काढून टाकला आहे

Submitted by Mother Warrior on 20 July, 2015 - 23:05

काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तुझ्यासारखीच आस्तिक-नास्तिकच्या सीमारेषेवर आणि देवाचे करणे, व्रतवैकल्यामधे कणभरही विश्वास नसणारी आहे.
परिस्थिती आपल्या प्रयत्नांच्या बाहेरची असली की अश्या प्रकारे ’असेलही काहीतरी!’ ’उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला?’ हे सगळे सुचतेच. मला तरी ते अत्यंत नॉर्मल वाटते.
असेलही काहीतरी म्हणत केलेल्या गोष्टींनी कदाचित आपण उन्मळून न पडता टिकून राहण्यासाठी उर्जा मिळत असावी आपली आपल्यालाच.

वरच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत. सगळीकडुन निराशा पदरात पडायला लागली की कुठल्याही बाबाबुवांवर विश्वास बसायला लागतो. अशा वेळी आपल्या मनाला स्थिर ठेऊन केवळ आपल्याला जे आणि जेवढे पटतेय तेवढेच करत राहावे. मी तरी असे करते. एकाचे ऐकायला लागले की अजुन दहा जणांचे ऐकावेसे वाटायला लागते. एवढे सांगताहेत तर एकदा करुन पाहुया, काय वाईट आहे त्यात असे म्हणुन एकदा न पटणा-या गोष्टी करायला लागलो की मग ती यादी अंतहीन होत जाते. वेळीच आवर घालुन केवळ मनापासुन जे करावेसे वाटते तेवढेच करावे.

,

मवॉ, मागे फॅड डाएटच्या लेखानंतर एक भली मोठी पोस्ट तुम्हाला पाठवली होती. त्यात शेवटी, आत्ता हळुहळु करून पाहूया म्हणून गंडेदोरे, करणी, शांती यांना तरी जवळ करू नका असे लिहीणार होते. पण हात आवरता घेतला.
तर ... शांत रहा, तुमच्या मतावर ठाम रहा, तुमच्या मनाला शांती देईल असं पण तुमच्या मुलाला फिजीकल्/मेंटल ट्रॉमा होऊ न देणारं काहिही करा. त्यामुळे मुलाला ऑटिझमवर फायदा झाला नाही तरी केअर टेकरम्हणून तुमच्या मनाला शांती मिळेल.

+++१ नंदिनी , नीधप आणी साधना

आणी मदर वॉरीअर

तुम्हाला शुभेच्छा । जर देव असेलच तर तुम्हाला शक्ती देओ ……

मी पण बराचसा अश्राध्ध आहे पण अनेकदा तणावपूर्ण क्षणांना देवाचा धावा केला आहे . काही चांगले प्रसंग आले तेवा मला तो चमत्कार वाटला आहे आणि वाईट प्रसंगात देवावरचा विश्वास पूर्ण डळमळीत झाला आहे,
बाळाला तुमची गरज आहे आणि त्यासाठी तुमचे मन खंबीर असले पाहिजे . अशा परीस्तीतीत तुम्ही प्रार्थना करता तर ते बरोबरच आहे.
पण बाधा , भूत , कारणी ? काही लोकांना पोच पाच नसते , तुम्ही वॉरीअर आहात - सरळ वार कर…

Respect and salute

May the Force be with you" - Star Wars

मवॉ.. लेख वाचला, शांततेनं उत्तर लिहू म्हणुन थांबलो अन आता बघतो तर 'काढुन टाकला आहे..'!!!
खरं तर मला खुप कौतुक वाटतं तुमचं या लेखाबद्दल, मनात वादळं चालु असतांनाही एवढं स्पष्ट इथे मांडल्याबद्दल!
असो, माझ्याबद्दल सांगायचे झाले तर मी सुध्दा त्याच सिमारेषेवर. भजन आवडते पण 'देवाचं करण्यावर' विश्वास नाही. देवळातल्या देवावर विश्वास नाही पण कोणत्याही शांत देवळात लावलेला दिवा आवडतो, त्याच दिव्याच्या प्रकाशातील देवाकडे बघायलाही आवडते.
परिस्थिती अवाक्या बाहेर असतांना जर धीर सुटू लागला असे वाटले तर ..'माझ्या सद्सदविवेक बुध्दिला जे काही योग्य वाटलं ते मी सर्व केलं" हे मनाला पक्के बजावून सांगा.
मनाला पटतेय तेच करणे योग्य असा माझा अनुभव. आणि हो अजुन एक..फुकटचे सल्ले देणार्‍यांनाही माफ करा, तुमच्या इतके विचारमंथन त्यांनी केलेले नाही. कदाचीत ते पण स्वतः कुणाचे तरी शिकार झालेले आहेत!

'काढुन टाकला आहे..

काढुन टाकलेल लिखाण काय होत? का काढले?तुमचे लिखाण वाचनिय असते वाचता आले असते तर बरे झाले असते.

लेख काढून टाकल्याबद्दल क्षमस्व!
अचानक मला ह्या सतत Analytical Thinking चा कंटाळा आला. सगळं waste of time आहे असंही वाटू लागले. असं वाटले की सतत विचार करून, प्रत्येक पाऊल जपून व विचारपूर्वक टाकण्याने खरंच काय चांगलं होतं नाहीतरी? इतका विचार करून व अँटीसिपेट करून कदाचित त्या येणार्‍या एक्स्पिरिअन्सचा नीट उपभोगही घेता येत नाही. स्पाँटेनिअस व इम्पल्सिव्ह वागणं कदाचित भरभरून आनंद घ्यायला मदत करत असेल.

मग लोकांची मतं विचारात घेतल्याने काय होणार? ४ लोकं म्हणतील आमची श्रद्धा आहे, ४ लोकं म्हणणार आमची मुळीच नाही - थोतांड असते. आणि अजुन कुणी ४ लोकं म्हणतील की फार विचार नाही करत, अमुक करून बरं वाटतं म्ह़णून करतो. कुठलेही उत्तर ह्या ३ ग्रुपमध्येच विभागले जाईल. मग जाऊदे ना. कशाला आयुष्यात अजुन एक गोंधळ. डिफिकल्ट टाईम्स येतच असतात. आपण जमेल तसा , त्या त्या वेळेस जे योग्य वाटेल ते करून मार्ग काढायचा असतो. प्रत्येक वेळेस कुठे एव्हढा विचार करायचा.

असे काहीतरी सेकंड थॉट्स आले. म्हणून लेख काढून टाकला.

लेख वाचला नाही, पण प्रतिसादांवरून अंदाज आला.

मायबोलीवरून लेख काढायची गरज नव्हती, तर मनात जे काही वादळ उठले होते ते तिथून जाणे गरजेचे होते.

आपल्या या वरच्या पोस्टला अनुसरून ते खरेच गेले असेल तर ऊत्तमच.

अवांतर - आपला लेख वाचायची ईच्छा मात्र होती.