मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.
त्याने स्त्री-पुरुष समानतेचा हाच मुद्दा उचलत राधे मा यांच्या बचावासाठी ट्वीट केलेय की जर पुरुष साधू नग्न फिरू शकतात तर राधे मा यांनी स्कर्ट घातले तर बिघडले काय?

मगाशी सविस्तर बातमी पाहिली,
पुढे त्याने जोडले आहे की मी कोणाला मानत वगैरे नाही पण माझा मुद्दा एवढाच आहे की कपड्यांच्या लांबीवरून कोणा स्त्रीचे चारीत्र्य ठरवू नये.
अर्थात, स्वतंत्रपणे हा मुद्दा योग्यच आहे. पण नक्कीच राधे मा प्रकरणात हा आणि एवढाच मुद्दा नसावा.

काही का असेना, आपल्या कडून स्त्री-पुरुष समानता राखली जावी म्हणून पुरुष बाबा बापू महाराजांवर जसे मायबोलीवर आजवर अनेक धागे निघालेत तसा हा एक धागा स्त्री असलेल्या राधे मा के नाम Happy

* शूल्डचे शूड करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

-----------

राधे मा यांना सुभाष घई यांनी भक्तीपुर्ण पाठिंबा दर्शवला.

Radhe Maa treats me and my wife as her parents: Subhash Ghai

http://www.hindustantimes.com/bollywood/radhe-maa-treats-me-and-my-wife-...

पुरा बॉलीवूड जुट गया है राधे मां को बचाने के लिये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष,

त्याचं काय आहे की स्त्रीपुरुषांचा व्यवहार सर्व जगास ठाऊक असतो. पण म्हणून त्याचं खाटलं कोणी रस्त्यावर उभं करत नाही. जी गोष्ट चार भिंतींच्या आत व्हायला हवी ती तिथेच व्हायला नको का? हे मत माझं नसून ज्ञानेश्वरमाऊलींचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

Should - शूल्ड

लिहिताना शूल्ड असेच लिहितात.
वाचताना मात्र 'ल' ला मूकबधीर ठेवत शूड असे वाचू शकता. ती वाचकांची व्याकरण चॉईस.

Should - शूल्ड

लिहिताना शूल्ड असेच लिहितात.
वाचताना मात्र 'ल' ला मूकबधीर ठेवत शूड असे वाचू शकता. ती वाचकांची व्याकरण चॉईस.

राधे मा ला पाहुन माझ्या मनात आलेले विचार - बाई दिसायला देखणी आहे.दोन मुलांची आई व सुनांची सासु असुन स्वता:ला छान मेंण्टेन केलय. फिल्म डान्सर किंवा कॅबरे डान्सर म्हणुन चमकायला हरकत नाही.
राधे मा बणुन लोकांना मस्त बेवकुफ बनवतिय.लहानपणी वडिलांच्या सुखाला पारखी झाली असावी म्हणुन पुरषांच्या कडेवर बसायला आवडत असावे.

सुंदर सुशिक्षित बेरोजगार स्त्रीयांनी राधे मा कडे ट्युशन लावुन या व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही.

बाबा व मा अम्मा यांच्या एकुन संख्येत मा अम्मा कमी असाव्यात त्यामध्ये समानता यायला हवी स्त्रीयांची भागेदारी वाढायला हवी.
जय राधे मा.

ऋन्मेष, तुम्हाला स्वतःला नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही. विनोद, समानता, सोनू निगम वगैरे इतर मते झाली.

अवांतर - भंपक राधे मा चे सर्व उपक्रम तातडीने बंद करून टाकले जावेत. तिला योग्य ती शिक्षा त्वरीत व्हावी.

असंच, सहज, थोडा विनोद, थोडा उपहास, धागा उघडायचा तर काही तरी चार ओळी लिहाव्या लागणार ना.
आधी अश्या बाईबुवांच्या बचावासाठी अमुक तमुक धर्माच्या साधूसंतांनाच लक्ष्य का करतात असा मुद्दा यायचा. आता हा स्त्री-पुरुष असमानतेचा मुद्दा आलाय, जरा गंमत वाटली. तेच हेडरमध्ये टाकले. पण विषयाचा आवाका मोठा आहे.

