सायबर स्टॉकिंगबद्दल राज्यात पहिली शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 July, 2015 - 13:10

धक्कादायक बातमी!.....
खरंच..

--------------------------------------

ऑर्कुटवरून मैत्री झालेल्या मैत्रिणीला अश्लील मेसेज पाठवत सायबर स्टॉकिंग करणाऱ्या इंजिनीअरला कोर्टाने तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

--------------------------------------

सविस्तर बातमी ईथे वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/What-Is-Cybers...

--------------------------------------

वरची बातमी आज मी सर्वप्रथम मोबाईलवर न्यूजहंट अ‍ॅप्लिकेशनवर वाचली.

हेडलाईन अशी होती - अश्लील संदेश तरुणास भोवला.

असेल नेहमीचेच काहीतरी असे म्हणत, अन तरीही उत्सुकतेने काय केले नालायकाने बघूया म्हणत बातमी वाचायला घेतली, अन बातमीतील खालील वाक्य वाचून धक्का बसला.

अश्या प्रकारे महिलांना मनस्ताप दिल्याबद्दल (सायबर स्टॉकिंग) आरोपीला शिक्षा झालेले राज्यातले हे पहिलेच प्रकरण आहे.

घरी आल्याआल्या मुद्दाम सर्वप्रथम लॅपटॉप उघडत आधी न्यूज चेक केली आणि तिथेही यालाच दुजोरा मिळाला.

"".. सायबर स्टॉकिंमध्ये राज्यात शिक्षा झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ""..

याबद्दल आनंद व्यक्त करावा, कोणाचे अभिनंदन करावे, की खरेच आणखी काही..
कारण माझ्यामते हा गुन्हा राज्यातील कित्येक हजारावा गुन्हा असावा, आणि आज कोण्या एकाला पहिल्यांदा शिक्षा होत आहे.

तरीही, काही करायचेच झाले तर पहिले म्हणजे त्या तक्रार करणार्‍या मुलीचे कौतुक जरूर करेन .. यामागे सर्वात मोठे श्रेय तिचेच .. हॅट्स ऑफ!

आणि दुसरे म्हणजे जे केलेय ते.., स्वतंत्र धागा काढून या बातमीला प्रसिद्धी देणे..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम झालं. यापुढे असं करणार्‍या तरूणांनाही वचक बसेल आणि अनोळखी व्यक्तींना अ‍ॅड करत बसणार्‍या तरूणींनाही ह्यातून काहीतरी शिकता येईल.
एप्रिल २०१० मध्ये अटक झाल्यावर सव्वा पाच वर्षांनी शिक्षा ठोठावली?

अरे हो, खरेच की.. २०१० मध्ये अटक झालेली.. आणि आता शिक्षा.. याचाच अर्थ मधल्या काळातील अशी आणखीही कित्येक प्रकरणे सडत असतील वा कंटाळून स्वत:च बंद झाली असतील.. असो, पण झाले ते उत्तमच

बातमी नेहमीच सनसनाटी देतात.
प्रत्यक्ष 'सायबर स्टॉकिंग' यासम कलम त्या गुन्हा करणार्‍याला लागले असण्याची शक्यता कमी वाटते.
निनावी पत्र पाठविणे, मानसिक त्रास देणे, पाठलाग करणे असे गुन्हे लागले असणार.
फक्तं गुन्हे अन्वेषण सायबर सेलने केले असणार.

बातमीत जे 'सायबर लॉ २००० लागू झाल्यापासून पकडलेला पहिला गुन्हा ' असे म्हटलेय त्यातली कलमे तर या प्रकारच्या गुन्ह्याकरिता नाहीतच.

एकंदर कुणा वकील/ पोलिसांनी या बातमीवर प्रकाश टाकल्यास उत्तम.

(म्हणजे या बातमीच्या अनुशंगाने एखाद्याला आता सोशल साईटसवरच्या गुन्ह्यांना/ वात्रट प्रतिसादांना सध्याचा सायबर लॉ लागून अटकाव होईल असे वाटत असेल तर तसे नाही. या पर्टीक्युलर केसमध्ये एक व्यक्ती दुसर्‍या ओळखीच्या आणि एकदा लग्न ठरून मग ब्रेक झालेल्या व्यक्तीचा पाठलाग करून तशी निनावी पत्रे पाठवत होती, फक्त पत्रांचे माध्यम इलेक्ट्रॉनिक (जी मेल) होते.)

