वाटले नाही. प्रॉब्लेम इथे आहे.

कुणीही विरोध का नाही केला? आणि जे करत आहेत ते जातीयवदी, हिंदूत्ववादी ही मांडणी मात्र कॉमन आहे. ( इथेच नाही, सगळ्या मिडीयात).

हिस्ट्री का चेंज करायची? तो वाईट नाहीच हे दाखवून देणे इतके महत्वाचे आहे का?

शिवाजी बेग्ज वर तुम्ही नाही लिहिले, की ही शिवाजीची खास चाल होती? का लिहावे वाटले नाही. प्रॉब्लेम इथे आहे.

कुणीही विरोध का नाही केला? आणि जे करत आहेत ते जातीयवदी, हिंदूत्ववादी ही मांडणी मात्र कॉमन आहे. ( इथेच नाही, सगळ्या मिडीयात).
>> +१
या सगळ्यांना सौदीतुन फायनान्स होतो आणि यांचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे सर्व जगाला हिरवे करणे. त्यासाठि हे लोकं(?) काहीही करतील.

औरंगजेबच कशाला इतरही अनेक मुसलमान देवळाना मदत करायचे.

रामदास स्वामीनी बांधलेल्या चाफळच्या राममंदिराला अदिलशहाने जमीन / पैसा दिला होता ना ?

But Kejriwal was supporting name change then it does not matter who else from AAP oppose this change. AAP is Kejriwal or Kejriwal is AAP. This is fact Happy Anyway this is not inline with the subject discussion so better I stop here.

केदार, औरंगजेब नि इतर आक्रमकांनी मंदिरे तोडण्यामागे धार्मिक नाहि तर आर्थिक कारणे होती.

औरंगजेब नि इतर आक्रमकांनी >>

चला औरंगजेब आक्रमक होता इथपर्यंत प्रगती झाली धाग्याची. म्हणलंच आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडीता.

ते आमच्या शोएबांनाही सांगा ते म्हणत आहेत तो आक्र्मक नसून लोकल होता. "बाबाजी धम धम" वरून. बरं पडल.

धन्यवाद !

आर्थिक कारणे होती. >> एकदम कबुल. जामा मशिदीला दगड कमी पडत होता. आणि मग खाणीतून का काढा. तेवढे पैसेच नव्हते मग दगडाच्या मूर्ती तोडल्या. बरोबरे.

चुक

>>>औरंगजेब नि इतर आक्रमकांनी मंदिरे तोडण्यामागे धार्मिक नाहि तर आर्थिक कारणे होती.<<<

ती कारणे समजून घ्यायला आवडेल

जयदीपक,धार्मिक कारणे असती तर एकही मंदीर बांधायला त्यांनि मदत दिली नसती..मदीरे पाडण्यामागे आर्थिक कारणे होती.

एखादे मंदिर बांधण्यामागे आर्थिक कारण असू शकते की? सगळी मंदिरे पाडण्यामागे कशी काय आर्थिक कारणे?

,धार्मिक कारणे असती तर एकही मंदीर बांधायला त्यांनि मदत दिली नसती..मदीरे पाडण्यामागे आर्थिक कारणे होती. >> माझ्यामते मुघल साम्राज्यात सर्वाधिक काळ जगणारा बादशाह म्हणून औरंगजेब होता (इथे फक्त लढाई करणारे बादशाह विचारात घेतले आहे) पडत्या काळात मंदिर बांधण्यात मदत दिली असेल तर तो काळ वेळ वेगळा मानायला हरकत नाही काळानुसार धोरणे बदल होतात परंतू उमद्या वयात अशी मदत दिल्याचे उदाहरण दुर्मिळ असेल

आर्थिक कारण मला ठाऊक असलेल: मुस्लिम राज्यकर्ते सैनिकांना पगार मंदिरांच्या लुटीतून द्यायचे.

