निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भितीदायक म्हण हव तर पण घाण नै हं>>>> येस्स टीना, तूमाखमै.
बघ वरचा फोटो बघ.असे सौंदर्य गांडूळाला असते का? उगा आपलं कैच्या काय. Wink

03.. Vine Snake..हरणटोळ

IMG-20150806-WA0037.jpg

हॅरी पॉटर प्रेमींना लाॅर्ड व्हाॅल्डेमाॅर्ट आठवला का..?

रॅटल स्नेक चा फोटो लेक डेल व्हॅले कॅलिफोर्निया मधला आहे. सही म्हणजे तो आवाजही करत होता रॅटल सारखा तेव्हा कळलं Happy

रेपटाईल्स टीवी वर दिसले तरी आम्ही पटकन सोफ्यावर पाय घेणारे लोकं, फोटो कसले काढतोय '

पण हे वरचे रुबाबदार दिसणार्‍या सापांचे दिमाखदार फोटो काढणार्‍यांना __/\__

अय्यो साधना.. कोई मासे गायबले?? Uhoh

THE QUEEN'S FLOWER OR PRIDE OF INDIA. Lagerstroemia ... Other popular names Crepe Flower, Mota-Bondara,. Queen ... Marathi—taman, mota-bondara,.

आपले राज्यफूल आहे हे - तामण ...

साधना, वर्षुदी आणि टीना - यांच्या कॉमेंट्स अगदी वाचनीय, चाबूक, लै भारी, धमाल, वगैरे सर्वच.... Happy

म्हणजे प्राणिसंग्रहालयातले नाहीत..
रानावनातले...
कॅमेरा लेन्स शिवाय दुसरी कोणतीही काच मधे नाही.. >>>>> अरे बापरे, मग तर डेअरिंगबाजच म्हणावे लागेल तुमच्या बंधूंना .... शिवाय पेशन्स पण किती लागत असेल...

___________/\_________

मी यावेळी गावी मलबार ग्लायडींग फ्रॉग आणि मलबार पिट वायपर पाहिला. निरू, तो पहिला पिट वायपर असणार. त्रिकोणी डोके हे वायपरची खुण आहे. त्रिकोणी डोके हे सगळ्याच विषारी सापांची खुण आहे. डोके असे आहे म्हणजे तो साप कमी/जास्त, त्याच्या कुवतीनुसार जसे असेल तसे, पण विषारी असणारच. नागाचे डोके त्रिकोणी नसते बहुतेक. पण तरीही तो विषारी आहेच.

अरे काय मस्त मजा चाललीये इथे साप, माश्यांवरून. आत्ताशीक(नगरी शब्द!) झालं सगळं वाचून.
सर्वांचे फोटो आणि माहिती मस्त.
लाॅर्ड व्हाॅल्डेमाॅर्ट>>>>>>>>>>> नीरु ....अगदी अगदी!
आता सापनागसुसरीमगरीतून बाहेर येण्यासाठी हे पहा.............
शरदला(माझ्याकडे काम करणारा मुलगा) रस्त्यात हा जखमी अवस्थेत सापडला. त्याने तो घरी नेऊन त्याला बरा केला. जगवला. हा पिंजरा आणला.
काल तो आम्हाला दाखवायला घेऊन आला होता. पण त्याने पि़ंजरा खाली ठेवल्याबरोबर त्याने पिंजर्‍यातल्या पिंजर्‍यात अ‍ॅक्रोबॅटिक्स करून दाखवायला सुरवात केली. मी आयपॅड आणायला पळाले. म्हटलं फोटो घेऊ...पण तो इतके खेळ करून दाखवत होता ...अज्जिबात स्थिर रहात नव्हता. तो बहुतेक नव्या वातावरणात घाबरला असावा.
तेव्हा खालील "ड्वाय्लॉक" झाले.
धाकटी जाऊ: अग्गोबाई हा मोठा झाला रे शरद!
(तिने तो अगदी आणला तेव्हा पाहिला होता.)
शरदः हो काकू......तो सगळं मस्तपैकी खातो.
धा.जाऊ: काय खातो रे तो?
शरदः त्याला पोळी दिली तर तो या भांड्यातल्या पाण्यात बुडवून खातो.
धा. जाऊ आणि मी: Proud Proud Biggrin Biggrin
मग शरद आपल्या कामाला गेला. आम्ही दोघी साबुदाण्याचा चिवडा खात होतो.(कालचा गुरुवार उपास).
त्यातले काही दाणे त्याला दिले तर तो आमच्याकडे पाठच करून बसला. आणि मधून मधून खेळ चालूच.
कम्प्लीट रोलर कोस्टर राइड!
मग शरद आला. त्याला म्हटलं.. काही तरी घाल बाबा त्याला खायला. तो दमला असेल.
शरद पिंजर्‍या समोर बसला की लगेच तो शांत झाला. आणि शरदच्या हातातलं बिस्किट चोचीत घेऊन आमचयाकडे पाठ करून खात बसला. काही वेळाने शरद पिंजरा घेऊन घरी गेला.
खरं म्हणजे यातला विनोदाचा भाग सोडता......................त्याला आता सोडून द्यायला हवं असं वाटलं. पण आता तो अ‍ॅड्जस्ट करेल का बाहेरच्या वातावरणाशी? बाकीचे पक्षी त्याला टोचून मारणार तर नाहीत?





