दहिसर येथील नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने..

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2015 - 05:59

एखाद्या सोसायटीमध्ये मांसाहाराला परवानगी नाकारणे हे चूक की बरोबर ही चर्चा काही नवीन नाही.

मात्र दहिसर येथील मराठी नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मात्र हा प्रश्न एक समस्या बनत चिघळण्याची शक्यता आहे, कारण याचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/marathi-family...

काल सोशलसाईटसवर सहज चक्कर टाकता, या वादाला शाकाहारी-मांसाहारी, गुजराती-मराठी, तसेच भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक (वा सेना समर्थक) असे विविध आयाम आलेत. कारण गुजराती समाज हा भाजपाची वोटबॅंक समजला जातो आणि भाजपाच्या राज्यात ईतर कोणाचे अच्छे दिन येवो ना येवो, या समाजाचे नक्की येणार, असा एक मतप्रवाह जनसामान्यांमध्ये आहे.

त्याचबरोबर या प्रकरणात निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी, "..... गुजराती भाषकांनी अशी बळजबरी केली, तर कोणत्याही मराठी नाट्यगृहावर आम्ही गुजराती नाटके होऊ देणार नाही" असा पवित्रा घेतला आहे.

एकंदरीत या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते ?

माझ्यामते जर आधीपासून त्या सोसायटीत मांसाहार करू नये असा काही नियम नसेल, गोविंद चव्हाण यांना घर घेताना अश्या काही निर्बंधाना सामोरे जावे लागेल याची काहीच कल्पना नसेल, तर त्यांच्यावर अशी जबरदस्ती हा फार मोठा गुन्हा आहे. मी स्वत: मांसाहारप्रिय आहे आणि मांसाहाराशिवाय जगणे सहनही करू शकत नाही, म्हणून या प्रकारच्या बळजबरीतले गांभीर्य ओळखतो.

त्याचबरोबर, त्या हल्ला करणार्‍या रहिवाश्यांची तरुण मुले बाहेर जाऊन मांसाहार तर करत नाहीत, हा देखील एक शोधकामाचा विषय ठरेल. अन्यथा एकंदरीतच हे असले नियम बनवणे फार हास्यास्पद ठरेल.

अवांतर - मला पडलेला एक प्रश्न - माझ्या माहितीसाठी विचारतोय - मांसाहाराच्या जोडीने मद्यपान देखील करू नये असाही नियम असतो का या सोसायट्यांमध्ये? की ते चालते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हास्यास्पद वा क्षुल्लक वाटत नाही.
याची कधी ना कधीतरी तड लावावीच लागेल. आपल्या नियमावलीत बसणार्‍यांनाच सदनिका विकण्याची मुभा बिल्डरला आहे. पण यामुळे जर घाऊक डिस्क्रिमिनेशन होत असेल तर काही तरी उपाय शोधायला हवा. कारण यामुळे ठराविक लोकांची 'पॉकेट्स' बनतात. डेमोग्राफिक बदल घडवून आणता येतात. शिवाय यामागे मोठे आर्थिक कारणही आहेच. मोठ्या शहरांमध्ये इमारती बांधू शकणारा वर्ग हा धनवान अश्या अल्पसंख्य जातीचा असतो. इतरांकडे ती क्षमता नसते. मग केवळ दरिद्री आहेत म्हणून किंवा दरिद्री नसले तरी 'आमच्या' मोहल्ल्यात राहू इच्छितात म्हणून मूठभर लोकांनी इतरांचे खाणेपिणे धार्मिक कारणावरून कंट्रोल करणे हे योग्य वाटत नाही. केवळ धन हाती आहे म्हणून अक्ख्या समाजाची नीतिमत्ता स्वतःच्या मताप्रमाणे सुधारायला निघणे ही नैतिक दांडगाई वाटते. उद्या इतर जातींतले धनवान लोकसुद्धा मलबार हिलवर जागा घेऊ शकणार नाहीत/ आजच शकत नाहीत. मलबार हिलच काय, पण थेट दहिसरपर्यंतच्या पश्चिम किनार्‍यावरच्या मोक्याच्या जागांवरच्या गगनचुंबी इमारतींत हीच परिस्थिती आहे.
(काय्त्री केले पाहिजे. काय्ब्र करावे- हतबल हीरा)

