कोकण ..सावंतवाडी माझो गांव ...

Submitted by शैलेशगांवकर on 16 August, 2015 - 03:38

नमस्कार ....मित्रांनो .......आपल्या मायबोली वरील .."जिप्सी" ह्यांची "कोकणमय" मालिका आणि "यो रॉक्स" ह्यांची "कोकणफ्रेश" आणि मु.पो.बांबर्डे " मालिकेतील आपल्या कोकणाची प्रकाशचित्रे व वर्णन बघुन आणि वाचुन मलाही माझ्या गावचे म्हणजे घराचे प्रकशचित्रे पोस्ट करावीशी वाटले .....वाईट प्रकाशचित्रे आले असतील तर चुक भुल माफ असावी ... Happy

आमचे घर .. [कोकण शोभुन उठते ते ह्या मंगलोरी कौलांच्या छतांमुळे .. Happy हल्ली सिंमेटच्या स्लॅबची पण घरे दिसायला लागली आहेत ...जीव जळतो हे पाहून . . Sad ]
50(2).jpg

घरासमोरील खळे (अंगण)
75(3).jpg

घरासमोरील खळयातील तुळसी वृंदावन ...(घरातील वातावरण सात्विक होते ..संध्याकाळी कुलदैवतेला ..ग्रामदेवतेला,वास्तुदेवतेला नमन करुन दिवाबत्ती केली जाते .... )
75(2).jpg

घराचा एका बाजुने घेतलेला फोटो..
50(3).jpg

आम्ही काही काजुची ,कोकमाची आणि सागाची कलमे लावलेली आसत ..साधारण दोन वर्षापूर्वी .....थय जाणारी वाट ... आणि कोकणात सगळी कडे अशी वाट असता ..लाल मातीची .. Happy
50(6).jpg

हयती कलम ....आता थोडी मोठी झालेली आसत ..वरुणराजाची कृपा आसा ना आपल्या कोकणावर .. Happy
90(2).jpg

आणखी एक प्रचि ...तो डोंगर दिसता मा ...त्या थयसर तिलारी प्रकल्प असा..म्हणतत ....महाराष्ट्र आणि गोवा सरकारचो मिळान .. १५ वर्ष व्होत ईलित अजुन काय पुरा व्होणा नाय ....देवाक काळजी .... Happy
75.jpg

पावसातलो एक ...प्रचि ..भात शेती ..सुंदर वाटता मा ! Happy
50(4).jpg

मुंबई सुन गावाक येताना काढलेलो वशिष्ठ नदीचो प्रचि ..
90.jpg

- वाईट वाटला तर ......नविन समजुन दुर्लक्ष करा ..सुरवात हा मा .. :))

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो आणि लिखाण छान असां हां!तुमी अंगणात भर टाकल्यात काय हो? नाय म्हणजे कोकणाच्या मानान घराचा जोतां कमी उंचीचा दिसतासा.

देवकी जी >फोटो आणि लिखाण छान असां हां!तुमी अंगणात भर टाकल्यात काय हो? नाय म्हणजे कोकणाच्या मानान घराचा जोतां कमी उंचीचा दिसतासा. >> भर नाय टाकल्यानी घरच तसो बांधल्यानी ..बाबा एकटेच रवाक व्होते गावाक ...घाई केल्यान बाबान ...ह्या वर्षाक खळो नीट करुचो असा ...

वा, मस्त फोटो.

आठवण झाली कोकणातील घरांची. सुदैवाने माहेर आणि सासर मूळ कोकणात आहे आणि दोन्हीकडे चिरेबंदी घरं आहेत, मंगलोरी कौलांची.

मजा आली फोटो बघून .. Happy

हल्ली सिंमेटच्या स्लॅबची पण घरे दिसायला लागली आहेत ...जीव जळतो हे पाहून . . >>>> खरंय साला. आणि वर आम्हा मुंबईहून आलेल्या पाहुण्यांना मोठ्या हौसेने तो काँक्रीटचा पिंजरा आमचे नवीन आधुनिक घर बघा म्हणत दाखवतात..
पण ठिकाय, कदाचित त्यांना त्या गोष्टीचे कौतुक आणि नवलाई वाटत असावी.