धार्मिक कारण: तुमचा देव तुमचे रक्षण करू शकत नाही, तुमचा राजा तुमचे रक्षण करू शकत नाही … आमचे व्हा सुखाने जागा Happy

पण औरंगजेबाचे नाव काढले हे मला आवडले.

खुप वर्षांपुर्वी जेव्हा ह्या नावाचा रस्ता दिल्लीत आहे हे ऐकलेले तेव्हाच आश्चर्य वाटलेले की स्वतंत्र भारत झाल्यावरही ते नाम कायम का ठेवले. नाव बदलले याचा आनंद आहे.

वरची इतर चर्चा वाचुन गंमत वाटतेय कि विषाद हे नक्की सांगता येणार नाही. विरोधासाठीच विरोध हे धोरण राबवत लोक अशा थराला जातात की शेवटी कशाला विरोध करतोय त्याचेही भान गळून पडते.

असो.

केदार,

तुमचा लेख पटला. शहाजहान कैदेत असतांना औरंग्याला म्हणाला होता, "ते हिंदू लोकं किती चांगले आहेत ते बघ. मृत पितरांना पाणी देतात. तू इथे जिवंत बापाच्या घशात एक थेंब पाणी ओतायला तयार नाहीस."

आता हा औरंग्याला महान म्हणून फुकटचं डोक्यावर चढवून ठेवलं जातंय. यामागे सौदी पैसा आहे ते उघड गुपित आहे. त्याचं काय आहे की पराक्रम दाखवून हिंदूंना जिंकता येत नाहीना ! मग कुठून तरी हिंदूंचा मानभंग करायचा.

आ.न.,
-गा.पै.

मंदिरे तोडण्यामागे धार्मिक नाहि तर आर्थिक/राजकीय कारणे होती.

शृंगेरीचे मंदीर मराठ्यांनी लुटले होते आणी मग त्या मंदिराला टिपु सुलतानाने मदत केली होती.

>एक मंदीर बांधायला जागा दिली आणि हजारो तोडले.

In spite of his terrible reputation, Aurangzeb sticks to this template. Temples are rarely destroyed (Eaton puts the number of instances at 15 for Aurangzeb) and, if they are, the reason is political. For example, Aurangzeb almost never targetted temples in the Deccan, although that is where his massive army was camped for most of his reign. In the north, he did attack temples, for example the Keshava Rai Temple in Mathura. But the reason was political: the Jats of the Mathura region had revolted against the empire.

औरंगजेब हा एक चार चौघासारखा राजा होता. तो "रयतेचा राजा" नव्हता. तरीही तो "हिंदु विरोधी" वगैरे नव्हता. त्याला हिंदु बद्दल इतका द्वेष असता तर त्याने आपल्या सरदारंना जबरदस्तीने मुसलमान बनवले असते, एकाही मंदिराला मदत केली नसती आणी हिंदु स्त्रिया सती जाताहेत तर जाउदेत असे म्हणाला असता.

औरंगजेब हा एक चार चौघासारखा राजा होता. तो "रयतेचा राजा" नव्हता. तरीही तो "हिंदु विरोधी" वगैरे नव्हता. त्याला हिंदु बद्दल इतका द्वेष असता तर त्याने आपल्या सरदारंना जबरदस्तीने मुसलमान बनवले असते, एकाही मंदिराला मदत केली नसती आणी हिंदु स्त्रिया सती जाताहेत तर जाउदेत असे म्हणाला असता.

<<

Lol औरंग्याची एवढी 'तारिफ' तर त्याचे चरित्र ज्यांनी लिहिलेय त्या 'जादुनाथ सरकार' यांनी देखिल केली नाही. ते आता हे महान इतिहास अभ्यासक करतायत. किती ते लांगुलचालन करायचे त्याला काही प्रमाण आहे की नाही. Proud

अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगज़ेब आलमगीर की जय! दारुल हर्ब अभीभी बाकी है!!

कुलकर्णी, काशी विश्वेश्वरपण का तोडले सांगून टाका एकदाचे …

Pages