चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, मस्त पोस्ट. पण यात ऐश्वर्या लबाड वृत्तीची दाखवली आहेच की. शेवटी तिने काय पाहिलं तर अच्छी जॉब, ओन हाऊस, वेल सेटल्ड.. हो गया ना इक्वल इक्वल? Proud

हम आपके है कौन चा शेवट अजिबात आवडला नाही. उगीच आपलं पुरणपोळी फारच गोड झाली म्हणून सारणात बळंच तिखटाची चिमूट टाकल्यासारखं वाटलं.

मला शेवटी विनोदी हाणामारी अस्लेले पिक्चर फार आवडतात. हेराफेरी अंदाज अपना अपना हम् है राही प्यार के, मि. इंडिया वगैरे. फुल्ल पैसा वसूल होतो.

एक कहर एंड म्हणजे 'पाप' नावाचा सिनेमा. "दिन मे तीन बार ध्यान करती हू" असली भिक्षू हिरवीण शेवटी जॉन अब्राहमला एकदम सराईतपणे थेट लिप किसच करते आणि कहर प्रकार - बॅकग्राउंड्ला झुलेझुलेलाल गाणे. ती बौद्ध, तो ख्रिस्ती, मधल्या मध्ये झुलेलालला का गाण्यात फुटेज दिले ते का ही टोटल लागत नाही.

केवळ त्या "लगन लागी तुमसे पायी " असला चक्रम सिनेमा पाहिला होता.

परिणीता....संपूर्ण चित्रपट हळुवार असताना त्याचा शेवट भिंत तोडून का? >>> अग्बै खर की कै? आता यासाठी परिणिता बघावा लागणार..

पाप - बॅकग्राउंड्ला झुलेझुलेलाल गाणे ----काहीतरी वेगळे . इतर ठिकाणी तुमचा धर्म , जात काहीही असो गाण्यात खुदा पाहिजेच

हे खुदा प्रकरण जामच इरिटेटींग आहे. मनिषा कोइरालाच्या टेल मी ओ खुदा गाण्यात हिरो हिंदू, हिरविन ख्रिश्चन आणि इंग्रजी शब्द अस्लेल्या गाण्यात साकडे घातलेय थेट खुदाला.

त्यावर जावेद अख्तरनी मस्त साम्गितलंय कुठल्याशा मुलाखतीत. टेल मी ओ गॉड तिथं बसेना. जतीन ललित चाल मॉडीफाय करतो तर भन्साली तयार नव्हता, मग मीटरमध्ये खुदाच बसत होता.

जुना मराठी `कुंकू'

यात काय पटले नाही? हिरोईन बंड करुन् म्हाता-याबरोबर राहायचे नाकारते. बहुतेक तो म्हातारा पाण्यात वाहताना दाखवलाय. एवढेच मला आठवतेय. तेव्हाच्या काळाचा विचार करता म्हाता-या नव-याबरोबर राहणे नाकारणे असे चित्रपटात दाखवणेसुद्धा प्रचंड मोठी क्रांती होती. चित्रपटाचा विषयच तो होता.

आपण वर "हिरविन परत नव-याकडेच जाणे" या विषयावर केलेली चर्चा पाहता अशा विषयावर चित्रपट काढणे किती धाडसी आहे हे परत परत जाणवत राहते.

हिरविन परत नव-याकडेच जाणे<<< यावर आवडलेला एकमेव सिनेमा म्हणजे दम लगाकि हैस्शा. पण त्यात त्रिकोण् नव्हता. तिसरा कोन "इगो" होता.

मधयंतरी स्लीपिंग विथ द एनीमीवरून इन्सोपायर होउन अनेको चित्रपट आले, सर्वांच्या शेवटी दुष्ट नवर्‍यालाच मरावं लागलं होतं. याराना, अग्निसाक्षी, दरार, कारोबार (हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे) वगैरे.

मला शेवटी विनोदी हाणामारी अस्लेले पिक्चर फार आवडतात. हेराफेरी अंदाज अपना अपना हम् है राही प्यार के, मि. इंडिया वगैरे. फुल्ल पैसा वसूल होतो.
>>>>>

जाने भी दो यारो या बाबतीत अजरामर आहे!
अगदी शेवटी त्या दोघांनाच फाशीची शिक्षा होते तरीही शेवटचं महाभारत हा एक अफाट प्रकार आहे!

अगदी शेवटी त्या दोघांनाच फाशीची शिक्षा होते तरीही शेवटचं महाभारत हा एक अफाट प्रकार आहे!>>> हो. Lol

आता पिक्चर पहावा लागणार.

जाने भी दो यारो अजरामर आहे. शेवटचा सिन तर अफलातुन. युधिष्ठिरचे अधुनमधुन "शांत हो गदाधारी भीम शांत", शेवटी भीम त्याच्याच डोक्यात गदा घालतो. आणि अधुन मधुन धृतराष्ट्र "ये क्या हो रहा है?"

परवाच अनकही पाहिला. त्यातही अमोल फार बेरकी दाखवला आहे. प्रेयसीची जान जाउ नये म्हणून
साध्या भोळ्या दीप्तीशी लग्न करतो. ती ११ महिन्यात जाणार असे भाकित असते. पण मग दीप्तिलाच मुलग होतो आणि प्रेयसी मरते. प्रेयसीवर अन्याव आहे हा.

