कच्चे धागे.... ते पक्की कुलुपं.....!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज, सिडनी च्या जवळ एक हेलेन्सबर्ग या गावात एक भारतीय मंदिर आहे, तिकडे गेलो होतो. येताना एक सुंदर अन शांत बीच वर थोडा वेळ थांबलो होतो. तिथुन समुद्राला समांतर असा रस्ता वेलोंगोंग शहराकडे जातो. तो शोर्ट कट आहे. जी पी एस गंडले म्हणुन तो रस्ता पकडला..... वाटेत एक पुल लागला. तिथे थांबलो. तर एक नवा च प्रकार पहायला मिळाला...

पुलाच्या संरक्षक कठड्याला ज्या जाळ्या बसवलेल्या असतात तिथे प्रत्येकी एका गजाला एक अशी खुप सारी कुलुपे लावली होती. हे काय नवीन म्हणुन जवळुन बघितले तर, प्रेम व्यक्त करण्याचा एक नवा प्रकार सापडला. त्या प्रत्येक कुलुपावर अशी जोडप्यांची नावे होती! काही निव्वळ आठवणी तर काही लग्नाच्या दिवसाची नोंद केलेली!

भारतात अनेक मंदिरात लोक आपल्या इच्छापुर्ती साठी धागे बांधतात, काही प्रेमी युगुले ठराविक ठिकाणी धागे बांधतात.... तसाच काहीसा हा प्रकार...... बदल म्हंजे.......इथे धाग्या ऐवजी कुलुपे! Happy

आपले आपले प्रेम एकदम...... लॉक कर दिया!

पुल Hlnsbrgh_bridge.JPG
कुलुपेkulupe.JPG
कुलुप १Lock_1.JPG
कुलुप २Lock_2.JPG

प्रकार: 

भन्नाट रे चंपक,
प्रेम म्हणजे प्रेम असत, कुठेही केल तरी ते सेम असत!
प्रेम हे आयुष्यातील सर्वात सुंदर बाब. मग त्याचे रुपांतर लग्नात होवो अगर नाही. म्हणुनच त्याच्या आठवणी जपव्यात असे प्रत्येकालाच वाटते. त्या आठवणी जपण्याची ही एक अतिशय सुंदर पध्दत. कदाचित त्या जपण्याच्या पध्दती वेगवेगळ्या असतील पण भावना सेम असतात. म्हणुन-
प्रेम म्हणजे प्रेम असत, जगाच्या पाठीवर सगळीकडेच ते सेम असत!! Happy

अरेच्या.. मी परवाच नेपल्समधे हा प्रकार पाहिला.
गाइडनी सांगितलं की कुठल्याशा कादंबरीत शेवटी तो प्रेमवीर असं करतो म्हणे, 'त्यांच्या प्रेमाला कुलुप लाउन किल्ली खाली फेकुन देतात'... म्हणुन हल्ली सगळेच लोक हे करतात...

मला ही माहिती मिळाली... http://www.loverslock.com/About-Locking-Your-Love.html

काहितरी फॅड... आपल्याकडे कसे आले नाही अजुन?!!

चम्पी आणि चपंक दोघाच्या नावचे कुलुप लाउन यायचे तेथे पुढेचालुन मुलांना सागता आले असते.
चंपीने माझ्या तोंडाला एक भले मोट्ठे कुलुप लावलेय! Uhoh
त्या कुलुपचा फोटो येउद्या मग.................................!

तिकडे कुलुपांच्या दुकानांत पुरेल इतका स्टॉक आहे का ?
आम्हीपण कुलुपं लावावे म्हणतोय!(प्रत्येकीसाठी एक हो :-P).