बजरंगी भाईजानचा मराठी रिमेक !!!!!

Submitted by हेमन्त् on 29 July, 2015 - 11:46

"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.
चित्रपटाचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा असेल जेव्हा मारुती भाऊ, मुलीला तिच्या घरी सदाशिव पेठेतल्या घरी सोडतो आणि तिचे आई वडील मारुती भाऊला "काय हो, दुपारी घरी यायची वेळ आहे काय? यायचे होते तर १ च्या आधी कीवा ४ च्या नंतर यायचे नं" असे म्हणत खेकसतात.

( whatsapp वरून साभार )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great!

हे व्हॉटसप मेसेज आहे का?

असो,
थोडक्यात मराठी रिमेकमध्ये भारत-पाकिस्तानला लो बजेट लेव्हलवर आणून मुंबई-पुणे केले आहे.

पण कथानक पाहता यात मुंबईला भारत आणि पुण्याला पाकिस्तान केले आहे.

प्रत्यक्षात मात्र उलटे आहे.

पुण्याने आपली संस्कृती आणि परंपरा जपली आहे तर मुंबई मात्र घुसखोरांचा अड्डा आणि झोपडपट्टी झिंदाबाद झाली आहे.
आणि हे मी स्वता एक मुंबईकर सांगत आहे.

यावर चर्चा करता येते का बघा, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज. ..