माहिती हवी आहे .

Submitted by manjiri89 on 3 June, 2015 - 13:12

शेगावला जायचे आहे ..आनंद सागर सोडून अजून काही आहे का बघायला ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्रजीना विचारा.
शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणे म्हणजे त्यांच्या आवडीचा विषय. वर्षात किमान एकदा ह्या वारीत गेले २३ वर्षे ते जात आहेत.

गजानन विजय ह्या ग्रंथात उल्लेख आलेली स्थानं लोकल रिक्षावाला ठरवून बघून येवू शकता.

शेगावात विशेष असं पाहाण्यासारखं म्हणजे आनंदसागरच आहे. नागझरी शेगावपासून जवळ असलेलं एक ठिकाण. तिथेही फार काही पाहाण्यासारखं नाहीये. एक करता येइल; शेगांव जवळ बाळापूर आहे; हे देवीचं ठिकाण. ते पाहाता येईल. तिथे किल्लाही आहे. स्वयंभू (तरी नक्की माहीती नाही) गणपतीचं ठिकाण गायगांव ला आहे. हे दोन्ही ठिकाणं एका दिवसात होऊ शकतील.

आनंदसागरला जे भक्तनिवास आहे ते मंदिराजवळच्या भक्तनिवासापेक्षा जास्त छान आहेत, तर मी सुचवेन की ते भक्तनिवास निवडावं.

सध्या त्याभागात ज ब र द स्त ऊन आहे. ४५ - ४७ डिग्रीज रोजचं तापमान आहे. त्यामुळे योग्य ती काळजी, अन महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी घेऊनच प्रवास करावा.

कृपया धाग्याच्या नावातच कसली माहिती हवी आहे ते लिहिल्यास बरे होईल.
किमान "माहिती हवी आहे-शेगाव प्रवास" इतके तरी लिहाच.

पीकेव्ही (पंजाबराव कृषी विद्यापीठ) मध्ये जर कुणी ओळखितलं असेल तर एक एक भाग फिरून दाखवता येईल. खूप मोठा भाग आहे (काही शे एकर्स चा), यात त्यांची शेतीही आहे.