>>Should - शूल्ड

लिहिताना शूल्ड असेच लिहितात.
वाचताना मात्र 'ल' ला मूकबधीर ठेवत शूड असे वाचू शकता. ती वाचकांची व्याकरण चॉईस.>> अच्छा. बरं. नव्यानेच कळलं. धन्यवाद.

Admin sir, do something please. Don't let the site get dumbed down please. sincerely appealing.

सायो, जे ऋन्मेष 'टॉल्क' करत आहे ते त्याच्या 'प्सायकॉलॉजीला' धरून आहे.
तू 'टेंसिऑन' घेऊ नकोस.
टॉल्किंग वॉल्किंग तो पडला युंग मुलगा , तो 'फॉरिगन' भाषेचे नियम का पाळेल?
आपण 'वेडनेसडेला' 'चंपागणे' ची बोटटले उडवून त्याला मायबोलीवरची 'क्नाईटहूड' देऊन टाकू.
Wink

अमा काही उपयोग होणार नाही. ऋन्मेषला २ ठिकाणी चान्गले आणी उरलेल्या ८ ठिकांणी टाकाऊगिरी करायची सवय लागलीय. त्याला स्वतःलाच त्यातुन बाहेर निघायचे नाहीये. काय आहे ना की जन्क फुड पण किती खावे याला लिमीट्स असतात. ते जास्त झाले की डायबेटीस आणी बीपी मागे लागते. मग बायामाणस फोफसे होत जातात, फुग्यात हवा जास्त भरली की फुगा फुटेल एक दिवस. जाऊ द्या.

कृपया विषयावर बोला अन्यथा ही संधी साधून राधे मा यांचे भक्त धागा भरकटवायला बघतील.
तुर्तास थोडे ऑफिसकाम, मी नंतर लिहितो सविस्तर

वेल, बाकी कानामात्रेची गंमत सोडा, माझ्या वरच्या पहिल्या पोस्टमध्ये 'सायलेंट लेटरांची' गंमत आहे. शुल्डसारखी.
Wink

अरे हो, ऋन्मेष,
राधे मा मला लई भारी वाटली हां!
म्हणजे हा विषय सुरू झाल्यानंतर पहिल्यांदी मायबोलीवरच वाचलं.
मागे एकदोनदा मुंबईत पोस्टर्स बघितली होती पण मला ती सिरीयलची वगैरे वाटल्याने नीट पाहिली नव्हती.

इतक्या कमी वेळात असं एस्टॅब्लिश होणं म्हणजे भारीच.
बाकी अध्यात्मिक वेळा सोडून त्यांनी काय घालावं हा त्यांचा प्रश्नं.

इथे दक्षिणभारतात भक्तांना मिठी मारणार्‍या, छातीवर भक्तांचे डोके घुसळून प्रेमाचा प्रसाद देणार्‍या एक दोन पॉवरफुल्ली प्रेमळ माता ऑलरेडी आहेत.
त्यामुळे राधेमांच्या रूपाने उत्तर भारताचा पॉवरफुल वात्सल्याचा अनुशेष भरून निघाला असेच मी म्हणेन.

बाकी मांविषयी मी काय बोलावं इतकं त्यांच्याविषयी मी वाचलं/ पाहिलं नाही.
इथे माबोवर आलं तेवढंच आणि इथेच एक्दोन लिंकात आलेले फोटोज.
वाचायला पाहिजे.
Wink

तु नळी वरचा व्हिडीओ बघा -- राखी सावंत ची मोठी बहीण वाटते -डिट्टो- अगदी सेम टू शेम.. काहीही म्हणजे काहीही फरक नाहीये Happy

साती गंssssssssssssssssss Rofl
भारीयेस तू!

ऋन्मेष , तू जे हे शब्दांचे लॉजिक सांगितले आहेस तसे काही नसते!

रीया,
ईंग्लिश भाषा बनवताना आधी उच्चार बनवले की स्पेलिंग हे आपण मला सांगू शकाल का?
राधे मा वर आपण नंतर बोलू

Pages