कालची बतामी वेगळीच आहे. त्या इमारतीतल्या रहिवाश्यांच्या मते भांडणाचं मूळ कारण वेगळंच आहे. त्या इमारतीत अनेक मराठी, मांसाहारी कुटुंबं राहतात आणि त्यांच्या मांसाहाराबद्दल कोणासही आक्षेप नाही, असं खुद्द त्या मराठी, मांसाहारी व्यक्तींनीच सांगितलं.
https://www.youtube.com/watch?v=rALzpelw-4M&sns=fb

वेल, वरील घटनेत शाकाहारी-मिश्राहारी असा संघर्ष निदान या यू ट्यूबच्या दुव्यावरून तरी दिसत नाही, पण इतरत्र अनेक इमारतींमध्ये मिश्राहारींना स्वतःराहाण्यास अथवा मिश्राहारी भाडेकरू ठेवण्यास मज्जाव आहे, आणि त्यांच्याकडे हीनत्वाने पाहिले जाते हे खरे आहे. आमच्या अगदी जवळच्या ओळखीतले एक मिश्राहारी कुटुंब उपनगरात एके ठिकाणी राहाते. त्या सोसाय्टीत एक कुत्रा मेला, तर तिथल्या काही लोकांनी या कुटुंबातील बाईंना तो कुत्रा उचलून टाकण्याची 'विनंती' केली. 'आप वैसे भी तो खाते ही हैं ना, फिर क्या हर्ज है?' !!
हे अपार्थाइड कसे मिटावे?

>>>कालची बतामी वेगळीच आहे. त्या इमारतीतल्या रहिवाश्यांच्या मते भांडणाचं मूळ कारण वेगळंच आहे. त्या इमारतीत अनेक मराठी, मांसाहारी कुटुंबं राहतात आणि त्यांच्या मांसाहाराबद्दल कोणासही आक्षेप नाही, असं खुद्द त्या मराठी, मांसाहारी व्यक्तींनीच सांगितलं.<<<

हेच मी म्हणत होतो.

मी गोरेगाव मध्ये ऎक बरेच गुजराती आणि जैन असलेल्या पण इतरही लोक असलेल्या इमारतीत वाढलो
असे अनुभव कधीही आले नाहीत,

माझ्या माल्वर ऎक क्रिस्ती आणि जैन समोरासमोर राहतात .
हा आमचा जातीय सलोख्याचा अनुभव
http://www.maayboli.com/node/51682?page=9

गोरेगावात माझे शेजारी क्रिस्ती आहेत. त्या माळ्यावरील ६ कुटुंबात १ आम्ही मराठी , १ कारवारी , २ गुजराती , १ जैन आणि १ क्रिस्ती होते. माळ्यावर उत्तम सलोखा होता आणि आहे.( नशिबाने इकडे फारच कमी मराठी लोक आहेत )

माझ्या क्रिस्ती शेजार्याचे लग्न झाले तेवा 6 खाण्याचे counters लागले होते.

१) सर्वात महत्वाचा - दारू - अधार्मिक
२) बीफ - क्रिस्ती आणि मुस्लीम ( आणि खाणारे हिंदू)
३) पोर्क - क्रिस्ती ( आणि खाणारे हिंदू)
४) मांसाहार - मटनआणि कोंबडी - सर्व
५) शाकाहार

आणि कळस म्हणजे

६) जैन

होय आमच्या इमारतील काही जैन येणार म्हणून क्रिस्ती शेजार्यांनी येक छोटासा जैन counter लावला . तसेच काही मुस्लीम स्नेही पण येणार होते.
ते श्रीमंत नवते पण सर्वाना सामावून घेणारे मन मात्र होते . त्या दिवशी मला भरून आले आणि म्हणून मी माझा पेग सुद्धा सतत भरून ठेवला.

मुंबई rocks..

ईंटरेस्टींग आहे वरची यू ट्यूब क्लिप ..
जर हे खरे मानले तर आता दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाखाली चव्हाण साहेबांना आत घेतात का हे बघणे रोचक.
कारण माझ्यामते हा गंभीर गुन्हा आहे.

चीनुक्स यांनी जो व्हिडीओ share केलाय तीच बातमी मी काल बघितली.

त्यामुळे खरं नक्की काय? हेच समजत नाहीये.

चिनुक्सच्या विडिओत तथ्य असावे.

भांडणाची सुरवात आपण स्वतः करायची आणि प्रकरण अंगाशी येतेय असे वाटले की मग ते जातपात, प्रांत, धर्म इत्यादी गोष्टीवर ढकलुन द्यायचे हे आता नेहमीचे झालेय. हल्लीच एका मुस्लिम मॉडेलबाबतही हा प्रकार झालेला.

