फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फुप्रो वर कणीक मळायचा नाद सोडून दिलाय. साफ करायला जामच कटकटीचं आहे ते. जे पातं मधे लावतो त्याच्या आतल्या बाजूला पण कणीक चिकटून बसली Sad नकोच ती भानगड.

नो नो नो नो...माझा पप्पू पेजर दोन मिनिटात कणिक भिजवतो. एकदा अंदाज आला की नाही बिघडत. कणिक भिजली की भांडं, त्याचं झाकण आणि ब्लेड डीश वाॉशरला ढकलून द्यायचं. हा फूप्रो घेण्याआधी मी कसं काय करत होते कोण जाणे.

अंजली कणिक चिकटत आहे म्हणजे भांड ओल आहे किंंवा पाण्याच प्रमाण चुकतय. व्यवस्थित मळल तर भांड जरा सुद्धा मेसी व्हायला नको आहे.

माझा मॅ.बु. वर्षात बंद पड्ला
थँ.गि. ला न्यु.बु. घेतला. ओली चटणी केली. जबर्दस्त आहे. आता कोरडे जीरापुड ई. करुन पाह्ते.

-----
चिवा, चाकु, ब्लेड डि.वॉ. ला लावु नये म्हण्तात. धार कमी होते म्हणे. तेवढे पाहुन घे.

फुप्रो मधील आतलं पातं (जिथे कणीक अडकून बसते) साफ कराय्ला असा ब्रश आणलाय. ह्याने अगदी चकाचक नाही तरी बरच चांगलं साफ झालं पातं.

brush.jpg

सीमा तू म्हणते तसं पाणीच जास्त झालं असावं. पण एकूणच फुप्रोची साफसफाई जास्त वाटते मला तरी कणीक भिजवल्यावर.

मृणाल १ फिलिप्स चा फु पो चा अनुभव कसा आहे? -
१. ५ जर आहेत त्यामळे लहान मोठी वाटण मस्तच होतात
२. जबरदस्त ७५० watt !! पटकन काम होते. खरेतर timer लावायची पण सोय आहे पण मला अजून वापरावा लागला नाही. कारण तेवढा वेळ मिक्सरवर काम करावाच लागत नाही
२. जिथे मोटार आहे तिथेच जार बसतात त्यामुळे मोटार ची सर्व शक्ती वापरली जाते. इतर फु पो मध्ये मोटार एका बेल्ट ला फिरवते आणि मग त्यावर फु पो ची भांडी फिरतात.
३. अजून ज्यूसर वापरला नाहीये पण संत्री मोसंबी चा चांगला व्हावा कारण फिल्टर बारीक आहे .

Mrunal +1
Maza philips cha anubhav pan super happy aahe . Ekdam super fast food processor. Happy

मी या बीबीच्या डोक्यावरचा..
कणिक नीट मळून झाली की फुप्रो खराब होत नाही. आपण परातीत कणक भिजवतो तेव्हा शेवटी निपटून घेतो तसंही नाही करावं लागत. फुप्रो निपटून घेतो. पाणीकी अंदाज इज द की.

मी रिकोचा घेतलाय ६ महिन्यापुर्वी. रोज कणीक मळली जाते, नो कटकट. कणीक भिजवताना जरा तेल टाकायचे कणीक अजिबात चिकटत नाही भांड्याला..

मलापण शूम्पीने घेतलेल्या फु.प्रो. बद्दल माहिती हवीये. इथे भारतात घेतला तर क्वचित कधी काही प्रॉब्लेम आला तर सर्व्हिसिंग करून मिळेल का...इ इ. आणि हा फक्त फ्लिपकार्ट किंवा तत्सम ठिकाणाहूनच ऑर्डर करता येतो का? दुकानात मिळत नाही का?

भारतात फुप्रो घ्यायचा आहे.. आईला फक्त कणीक तिंबायला पाहिजे.. फिलीप्स खुप मोठ्ठा वाटतोय..
अजुन कोणतं मॉडेल आहे का? हेडरमधल्या फोटो सारखं?

फिलीप्स खुप मोठ्ठा वाटतोय - अग पूर्वीच्या मिक्सर कम फु पो एवढाच आहे.
पण खरच मस्त आहे. मी wet grinder घेणार होते पण आता cancel. डोसा पीठ एकदम मस्त वाटले गेले.

मृणाल , फिलिप्स फुप्रो कणिक तिबंण्याबरोबरच बाकीची कामे म्हणजे कापण / वाटण घाटनसाठी उपयुक्त आहे का ? आमच्याकडे याच कामासाठी हवा आहे आईला . पूर्वी रोनाल्डचा होता . तो बरीच वर्षे वापरल्याने बिघडला आहे

फिलिप्स फुप्रो कणिक तिबंण्याबरोबरच बाकीची कामे म्हणजे कापण / वाटण घाटनसाठी उपयुक्त आहे का ? - हो नक्कीच .

.

.

माझ्याकडे क्युझिनाआर्टचा हा ब्लेंडर+फुप्रो होता.
( http://www.amazon.com/Cuisinart-BFP-703CH-SmartPower-Blender-Processor/d... )
इतक्यात ब्लेंडरला त्याची ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली सो तो कामातून गेला Sad . त्या ब्लेंडर मध्ये इडली/डोसा चं पीठ मस्त बारीक व्हायचं. (फुप्रो मस्त चालतोय अजुन.)

वरती मृण्मयी ने लिहिलंय कि Nutri Ninja Auto-iQ Blender जार चे साईझ छोटे आहेत.
मॅ.बु चे पण जार छोटे आहेत . त्या मध्ये भिजवलेले तांदूळ खूप बारीक नाही झाले.

मला मोठा जार असलेले, भिजवलेले तांदूळ मस्त बारीक होतील डोशांसाठी असा ब्लेंडर हवा आहे. कोणता घ्यावा?

>>>वरती मृण्मयी ने लिहिलंय कि Nutri Ninja Auto-iQ Blender जार चे साईझ छोटे आहेत.
मॅ.बु चे पण जार छोटे आहेत . त्या मध्ये भिजवलेले तांदूळ खूप बारीक नाही झाले.

सगळ्यात मोठा जार साडेचार कपांचा आहे. मॅजिक बुलेटमध्ये तांदूळ कधीच बारीक झाले नाहीत. कितीही भिजवा.( आधी ह्याच्या प्रेमात होते.) पण Nutri Ninja Auto-iQ Blender मध्येमात्र अगदी ब्राउनराइससुध्दा गंधासारखा बारीक होतो. तो घेतल्यापासून दोन्ही आरतींच्या रेसिपीचे दोसे, इडल्या, ढोकळे वरचेवर करता येतात.

Pages