नजरेची भाषा

Submitted by CutePari on 28 March, 2015 - 06:33

सहजच बोलता बोलता भाषेचा विषय निघाला कि आपले म्हणणे प्रभावी पणे मांडण्यासाठी कि भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी भाषा कोणती? कोणी म्हणे मराठी कारण शब्द पटकन सापडतात बोलायला कोणी म्हणे इंग्रजी का तर कमीत कमी वाक्यात समजवता येत म्हणून (इंग्रजी मध्ये कमीत कमी शब्दात किंवा वाक्यात कस समजावता येत असेल हे मलाही माहित नाही) या मुद्यावर बराच वेळ वादविवाद झाला पण कोणाचाच मत मनाला पटल नाही. कारण कोणत्याही भाषेमध्ये बोला पण एक गोष्ट नक्की कि बोलायच्या अगोदर शब्दाची जुळवाजुळव करावीच लागते. मग प्रभावी भाषा कोणती हे कस कळणार?
असाच वाद विवाद सुरु असताना माझ्या मैत्रिणीचा फोन वाजला फोनचा आवाज ऐकून साहजिकच तिच्याकडे लक्ष गेले आणि लगेचच लक्षात आले कि कोणाचा फोन आहे तो. थोड्यावेळाने फोनवर बोलून ती पुन्हा आमच्याजवळ येऊन बसली आणि मी तिला विचारले कि काय म्हणाले भावोजी?(नुकतच तीच लग्न ठरलं आहे) तेवड्यात शेजारीच बसलेल्या दुसरया मैत्रिणीने प्रतिप्रश्न केला कि तुला कस कळाल कि भावजींचाच फोन आहे तो आणि मी हि सहजच उत्तर दिले कि तिच्या डोळ्यात बघून म्हणजेच फोन वाजला आणि कोणाचा फोन आहे हे बघितले असता तिच्या डोळ्यात स्त्री सुलभ लज्जा दिसली आणि त्यावरून मी आपला अंदाज केला आणि तो खरा निघाला. आणि तेवड्यात डोक्यात प्रकाश पडला कि ज्या गोष्टीवर आपण बराच वेळ वाद घालत बसलो आहे तीच नेमक उत्तर आपल्याला सापडलंय आणि ते म्हणजे “ सर्वात प्रभावी भाषा म्हणजे नजरेची भाषा”.
खरच कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी नजरेच्या भाषेपेक्षा प्रभावी भाषा आणि माध्यम दुसर कोणताच असू शकत नाही. खरच नजरेतून कितीतरी भावना व्यक्त होतात जसे कि प्रेम, लज्जा, राग तिरस्कार, भय, आश्चर्य, आनंद. प्रेमातही नजरेची भाषा किती महत्वाची ठरते. काही भावना व्यक्त करायला जिथे शब्द अपुरे पडतात ते काम फक्त एक नजर करते. काहीच न बोलताही बरेच काही बोलते ती नजर. म्हणूनच जिथे शब्द अपुरे पडतात तिथूनच खरा नजरेचा संवाद चालू होतो. एकाद्याच्या मनातील भाव जाणायचे असतील तर त्याच्या डोळ्यात बघा. कारण शब्द खोट बोलतील पण नजर नाही. म्हणूनच माझ अस मत आहे कि कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा आहे ती म्हणजे नजरेची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच माझ अस मत आहे कि कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा आहे ती म्हणजे नजरेची.>>> +१०००

च्यायला लफ़ड़े आहे!!! आमच्या बैकु ला नजरेतुन फ्लिपकार्ट ची ऑर्डर प्लेस केलेचे कळते पण आमचे वटारलेले डोळे वाटाण्या सारखे भास्तात गंमतच आहे किनै!!!

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि याचा शास्त्रीय पुरावा असा आहे की जेव्हां एखादा प्राणी आपल्याकडे बघतो तेव्हां तो आपल्या डोळ्यांकडेच बघतो. सर्वाधिक communication हे डोळ्यातून होतं.

<< आणि याचा शास्त्रीय पुरावा असा आहे की जेव्हां एखादा प्राणी आपल्याकडे बघतो तेव्हां तो आपल्या डोळ्यांकडेच बघतो. सर्वाधिक communication हे डोळ्यातून होतं.>> अगदी बरोबर spitting cobra वरची माहिती गुगलल्यास स्पष्टिकरणही सापडेल.

जव्हेरगंज्या, एखाद्या / दी च्या नजरेत किती वेळ नजर गुंतवावी ह्याचेही संकेत आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे सलग दोन ते तीन सेकंदापेक्षा जास्त नजर रोखू नये.