आणि मिडीया अतिरंजित वृत्ते देते असे खडे फोडणरे स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर तेच करतात. कालपासुन फेसबुक नुसते ओसंडून वाहतेय या वादाने. empty mind is devils workshop हे सतत जाणवतेय इथे.

भांडणाची सुरवात आपण स्वतः करायची आणि प्रकरण अंगाशी येतेय असे वाटले की मग ते जातपात, प्रांत, धर्म इत्यादी गोष्टीवर ढकलुन द्यायचे हे आता नेहमीचे झालेय..>>>

जातपात, प्रांत, धर्म यामुळे भांडणे (खरे तर दंगे, युद्ध, महायुद्ध ) सुरु होउन जेवढी माणसे मेली आहेत तेवढे या जगात दुसर्या कोणत्याहि कारणाने मेली नसावीत.

सोसायट्यांचे स्वतःचे नियम हा एक वेगळाच विषय आहे. सोसायट्यांना आपण भारतात रहात आहोत आणी भारतात काहि नियम आहेत याच्याशी काहिहि देणे घेणे नसते.

मांसाहार ज्यांना चालत नाही त्यांनी दुसर्‍यांवर हल्ला करणे कसे चालते? ! वाद किंवा भांडण कुठल्याही कारणाने असेल तरी त्याला जातीय किंवा धार्मिक स्वरूप प्राप्त होणे हे खरच निंदनीय आहे..!!

साधना, माणूस १ प्रतिसाद +१

भांडणाची सुरवात आपण स्वतः करायची आणि प्रकरण अंगाशी येतेय असे वाटले की मग ते जातपात, प्रांत, धर्म इत्यादी गोष्टीवर ढकलुन द्यायचे हे आता नेहमीचे झालेय. हल्लीच एका मुस्लिम मॉडेलबाबतही हा प्रकार झालेला.
<<

जातपात/प्रांत/धर्म.

सेक्सुल हॅरॅसमेंट / हुंडाबळी-जाच राहिले त्या यादीत.

अरे आधी ती बातमी नीट बघा, वाचा आणि मग धागे काढा आणि प्रतिक्रिया द्या!
हा फारच व्यक्तिगत वाद आहे आणि त्याला चुकीचे फ्रेम केलय.... त्याला अजुन हातभार लावू नका

जर नंतरची बातमी खरी असली तरी अजूनही खोटी बातमीच सोशलसाईटवर प्रभावीपणे फिरतेय आणि त्याला अनुसरूनच आजही चर्चा होतेय.

याचा अर्थ शाकाहार-मांसाहार कारण खोटे असले तरी अल्पावधीतच खूप पद्धतशीरपणे ते पसरवण्यात आले आहे,
अर्थात अश्या गोष्टींचा इश्यू करत त्यांना प्रोजेक्ट करायला काही संघटनांच्या टीम सोशलसाईटवर बसून असाव्यात.

म्हणूनच बातम्यांसाठी टीव्ही बघावा... रेडीओ ऐकावा.... ते तुलनेने जास्त विश्वासार्ह आहेत

>>>

आपला हा सल्ला महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांपर्यंत आजच पोहोचवतो,
आधी टीव्हीवर बातम्या बघून न्यूज कन्फर्म करा आणि मगच छापा Happy

त्या सोसायटीत अर्ध्याहून जास्त लोक मरठी आहेत आणि सदर निर्मार्ते हे गेल्यावर्‍षीपासून तिथे भाडेतत्वावर रहायला आलेले आहेत. त्यांना सोसायटीतील लोकांचे रात्री खाली बसून गप्पा मारणे चालत नसल्याने वाद आधीपासून होता. त्यात खाली काही सार्वजनिक कार्यक्रम सुरू असताना (बहुधा डिनर) वरून जाणीवपूर्वक पाणी फेकले गेल्याने सगळे चवताळून जाब विचारायला गेले असं वृत्तवाहिन्यांवर सोसायटीतले लोक स्पष्ट सांगतायत.

राजकिय वळण न लागलं तर बरे असेही सोसायटी वाल्यांचं म्हणणं आहे.

स्वरूप,
मुळात ती बातमी चुकीची वा खोटी नाहीये, कारण संबंधितांनी तशीच तक्रार केलेली. फक्त त्यानंतर आणखी एक बातमी उजेडात आली ईतकेच. कोणास ठाऊक उद्या ते रहिवाशी सुद्धा खोटे म्हणत आहे असे उजेडात येईल. म्हणून वृत्तपत्रांनी केसचा निकाल वा पुर्ण तपास लागेपर्यंत काही छापूच नये असे नसते.

