उणिव
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
11
कधी मी इथे असतो
तर तिथलं जग
इथली उणिव असते
तर तिथे असताना
इथल जग
तिथली उणिव असते
ही उणिव
कधी .. कधीच भरुन
निघणार नाही
इथली कमी .. तिथली कमी
जाणवत राहणारच!
पण कुठवर? आयुष्यभर?
हे नको म्हणून
एक वेगळच जग
माझ्या आत..माझ्या नकळत
उदयास आल!
फक्त ते कुणाला दिसत नाही
पण मला ते जाणवत
मी इथे.. तिथे वावरत असताना
आतल जग माझ्यासोबत
भटकत असत!!!
इथल्या.. तिथल्या दोन्ही जगातील
लोकांना मग माझ्यासहीत
माझ्या ह्या जगाचा थांग लागत नाही!!
आपल्याच जगात वावरणारी माणसे
बहुतेक माझ्याचसारखी असावीत!!!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान!
छान!
आवडली. छान.
आवडली. छान.
सुरेख लिहिलय. आवडलं.
सुरेख लिहिलय. आवडलं.
छान लिहीलय
छान लिहीलय
मस्त!
मस्त!
छान.
छान.
मस्त
मस्त
वा बी छान .. आपल्या कविता
वा बी छान .. आपल्या कविता खरेच विचारात पाडतात.. बरेचदा !
आवडली
आवडली
छान लिहिलय.. आवडली कविता
छान लिहिलय.. आवडली कविता
सर्वांचे भरभरुन आभार. मला
सर्वांचे भरभरुन आभार. मला ह्या कवितेचा शेवट नीट जमला नाही. पण त्यावेळी लिहून पुर्ण करायची होती म्हणून पुर्ण केली.