क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..

earrings (3).JPG

प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न

earrings (4).JPG

प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..

earrings (6).JPGहे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले Happy

प्रचि १.

earrings (5).JPG

प्रचि २.

earrings (7).JPG

प्रचि ३.

earrings (8).JPG

प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक Proud

earrings (9).JPGब्रेसलेट्स ..

प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..

bracelet (1).jpg

प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..

bracelet (2).jpg

प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन

bracelet (3).jpgक्विलींग चे चेन पेंडंट :

प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग

chain pendent (1).jpg

प्रचि २.

chain pendent (2).jpg

प्रचि ३.

chain pendent (4).jpg

प्रचि ४. काही पेंडंट्स

chain pendent (5).jpg

प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..

chain pendent (6).jpg

प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .

chain pendent (7).jpgहॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी Wink

प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..

hp pendent (1).jpg

प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स Happy

hp pendent (2).JPG

हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय Happy ..

neckpiece.jpg

जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..

sandal.jpg

आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि Happy

cellphone covers.jpg

अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..

frame.jpg

प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल Happy

frames (1).jpg

प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .

frames (5).jpg

आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत Lol

frames (2).jpg

यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न Wink

frames (3).jpgframes (4).jpg

हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! क्रिएटिव्ह आहात एकदम! Happy

डूल पेपरचेच आहेत की काही निराळं मटेरियल आहे? क्विल केल्यावर वरून रंग वगैरे दिला आहे का?

स्वाती_आंबोळे >> आम्ही तुम्ही नकोच प्लीज Happy

डूल पेपरचेच आहेत.. क्विल करुन वर पेपर वॉर्नीश लावायच.. मी ट्रांसपरंट नेलपेंट वापरलय.. पहिल्या आणि तिसर्‍या प्रचिमधे फक्त रंग वापरलाय आणि त्यावरुन नेलपेंट लावलयं Happy

सर्वांचे आभार Happy

टीना.. किती आर्टिस्टिक आहेस यार!!! वॉव.. सुपर्ब!! पेंडंट्स्,फोटो फ्रेम, ईअररिंग्स मस्त.. सर्वच वस्तू खूप आवडल्यात!!

हे बघून मला बहिणींच्या लग्नामधील रुखवताची आठवण झाली. उडीचाच्या पिठाचे दागदागिणे इतके सुंदर करायच्या सुमन वहिनी की बास. हल्ली तो थाट राहिला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नाची सुरवात रुखवताचे दागदागिण्यानी अगदी महिनाभर अगोदर सुरु व्हायची. त्याला सोनेरी वर्ख लाव्वलेला असायचा. अप्रतिम दिसायचे ते नानाविविध अलंकार.

beautiful.

धन्यवाद सर्वांना Happy

चैत्रगंधा, ती फ्रेम कशी केली? >> माउंट बोर्ड आणि हॅण्डमेड पेपर चा वापर करुन.. क्विलिंगनेच त्यावर वारली च डिझाईन टाकल Happy

आणाखी फ्रेम्स टाकल्या की नाही आठवत नाहीये मला.. नव्या बनवल्या पैकी टाकते इथच काही.. हेडर मधे अ‍ॅड करते Happy

Pages