थडका - थयथयाट

Submitted by वेगळी on 14 July, 2015 - 03:24

थयाथया नाच ह्या त्या बाफवर चोरा
'नी' र्बुद्धतेचा ठेका तू तर घेतलास की फारा

काय तुझ्या उद्दामपणाला आता बोला
बिनडोक विधानांनी सारा बाफ पेटवून दिला

स्वतःवर फोकस सारा ठेवूनच नाचा
विद्वान, विदुषी या असती, सारे बोला

चित्रपट, कॉस्चुम याचा यांनी घेतला मक्ता
काय एवढे केले, जरा दाखवा की हो तक्ता

तोंडावर आपटूनी खाती सदैव मार
उथळ पाण्याला खऴखळाटच फार

इतरांना थयथयाट करतात म्हणत प्रत्यक्ष स्वतः थयथयाट करणार्‍या माबो वरील आद्य मिस थयथयाटी यांना सादर!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<चित्रपट, कॉस्चुम याचा यांनी घेतला मक्ता
काय एवढे केले, जरा दाखवा की हो तक्ता>>>>>>ईतकी स्लीप ऑफ टंग कशासाठी???खेळीमेळीच्या वातावरणात चेष्टा करावी माणसानं.

राहवत नाही म्हणून प्रतिसाद खरडायचे साहस करतो. मुळात शटर धाग्यावर झालेले वाद बाळबोध होतेच. शिवाय त्या वादातील दोन्ही पार्ट्यांनी आजवर संधी मिळाली की स्वतःही इतरांचा जाहीर पाणउतारा करून थयथयाटाची अनेक उदाहरणे ह्या जमीनीत मोठ्या आत्मीयतेने पेरलेली आहेतच.

झालेल्या वादावर काही लोकांनी तिथे भावना व्यक्त केल्याच. आता इथे आणखीन वैयक्तीक टीका होत आहे. ह्यातून बहुधा आसूरी (की आसुरी?) आनंदच मिळत असावा.

वेगळी,

तुम्हाला माझा राग आला असला तरीही मला हेच म्हणावेसे वाटत होते म्हणून म्हणालो.

एकदम छान उत्तर,आवडल.. . बर्‍याच जणांना आपण करतो, लिहितो तेच बरोबर असा दुराभिमान असतो किंबहुना 'आपला तो बाब्या, दुसर्‍याचा तो कार्टा' असाच अ‍ॅटिट्युड असतो, त्याला फार चपखल जबाब आहे.

बेफिकीरांना अनुमोदन... जे जिथे घडले तिथेच ते संपवुन पुढे जायचे. कशाला वाद वाढवत बसायचे. शेवटी हे सगळे पर्सनल लेवलला येऊन पोचते आणि मग वाद घालण्यामागचे कारण प्रासंगिक नसुन काहीतरी जुनी उणीदुणी फेडण्यासाठी हे सारे केले जाते असे वाटायला लागते.

इथे सगळेजण दोन घटका जमतात थोडी गंमत म्हणुन. वाद कशाला घालत बसायचे त्यात? जो वेळ मिळालाय तो मजेत घालवा की.

बहुधा आसूरी (की आसुरी?)
<<
दोन्ही आसुरीच झालंय की!

हे म्हणजे फार अति आहे! तिथल्या गोष्टी तिथेच सोडल्या असत्या तर फार फार बरं झालं असतं.
स्वतः मधुरा तो विषय ओलांडून पुढे गेलीये.
साधना , बेफिकीर +१

या धाग्याचा निषेध!

जुनी उणीदुणी फेडण्यासाठी वा पर्सनल स्कोर सेटल करायला मी लिहीण्याचा काही प्रश्नच येत नाही...कारण माझे कोणाशीच पर्सनल स्कोअर नाहीयेत...मी इथे लिहीतच नाही, वाचन मोडात मात्र सदैव असते...त्यातून जे जाणवले त्यावर गप्प बसणे याउपर शक्य नव्हते.

मागेच ८-१० महिन्यांपूर्वी http://www.maayboli.com/node/24506 ही गोष्ट वाचनात आली...
त्यावर निर्बुधेने ओह सॉरी...नीरजा बाईंनी घातलेला गोंधळ बघितला...तेव्हाच लिहावेसे वाटत होत. पण उगाच जुना धागा वर का काढा असा तेव्हा विचार केला. आता फार झालं म्हणून लिहीलं....

