लाडका - कवि आणि कविता

Submitted by मीन्वा on 10 July, 2015 - 03:32

मी नव्यानेच कविता लिहायला लागलीये. मायबोलीवरच्या कविता वाचूनच मला स्फुर्‍ती मिळालीये
माझ्या बाबांना आणि आईला माझ्या काव्यापत्रीभेचं अजिबात कौतुक वाटत नाही तुमच्या सारर्‍ख्या रसिकांच्या परोत्साहनाने मी मोठ्ठी कवियत्री व्हायचं ठरव्लं

माझी कविता वाचल्याबद्दल खुप खुप थ्यांकु

ही माझी कविता माय्बोलिवरच्या माझ्या लाडक्या कविला सहर्श , सविनय, स...हे , स... आपलं ते, अर्पण! या कविच्या काव्यलेखनाच्या पद्धतीचं समर्‍पक वर्णन करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न तुम्ही आवडून घ्याल अशी आशा वाटते.

एक होता कवी
त्याने आणली रवी

अक्षरं घातली गंजात
घेतली घुसळून जोर्जोरात

काना मात्रा वेलांट्यांचा
वरुन दिला तडका

अक्षरात अडकलं अक्षर
बनले शब्द झरजहर (आपलं ते झरझर)
मायबोलीच्या पदरात अर्पण सादर

तुम्हाला माझी कविता आवडली तर तुमचा पत्ता आणि फोननंबर मला पाठवा मी घरी येऊन कविता म्हणून दाखवते. किंवा घर लांब असेल तर फोनवरुन पण म्हणून दाखवते. तुम्हाला माझी कविता खूप जास्त आवडली असेल तर मला एक ४० पानी वही पाठवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसेंदिवस तुमची काव्यपत्रीभा बहरात चाललीये.
तुमच्याकडे COD चा अॉप्शन आहे का? आणि कविता आवडली नाही, बसली नाही तर सात दिवसात परत घेता का? माझा पिनकोड तुम्हाला देऊ का? १६११.

आशू डी हो तर आम्ही कविता बदलून देतो.

म्हणजे समजा कवि आणि कविता या विषयावरची नाही आवड्ली तर

पपि आणि पपिता
सत्य आणि सत्यता

किंवा असे अनेक विषय आम्ही सुचवतो आणि तुम्ही निवडाल त्या विषयावर कविता लिहून देतो.

बसली नाही तर असं होत नाही आम्ही पोस्टकार्डावरच लिहितो त्यामुळे लगेच बसते

अ. आ. काम झालं हो... ! आता भेटू तेव्हा तुमच्या साठी माझ्याच कविता चाळीस पानी वहीत घेऊन येईन
एका पानावर तीन लिहीते मी कविता

नक्की पाठवेन सातीताई. पप्पा कितीही ओरडले तरी तुमच्या सारख्या काव्यरसिकासाठी मला वॉस्सप वर यायलाच हवं. हे दिव्य मला करायलाच हवं माझी प्रेरणा माझे गुरु माझ्या पाठीशी आहेत.

दक्षिणा तुमी का हसताय? कवि इतका कष्ट करतोय ते पाहून तुम्हाला हसायला येतंय? तुमच्या या वृत्तीचा मि निशेध नोंदवते

नीर्जाताई मी पुडचि कविता तुमच्यावरच लिणारै म्हणजे तुमा ला खूप आवडेल तुमी मला तिन पैकि तिन मार्क द्याल

@ तुम्हाला माझी कविता खूप जास्त आवडली असेल तर मला एक ४० पानी वही पाठवा.>> Lol योग्य जागा दाखवून दिलीत हो! Lol

आता एक स्वाती ठकार स्टाइल कविता येऊदे

मी भरले हुंकार
डाव्या हातात घेतला खिळा
चावून खाल्ले मी
सात शेंगदाणे

वगैरे वगैरे
Proud

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. माझी कविता तुम्ही वाचलीत या वरुनच तुम्ही किती धाडसी आहात ते दिसतं

माझ्या वाचकांवर मी एक खास कविता लिहीणारे...

स्वाती ठकार यांच्या कवितेचा अभ्यास करणे - लिहूनच ठेवलं हे आत्ता Happy

Biggrin

माझ्याकडे रोज दीड कवितेचा प्रिंटआऊट पाठवणार का? नुसताच पाठवण्यापेक्षा त्यात रोज ताजी कोथिंबीर गुंडाळून पाठवावी.

तुम्हाला माझी कविता आवडली तर तुमचा पत्ता आणि फोननंबर मला पाठवा मी घरी येऊन कविता म्हणून दाखवते. किंवा घर लांब असेल तर फोनवरुन पण म्हणून दाखवते. तुम्हाला माझी कविता खूप जास्त आवडली असेल तर मला एक ४० पानी वही पाठवा >>> Rofl