सदैव ऋणी

Submitted by रेव्यु on 5 February, 2015 - 04:52

सदैव ऋणी
तसा साधाच पण तरीही एक संस्मरणीय रविवार
संध्याकाळच्या सावल्या अजून लांब होतायत
नेहेमीसारख्याच
औदासिन्य आणि खिन्नता
पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत

अन तरीही या एकाकी पणात
मी प्रसन्न आहे
आनंदात
आणि सुखावलेला

कारण आज सकाळी
स्काईप वरील पिंगने पल जाग आणली
मला निरागसता अन साध्याभोळ्या आनंदाच्या दुनियेत
कुणीतरी बोलवत होतं

आमची नातवंड पाचारण करत होती
आपल्यात खेळायला बोलवत होती
त्या कडाक्याच्या थंडीत, भल्या पहाटे
ऊबदार दुलई तून आम्हाला खेचत होती
तंत्रज्ञानाने आम्हाला एकत्र आणले होते

खिडकीतून चोरपावलाने येणारी किरणे
आणखी उबदार झाली होती
आणखी चकाकत होती
उत्साहात होती

तो रविवार आता
आनंदाच्या अन निरासगतेच्या गावात
आम्हाला बोटाशी धरून नेत होता
चला खेळूया म्हणत होता
तसा निरर्थक पण किती अर्थपूर्ण

मग पोरं आमच्या समोर नाचू लागलीए
गाऊ लागली
धाकटा नातू नुसताच
ओठ हालवत होता
शब्द उमटायच्या प्रयत्नात होते
ते विश्व आम्हाला सामावून घेत होतं

थोरली नात केवढी आनंदात होती
आम्हाला स्पर्श करू पाहत होती
नाचत होती
तिला आज्ज्जीनं पोस्टातून पत्र पाठवलं होतं
पोस्टमन ने ते आणलं होतं
केवढ अप्रूप होतं
अगदी " The good old way"
ते कागदावर होत आणि पाकीटातून आलं होतं

जुन्या काळानं निरागसपणे त्या नव्या जमान्यातल्या
मुलीला मोहून टाकलं होतं
अन आता ती सुध्दा पत्र पाठवणार होती
लाडक्या आजोबा आज्जीला

अन मग ती सकाळ
आणखीच मनमोहक दिसू लागली
कॉफी मस्त्च लागत होती
नेहेमीची नकोशी आंघोळ तरारी आणत होती

बाजारातल्या नेहेमीच्याच भाज्या
खूपच सुंदर दिसू लागल्या

पहाट सुंदर झाली
जेवण साधेच पण रुचकर लागत होते
वामकुक्षी , वाफाळणारा चहा
संध्याकाळी देवळात घंटेची मंजुळ किणकिण

भीमेसेनजी - बतिया मोरा
त्यांच्या विशीतला कोवळा आवाज
तीनच मिनिटांची रेकॉर्ड
मंत्र मुग्ध करवणारी
वेड लावणारी
शुध्द कल्याण
माझे गानदैवत
भरभरून स्वराचे दान मला देत होते

किती सुंदर जग
हा दिवस
केवढी अनमोल देणगी
पामर मी

जीवन सुंदर आहे
निरागसता चिरंतन आहे
त्या विधात्याचा मी ऋणी आहे
त्याने मला पाहणार्^याचे डोळे दिले
ऐकणार्याचे कान दिले

सदैव ऋणी ,
सदैव सदैव ऋणी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुरेख लिहिलय. अगदी साध्यासुध्या प्रामाणिक शब्दांमधून लाखमोलाचा संदेश दिला आहे तुम्ही.
' सदैव ऋणी' खरच, किती साधा विचार पण आचरणात आणायला फार कठीण.मोठमोठ्या सुखांच्या मागे धावता धावता या लहान लहान गोष्टीत सुख शोधायचं आणि त्याविषयीचं ऋण मानायचं हे जणू विसरायलाच होतं.

क्या बात है ....

तुमचा सारा आनंद वरील वाक्यावाक्यातून उसळतोय नुसता .... फारच सुरेख ...

छान