ऋन्मेष - पण तेथे इतर मराठी भाषिक राहात आहेत का, त्यांना काही त्रास/निर्बंध आहेत का ही खात्री करणे ही त्यांची जबाबदारी असते. बातमी देताना शक्यतो 'दुसरी बाजू' काय आहे याचा अ‍ॅनेलिसीस करणे हे पत्रकाराचे 'बेसिक' काम आहे.

त्यांना छापू दे रे काहीही.... शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे
वरची तुझी पोस्ट एकांगी वाटली.... बर ज्या दिवशी हे घडले त्याच दिवशी बहुतांश न्युज चॅनेल्सवर दुसरी बाजूही समोर आली असे असताना सोशल मिडीयावर अमुक आणि पेपरमध्ये तमुक असला हवाला देत लोकांच्या प्रतिक्रिया मागणे बरोबर नाही!
इथे मायबोलीवर नसते वाद कशाला?

ऋंमेश - तू हा धागा काढण्यापूर्वी स्वता तरी काहीतरी चौकशी करायला हवी होतीत. पूर्ण माहीती नसेल तर असले तेढ वाढवणारे धागे का काढावेत?

अ‍ॅडमिन नी हा धागा उडवून लावावा ही विनंती.

मला बातमी सोशलसाईटने दिल्याने मी तेच प्रमाण न् मानता न्यूज साईट चेक केली आणि त्यानुसारच धागा आला.
आणि त्या वेळीपर्यंत तीच त्या साईटवरची त्या प्रकरणातील लेटेस्ट बातमी होती.
अर्थात माझ्या धाग्यापुरते झाल्यास मी तो काढायच्या आधी माझी माणसे पाठवून काय खरे आणि काय खोटे हे करणे अपेक्षित नसावे.
न्यूज साईटने खातरजमा करून बातमी द्यावी हे योग्य आहे, पण आधी बातमी तक्रारीनुसारच येणार हे देखील साहजिकच आहे. आणि मग त्या संबंधित ज्या घडामोडी घडतील त्या अपडेट केल्या जातात ही जनरल प्रॅक्टीस सर्वच न्यूज साईटवर दिसते. बर्याचदा हेड लाईन टाकून सविस्तर वृत्त लवकरच असेही लिहितात.

खरी न्यूज मी लवकरच धाग्याच्या हेडरमध्ये अपडेटतो आणि संभाव्य दंगे टाळतो.

न्यूज साईटने खातरजमा करून बातमी द्यावी हे योग्य आहे, पण आधी बातमी तक्रारीनुसारच येणार हे देखील साहजिकच आहे. >>> नाही हा बेसिक प्रॉब्लेम आहे. बातमी घाईघाईत द्यायची नसते, तीही अशा बाबतीत नाहीच. तक्रारीनुसार पेपर्स व चॅनेल्स बातम्या देउ लागले तर गल्लीतील गप्पा व मीडियातील बातम्यांमधे काही फरकच राहणार नाही.

खातरजमा न करता खळबळजनक बातम्या देणे, "बातमी" लिहीताना पत्रकाराचे "मत" त्यात घुसडणे, व जाहिरात ही बेमालूमपणे बातमी वाटेल अशी छापणे हे प्रकार सध्या खूप बोकाळलेत. पण ते पत्रकारितेच्या बेसिक नियमांच्या विरूद्ध आहेत.

हे चव्हाण एक तर तिथे भाडेकरू आहेत. नाट्यनिर्माते असल्याने ते स्वतःला ' स्पेशल" समजतात. आता निर्मात्याला कसले आलेय बोडक्याचे ग्ल्यामर ? ते ही मुबैत? त्यात हा चव्हाण नावाचा प्राणी च्यायनेलला दिलेलेआ मुलाखतीत म्हणतो की 'माझ्या सारख्या नाट्यनिर्मात्याला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाचे काय? " म्हणजे पहा हा स्वतःला सामान्य समजायला तयार नाही. मग भाड्याने का रहावे? बंगला घ्यावा मढ आयलंडला! तिथली बाकी मराठी कुटुम्बे मांसाहार करीत असूनही आम्हाला काही त्रास नाही असे संगताहेत. हा चव्हाणच्या आगाऊ पणाचा भाग आहे. काही खात्री न करता सगळे राजकारणी गेले मूर्खासारखे धावत 'मुद्दा' मिळाला म्हणून...

थोडं अवांतर,
मांसाहार करणार्यानी एकदा 'फार्म टू फ्रिज' हा विडिओ जरूर बघा 'तू नळी' वर उपलब्ध आहे....!

Pages