छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार,
मी स्पॉक, बेफिकिर आदि टिपिकल "हिंदुत्ववादी" लोकांच्या इथल्या बागडण्यामुळे म्हणतोय ते. तुम्ही अन मी लाख संतुलित लिहू बोलू हो. या विखाराचं काय करायचं?

जामोप्या आयडी बदला पाहु तुमचा. लबाड कोल्हा काय, शेळी काय. सगळे प्राणी झाले असतील तर फुलान्वर तरी या.

तर मुस्लिम एक होतात ही हिन्दुची पोटदुखी आहे असे तुम्हाला वाटते? मला आनन्दच आहे त्यात. उलट हिन्दुनी पण शिकायला पाहीजे असे. पण इथे या बाफावर बघा. केदारने जरा कुठे कोणा टिवटिव वाल्याविरुद्ध भाष्य केले तर त्याला हाणायला चार हिन्दुच पुढे आले. मग ओवेसी आणी हे हिन्दु यात काय फरक? कशाला त्या ओवेसीला नावे ठेवायची.
रहाता राहीला तो औरन्गजेब, तर सत्तेच्या लालसेसाठी ज्याने आपल्या बापाला आणी सख्ख्या भावाला मारले, त्या नराधमाची काय बाजू घ्यायची. मरेना का ते येड तिकडे. आणी असल्या नराधमाचे नाव भारतातल्या रस्त्याला हवेच कशाला? इथे कसला आलाय हिन्दु-मुस्लिम वाद? आणी हा वाद कोण पेटवतय? डॉ. कलाम यान्चे नाव त्या रस्त्याला द्या म्हणणारे? की या नावाला विरोध करणारे?

जे चान्गले शासक होते, उदा. अकबर, हुमायुन वगैरे त्यान्ची नावे ठीक आहेत. मुस्लिम समाज सुधारकान्ची नावे ( जे आता या जगात नाहीत ते) सुद्धा द्या. तो औरन्गजेब कशाला हवाय? कमाले!

मी स्पॉक, बेफिकिर आदि टिपिकल "हिंदुत्ववादी" लोकांच्या इथल्या बागडण्यामुळे म्हणतोय ते. तुम्ही अन मी लाख संतुलित लिहू बोलू हो. या विखाराचं काय करायचं?

>>

अहो तुम्ही माझा लेख असे लिहिले आहेत ना? मग ते संतुलित कसे? असो.

इब्लिस. कोण कसे लिहिते ह्यावर आपला काही कंट्रोल नसतो, पण ते किती लावून घ्यायचे ह्यावर असतोचकी. दुर्ल्क्ष करा की. दरवेळी आपले म्हणणे सिद्ध व्हावेच असे का? म्हणून मी पण करतो अनेक आयडीज नां त्या ट्रोल आयडीज असतात असे समजा की.

आणि तुमचेही प्रतिसाद थंड कुठे हो असतात. इथेही "हिंदुत्ववादी" आणलंच की तुम्ही. Happy

संतुलित लिहू, संतुलित बोलू. पण कोणी काही संतुलित खोडले तर मग डीवचणारे नका म्हणू बॉ Happy

.

छान माहिती दिलीत केदार. मला हा शोएब कोण ते माहितही नव्हते, या निमित्ताने कळले.


शोएबला जाऊन म्हणा, की डिवचणारे का लिहित आहेस. मी दुसरी बाजू दाखवत आहे. कृपया लक्ष द्या हो मुद्द्याकडे.

Happy काय पण अपेक्षा आणि कोणाकडुन .... Happy

मला "आवरण" वाचल्यापासुन सगळीकडे शास्त्री शोधायची सवय लागलीय आणि ते सगळीकडे प्रचंड संख्येने सापडतात.

रश्मीबै !

Proud

आधी हसून घेतो.

हिंदूनी एक व्हावे म्हणे ! कुठून आणायचे ? नेपाळ व कंबोडियातून का ? मुस्लिम ख्रिस्चन दीडशे देशात पसरले आहेत.

औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले.>>>>छान.

फक्त तो रोड खड्डे विरहित आहे का? ते बघावे त्या रोडवरुन हिंदू-मुस्लिम दोघे सुरक्षित प्रवास करु शकले तर बस्स झाले नावात काय ठेवलय. जसे महात्मा गांधी रोड ला एम जी रोड म्हणतात तसे APJ रोड म्हणतिल.

रश्मीतैनी अकबर व हुमायुनला चांगले शासक म्हणून सर्टिफिकेट दिले आहे.

सनातन ग्यांगने कृपया नोंद घ्यावी.

Rofl

हसून घ्या.:फिदी: मी पण हसते.:फिदी: काय हे परत परत तेच बोलताय तुम्ही. अहो मुस्लिम आणी ख्रिश्चन १५० देशात पसरले असतील, पण आता काय परीस्थिती आहे? किती देश स्वतःचे अस्तित्व टिकवु शकतायत? इराकचे काय झालेय? या लोकान्ची आपसातच हाणामारी सुरुय. भारतावर कित्येका नी आक्रमणे केली, पण देश टिकलाय ना? एक पाकीस्तान सोडला तर असे किती तुकडे झाले भारताचे? आणी कोण करु पहातय ते तुम्ही बघत आहातच.

उलट जे असे करतायत ना त्यान्चीच नाके ठेचली जातायत. अफगणिस्थान, पख्तुनिस्तान, सिन्ध असे अनेक प्रान्त-देश पाकड्यान्च्या नाकी नौ आणतायत. आणी तरी तुम्ही सारन्गी वाजवताय मुस्लिम एकतेची?

भारतातले मुस्लिम सोडले तर बाहेरचे कुणीच एक नाहीत, कळ्ळे?

ओ ओ ओ मला त्या सनातन गॅन्गशी काही घेणे देणे नाहीये, मी त्याना मानतही नाही. पण दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने हे राजे बरेच होते असे म्हणेन. प्रत्येक जण महम्मद रफी वा अब्दुल हमिद असावा अशी अपेक्षा मी करत नाहीये.:फिदी:

फक्त तो रोड खड्डे विरहित आहे का?>> Do you know where the road is? It is one of the costliest property address in New Delhi. Where people like L.N. Mittal have their homes. Very few ordinary Hindu / Muslim travels on this road Happy

Kedar your point is valid but discussing on Maayboli is now a days is like .......... you know what I mean.

औरंगजेब चांगला नव्हता असे मान्य करूनही रस्त्याचे नाव बदलणे हा केवळ डिवचण्या साठी किंवा/आणी "अछ्छे दिन" वरून लक्ष काढून घेण्यासठी घेतलेला निर्णय आहे आणी त्याची जरूरी नव्हती हा भाग रहातोच. आता दिल्लीतल्या आणखी एका रस्त्याला गोडसेंचे नाव द्यावे अशी मागणी हिंदुसभेने करून हे कुठे जाणार याची झलक दाखविली आहेच.

एका रस्त्याला गोडसेंचे नाव द्यावे अशी मागणी हिंदुसभेने करून हे कुठे जाणार याची झलक दाखविली आहेच.>>> मग काश्मिर मधे अफजलचे नाव द्यायला सांगतील चालेल ?

>>>मी स्पॉक, बेफिकिर आदि टिपिकल "हिंदुत्ववादी" लोकांच्या इथल्या बागडण्यामुळे म्हणतोय ते. तुम्ही अन मी लाख संतुलित लिहू बोलू हो. या विखाराचं काय करायचं? <<<

इब्लिस की जे काय कोण असाल ते! स्वतःच्या पोष्टीत स्वतःचे विचार डकवत चला. दुसर्‍यांवर लेबले लावू नका. विखाराबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे सनी लिओनेने नऊवारी पातळाची महती सांगण्यासारखे आहे. आणि तुम्ही स्वतःचे प्रतिसाद स्वतःच संतुलित म्हणणे हा तुमचा हास्यास्पद असण्याचा मोठा दाखला आहे. छपरी प्रतिसाद बास करा.