हा पोपटच ना? मग चोच पांढरी कशी? का ती नंतर लाल होते? (हा प्रश्न घोर अज्ञान दाखवणारा असू शकतो.

निरु,
धन्यवाद..मस्त प्रचि टाकलेत..
त्या हरणटोळाचे डोळे त्यान बारिक केले आहेत ना? तो असा मोकळ्यावर सापडायला खरच नजर लागते पन..बेमालुमपणे मिसळून जातो झाडांवर..मला तरीही दिसतो न चुकता.. Wink प्राणिसंग्रहालयात म्हणा..पण सापांना भेट दिल्याशिवाय मी निघतच नै कुठुनच.. Lol
Saw scaled viper came under the Big Four of India त्याचा फोटो एवढ्या जवळून..भलेही लेन्स ची मदत झाली असणार तरीही एवढ्या जवळून म्हणजे बाबो.. _/\_ सांगावा माझा..

माझा छोटा भाऊ, त्याचा मित्र सर्पमित्र आहे आणि हा त्यांच्या टिम मधे ट्रेनिंग घेतोय. कुठूनही साप निघाला म्हणुन फोन आला कि धावतपळत तिथ जातात आणि त्या सापाला घेऊन येतात..सोडण्यापुर्वी त्याला व्यवस्थित हाताळून बघतात..आणि मग जंगलात सोडून येतात..त्यांनी काढलेले फोटो बघितले कि दोन चार बुक्क्या बसतेच माझ्या हातच्या भावाच्या पाठिवर..
तो म्हणतो अग त्या ( सापाला ) त्रास न देता तुम्ही राहु दिल तर नै करत तो काहीच.. तरी माझ हवं तितक समाधान नै होत.. इतक्या जवळून कशाला काढायचे म्हणते मी फोटो त्याच्यासोबत.. आता नै करत बहुतेक्क ते असले पराक्रम..मोठे झाले ना Lol

वर्षू नील, तामण मस्तच गं..

साधना, गुलाबी कॉसमॉस पन छान..
घरी असलो कि हमखास शेतावर पार्टी होते..मुख्य रस्त्यापासुन आत साडेतीन किमी चा फाटा आहे..मग गाव आणि गावातुन जवळपास दिड दोन किमी चालत गेल्यावर शेत..आजुबाजुला खुप सारे रानफुल दिसतात..पण पिवळी, केशरी रंगाची..जास्त..गुलाबी फार कमी..जोडीला कोंबडे, वेलवेट सारखे हाताला लागणारे कोंबडे.. मग वाळलेल्या त्यांच्या काळ्या बिया खरडण्याचे प्रकार वगैरे करत मस्त रमत गमत जायच.. मज्जा..

Pages