वर्षाविहार २०१५: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18

यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००३-सिंहगड
२००४-मुळशी
२००५-मावळसृष्टी
२००६-मोदीज रिसॉर्ट ,कर्जत
२००७-सगुणाबाग,नेरळ
२००८-हेगडेज रिसॉर्ट,कर्जत
२००९-मावळसृष्टी
२०१०-युकेज रिसॉर्ट,खोपोली
२०११-फार्मलाईफ,नेरळ
२०१२-युकेज रिसॉर्ट,खोपोली
२०१३-विसावा रिसॉर्ट्,मुरबाड
२०१४-एस पी फार्म्स ,पेण

२००३-सिंहगड
२००४-मुळशी

हे दोन वर्षाविहार सार्वजनिक ठिकाणी केलेले दिसत आहेत. त्यानंतर मात्र खासगी रिसॉर्ट्समध्येच केलेत. यावर्षी काय धोरण आहे?

कमाल आहे, आधी समितीवर माणसं तरी येऊ द्या, मग विचारा धोरण आणि टीशर्ट, युटिलिटी आयटम वगैरे!
बाकी प्रतिसादातले एकूण औदासिन्य बघता असे उपक्रम एवढ्या मेहनतीने राबवायचे तरी कशाला असे वाटू लागले आहे.

बाकी प्रतिसादातले एकूण औदासिन्य बघता असे उपक्रम एवढ्या मेहनतीने राबवायचे तरी कशाला असे वाटू लागले आहे.
>>>

असे नाही म्हणू शकत, कारण वविला आवडीने येणारे वेगळे असू शकतात तर मायबोलीवर आवडीने सक्रिय राहणारे वेगळे असू शकतात. आंतरजालावर सक्रिय असणार्‍यांना वविची उत्सुकता नसेल तर ते फारसे इथे फिरकणार नाहीत (मी येणार नसूनही इथे फिरकलो हे विशेष), तर याउलट वविबद्दल उत्सुकता असणारे इथे अधूनमधून उगवत असतील तर त्यांची ईथे भारंभार चर्चा दिसणार नाही.

जर वविच्या दिवशी जमलेल्यांमध्ये औदासिन्य दिसले, वा त्यांची संख्या फारच कमी भरली तरच हे लागू. ईथल्या रिस्पोन्सवर जाऊ नका.

वविला शुभेच्छा !

ऋन्मेष, हा धागा स्वयंसेवकांना आवाहन करण्यासाठी आहे. त्या अनुषंगाने इथे किती प्रतिसाद आले हे उघड आहे. नुसता टाईमपास करायला येणार्यांच्या उत्सुकतेचा उपयोग नाही. उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून फार कमी लोक पुढे येतात आणि स्वयंसेवक आले तरच ववि होणार, म्हणून हे वाक्य आताच लागू.

ढेपेवाडा दिसतोय मस्त. पण साईट फ्रेंडली नाही अजिबात. अटीच फार घातलेल्या दिसतायत. तिथे पोहोचायचं कसं. भाडं किती, फोन नंबर वगैरे काहीच दिसत नाहीये.

शिवगंगा रिसॉर्ट चांगलं वाटतंय. पुण्याहून फार लांब पडेल का? एखादा मोठा हॉल आहे का ते पहावं लागेल.

अन्नपूर्णाच्या साईटवर ते ५० लोकांपर्यंतच्या ग्रुपची सोय करू शकतात असं म्हटलं आहे. वविकरांना अपुरी पडेल जागा.

आशूडी, स्वयंसेवकांना संयोजन करावे लागते आणि ते कला-कौशल्याचे काम असते. एखाद्यात त्याचा अभाव असू शकतो, वा त्यासाठी लागणारा आत्मविश्वास अनुभव याची कमतरता असू शकते. कदाचित आपल्यालाच संयोजनाला विचारतील आणि ते आपल्याला जमणार नाही म्हणूनही इथे काही जण उत्साह दाखवायला बिचकत असतील असेही असू शकते. याउपर काही जणांना वेळेअभावी ते शक्य नसावे आणि त्यामागचे कारण खरेच जेन्युअन असू शकते.

