मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast!

टीना, अप्रतिम मेंद्या काढता तुम्ही! बरेचदा निव्वळ टाइमपास म्हणून काढल्याचं लिहिलंय! हे जास्तच अमेझिंग वाटतं. Happy

सिंडरेला >> १०० टके कि बात Proud
नाहित अजुन.. पुढले काहि महिने फुल्ल आहेत .. अभ्यास करुन कंटाळा आला कि खाली असलेला हात मी रंगवते Wink

धन्यवाद सर्वांचे Happy

सिंडरेला >> 00020468.gif

त्याच्या तळहातावर मेहेंदी काढायचा प्रश्नच येत नै.. फक्त मळ हातावर काढता येणार . त्यातही तो लगेच हात पाण्याने धुवुन टाकणार नं Wink Proud

प्रज्ञा, अग्ग किती मस्त मस्त डिजाईन्स आहेत .. तुझी मनोमन परमिशन घेउन मी ढापल्यात बर का..

धनुडी धन्यवाद Happy

बाकी लोकहो, बघा बघा.. याला म्हणतात प्रोफेशनल.. कसल्या एकसंध रेषा आहेत काळजीवाहू ने काढलेल्या डिजाईन्स मधे.. मला नाही जमत प्रत्येकवेळी अश्या काढायला म्हणुन कचकच करत राहते मी Sad

तस पाहिलं तर यात काही दाखवण्यासारखं नाही आहे पण उगाच कल्पना आवडली मला म्हणून तुम्हा सर्वांना दाखवतेय.. A very unique identity code : Barcode Wink

WP_20150617_01_12_45_Pro.jpg

आजुबाजुला ती मेहेंदी नको होती ना ? नसती तर आणखी मज्जा आली असती .. तश्या उगाच मारलेल्या रेषा आहेत त्या पण आता विचार करतेय की स्वतःच्या नावाला बायनरी मधे कन्व्हर्ट करुन हातावर टॅटू करुन घ्यावा Wink

काळजीवाहु.. मस्त सुबक डिझाईन्स Happy
टीना.. हो फक्त बारकोड पाहिजे होता .. टॅटु आयडिया भारीयं .. माझी हिंमतच नाही टॅटु काढायची Sad

टॅटु आयडिया भारीयं .. माझी हिंमतच नाही टॅटु काढायची Sad >> तुला काय वाटत एवढे दिवस मी का थांबली असणार टॅटू काढून घ्यायला Wink .. तस आदिवासी लोकांमधे अंगावर लहानपणीच गोंदवून घेतात पण ते आजकालच्या टॅटू सारख सुबक वगैरे नसतं .. आणि रंग सुद्धा हिरवट असतो.. काळा नाही .. मी खेड्यावर असती तर कदाचीत गोंदवल सुद्धा असत.. पण आता जास्त दिमाग आला तर भिती वाटते Lol .. गोंदवणाला आमच्यात दागिने म्हणतात.. असे जे मेल्यावर सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता .. म्हणून हरेकाच्या अंगावर ठिपका का असेना पण गोंदुन असतच असत .. Happy

धन्यवाद सगळ्यांना. टिना अगं इतकी प्रोफेशनल नाही मी,
ए मी इथे एक छोटी कविता शेअर करु क? खुप छान आहे, मला आवडते.

हळव्या नाजूक प्रीतभावना तळव्यावरती कुणी रेखीते
पानापानातुनी मेंदीच्या कुणी राधिका ठुमकत येते
शृंगाराच्या तर्‍हा पाहूनी मेंदी हसते चाफा खुलतो
लाज दाटते गालावरती कृष्णसखा हा जणू भेटतो !
कृष्णसखा हा जणू भेटतो !

Pages