केदार,

उत्तम पुरावे दिलेत. माहितीबद्दल आभार!

औरंगजेब चांगला नव्हता असे मान्य करूनही रस्त्याचे नाव बदलणे हा केवळ डिवचण्या साठी किंवा/आणी "अछ्छे दिन" वरून लक्ष काढून घेण्यासठी घेतलेला निर्णय आहे आणी त्याची जरूरी नव्हती हा भाग रहातोच. आता दिल्लीतल्या आणखी एका रस्त्याला गोडसेंचे नाव द्यावे अशी मागणी हिंदुसभेने करून हे कुठे जाणार याची झलक दाखविली आहेच. >>

ह्या सर्वाचा शोएब डॅनिएलचा तो लेख चांगला लिहिला ह्याच्याशी काय संबंध ?

दिल्ली सरकार मध्ये "आप"चे राज्य आहे की भाजपाचे? आपने प्रस्ताव आणला आणि भाजपाच्या दोघांनी पाठींबा दिला. उगाच भाजपाला झोडत आहात तुम्ही. हा निर्णय लोकल सरकारचा आहे. केंद्राचा नाही !

सहसा मोठे लोकं गेल्यावर त्यांच्या स्मरनार्थ नाव देण्याची प्रथा आहे. ह्या आधीही दिल्ली मधील रस्त्यांची नावं बदलली आहेत.

हिंदू महासभेची ती मागणी मूर्ख आहे.

जाणकारांसाठी परत एकदा, आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर. त्यामुळेच लिहिले की आताशा त्याला महान ठरविणारे लेख येत आहेत. म्हणून मी इथे लिहिले.

अहो हे लोक राजकारणी आहेत. त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेऊ नका. हेच लोक परवा माबोवर व इतरत्र शिवशाहीर पुरन्दर्यान्विरुध्द बोलत होते. त्यांना पुरंदरे खटकतात (का त्याचं काही कारण कोर्टात सिध्द करू शकले नाहीत ते सोडा..) पण शिवाजी महाराजांना सतत त्रास देणारा आणि महाराजांचे तरुण कर्तबगार ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा खून करुन मृतदेहाची विटम्बना करणारा औरंगजेब खटकत नाही उलट त्याचा पुळका येतो. काय बोलणार यावर? एकच वाक्य- झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

रस्त्याचे नाव बदलायचा निर्णय दिल्ली राज्यसरकारचा नसून नवी दिल्ली मनपाचा NDMC आहे.
तिथे सत्ताधारी पक्ष भाजप आहे. मनपातील आप सदस्यांनी निर्णयाशी असहमती दर्शवली होती. अर्थात अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सहसा मोठे लोकं गेल्यावर त्यांच्या स्मरनार्थ नाव देण्याची प्रथा आहे. ह्या आधीही दिल्ली मधील रस्त्यांची नावं बदलली आहेत.>>>

नविन-नविन रस्ते बांधुन नावे दिली असती तर बरे झाले असते.
लोकांचा (हिंदू-मुस्लिम)दुवा मिळाला असता आता नविन नाव पाठ होईपर्यन्त जुनेच नाव तोंडात येणार

>दिल्ली सरकार मध्ये "आप"चे राज्य आहे की भाजपाचे? आपने प्रस्ताव आणला आणि भाजपाच्या दोघांनी पाठींबा दिला. उगाच भाजपाला झोडत आहात तुम्ही. हा निर्णय लोकल सरकारचा आहे. केंद्राचा नाही !

Are you sure ?

Are you sure ? >>. मी चुकून दिल्ली सरकार लिहिले. दिल्ली कॉर्पोरेशन असे हवे. नाव बदलात आप आणि भाजपा दोघेही होते.

