तुमच्या घरातल्या काढलेल्या कडाप्प्यांचे तुम्ही काय करता?

Submitted by आशूडी on 24 July, 2015 - 02:28

माझ्या घरात चुकून एक जास्तीचे स्वयंपाकघर झाले आहे. हल्ली तसाही पुण्यात घरी स्वयंपाक कमीच तयार होतो. त्यामुळे दोन खोल्यांत दोन ओटे हा मला जागेचा अपव्यय वाटतो. शिवाय घरात दोन दोन ओटे असून आपण किती कमी भांड्यांत स्वयंपाक करतो हा न्यूनगंड येतो. तेव्हा मी या समस्येच्या मुळावरच घाव घालायचे ठरवले आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने ओटा फोडला म्हणून स्त्रीमुक्तीच्या इतिहासात माझे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे. त्याला मोत्यांची अंडरलाईन मिळावी म्हणून कृपया मला मदत करा.
१. खरंच हा ओटा फोडावा का? सध्या त्यावर इस्त्री केली जाते. हा अपमान सहन न होऊन तो काळवंडत चालला आहे.
२. तुकडे तुकडे न करता सबंध ओटा काढून मिळतो का? तसे करण्याची मजुरी अधिक असते का?
३. हा हट्टाने सबंध काढलेला ओटा नंतर "मला जागा दे" म्हणत मी ज्या कोपर्यात ठेवायला जाईन तिथे समंध बनून उभा राहील काय? तसेच त्या खाली केलेल्या कप्प्यांच्या कडप्पा पिल्लावळीचे काय?
४. त्या पिल्लातली एक दोन गोंडस पिल्लं रांगोळीसाठी वापरता येतील पण बाकी अनाथांचं काय?
५. असे नको असलेले कडाप्पे निसर्गात फेकले तर त्याची हानी होते का?
६. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मला जास्तीत जास्त कल्पक कल्पना सुचवून मदत करा, खरंच आभारी राहीन. Happy
कृपया कडाप्प्याला धरून अवांतर बोला, विनोद करा पण खरोखरीचे पर्याय सुचवायला विसरू नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया, कॉम्प टेबल पण आहे आणि खरंतर हल्ली laptop घेऊन टीव्हीसमोर किंवा कुठेही बसता येतं तेव्हा तेही अनावश्यकच वाटते.
आणि घरी खरंतर आम्ही कुणीच एवढे कॉम्पवर नसतो.
बेडची आयडीया भारी आहे, पण घरात किचन सोडून सगळीकडे सिटींग आणि बेड असल्याने होम पेक्षा नर्सिंग होम वाटायला लागेल Lol
तुम्ही सगळे खूप छान पर्याय सुचवता आहात. मला नाही तर इतर कुणाला तरी नक्की उपयोगी पडतील. मी फक्त माझ्या अडचणी सांगतेय त्याला फाटे फोडणं म्हणू नका प्लीज. Happy घर न बघता असं सुचवणं अवघड आहे हे मला माहीत आहे.

कडप्प्यापेक्षा जागेची किंमत आणि युटिलिटी दोन्ही जास्त आहे. त्यामुळे कडप्पा वाचवायच्या नादात जागा वाया घालवु नका. किचनशेजारीच असल्यामुळे या खोलीची ऐसपैस डायनिंग रुम बनवून टाका. मला माहीत नाही असं शक्य आहे का पण एक कल्पना म्हणजे ओटा उभा स्लिट करुन त्याची रुंदी अर्धी करायची आणि लांबी पण हवी तितकी करायची. मग लाकडाच्या फ्रेम्स आणि काचेची दारं लावून त्याचं क्रोकरी कॅबिनेट सारखं कॅबिनेट बनवायचं. फ्रेंच विंडोवाल्या भिंतीला दगडी लुक असलेला वॉलपेपर लावायचा. डायनिंग टेबल लाकडी/मेटल चं मिनिमलिस्टिक लुक वालं ठेवायचं. कोपर्‍यात एखादं बांबुचं झाड, फाउंटेन वगैरे. असा सगळा जामानिमा करुन पहिल्या ओट्यावर मिनिमलिस्टिक स्वयंपाक करायचा. Proud

येस इन्ना.
रिडींग नूक वगैरेला जास्तीची जागा खूप आहे. त्यासाठी ओट्याचीच जागा हवी असं नको. पण चित्रं मस्त आहे नी.
तुम क्या समझोगे महेशबाबू>> आय नो, आय नो! Happy पसारा हा पाण्यासारखा जागा सापडेल तसा समपातळीत पसरतो. त्याला बांध घालायचाय.

