कच्चा खर्डा

Submitted by आशुचँप on 29 June, 2015 - 14:28

स्ड्फ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचा प्रश्न हा एका........ तपशीलवार माहीतीही देण्यात आली.
मग बरंच झालं की. तसे गूगलवर बरेच काही सापडेल, अगदी इलेक्ट्रिक गीझबद्दल सुद्धा. अमेरिकेत काय पहावे, युरोपमधे काय पहावे असेहि विषय इथे चर्चिले जातात. कुणि नसेल गेले कोकणात पण जायची इच्छा असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांनी सांगितलेली माहिती बरी म्हणून विचारले असेल. तसे ट्रॅव्हल एजंट हि माहिती देतील, जाहीराती पण बर्‍याच सापडतील. म्हणून आपण कुणाला कधी काही विचारूच नये की काय?

बाकी मायबोलीवर राजकीय नि सांआजिक प्रश्नांवर जी चर्चा(?) होते, ते वाचल्यावर आपले हे बरे.

मला तरी काही धागे उपयुक्त वाटतात. म्हणजे मला सध्या गरज नसेल पण काही दिवसांनी मला गिझर घ्यायचाय. अशा वेळेस मी तो धागा वाचून त्यावरची मतं विचारात घेऊन मग निर्णय घेईन ना. तसेच अशा प्रश्नांच्या धाग्यांमध्ये तोच भाव असतो की माबोकरांनी त्यांची मतं, त्यांचे अभिप्राय लिहा. जर काही अनवट ठिकाणं असतील ती लिहा म्हणजे बर्‍याच लोकांना त्याचा उपयोग होईल.

ज्यांना प्रश्नांचा रोख कळला त्यांनी तिथे उत्तरं दिली सुद्धा, थोडक्यात ज्यांनी सरळ अर्थ घ्यायचाय किंवा मदत करायची आहे त्यांनी केली आहे, आपण ही लोकं अशी वागतात तर का वागतात हे लिहित बसायची उठाठेव करुन आपला वेळ वाया का घालवावा?

+१ झक्की.

द्या पाहू उत्तरे....>>>>> Lol इथेच गडबड आहे. उत्तरं दिलीच पाहिजे असा नियम नाहीये कुठेच.

आशूचँप,

तुम्हाला हे सगळे आज जाणवत आहे का? की बरीच वर्षे जाणवत आहे पण आज बोलता आहात?

टीव्ही कुठला घ्यावा, फ्रीज कुठला घ्यावा, वॉशिंग मशीन कुठले घ्यावे, पाककृती माहीत आहे का?, मोबाईल कुठला घ्यावा, गाडी कुठली घ्यावी, लॅपटॉप कुठला घ्यावा, चहा आणि बिस्किटे कशी खावीत, वगैरे वगैरे!

आजवर मी माझ्या वैयक्तीक आयुष्यात गरज पडेल अश्या एकाही गोष्टीची येथे विचारणा केलेली नाही. मला अजिबात समजत नाही की आपले एक स्वतंत्र वर्तुळ असताना आंतरजालावरील सल्ल्यांची गरजच का भासावी?

पण हे तुम्हाला आज का जाणवत आहे?

>>>आपण ही लोकं अशी वागतात तर का वागतात हे लिहित बसायची उठाठेव करुन आपला वेळ वाया का घालवावा? <<<

हे सांगण्यात तुमचा वेळ का घालवता आहात झक्की?

Happy

आशु, सगळ्या प्रकारची लोक असतात ना रे, मी असे प्रश्न नाही विचारणार आणि सर्च करून काय झेपेल ते करीन. रादर गुगल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणावरच धड विश्वास ठेवणार नाही.
पण मोबाईल कुठला घेऊ/ जॉब कुठला करू/ लग्न कोणाशी करू/ भविष्य बघायला हात दाखवू का थोबाड / कुठले शेयर घेऊ इतकच कशाला जीव कसा देऊ यावरची FAQ आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ना. कदाचित लोकाना बोलायला काहीतरी ठिकाण हवंय, मायबोली ते देतंय, लोक विचारतात, बाकी रीस्पोंड करतात, साईटला ट्राफिक मिळतो. चालतंय. सगळा माल आपल्याला हवा तसा नाही मिळणार ना, त्यातूनही काहीतरी नवीन माहिती मिळतेच.
आता तू हा धागा काढलास, काही तरी खरडलं, कामाची १०मिनिट मजेत गेली. झालं. Proud

>> >>>आपण ही लोकं अशी वागतात तर का वागतात हे लिहित बसायची उठाठेव करुन आपला वेळ वाया का घालवावा? <<<

हे सांगण्यात तुमचा वेळ का घालवता आहात झक्की?

असं झक्की नव्हे बुवा म्हणत आहेत .. Happy

बुवा, अमितव +१ ..

पोलीस कोणी व्हायचं आणि का हे कोणी ठरवायचं?

>>> वैद्यबुवा | 30 June, 2015 - 00:49 नवीन

ते मी लिहिलय बेफिकिर, झक्कींनी मध्ये घेऊ नका. हाहा
<<<

बुवा,

तर मग तुम्हाला उद्देशून आहे असे म्हणा!

इथे कशाला वेळ घालवताय कोणी कशावर वेळ घालवू नये हे सांगायला?

हॅ हॅ

>>> असं झक्की नव्हे बुवा म्हणत आहेत .. स्मित<<<

ते समजलं!

बेसिकली काही प्रतिसाद असतातच असे की ते 'त्यापैकी कोणीही' बोलल्यासारखे वाटतात. असो.

>>>पोलीस कोणी व्हायचं आणि का हे कोणी ठरवायचं<<<

हे कोणी विचारायचं आणि का विचारायचं?

