पुण्यातील थीम रेस्टॉरंट्स्/हॉटेल्स

Submitted by चैत्रगंधा on 20 May, 2015 - 05:49

पुण्यातल्या थीम रेस्टॉरंट्सची माहिती हवी आहे. व्हिलेज,हॉर्न ओके प्लिज,चोखी दाणी ट्राय करून झाले आहेत. अजून कुठली आहेत का? निवांत गप्पा, जेवण, मुलांनाही खेळता येईल म्हणजे ते त्रास देणार नाहीत असे कुठले हॉटेल/रेस्टॉरंट सुचवा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही ही माहिती पाहिजे होती. पुण्यात थोडे हटके रेस्टॉरन्ट आहेत का? सगळीकडे मराठी पद्धतीचे जेवण मिळते पण काही वेगळे. खास करुन उत्तम अ‍ॅम्बीअन्स असलेले. थोडे निवांत ठिकाणी.

ह्यावेळी पकवान मधे गेलो होतो पण तिथे बसायला जागा अपुरी पडत होती.
सीसीडी मधे गेलो पण जितके पैसे दिले तितके समाधान नाही मिळाले.
अप - अबाऊ मधे गेलो होतो पण तेही असेच पैसेखाऊ निघाले.
मागे हिंजवाडीमधे गेलो होतो तिथेही खूप रग्गड रेट्स होते. आणि पदार्थ सो .. सो.
चैतन्यमधे गेलो होतो पण खूप हेवी वाटलेत सगळे पदार्थ. कॉजेलमधील मुलांसाठी कदाचित ठिक असतील.

तशी बरीच आहेत. पण "थीम" म्हणले की सांगायला मर्यादा येतात.

औंधला फोर सिझन्स हॉटेल मधले बॉलिवुड थीम असलेले सिनॅमन स्पाईस पण चांगले आहे. जुनी पोस्टर्स वगैरे पाहायला बरे वाटते. लाईव्ह म्युझिक पण आहे.

इ स्वेअरच्या मागे NH-37 आहे. (भोसले नगर) ते पण स्वादासाठी चांगले आहे.

माझं आवडतं थीम रेस्टोबार आहे द शिप. फोर्टालेझा कल्याणीनगरमध्ये आहे. पूर्णपणे शिपचं एंबियन्स आहे..
पण ग्रूप किंवा कपल्ससाठीच चांगलं आहे, नो किड्स प्लीज..

थीम म्हणजे नक्की कशी? कुझीन, अम्बिएन्स की अजून काही? मी चवीला प्राधान्य देतो, त्यामुळे वातावरण एडजस्टेबल टू अ सर्टन लिमिट.

अरे थीम वर इतका भर नका देऊ चांगले रेस्टॉरन्ट तरी सुचवा आधी. आपण भारतात आहोत अमेरिकेत वगैरे नाही Happy

मला एन. डी. ऐ. मधील जेवण जेवायचे आहे. माझी नीज मला म्हणाली की त्या साईडला एक दोन रेस्टॉरन्ट आहेत.

अरे वा! आपण एकाच गावचे म्हणजे!

नॉनव्हेजसाठी I'm Lion, FishLand, Masemari. कावेरी (चांदणी चौकात) हे थोड ढाब्याटाईप आहे, पण अम्बिएन्स नाही. अम्बिएन्सकरता त्रिकाया बेस्ट. चव चांगली आहे, जरा महाग.

व्हेजसाठी फार अनुभव नाही Sad सो वरदायिनी, ओलीव्हा हे एक चांगले हॉटेल माहिती आहे.

चांदणी चौकातून पौड रोडला वळलात की निवांत हे बरे आहे. त्यानंतर अम्ब्रोझिया रिसोर्ट आहे, २ ३ हॉटेल्स आहेत बहुधा, पण मी स्वतः गेलेलो नाही.

NDA रोडवर गार्डन कोर्टचे नाव ऐकले आहे. अप अबोव्ह, बंजारा हिल्स यांची क्वालिटी आताशा राहिली नाही, आणि सीसीडीतर नको इतक महाग आहे.

खाली कोथरुडात उतरला तर खान्देशी झटका किंवा खानदेशी एक्प्रेसची शेवभाजी अप्रतिम, पण वातावरण साधारण खानावळीसारख.

अजून पुढे गेलात तर कोथरूडमध्ये बरेच ऑप्शन मिळतील Happy

बी, तुम्हाला थीम वर भर नको असेल तर कॅम्पमधले रामकॄष्ण छान आहे व्हेजसाठी . बाणेर रोडला पण भरपूर हॉटेल्स आहेत.
burrp / zomato चेक करा. पण उत्तम अ‍ॅम्बीअन्स असणारे थोडेफार महागच पडणार.

थीमसाठी -> त्रिकाया, बार्बेक़्यु नेशन (इथे वेगवेगळ्या थीम्स अनुभवल्यात), विष्णू की रसोई, इत्यादी …

बाकी यादी इथे बघता येईल:

https://www.zomato.com/pune/collections

भरपूर थीमवाईज कॅटेगरीज आहेत …

हो. वृंदावन पण छान आहे.
रश्मी, संस्कृतीची क़्वालिटी घसरली आहे असं ऐकून आहे

चांदणी चौकातुन NDA रोडवर ओअॅसिस आहे>>>>
ओअ‍ॅसिस मस्त आहे. तिथे मेडिटेरियन फूड मस्त मिळते. आणि कॉकटेल्स सुद्धा. पण आजकाल नविन नियम केला आहे. फक्त विकांताला चालू असते म्हणे.

वाकडरोड ला कोपा कबाना चांगले आहे.
बाणेर रोडला पोस्ट९!. रूफ टॉप. ओपन अयर आणि ईनसाईड दोन्ही आहेत. बुफे आणि मेन्युवाईज असे दोन्ही पर्याय आहेत. मस्त आहे. शिवाय किंमती जास्त नाहीत. पावसाळ्यात शक्यतो जाउ नका.
मेरिऑटचे अल्टो विनो आणि पाशा मस्त आहे. पाशा ला जाताना लहान मुलांना सोबत नेउ नका. म्युजिक खूप लाऊड असते.
एबीसी फार्म्सला विकांताला लाइव्ह पर्फोर्मन्स पण असतात.

ब्लू फ्रॉग ला कोणी जाउन आले आहे का? कसे आहे?