कसलं सुंदर चित्रं उभं केलंस नताशा. हे येईल करता. पण कडाप्प्याचं शेल्फ आहे आधीच त्यामुळे अहिंसक मार्ग स्वीकारता येईल. टेबल लाकडी नाहीच आहे, मेटल आर्ट मधलं आहे ग्लास टॉपचं नाजूक पायांचं. फ्रेंच नसलेल्या विंडोला वॉलपेपर, बांबूचं झाड वगैरे जमवता येईल.

असा सगळा जामानिमा करुन पहिल्या ओट्यावर मिनिमलिस्टिक स्वयंपाक करायचा>> हे खूप आवडलं Happy
नी, शी शेड ची आयडिया लै भारी.. कोकणात घरामागे वाडीचा व्ह्यू मिळेल अशी मस्त बांधता येइल..

जेव्हा मला ’शी शेड’ परवडेल तेव्हा सफाईसाठी माणसेही परवडतील.

तसंही सध्या घरात माझी वेगळी वर्कस्पेस आहेच.

दोन्ही किचन मधली कॉमन भिंत पाडून टाकयची आणि दोन किचनचे मिळून एक ओपन किचन बनवायचे.

तो कडप्पा आणि पहिल्या किचन मध्ये असलेला कडप्पा एकत्र चौकोनी आयलॅन्ड करून ओपन किचन मध्ये वापरता येईल. फक्त हा प्रोजेक्ट थोडा खर्चिक आहे. उरलेली जागा आपोआप डायनिंग रूम होईल.

आयलॅन्ड किचन असे गुगल (इमेज कर)म्हणजे मी काय म्हणतोय ते लगेच दिसेल.

किंवा फर्स्ट क्लास फॉर्मल डायनिन्ग रूम करायची. फक्त एक मस्त टेबल व साइड बोर्ड, भिंतीवर फोटो चित्रे वगैरे. मस्त सेंटर पीस. घरी जेवणे वगैरे अस्तात तेव्हा उप्योगाला येइल.

किंवा मसाज / सौना रूम जकुज्झी पण बसवता येइल

कडाप्प्याची शेल्फं (दारासहित/रहित) बनवून स्टोरेजसाठी वापरू शकता. कडाप्प्याचे देवघर बनवू शकता. बाल्कनीतल्या कुंड्यांसाठी वेगवेगळ्या उंचीची शेल्फं बनवू शकता. सोसायटीची परवानगी असेल तर कॉमन पॅसेजमध्ये दाराबाहेर भिंतीलगत काही सुशोभन किंवा पॉटरी ठेवायला कडाप्प्याचा शेल्फसारखा वापर करू शकता. बाल्कनीत रेलिंगच्या भिंतीला कडाप्पा सीटसारखा जोडून तिथे सीटिंग, एअर ईटिंग (हवा खाणे) नूक करू शकता.

एखाद्या गरजू सेवाभावी संस्थेला सर्व कडाप्पा देणगीदाखल देऊ शकता.

मी पण पूजा रूम देवघर लिहीनार होते पण. तेही आधीच असेल लेट्स फेस इट जागा जास्तीची झालेली आहे. बिल्डरला परत करून पैसे घ्या सरळ. त्यात कडपा काही महाग नसतो ग्रानाइट संगम्रवर सारखा. सुनो ना संगेमरमर....

आधी, वरची मुळ पोस्ट वाचल्यावर गंमत म्हणुन लिहीलंय की असंच वाटलं . कारण 'चुकुन' दोन ओटे झाले म्हणजे एखाद्या पॅलेस मधे दोन वेगवेगळ्या बांधकाम करणार्यांनी आपल्या मर्जीनुसात किचन तयार केलं आणि झाल्यावर सरप्राईज! दोन ओटे !! असं काय काय डोळ्यासमोर आलं. पण जौदे Wink

थोडेफार केदारने जे सुचवलेय ते + नताशाची आयडीया असे सुचवायला मी आले होते.