अवांतर - जे लोक कोकणात राहतात त्यांनी फोटोग्राफी आपल्याला जमते की नाही याचा विचार न करता फोटो काढावेत आणि शेअर करावेत .. कोकणचा हिरवागार निसर्ग सारे काही सांभाळून घेतो. Happy

मस्त.
गेल्या खेपेला सावंतवाडीला दिवस घालवला गोव्याहून येताना..
काजू फॅक्टरीच्या अलिकडे असं घर पाह्यलासारखं वाटतंय.

सगळ्यांचे खुप धन्यवाद ! ....मनीमोहर जी तुमची रिक्षा म्हणजे गांवचे प्रचि आधीच पाहिले आहेत ..अप्रतिम घर व सुंदर परिसर आहे .... Happy

आणि यो.रॉक्स ..नक्की भेटू गांवी ......बघुया गणपतीक सुट्टी गावता का ?? Happy

सुंदर फोटो!!!

मंगळुरी कौलाची घरे जाऊन आजकल कोकणात स्लॅबची घरे सर्वत्र बांधतात पण खरी मजा ह्या जुन्या पध्दतीच्य घरातच असते. छान आहे घर आणि आजूबाजूचा परिसर.

मस्त इलेत सगळे फोटो. मी पण वाडीचो (तळावडा , रेल्वे स्टेशन च्या जवळ). गणपतीक गावक जातालात मा ? तेवा पण टाका फोटो.

रुन्मेश ल १००० वेळा अनुमोदन!
अगदि खरय. तुम्ही लोक फक्त फोटो टाकत राहा. चांगल वाईट ह्याच आम्हा भुभुक्षितन काही सोयर सुत्क नाही. आम्ही सगळ चवीनेच खातो Wink

सुंदर फोटो Happy
खरंच कौलारू घरांना तोड नाही.. कोकणातली सिमेंटची घरं सुंदर चित्रावरच्या डागासारखी वाटतात. दोन पावसाळे बघूनच गळायला लागतात आणि अजून खराब दिसतात.

BiTel photos are just too good. sorry for English.
ajun thode taka na. kokan mastach

खूप खूप धन्यवाद सर्वांक ..

कोकणीमाणूस: मी पण वाडीचो (तळावडा , रेल्वे स्टेशन च्या जवळ). गणपतीक गावक जातालात मा ? तेवा पण टाका फोटो. >>>>> हो जातालाय गावक .पण गणपतीक सांगता येणा नाय …… Happy मीया इन्सुलीक बांदाक जाताना

truptipatil >>>>> मीया इन्सुलीक बांदाक जाताना … Happy

कीरु दादा …नक्की ! च्याला बॉस गणपतीची सुट्टी ला का - कु करतोय …पण नक्की !! मला वाटत दिवाळीच उजाडेल सुट्टीला … Happy

बिटेल,
छान घर नी परस.
कौलांबद्दल बोलायचं तर ती आजकाल परवडत नाहीत. दर पावसाळ्याला सगळी कौलं / नळे काढून झाडणी करा, वांदरं कौलं फोडून जातात ती बदला, अधून मधून झाडा, पन्हळ झाडा. त्यापेक्षा स्लॅब किंवा सिमेंटचे पत्रे परवडतात. रोज तिथे राहणारे आणि निगा राखणारे असतील तरच जमतं. नायतर चाकरमान्यांना कायव परवडूचा नाय ता नळ्यांचा सोवळा.

वान्दरांचा जिथे प्रॉब्लेम आहे तिथे मात्र सोनू यांनी लिहिलेय ते खरं आहे. माहेरी माझ्या खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे गावाला माहेरी पत्रे घालणार आहेत. सासरी हा प्रॉब्लेम नाहीये.

Pages