कच्चा खर्डा

Submitted by आशुचँप on 29 June, 2015 - 14:28

स्ड्फ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबूटिंबू यांना प्रचंड अनुमोदन.
इथे एखाद्या धाग्यावर केलेल्या सल्लामसलतीचा उपयोग फक्त धाग्याकर्त्यालाच नाही तर इतर वाचकांनाही होतो त्यात काहीच चमच्याने दुध पिण्यासारखे नाहीये. आणि इथे १० पैकी ९ जण तरी मनापासुन सल्ला देतात, चांगले-वाईट यातील फरक समजवतात त्यामुळे निर्णय घेणे सोपे होऊन जाते.

लिंबुटिंबु +१
मला तर मायबोलीवरच्या धाग्यांचा फार उपयोग होतो.
मायबोलीचालकांनाही मायबोलीचा वापर एक मराठी डाटाबेस म्हणून व्हावा असे वाटते.
म्हणजे सर्चमध्ये कुणी एखाद्या विषयाबद्दल मराठीत टाईप केलेतर मायबोलीवरच्या धाग्यांची आणि माहितीची लिंक आली पाहिजे सर्चमध्ये. त्यादृष्टीने काही बदल किंवा सुधारणा मायबोलीमध्ये केल्याची माहिती देणारा धागापण चालकांनी मागे काढला होता.
त्यामुळे कोंकण भटकंतीच काय पण पुण्यातील क्विलींग पेपर मिळण्याची ठिकाणे असाही डाटाबेस मराठीतून मायबोलीवर उपलब्ध झाला तर चांगलेच आहे.

हल्ली इतरांचे धागे कसे निरर्थक, बिनकामाचे आणि उगीच सर्वर स्पेअ व्यापणारे आहेत असे लिहिण्याची मायबोलीवर फॅशनच आहे.
विशेषतः बी आणि ऋन्मेषच्या धाग्यावर.

याबाबत एकदाच अ‍ॅडमिननी काय तो खुलासा करायला हवा.

लिंबू मस्त पोस्ट आणि अनुमोदन. मला पण एकटे पालक धाग्यावर माबो कर आणि अ‍ॅडमिनचा अतिशय आधार मिळाला आहे जेव्हा त्याची गरज होती व इतर बोलायला कोणी नव्हतेच. हैद्राबादेत दूर असताना माबोकरांचा व त्या नेटवर्क चा आधार मिळाला आहे.

माझ्यासारखे अनेक मराठी लोक असतील ज्यांना कोकणाची काहीच माहिती नाही. मी शुद्ध पुणेरी व मग एकदम हैद्राबाद. त्यामुळे कोकण माहीत नाही. त्या धाग्यामुळे माहिती मिळाली. विळद घाट ही पण एक मेटॅफिजिकल जागा आहे असा मा झा समज होता पण तोही प्रत्यक्षात आहे. ही माहिती मिळाली.

लिंबूटिंबू आणि साती यांच्याशी सहमत,

जर बी यांच्या कोकण धाग्याला टार्गेट केले जात असेल तर खरेच खेदजनक आहे. कारण मी तो धागा आणि त्यातील सुरुवातीच्या पोस्ट पाहताच कामाची माहिती म्हणत त्याला निवडक दहात घेतलेला, तशी नोंदही त्या धाग्यावर दिसेल.

आणि हो, नुकताच आम्ही वॉटर प्युरिफायर मामी यांच्या धाग्यावरील माहिती वाचून आणि तिथेच शंका कुशंका दूर करून घेतला. याबद्दल धागाकर्त्यांबरोबरच मायबोली प्रशासनाचेही आभार Happy

नेटवर माहिती असते असे म्हणण्याचा अर्थ माबोवर विचारू नका असा कोणीच काढू नये. खूप साधी माहिती नेटवर सहज मिळते. 'ह्यात इथे काय विचारायचंय' असे म्हणणारेही पोलिस नाहीत आणि ते काय पोलिस आहेत का असे विचारणारेही पोलिस नाहीत.

बाकी माबोकरांनी दिलेला मानसिक आधार आणि माहिती देणे ह्यात वर एका प्रतिसादात गल्लत झालेली दिसते.

ह्या धाग्याचा (आता खोडला गेला असला तरीही) उद्देश चिटूक मिटूक गोष्टी माबोवर कशाला विचारायच्या असे विचारण्याचा आहे

तसेच, एकटेपण घालवणे ह्यासाठी काही धागे उघडले जातात असे समर्थन काही जण करत असले तर असे लोक प्रतिसादातून इतरांवर टीका कसे काय करू शकतात?

Happy

अमके तमके धागे स्पूनफीडिंग असतील तर या धाग्यांना बॉटल फीडिंग म्हणावे का? आमच्या लाडक्या बी आणि ऋन्मेषवरच काय म्हणून इतकी माया?
१) याहु मेल मधे प्रॉब्लेम आहे का? २४ डिसेंबर २०१३ - सेंध्याकाळ ६:०० वा
२) याहू लॉगिन करताना पासवर्ड बदलायला सांगतो आहे का?
३) ज्योत्स्ना भो़ळे सभागृह टिळक रोडवर (पुण्यात) कुठे आहे?
४) असंच काहीतरी होतं तिथे
५) पुण्यातले (बाणेर, बालेवाडी, औंध, किंवा पुणे शहर) डेंटिस्ट्स सुचवाल का?
याशिवाय अमक्या तमक्या गाण्याचा अर्थ सांगा असे दोन-तीन धागे, अमकी तमकी मालिका सुरू झाली आहे, ती पहा

हे सगळे धागे एकाच आयडीचे आहेत पण आयडीपेक्षा धागाविषयांकडे लक्ष वेधायचा हेतू आहे.

भरत, सगळ्या लिंक्स मला पाहता आल्या नाहीत. ग्रूप्सपुरत्या मर्यादित असाव्यात. पण उदा. प्रश्न ३ आणि ५ यांत धागाकर्त्याने आपण होऊन काही शोधाशोध केलेली दिसते आहे, (गूगल मॅप इ.) आणि त्यानंतर तरीही हव्या असलेल्या माहिती/मतांसाठी मदत मागितली आहे.

बीला त्याच्या धाग्याचा आधार घेऊन लिहिल्याबद्दल राग आलेला दिसतो आहे, पण 'कोकणात समुद्र किती' यासारखे प्रश्न इतरांना खरोखरच थक्क करणारे वाटू शकतात हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि तरीही लोकांनी आपुलकीने त्याला भरभरून माहिती दिलेली आहेच.

हा पब्लिक फोरम आहे. कोणतंही विधान जाहीररीत्त्या केलं की त्याला दहा दुजोरे आणि दहा विरोधी मतं मिळायचीच. दुजोरे देणारे प्रियकरप्रेयसी नसतात आणि विरोध करणारे शत्रू नसतात हे खरंतर सांगावं लागू नये. असो.

Pages