-दोन किचन मधली सामायिक भिंत पाडुन टाकायची.
-तिथे मोठं हवं तसं डायनिंग टेबल ठेवायचं. ( आयलँड किचन चालेल, पण ते भारतीय फोडण्यांना अजिबात उपयोगी नाही. शिवाय ओटा धुवाधुवी शक्य होत नाही. त्यात सिंक हवे असल्यास पाईप इत्यादी चेंज करावे लागेल )
-आता आहे तो ओटा २ फुट रुंद असेल. कन्स्ट्रक्श्न वाल्याला विचारुन त्याची रुंदी कमी करता येईल- शक्य आहे का विचारा आधी. खुप स्किलफुली करावे लागेल. शिवाय त्याला पुन्हा राउंडेड बॉर्डर बसवुन घ्यावी लागेल.
-तो १६/२० इंच कडाप्पा केला तर त्या खाली काचेच्या कपाटात क्रोकरी ठेवता येईल.
-त्या कडप्पावर खिडकीसमोर हर्ब गार्डन कुंड्यात लावता येईल. आणि इतर टेराकोटा/ मातीच्या डेकोरेटीव वस्तु सजवता येतील.
- हवं असल्यास आणि सिंक अपोझिट ( सामाईक भिंतीच्या समोरची) भिंतीजवळ असल्यास तिथे एखादे छोटेस फॅशनेबन बेसिन बसवता येईल. जेवुन तिथेच हाथ धुता येतील.
-सगळ्यात दुरच्या भिंतीजवळ / डायनिंग जवळ एखादं छोटी रायटींग स्पेस / अभ्यासिका करता येईल. - मुलं लहान असताना त्यांना दर मिनीटाला एक प्रश्न पडतो, त्यावेळेस आपण किचन मधे आणि मुलाची अभ्यासाची जागा जवळच असेल तर चिडचिड आणि धावाधावी ( आपलीच ) कमी होते. Wink

किंवा आणखी एक कल्पना म्हणजे.

- दोन किचन मधली सामायिक भिंत पाडुन टाकली की किचनचे लाकडी पार्शिशनने १/४ + ३/४ अशा दोन भागात विभाजन करायचे.
- ३/४ भागात वरच्या पोस्ट सारखेच डायनिंग करायचे.
- १/४ भागात वॉक इन क्लोजेट करायचे. वॉक इन क्लोजेट हे अतिशय मोठे सुख आहे. ( इथे मिसतेय मी ) अक्षरशः काहीही ढकलता येतं. खेळणी बसतात. ऑफ सिझनचे कपडे, चादरी ठेवता येतात. रिकाम्या बॅगा ठेवता येतात. वेळी अवेळी कोणी आलं तर सगळा पसारा ढकलता येतो हे एक मोठ्टा फायदा.

जेवुन तिथेच हाथ धुता येतील.> मला ही भारतीय सवय आजिबात आवड्त नाही. म्हणजे इतर लोक्स चुळा भरताना ते हात धूताना बघायला आजिबात नाही आवडत. त्यात जुने लोक फार आवाजी करतात.

घर हाय फंडा असेल तर एक छोटी गेस्ट रेस्ट्रूम करा ( किचन च्या जागेत नाही) पावडर रूम म्हणतात तसे. शानसे रहो.

केदार, आयलँड किचन पाहिली, खूप सुंदर. पण ते अवाजवी वाटेल माझ्या कमी माणसांच्याब घरात. आत्ता किचनमध्ये सर्व आटोपशीर बसते. आख्खी भिंत नाही पाडता येणार कायदेशीर अडचणी.
अकु, देवघर माझ्याही मनात आलं होतं. लक्षात ठेवते. नो बाल्कनी. आणि सामायिक जागेत काहीही करता येणार नाही.
लेट्स फेस इट >> Lol अमा.
सावली, छान सूचना. भिंत न पाडता तू म्हणतेस तसं करता येईल, अर्ध्या भागात डायनिंग व एका समोरच्या कोपर्यात छोटंसं रायटिंग टेबल किंवा वॉकइन वॉर्डरोब.
घर हाय फंडा नाहीये, तरी पण गेस्टांना रूम आहे. Happy
लोकहो, चुकून झालेले म्हणजे unplanned अशा अर्थाने लिहीलेय मी. हलके घ्या. कडप्पा फेकून दिल्यानंतर अरेरे करण्यापेक्षा आधी विचारावे म्हणून हा उद्योग. माझा काही जीव अडकवा नाहीये त्यात Happy

fekoon deu nakos.
Everything has come at a cost to nature.. there is nothing that's really free..
sell it off, give it out use it, but please don't throw!