काय ती भाषा....ह्या आकाशातूनच पडल्या ना...काय ते चित्रपटात कॉस्च्युम डिझाईनींग केले म्हणजे काय त्याचे सर्व हक्क तिला मिळाले का? किती तो उर्मट्पणा...कोणी काही बोलत नाही म्हणून ही डोक्यावर पडलेली बाई काही बाही बरळते...हिची काय लायकी आहे की हिने लोकांचा येता जाता अपमान करावा? विद्या विनयेन शोभते - ह्याचा अर्थ ह्या उद्दाम बाईला काय कळणार???

असो...मी माझा मुद्दा मांडला. एखादा शहाणा असेल तर अंतर्मुख होऊन विचार करेल...या अतिशहाणी कडून ती अपेक्षा नाहीच.

वेगळी, अगदी योग्य शब्दात लिहीलं आहेत. अगदी ह्याच कारणाने मी सुद्धा माझ्या लाडक्या माबो वर लिहीणं सोडून फक्त वाचक बनून रहाणं पसंद केलंय .

अर्थात विशेष महत्त्व देण्याची लायकी नाहीच आहे. विद्या विनयेनं शोभते हे तर अगदी सोळा आणे खरं बोललात. इथे खूप चांगली व्यक्क्तिमत्त्व आहेत ज्यांच्यामुळे अजुनही माबो वर यावेसे वाटते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की प्रसंगी चुका करणार्या आयडींची कानउघडणी करणारी मंडळी हे असे ढळढ्ळीत अपमानास्पद बोलणे कसे दुर्लक्षित करतात? फक्त त्यांची मैत्री आहे म्हणून की त्यांच्या वर अजून असा अपमान सहन करायची वेळ आली नाही म्हणून?

मायबोलीवर येण्याचा उद्देश निखळ आनंद मिळवणे हाच असतो. उगाच इथे कोणाचेही काही ऐकून घ्यायला येण्यात रस नसतो. वाद विवाद असावेत पण ते खेळकरही असावेत. आपण सर्वज्ञ आहोत आणि चुका करणारा तुच्छ आहे हे दाखवण्याचा माज नसावा. असे लोक प्रत्यक्षात असतातच की आजुबाजूला. निदान त्या रोगाची लागवण मायबोलीवर तरी नसावी.

वेगळी…तुम्ही अनेकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत असं माझा तरी ठाम मत आहे. जे बोलावेसे वाटत होते पण कशाला चिखलात दगड मारा म्हणून टाळत होते ते स्पष्ट पणे मांडल्याबद्दल आभार आणी अभिनंदन!!!

एकंदरीत मायबोलीची नी रिप्लेसमेन्ट व्हावी असे अनेकांना वाटत आहे असे दिसते. Light 1

वेगळी आणि श्रद्धादिनेश.. तूमचे मुद्दे बरोबर आहेत. माझ्या तर्फे खुलासा म्हणजे, वाईट ( असभ्य, अपमानास्पद ) पोस्टींचा अनुल्लेख करणे, हेच माझे धोरण आहे. एक संकेतस्थळ म्हणून मायबोली प्रशासनाचे काही नियम आहेत का ? ते सर्व सभासदांना लागू होतात का ? एखाद्याने तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जाते का ? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माझ्याकडे नाहीत.

@वेगळी - मस्त लिहीलय आणि मुख्य म्हणजे भीड न बाळगता लिहीले आहे. तुम्ही लिहीलेले सर्व बरोबरच आहे.

Vegli ani itar - anumodan. Ignore kiti vela karnar. Such people deserve to be shown their right place.

Sorry phone varun type karte ahe. Devnagari nahi lihu shakat.

बाप रे!!! इथे मी नवीनच आहे. गेले चार दिवस फक्त वाचत होते. खूप उपयोगी माहिती संकलित झाली आहे पण हे असं सगळं वाचून मायबोलीवर लिहिण्याचा उत्साहच मावळून गेला.

