Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 July, 2015 - 02:17
पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले
हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले!
रंगांचिहि अशी नशा की गुंतत गुंतत जावे
मुळचा आपुला रंग टाकुनि त्या रंगाचे व्हावे!
व्यक्तित्वाला उरू नये मग मुळचा कुठला रंग
व्यक्तित्वाने व्हावे त्याचा खराखुरा सत् संग!
आत्म दुजा अन देह वेगळा भलते बेचव कोडे
देहधारणा आत्मचि असता का हे वेडे चाळे?
आत्मरूप मी निसर्गदेहि हिरवा हिरवा झालो
मनी दाटता हिरवाई ती तुमच्या भेटि आलो
साज रोजचे टाकुनि द्या हो तुम्हिही उचला रंग
देवाजीच्या बागेमधला तुमचा एक अभंग
चला गड्यांनो हिरवाईला डोळे भरुनी पाहू
काही क्षण तरि आपुले नाही तिचेच होऊन राहू!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ..... खूप छान .......
मस्त ..... खूप छान .......
छान कविता
छान कविता
@ पुरंदरे शशांक, मनरंग >>
@ पुरंदरे शशांक, मनरंग >> धन्यवाद.
Sundar... Hirawaaeechee
Sundar... Hirawaaeechee kimmat aamhaa vaaLavanTaateel lokanaach kaLate
खुपच छान!!!!!
खुपच छान!!!!!
@ दिनेश., विभाग्रज>> धन्यवाद.
@ दिनेश., विभाग्रज>> धन्यवाद.
आ.आ अप्रतिम कविता.. आणि
आ.आ अप्रतिम कविता.. आणि प्र.ची..खुप सुंदर ... क्या बात है!
धन्यवाद गं सायली.
धन्यवाद गं सायली.
वाह गुर्जी !
वाह गुर्जी !