Refuse -> Reduce -> Reuse -> Recycle

काढलेले कडाप्पे (असे कितीसे आहेत?) सोसायटीला दान करा. सोसायटीच्या आवारात (नसेल तर) बसायला बाकडी, सीट आऊट्स मोठ्या झाडांसाठी कुड्या इत्यादी प्रकार करून घेता येतील.

एक तुकडा कापून त्याचा चॉपिंग बोर्ड बनवून घे.>> हो, आणि पोळपाट पण बनवून घे. दगडी पोळपाटावर पोळ्या झरझर लाटल्या जातात. माझा तसाच आहे, ग्रॅनाईटचा Wink त्याचा एक पाय आता सुटतोय सारखा... फेवीक्वीक लावूनही वरचेवर सुटतोय. फेवीक्वीकवाल्यांना चॅलेंज देणारच आहे, तोवर त्याला फिट बसवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.

येस नी, हे चालेल. आणि आत्ताच आठवलं, की एक चौकोनी तुकडा सिंकच्या वरच्या बाजूला टाकून घेतला जुन्या ओट्याजवळ तर माठ ठेवता येईल. ओटा रिकामा तेवढाच.
मंजूडी, आमची सोसायटी जुनी आहे त्यामुळे अशी फ्री स्पेस शिल्लकच नाही जिथे बाक करता येतील, कुंड्या लावता येतील.
पुन्हा एकदा नम्रपणे सांगते की देऊन टाकणे हा सोपा पर्याय शेवटचा ठेवला आहेच. त्याआधी नानबा म्हणते तसं.

आशूडी, सामाईक भिंत पूर्ण न काढता अर्ध्या उंचीची करण्यातही कायदेशीर अडचणी येतील का?
तसे किंवा मग मोठ्ठी विंडो करुन घ्यायची त्या भिंतीला. म्हणजे मग ती सर्विंग विंडो म्हणुन वापरता येईल.

किचन डायनिंग अगदीच वेगवेगळ्या रुम मधे असेल तर जेवणाची तयारी करणे आणि नंतरचे आटपणे जाम बोरिंग होते. प्रत्येक सामान घेऊन खोल्यातुन जा ये करा, गरम पदार्थ घेऊन जायच्या आधी अनाउंन्समेंट करा इ. Lol इतकं करुनही गरम वरण नेताना कोणतरी समोर कडमडणार Wink
सर्विंग विंडो असेल तर हे त्रास कमी होतील.

ही अशी पण जरा मोठी किंवा अशी

अर्ध्या भिंतीचा पर्याय असा दिसेल

बाल्कनीमधे बाकासारखे लावता येतिल.

घरात जेष्ठ नागरीक असतील तर संध्याकाळी तिथे बसून त्यांचा वेळ बरा जाईल. पण घरात चिल्लरपार्टी नको किंवा बाल्कनीला ग्रिल हवे.

की एक चौकोनी तुकडा सिंकच्या वरच्या बाजूला टाकून घेतला जुन्या ओट्याजवळ तर माठ ठेवता येईल. ओटा रिकामा तेवढाच. >> इतक्या वरच्या उंचीवर माठ भरणार कसा आणि नेहेमी नेहेमी वरचा काढुन घासणार कसा याचा पण विचार करुन ठेवा. बहुतेक वेळा असा कडप्पा करुन त्यावर माठ ठेवला जात नाही.

एल ओटा असेल तर एकाबाजुला कडप्पा भिंतीत बसवुन ( मावे डोळ्यासमोर येईल इतक्या उंचीवर) त्यावर मायक्रोवेव ठेवता येईल. माझ्याकडे तसा आहे बसवलेला. मावेच्या खालची जागाही वापरली जाते.

रच्याकने. वापरातल्या ओट्यावरच्या भिंतींवर टाईल्स लावल्या असतील तर कडप्पा भिंतीत बसवण्यासाठी टाईल्स तोडाव्या लागतील. चाराने मी मुर्गी सारखं व्हायचं ते. Wink

एकाबाजुला कडप्पा भिंतीत बसवुन ( मावे डोळ्यासमोर येईल इतक्या उंचीवर) त्यावर मायक्रोवेव ठेवता येईल. माझ्याकडे तसा आहे बसवलेला. मावेच्या खालची जागाही वापरली जाते. >>> +१११ मी खाली एक कप्पा करुन त्यात मावेची भांडी ठेवली आहेत.

सिंकवर पण एक कडप्पा लावला आहे, तिथे जादाचे किचन सफाईचे सामान ठेवते.

Pages