आशूचँप,

हा बीबी काढून फुकाचा वेळ घेताय.. लोकांचा. नक्की हेतु काय ह्या बीबीचा?

आता तुम्हाला हि स्पून फीडींग करावे लागेल ना? म्हणजे असे की, तुम्ही हा बीबी उघडून, तुम्हाला कोणीतरी सांगणार की, अरे बाबा विचारतात काही काही लोकं प्रश्ण, असतात त्यांच्या गरजा. नसतात काही जण सर्वज्ञानी, तु काहून कोकलतोस?

तुम्हीच का नाही अ‍ॅनलिसीस करत?
'त्यां अश्या लोकांच्या वृती कशा आहेत , का आहेत हा अभ्यास तुमचा तुम्हीच करा ना. ह्या साठी बीबी कशाला? '

आता, ढिगाने(ज्यास्त करून वैदर्भीयच; हे वैदर्भीय शब्द मला नेहमी तो तसे का वाटतो. ) 'त्या' बीबीवर लोकं म्हणताय ना की, कोकणाची माहीती नसल्याने, हा बीबी बरा वाटेल. घालू देत की गोंधळ इतरांनाही.
इतकं काय मनाला लावून घेताय की लोकांना स्पून फिडींग करावं का लागतं वगैरे? तुमचा घरचा स्पून नाही ना वापरत कोणी?

ह. घ्या. Happy

आशूचँप,

तुमच्या मूळ मुद्याशी सहमत आहे.

बाकी व्यक्तीशः मला कोणाबाबतही काहीही म्हणायची इच्छा नाही.

मला तरी फारसं वावगं नाही वाटलं बी च्या धाग्याविषयी , उलट ज्याला कोकणाच्या बाबतीत फारशी माहिती त्याला माबोकर फर्स्टहँड माहीती देऊ शकतील जी नेटवर कदाचीत नाही मिळु शकणार , काही अनवट जागा बर्‍याचदा नेटवर पण सापडत नाहीत पण इथे मात्र त्याविषयी माहिती मिळु शकते. उगीच बी ला झोडपण्यात काहीच अर्थ नाही.

ह्या लोकांना सुनवावे ही आपली नैतिक जबाबदारी आहे का? लागू होईल न होईल ही तळटीप आहेच पण तरी सुनवावंसं वाटावं ह्या विचारात प्राबलेम नाहीये का?

>> हे कोणी विचारायचं आणि का विचारायचं?

आमच्यातलाच कोणीतरी पोलीस होऊ पाहतोय हे दिसल्यावर "तूच का" असा विचार मनात आल्याने मी विचारत आहे ..

>> बेसिकली काही प्रतिसाद असतातच असे की ते 'त्यापैकी कोणीही' बोलल्यासारखे वाटतात. असो.

आधी असं म्हणता मग म्हणता व्यक्तीशः कोणाबाबतही काहिही म्हणायची इच्छा नाही ? Happy

आशुचॅम्प प्रत्येक प्रतीसाद तुम्ही सम्पादीत का करताय? ( मी आधीपासुनच काही वाचलेले नाही, पण किन्चीत सन्दर्भ लागला) ज्याना स्पून फिडीन्ग केले जाते तेच त्याना काही पटले नाही की लोकान्च्या विपुत जाऊन लोकान दरडावुन येतात. तुम्ही तसले काही केले नाही, फक्त बाफ काढला मग प्रतीसाद एडिट का करताय? तुमची भाषा सौम्य आहे. पण आम्हाला तर इनडायरेक्टली अरेरावीचीच उत्तर ऐकायल मिळाली आहेत, ती सुद्धा माहिती दिल्यानन्तरही.
असो, सोडुन द्या. काही लोक आयुष्यात कधीच सुधारणारे नसतात. ते उलट वाकड्यात शिरुन त्रागा/ थयथयाट करतात.

माफ करा पण धागा संपादित, प्रतिसाद संपादित नाही करायला हवे होते.
त्यामुळे कशाचा कशाला अर्थ लागत नाहीये, प्रतिसादांमधून अर्थ काढायचे तर ते मूळ विषयाला धरून असतातच असे नेहमीच नसते,
आता थोड्यावेळाने ईथे गांधीमोदी येणार, माझा प्रतिसाद बघून कोणाला सईशाहरूख आठवणार, मग वैयक्तिक वादप्रतिवाद चिखलफेक ऊणेदुणी थट्टामस्करी टिंगलटवाळी काय अर्थ राहणार या धाग्याला ...

आता थोड्यावेळाने ईथे गांधीमोदी येणार,
<<

गांधी आणि मोदिंना कोणत्याही विषयात घुसडणारे एका विशिष्ठ गॅंगचे मेंबर सध्या मायबोलीवरुन तडीपार असल्याने याची शक्यता फार कमी आहे.

माझा प्रतिसाद बघून कोणाला सईशाहरूख आठवणार,
<<
या बद्दल काही सांगता येणार नाही.

मला माहिती आहे हा धागा माझ्यामुळे उघडला आहे ह्यांनी. ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच. Sad

माझा प्रतिसाद बघून कोणाला सईशाहरूख आठवणार>>>>> अरे तसे कुणाला आठवत नाही रे. पण त्तुच त्याना हाताला धरुन ओढुन आणतोस चला चला म्हणून, ( सई-शाहरुख) तर ते बिचारे काय करणार? येतात आपले हलत-डुलत.:फिदी::दिवा:

एबढे रागावु नका हो "बी", असते सवय ऐकऐकाला, असे फुकटचे उपदेश देण्याची.
त्याला काय करणार तुम्ही.

>>>ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच<<<

Rofl

Proud

Pages