आणि तसेही .. बीजेपी आणि आप ह्यात नंतर आले. आधी तारिक फतेह ह्यांनी २०१५ च्या सुरुवातीला ही मागणी केली होती. त्यांनी औरंगजेब हे नाव काढून दारा शिकोह हे द्या अशी मागणी केली होती. दारा शिकोह हे नाव जरी दिले असते तरी आवडले असते.

मुळात दिल्लीतील रस्त्यांची/जागांची नावे औरंगजेब रोड, लोधी गार्डन, पृथ्वीराज मार्ग ही नावं ब्रिटिशांनी ठेवली (असे वाचनात आले). त्यामागे दिल्लीच्या इतिहासाच्या खुणा जपणे हाच हेतू होता.
इतिहासाच्या खुणा नष्ट केल्याने इतिहास बदलत नाही.

हो ब्रिटीशांनी ठेवली आहेत. १९२०ज मध्ये. बाबर मार्ग पण आहे. पण मी लिहिल्यासारखे ब्रिटीशांनी ठेवलेली नाव बदलून आपण जवाहर मार्ग, इंदिरा मार्ग असे आधीही केले आहे. पण आत्ताच का त्रास?

इतिहासाच्या खुणा नष्ट केल्याने इतिहास बदलत नाही. >>

इतिहास पत्र आणि पुस्तकात आणि मॉन्युमेंट्स मध्ये असतो.

रोडचे नाव बदलले म्हणजे इतिहासाची खुण बदलत नसते. तसेही ही नाव १९२०ज मध्ये दिली आहेत. म्हणजे तो पर्यंत औरंगजेब मृत झाला होता की काय?

पुस्तकातून नावे काढा असे कोणी म्हणाले आहे की काय?

इथे लोक एकदा औरंगजेब वाईट होता हे दाखवा हे म्हणतात, मग ते दाखवले की म्हणतात आहे हे मान्य करूनही रस्त्याचे नाव बदलणे वाईट, मग म्हणतात की रस्त्याचे नाव बदलले तरी इतिहास बदलत नाही. नसेल बदलत इतिहास तर मग इतका का शोष चालू आहे? केदार म्हणाला तसे जवाहर मार्ग वगैरे आहेतच की. तिथे नाही का बदलला इतिहास?

आता जर्मनीमध्ये हिटलरचे नाव कुठल्यातरी रस्त्याला दिले तर किती गदारोळ होईल? त्याने जी काही बरी कामे केली असतील त्याची जंत्री देणार आहे का कोणी? का त्यांनी "तो काही इन्व्हेडर नव्हता, आपलाच होता" म्हटले की झाले?

ब्रिटिशांनी दिल्लीच्या राज्यकर्त्यांची नावे दिली त्यामागे त्यांचा जो उद्देश माझ्यापर्यंत पोचला तो इथे लिहिला. नेहरूंचं नाव ज्या रस्त्याला नंतर दिलं गेलं त्याचं आधीचं नाव कोणा व्यक्तीच्या नावावर नव्हतं असं दिसतं. तसं असूनही ते बदललं गेलं असेल तर तेही चूकच.

१९११ मध्ये ब्रिटिशांनी देशाची राजधानी दिल्लीला हलवली. गेले जवळजवळ शतकभर ही नावे आहेत. ती तोवर कोणाला खटकली नाहीत. आताच का खटकावीत?

विकु म्हणतात तसं रस्त्यांची नाव बदलणं एका मोठ्या योजनेचा भाग आहे हे जाणवतंय. म्हणून त्याची चर्चा होणारच. औरंगजेब भलाबुरा कसा होता हा चर्चेचा मुद्दा नाही.

जे लोक असा मुद्दा मांडताहेत त्यांच्याकडे मी तरी दुर्लक्षच करतोय.
धाग्याचा विषय औरंगजेब कसा होता हा ठरवणे असेल तर पास. आधीचे प्रतिसाद आता उडवत नाही.

Pages