राजस्थान एक अनोखा रंग

Submitted by सुनिल परचुरे on 30 July, 2009 - 09:37

आपल्या भारत देशातली राज्येच एवढी मोठी आहेत कि, एका 10 दिवसाच्या ट्रिपमध्ये संपुर्ण एक राज्य बघणही शक्य नसते. त्यामुळे जेव्हा ``मी ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड 12 दिवसांत पाहिला किंवा 15 दिवसांत अमेरीका बघितली असे म्हणणे म्हणजे नुसते टिकमार्क करण्यासारखे आहे.
जेव्हा आम्ही राजस्थानला जायचे ठरवले तेव्हा आधि उदयपुर, माऊंट अबू व जयपुर हे पाहून झाल्याने ते सोडून बाकी टुर ऍरेंज केली. प्रथम जयपुरला येऊन तिथून लगेच रणथंबोर मग मध्ये अजमेरला थांबा, मग पुष्कर करुन जोधपुर, जैसलमेर करत येतांना मन्वर करुन परत जोधपुर-जयपुरला आलो. जोधपुर हुनही विमानाने मुंबईला येऊ शकत होतो. पण जोधपुर-मुंबई व जयपुर-मुंबई ह्या तिकिटात जवळजवळ दुपटीचा फरक असल्याने परत जयपुरला आलो.
एकदा रुट ठरल्यावर ऑनलाईन सर्व हॉटेलचे व विमानाचे बुकिंग केले. हल्ली yaatra.com पासून makemytrip.com वर कुठल्याही शहरातील हॉटेल्स आपल्याला पाहिजे त्या बजेटमध्ये मिळू शकतात.
जयपुर ते रणथंबोर हे अंतर 180 कि.मि. आहे. संपुर्ण राजस्थानात आम्हाला सवाई माधोपुर यायच्या आधी जवळ जवळ 30 कि.मि. चा खराब रस्ता सोडला तर सर्व रस्ते चांगलेच मिळाले. अंतर जरी 180 कि.मी. होते पण खराब रस्त्यामुळे साडेचार तास लागले.
सकाळी जंगलात फिरायला कँटरमध्ये बुकींग केले होते. कँटर ही 15 माणसे बसायची उघडी मिनिबस सारखी असते किंवा तुम्ही जिफ्सी ही बुक करु शकता, ज्यात 5 जण बसू शकतात. rajsthantourism.gov.in ह्या साईटवरुन तुम्ही कंटर किंवा जिफ्सीचे online booking करु शकता. कँटरला एका व्यक्तिस कॅमे-यासह 555 चे तिकीट आहे. तर जिफ्सीला रु.642/- संपूर्ण दिवसाचे तिकीट रु.871/- आहे. तसेच तुम्ही elephantride ही घेऊ शकता. सध्या नवीन ballon सफारी ही चालू केली आहे. जिच्यात तासाकरता प्रत्येकी रु.8000/- दर आहे. ज्याचे बुकिंग www.skywalz.com वर करु शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा अविस्मरणीय अनुभव जरुर घ्यावा.
सकाळी आम्ही 7.30 वाजता कँटररमधून निघालो. मुख्य दाराजवळ चेकींगच्या वेळी गाडयांमध्ये हातात बिस्कीटाचे तुकडे घेऊन उभे राहिलो तर पक्षी हातावर बसून ते खायचे, त्यांच्या पायांची छोटी छोटी नखे, चोच यांचा स्पर्शच रोमांचीत करणारा होता. म्हटल चला सुरुवात तर छान झाली.
IMG_0094.jpg
आत शिरल्या शिरल्या एके ठिकाणी माकडांचे टिपिकल आवाजातील चित्कारणे चालू होते, पक्षी ओरडत होते, तेव्हा गाईडने सांगितले की वाघ इथुनच आतुन चालत आहे. आमच्या नाकांना त्याचा दर्प ही जाणवत होता पण त्याने काही दर्शन दिले नाही. ह्या पार्कचे त्यांनी चार भाग केले आहेत. वेगवेगळे छोटे दगडी रस्ते आहेत ज्यात सतत कँटर्स-जिफ्स फिरत असतात. हरणे-मोर-वेगवेगळे पक्षी दिसत होते. पण तासभर होत आला तरी व्याघ्रदर्शन होईना. एवढयात त्याला बातमी कळली की, 4 नंबरच्या एरियात वाघ आहेत. त्या 10 मिनिटात त्या खडकाळ रस्त्यावरुन ड्रायव्हरने अशी गाडी हाणलीय की कोणी सीटवर बसूच शकत नव्हते. पण शेवटी आम्ही त्या ठिकाणी जायला व वाघाच कुटुंब बाहेर पडायला एकच गाठ पडली. आता पर्यंत ब-याच जंगलांना भेटी दिल्यात पण आमने सामने पहिल्यांदाच आलो. पहिल्याच दिवशी ट्रिपच सार्थक झाल. काहीजण 8-8 दिवस सकाळ-संध्याकाळ ह्या सफारीवर जातात पण त्यांना वाघ दिसत नाही.