पण आपल्या भावना समजून आहे. कितीही आवड असली तरी मुळात ते काम आहे, त्यासाठी वेळ आणि ताकद खर्ची पडते, ती व्यर्थ तर नाही असे सहज वाटू शकते.
मी स्वताही संयोजनाची जबाबदारी अंगावर घेण्यापासून दूर पळणारा आहे, पण त्याच बरोबर कुशल संयोजकांबद्दल कमालीचा आदर आणि कौतुकही वाटते, की या लोकांमुळेच आज मजा आली वगैरे. आणि जरी कोणी हे कबूल करत नसेल तरी हेच सत्य आहे.

शक्य होईल तिथे कामे सर्वांमध्ये वाटायला बघा, सेल्फ सर्व्हिसचा फंडा वापरता येतो का बघा, कामाचा ताण कमी करा, भाव खा, संयोजकांना स्पेशल गिफ्ट द्या, छान छान फोटो काढा, मस्त एंजॉय करा Happy

पावसात भिजायचे आणि ते पण मदिरेचा हात हातात न धरता?

असो,

पिकनिकला येवू शकणार नाही.

(मदिरेवर मनापासून प्रेम करणारा आणि मदिरेची हुकुमत जरापण सहन न करणारा)

फक्त मद्यपी आणि फुकड्या आणि तीमेपास करणार्यांचा कट्टा करायचा का?

मी नवी मुंबईत / पश्चिम मुंबईत राहतो ..

माझी सूचना आशी कि सार्वजनिक वाहतुकीने येता येईल अशीच जागा पाहिजे . मी येक दारूशी निगडीत वेब साईट काढत आहे आणि आमच्या धोरणाप्रमाणे आमचा दारू पिऊन गाडी चालवण्यास आणि दारू पिऊन लोकांना त्रास देण्यास सक्त विरोध आहे..

काही सूचना?

अरे वा! वविचा धागा आला Happy
चला चला.... नवीन संयोजकांनी भराभरा पुढे या, नवनवीन कल्पना मांडा आणि तडीला न्या.

आशूडी ही एक जुनी मायबोलीकर आणि वविकरही आहे. तिच्या प्रतिक्रियेत तथ्य आहे. त्यावर उगाचच मोठ्या मोठ्या पोकळ पोस्टी पाडण्यात काहीच अर्थ नाहीये.

पण साईट फ्रेंडली नाही अजिबात. अटीच फार घातलेल्या दिसतायत. तिथे पोहोचायचं कसं. भाडं किती, फोन नंबर वगैरे काहीच दिसत नाहीये.>> दक्षिणा, तू सगळ्यात आधी त्या साईटवरचा 'सूचना व अटी' हाच टॅब पाहिलेला दिसतोय Wink
त्या साईटवर चित्रांकित नकाशा, भाडं, पत्ता फोन नंबर हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे.

अरे वा आला का वविचा धागा.
नविन संयोजकांना आणि नव्या कल्पनांना मनापासुन शुभेच्छा. Happy

मस्त अनुभव असतो वविचे संयोजन म्हणजे.

मी बघितले. रिव्हरगेट साईटवरचे फोटू, वर्णन वगैरे ठीकठाक वाटत आहे. वविसाठी तपासून बघायला हरकत नाही. रेट्स् ची चौकशी केली आहे का?

http://karnalaresorts.com/near-by-resorts/special-holiday-destination/

इथे पॅनोरॅमिक रिसॉर्टचे नाव आहे. तोही पाहा कृपया.

http://panoramicresortkarnala.com/

(दोन्ही साईटवर वन डे पिकनिक पॅकेजचे रेट्स जरा वेगळे दिसत आहेत.)

ढेपेवाडा मध्यवर्ती नाहीये का? सॉरी सॉरी. अजुन एका गटगसाठी त्या लोकेशनचा विचार चालू होता. त्या गटगमध्ये पण पुणे आणि मुम्बई वरूनच लोक येणार होते. म्हणून मला वाटले की मध्यवर्ती आहे. मला त्या भागातले काही माहिती नाही विशेष. Sad

प्राची, लोकेशन मुंबईकरांसाठी बहुतेक लांब आहे. ढेपेवाड्याच्या साईटवर तिथे शुध्द शाकाहारी भोजनच मिळेल असे स्पष्ट म्हटले आहे. बसेसही फक्त २५ ते ३० सीटरच येऊ शकतात असे म्हटले आहे.

Pages