स्वातंत्र्यदिन सोहळा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या जवळ्पास पाच वर्षाच्या परदेशातील वास्तव्यात प्रथमच मी परकिय भुमीवर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहीलो. कारण या पुर्वी मी जिथे राहिलो तिथे इतर कुणीही भारतीय नव्हते!
सुदैवाने ऑस्ट्रेलियात भरपुर भारतीय लोक असल्याने अश्या सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. जवळपास तीनशे लोक उपस्थित होते. त्यात बरेच मराठी लोक ही होते. तीन नवीन मराठी कुटंबाशी परिचय झाला. अन त्यात एक पुर्ण कलाकार कुटुंब ही भेटले.

ज्या हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजीत केला तिथे मी अन चंपी गेलो, तो एक वयस्कर गॄहस्थ उभे होते. मी त्यांना अभिवादन करुन तुम्ही इथे याच शहरात राहता का असा एक साधा प्रश्न विचारला...त्यांनी हो असे उत्तर दिले अन ते दुसर्‍या एका व्यक्तीच्या स्वागताला निघुन गेले....... नंतर कळले, ते वयस्कर गॄहस्थ च शहरातील भारतीय संघटनेचे अध्यक्ष होते! Happy

दीड तास अनेक कलाकारांनी अतिशय सुरेख कार्यक्रम सादर केले. मुलांचा उत्साह अतिशय दांडगा होता. अगदी गावातील शाळेच्या मुलांप्रमाणेच दंगा चालु होता! कार्यक्रमाची व्हिडीओ शुट मी लवकरच अपलोड करेल! Happy

एक खटकले कि...कार्यक्रम संपतेवेळी राष्ट्रगीत सादर करणार्‍र्यांची तयारी नव्हती. एक कडवे च गायब करु पाहत होते. पण काही जागरुक श्रोत्यांमुळे पुर्ण राष्ट्रगीत म्हटले गेले.

कार्यक्रम संपल्यावर नाश्त्यासाठी सोय होती. पण पारंपारिक भारतीय जेवणामुळे मुदपाकखाण्यात धुर झाल्याने फायर अलार्म वाजु लागला. हे आपले नेहमी चे च समजुन सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पोटोबा केला. पण फायर ब्रिगेड चे लोक आल्यावर त्यांनी आयोजकांना ८०० डॉलर दंड केला..... दिवाळी कार्यक्रमाची फी वाढणार असा अंदाज बांधुन .... सर्वांनी एक्मेकांचा निरोप घेतला!

एकुणच, जाम मजा आली.... छान वाटले. परदेशात पहिल्यांदा १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात भाग घेणे खुप आनंद देउन गेले!!! Happy
******************************************************

कार्यक्रमात शहरातील भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष अन उपाध्यक्षांची ओळख करुन दिली गेली. एक प्रजापती नावाचा बिहारी अन एक आशिष नावाचा कर्नाटकी मुलगा अध्यक्ष अन उपाध्यक्ष झाले. प्रजापतींनी जे काही भाषणात सांगितले ते ऐकुण मी अन बाकी बरेच श्रोते गारच झाले! तो तीन च वाक्य बोलल.... आम्ही भारतीय विद्यार्थ्यांना नाईट लाईफ एन्जोय करायला मदत करु. आम्ही डिस्को पार्टी आयोजित करु. मुलांना शहरातील करमणुकीच्या कार्यक्रमांची माहीती देउ..... माझ्या मागे एक बाई बसलेल्या होत्या, त्या म्हणाल्या... जळ्ळे मेले अध्यक्ष, ह्यांना अभ्यास करायला पाठ्वलेय कि हे नाटकं करायला? मी मागे वळुन पाहीले, तो त्यांच्या शेजारीन म्हणाल्या, ह्याम्चा मुलगा आता कॉलेजात जाउ लागेल, त्यामुळे चिंता वाढलीय!

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे, विद्यापीठे च अशी विद्यार्थी संघटना करायला प्रोत्साहन देत आहेत. अन म्हणुन हे अध्यक्ष झाले. आमच्या विद्यापीठानेही, प्रथमच ७० भारतीय विद्यार्थ्यांना विषेश स्वागत समारंभ करुन सेशन ची सुरुवात केली होती.

हल्ली टीव्ही चॅनेल वर, बोगस शैक्षणिक संस्था, त्यांचे एजंट अन त्याला बळी पडणारे भारतीय व परदेशी विद्यार्थी यावर गरमागरम चर्चा होत आहेत. अनेक भारतीय विद्यार्थ्यांची मुलाखती अन अन्नुभव दाखवत ते कसे फसले गेले हे सांगत आहेत. त्यावर इथले सरकार काय करित आहे, पोलिस व प्रशासन काय पावले उचलत आहे, हे प्रत्यक्ष पोलिस अन प्रशासकिय अधिकारी बोलावुन आमने सामने चर्चा करताना दाखवत आहेत. भारतीय वकिलातीचे लोक ही ह्यात (चर्चेत) सहभागी आहेत.

प्रकार: 

माझ्या मागे एक बाई बसलेल्या होत्या, त्या म्हणाल्या... जळ्ळे मेले अध्यक्ष, ह्यांना अभ्यास करायला पाठ्वलेय कि हे नाटकं करायला?:अओ:
छान!