>>>या पर्टीक्युलर केसमध्ये एक व्यक्ती दुसर्‍या ओळखीच्या आणि एकदा लग्न ठरून मग ब्रेक झालेल्या व्यक्तीचा पाठलाग करून तशी निनावी पत्रे पाठवत होती,>> हे त्या बातमीत नाही. कसं कळलं?

>>म्हणजे या बातमीच्या अनुशंगाने एखाद्याला आता सोशल साईटसवरच्या गुन्ह्यांना/ वात्रट प्रतिसादांना सध्याचा सायबर लॉ लागून अटकाव होईल असे वाटत असेल तर तसे नाही.>> छे, तसं काही नाही. सायबर क्राईमवाल्यांना इथल्या राजकीय धाग्यांवर ठाण मांडून बसण्याएवढा कुठून आलाय वेळ? Proud

सायबर लॉ म्हणजे मग असे नक्की काय आहे, त्या अंतर्गत काय कलमे येतात जे 2000 पासून लागू करूनही त्या अंतर्गत एकही गुन्हा घडला नाही, वा नोंदवला गेला नाही, वा त्या अंतर्गत शिक्षा झाली नाही.
नुसता नावाला बनवला गेलेला कायदा आहे का?

पब्लिक फोरमवरचे वात्रट प्रतिसाद वेगळे झाले पण कोणा मुलीच्या पर्सनल चॅटमध्ये फ्लर्टींगची लेव्हल ओलांडून अश्लील मेसेज टाकणे, ते देखील मुलगी तशी नसताना, रिस्पॉन्स देत नसतानाही तिच्याशी असे वागणे, तिला हॅरास करणे, हे या कायद्यात येत नाही का किंवा याबाबत ईतर कोणता कायदा नाही का..
कारण माझ्याच अनुभवात अशी बरीच उदाहरणे आहेत कधीतरी लिहेन सवडीने ईथे किंवा आणखी कुठे.. म्हणून मी वर म्हणालेलो की असे हजारो अपराध घडले असतील..

साती, माझ्या मोबाईलचा नेट गंडलेला आहे, सर्च करणे नकोसे वाटते, आणि त्यातही भलेमोठे ईंग्लिश पॅराग्राफ वाचणे फार जिवावर येते, उगाच पुन्हा कॉलेजात जाऊन अभ्यास करतोय असे फिलिंग येते, तरी आता लॅपटॉपवरून काही साधीसोपी सुटसुटीत माहीती मिळतेय का शोधेनच.

तशी नसताना >> म्हणजे पुढे लिहिलेय ना रिस्पॉन्स देत नसताना.
तसेच कोणाला रिस्पॉन्स द्यायचा की नाही हे देखील तिचीच चॉईस. बरेच वेळा असेही होते की एक मुलगा मुलगी फ्लर्ट करत असतात. त्यांचा आणखी एक कॉमन मित्र ते बघतो, आणि विचार करतो की अरे ही मुलगी फ्लर्टच आहे, चला आपणही फ्लर्ट करूया. पण तसे नसते.
किंवा काही वेळा काही मुली थोडीफार फ्लर्टींग चालायचीच म्हणत चालवून घेतात. पण समोरचा लगेच ती बोट पकडायला देतेय तर हात पकडायला धावतो. आणि मग तिने त्याला अडवले तरी स्वताच्याच सोयीने अर्थ काढत तो पुढेपुढे जात राहतो.. गुन्हा घडेपर्यंत..

अ‍ॅ डमिन डू सम थिंग
हे अर्धे कच्चे धागे त्रासदायक आहेत.
<<

सहमत!
प्रशासक थोडीतरी दया दाखवा, आम्हा सामन्य मायबोलीकरांवर.

अमा,
धाग्यात फक्त बातमी आहे आणि ती पुर्ण आहे.
बातमीवर मी माझे मत दिलेय, किबहुना ती बातमी वाचून जी उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ती दिली आहे. बातमीचे विश्लेषण करतोय असा दावा नाही केलाय.