एप्रिल, इथे चांगले लोक नक्कीच जास्त संख्येने आहेत. अवश्य लिहित रहा. समाजात ज्या प्रमाणात किडलेली माणसे ( हा शब्दप्रयोग माझा नाही, गंगाधर गाडगीळांचा आहे ) त्यापेक्षा कमी प्रमाणात इथे आहेत.

दिनेशदा, सहमत!

सर्वांना/नविन लेखकांना लिहीते करण्यासाठीच हि (मायबोली व इतर) व्यासपिठे निर्माण करण्यात आलीत, बोटावर मोजण्याइतक्या किडक्या मनोवृत्तीच्या लोकांच्या काही कॉमेंटस् ने, लिहिणे कुणीही बंद करु नये.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती !

एखादा प्रतिसाद नकारात्मक पण संकेतस्थळाच्या नियमात आणि मर्यादेत राहून येत असेल तर त्यात काही गैर नाही, त्यासाठी तयार राहायला हवे.
तसेच एखादा वैयक्तिक टिकेचा धागा देखील संकेतस्थळाच्या नियमात आणि मर्यादेत राहून येत असेल तर त्यात काही गैर नाही, त्यासाठी तयार राहायला हवे.

राहता राहिला मुद्दा तो हा की नियम आणि धोरणांच्या आधीही आपण समोरच्याकडून नैतिकतेची अपेक्षा धरतो.
मात्र नैतिकतेची व्याख्या देखील व्यक्तीपरत्वे बदलते.
पैकी बहुतांश लोकांची जी व्याख्या असते तिची सरासरी काढून त्यानुसार समाजाची नैतिकतेची व्याख्या ठरते.

आता एखादा या सरासरीच्या कमीजास्त असणारच. आणि ती व्यक्ती देखील आपल्या जागी बरोबर असू शकते. फक्त ती समाजाच्या नैतिकतेच्या व्याख्येत फिट बसत नाही. त्यामुळे ती आपल्याला झेपत नाही.
पण अश्यांची संख्या तुरळकच असते. तर त्यासाठी प्रत्येकाने तयार राहायला हरकत नसावी.
तसेच झाल्या प्रकाराने विचलित होऊन पलटवारही करू नये. त्यातही काही शौर्य नसते. फक्त आपण आपले मन:स्वास्थ बिघडवून घेतो ईतकेच.

ईथे घडलेल्या प्रकरणात कोणाचे समर्थन करायचे वा कोणावर टिका करायचा हेतू नसून माझ्या सोशलसाईटसवरील वावराचा फंडा सांगितलाय. Happy

ऋन्मेष!
+१
काय भारी लिहिलंयस.
हे इतकं इतक्या चांगल्या शब्दात मला लिहिता आलं नसतं.

बाकी सगळं बाजुला पण ऋन्मेष हॅट्स ऑफ टू यू !

आत्ता रविवारी झालेल्या एका गटगला पण तुझा विषय निघाला आणि तुझ्या शांतपणा आणि संयमाचं कौतुक करण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यावी.

लिहिले आहे ते फार काही चुकीचे वाटले नाही..
लेखिकेने बऱ्याच वेळा पहिल्या नंतर लिहिले आहे म्हणून शब्द जरा तिखट वापरले असून सुद्धा अनुमोदन ..
बाकि दिनेशदांचे धोरण पटते, तेच वापरतो ..

एप्रिल तुम्ही इतक्या पटकन एप्रिल फूल होउ नका.. माबो खुप छान आहे Happy

>>>ईथे घडलेल्या प्रकरणात कोणाचे समर्थन करायचे वा कोणावर टिका करायचा हेतू नसून माझ्या सोशलसाईटसवरील वावराचा फंडा सांगितलाय. <<<

हा तुमचा फंडा स्तुत्य आहे पण त्याची स्तुती करणारे तो पाळत नाहीत त्याचे काय? Proud ते इथे स्तुती करतात आणि इतरत्र जाऊन स्तुतीबरोबरच इतर बरेच काय काय करतात. असो!

एकुण ह्या धाग्याच्या निमित्ताने 'आंतरजालीय वावराचे आदर्श व मापदंड' असा एक पोल काढा असे म्हणतो.

Pages