IMG_0114.jpg
नंतर आम्ही अजमेरला एक थांबा घेतला, कारण अंतर सर्व ठिकाणी खुप आहे.
रणथंबोर - जयपुर 180
जयपुर - अजमेर 135
अजमेर - जोधपुर 208
जोधपुर - जैसलमेर 305
बिकानेर हे आम्ही टाळले. कारण बिकानेर हे एका बाजूला पडते व जयपुर बिकानेर किंवा बिकानेर जैसलमेर हे अंतर जवळ जवह 300 कि.मि. आहे.
जोधपुर व जैसलमेरचे किल्ले म्हणजे जिवंतपणा वाटतो कारण जैसलमेर किल्यावर आजही हजार लोक राहतात. मोगल व राजस्थानी किल्यांमध्ये त्यांनी वैभव भोगलेल्या खुणा आजही सर्वत्र दिसतात. पण त्या मानाने आपल्या महाराष्ट्रातल्या किल्यांची तटबंदी आहे आतमध्ये फक्त पडझड.
IMG_0145.jpgIMG_0151.jpgIMG_0204.jpg
जैसलमेर पासून जवळच 45 कि.मी. अंतरावर सनसेट पहायला सँड डयुन्सवर आलो. प्रथम आपली कल्पना असते की राजस्थन म्हणजे जिकडे तिकडे वाळू पडलेली असेल. पण ही सँड डयुन्सचा परिसर सोडला तर कुठेही वाळु दिसली नाही. येताना रस्त्यात सुझलॉन एनर्जी कंपनीने लावलेल्या शेकडो पवनचक्या दिसल्या. राजस्थानात लोडशेडिंग का नाही ह्याचा आता उलगडा झाला. तसेच थर्मल पॉवर प्रोजेक्टसही खुप आहेत. त्यामुळे मुंबई सोडली तर महाराष्ट्रात electrictyची चणचणच आहे ति इथे कुठेही नाही.
IMG_0278.jpgIMG_0298.jpgIMG_0306.jpg
जैसलमेरहुन परतताना पोखरण जेथे पहिली अणुस्फोट चाचणी झाली त्याच्या थोडे पुढे मन्वर म्हणून एक डेझर्ट कँप आहे. तिथे पोचल्यावर आपल्याला जेवण करुन मग रस्त्यापासून 12 कि.मी. लांबवर असलेल्या मन्वर डेझर्ट कँपमध्ये जिपने नेतात. जाताना दोन मोठे डयुन्सही आहेत. ज्यावरुन उतरतांना आपण esselworld मध्ये गेल्यासारखे वाटते. वाटेत जंगलात किती तरी हरण दिसली. Siteवर कित्येक तंबु बांधलेले आहत. आतमध्ये संडास/ बाथरुम/शॉवर/डबलबेड सर्व आहे. संध्याकाळी Camel ride व गाद्यांवर बसून स्थानिक कलाकारांची नाच-गाणी, रात्री जेवण हा अनुभव इतका वेगळा आहे की तो प्रत्येकानी घ्यावाच. त्यांची site आहे www.colorsofrajasthan.com/jodhpur/manwardesertcamp.html..
IMG_0358.jpgIMG_0378.jpgIMG_0383.jpg
पण एकाच गोष्टीचे वाईट वाटत होत की सर्व मोठया हॉटेल्समध्ये फॉरीनर्सना जेवढा मान / आदर मिळत होता त्याच्या एकशतांशही भारतीयांना नव्हता. जोधपुरच्या किल्यातील हॉटेलात भरदार मिशितला दरवान असो, जैसलमेरच्या किल्यातील राजस्थानी हुक्का पित बसणारा म्हातारा असो की गावात राजस्थानी कपडे घातलेला रस्त्यावरुन पाणी भरणा-या महिला असोत सर्वांचा आधी पैसे द्या मग फोटो हाच बाणा होता. असो काही कटु आठवणी असल्या तरच सुखद आठवणी गोड लागतात.
IMG_0385.jpgIMG_0477.jpg