त्याचे पहिले मुल जन्माला येत असताना बायको मरणार असे भाकित असते. हे भाकित टाळण्यासाठी तो दीप्तीबरोबर लग्न करतो कारण त्याच्या डोक्यात बायको म्हणजे लग्नाची बायको हे असते. पण विधीलिखितात बायको तीच जी त्याच्या मनात भरलेली असते आणि जिच्याबरोबर तो राहात असतो.

आता विधीलिखितच असे लिहिल्यावर प्रेयसी वर अन्याय कसा काय? ती जरी सामाजिकदृष्ट्र्या प्रेयसी असली तरी प्रत्यक्षात त्यांचे लिव इन रिलेशन असते.

पण तो शेवटी कल्टी मारुन दीप्तीला "मेरे होनेवाले बहु की होनेवाली सास कैसी है" हे विचारतो हे मला रुचले नाही. अर्थात त्याने दीप्तीला स्विकारणे हे योग्यच, पण म्हणुन प्रेयसी मेल्याचे दु:ख लगेच विसरावे

रच्याकने, अनकही हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. सगळ्यांची कामे अतिशय उत्तम झालेली आहेत त्यात. अमोलने शेवट आशावादी केलाय. मुळ कथा खानोलकरांची असल्याने शेवट निराशावादी आहे.

चाची ४२० मधे शेवटी कमल हासन ज्या पद्धतीने आपण पुरुष आहोत हे दाखवतो, ते नाही आवडलं, विशेषतः पूर्ण सिनेमात सोज्वळ चाची उभी केल्यावर!

चाची ४२० मधे शेवटी कमल हासन ज्या पद्धतीने आपण पुरुष आहोत हे दाखवतो, ते नाही आवडलं, विशेषतः पूर्ण सिनेमात सोज्वळ चाची उभी केल्यावर!>>> +१

चाची ४२० मध्ये परत हिरविन हिरो कडे जाते तेही नाही पटल.

मिसेस डाउट्फायर मध्ये कसं तो हिरो हिरविनीचं नव नात स्वीकारतो ते जास्त आवडत आणि पटतं

मिसेस डाउट्फायर मध्ये कसं तो हिरो हिरविनीचं नव नात स्वीकारतो ते जास्त आवडत आणि पटतं

हॉलिवुडवर भारतीय संस्कृती सांभाळायचे ओझे नाही, त्यामुळे ते वास्तववादी शेवट दाखवु शकतात. Happy

तसा मला सात च्या आत घरात चा शेवटही विशेष पटला नाही पण वास्तववादी वगैरे म्हणून बरोबर असावा.
दुनियादारीचा शेवटही भंपक वाटला. अगदी मूळ कादंबरी वाकवायची म्हटली तरी जरा कन्व्हिंसेबल प्रकारे वाकवता आली असती. ते शंभर चित्रपटांची परंपरा पाळून हिरॉइनीच्या लग्नातून हिरॉइनीला पळवणे, इतकं करुन हिरोला (हिरॉइनीला वारस देऊन झाल्यावर) मरण्याइतका गंभीर आजार असणे. मी जर हिरॉइनीचा भाऊ असतो तर मला नक्की पश्चात्ताप झाला असता बहिणीला पळायला मदत केल्याचा. Happy

दुनियादारीच्या शेवटाबद्दल काही बोलू नका ...
धागा ईथेच भरकटायचा

हो बरोबर आहे दुनियादारी नकोच ,कारण ह्या धाग्याचा विषय चित्रपटांचे न पटलेले शेवट असा आहे

जर ' तुम्ही पाहिलेला वाईट चित्रपट कोणता ? ' असा धागा असेल तर दुनियादारी चा उल्लेख केला पाहिजे

इजाजत आणि आंधी बद्दल सगळ्याना मम.

'कहानी' मध्ये विद्या बालन आणि सत्योकीची लव्हस्टोरी बघायची इच्छा होती.>>> मला आहे तोच शेवट पटला. ती एक कहानी बनुन रहाते हेच योग्य होते. रच्याकाने, सत्योकी मलाही खूप आवडला Happy

HAHK - अजिबातच पटला नाही शेवट. बळच त्या टफीला कामाला लावले.

DDLJ - अमरीश पुरीला अचानक तो फोटो मिळतो म्हणजे जरा अतीच होते.

लोकहो,
त्या बाहूबली चाच शेवट बघा ना...
म्हणजे, ३ तास खुर्चीत बसून शेवट काय तर...२०१६ मध्ये पहा.
म्हणजे इतके दिवस टि.व्ही वरच्या सोप ओपेरा त्रास देत होत्या आता यांनी सुरू केलं...
म्हणजे २०१६ मध्ये शेव़ट बघतांना सुरूवात काय होती हे आठवायला हवे.
अवघड आहे.

DDLJ - अमरीश पुरीला अचानक तो फोटो मिळतो म्हणजे जरा अतीच होते.
>>>>>
ते तरी ठिक आहे, पण अमरीशपुरी जेव्हा ओळखतो की शाहरूख तो बीअरवालाच मुलगा आहे, तेव्हाच एखादा लंडनमधील मुलगा नेमका आपल्या जावयाचा मित्र बनून कसा आला, आणि हा तो आपल्या मुलीचा प्रियकरच तर नाही ना अशी शंका यायला हवी होती. पण हा तर तर त्याच्याबरोबरच ऑंव आँव करत बसला..

Pages