गुलमोहर: 

मस्त फोटोज. आणखी सविस्तर माहिती वाचायला आवडली असती.

सुंदर आहे वर्णन, माहिती आणि फोटोही.

अप्रतिम..

म्हारे राजस्थाण मा
सरसो का नही खेत
सोणे सी चमके मिट्टी
रेगिस्तान दि रेत Happy

छान आहेत फोटो आणि प्रवासवर्णन सुध्धा Happy

सुरेख वर्णन आणि फोटो......राजस्थानात बरीच ठीकाणे आहेत बघण्यासारखी.
मागे मी पुष्कर आणि जयपुरचे काही फोटो इथे अपलोड केले होते.
जोधपुर,उदयपुर आणि जैसलमेर आणि पुष्करचा मेला राहीलेत. बघु कधी मुहुर्त लागेल ते !
तुमचे फोटो पाहुन परत एकदा जायची इच्छा होतेय! Happy
________________________________________
प्रकाश

खरतर हे प्रवास वर्णन व फोटोज असे नसुन , फोटोज व त्याचे वर्णन असे आहे. सर्व फोटोज माझ्या पत्निने क्यानन डिजिटल क्यामेर्‍याने काढ्ले आहेत.

राजस्थान मस्तच आहे. युरोप/अमेरिकेतील लोकांचे भारतातले नंबर १ चे ठिकाण!
गावांदरम्यान प्रवास कसा केला? ST नी?
>> महाराष्ट्रातल्या किल्यांची तटबंदी आहे आतमध्ये फक्त पडझड.
त्याची बरीच कारणे आहेत. राजस्थानचा दगड जार मउ असल्याने कलाकुसर करणे सोप्पे असते. ते आपल्या काळ्या बसाल्ट मधे शक्य नाही. आपली कलाकुसर लाकडात. शिवाय राजपुतांनी मोगलांशी जास्त भांडणं केलं नाही (प्रसंगी त्यांची मुलगीही मोगलांना दिली) आपण भांडलो. राणा प्रतापही भांडला. मेवाडमधेही मारवाडच्या मानाने किल्ले/महाल यांची अवस्था खराबच आहे.

मा बो मध्ये सुस्वागतम.
फोटो आधी पाहीलेले असुनही, इथे, प्रवास वर्णना बरोबर बघताना अधीक मजा आली.
लगे रहो!

छान

मलाही दिसत नाहीयेत, बहुदा लेखकाने मायबोलीवरच्या त्यांच्या अकाउंट्मध्ये अपलोड केलेल्या फाइल्स काढून टाकल्या असतील. अश्या साठवलेल्या फाईल्स काढून टाकल्या तर ती चित्रे लेखातुन गायब होतात.

छान

छानच