Submitted by shriramb on 31 May, 2015 - 08:08
अवेळी
अवेळीच आल्या अनाहूत धारा
तुझे बिंब थेंबात डोकावले
जसा वाहला गार बेभान वारा
सयेचे तुझ्या गंध फोफावले
अवेळीच झाल्या दिशा चिंब ओल्या
तुझ्या मोकळ्या लांब केसांपरी
जसा वर्षला धुंद पाऊस पहिला
तुझे हास्य प्राजक्त तो पांघरी
अवेळीच घुमले ढगांचे नगारे
नभी पेटली शुभ्र सौदामिनी
अवेळीच छेडून मल्हारमाला
तुझे रूप मी मूर्त केले मनी
~श्रीराम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या पावसासारखीच रोमान्चक
पहिल्या पावसासारखीच रोमान्चक ....!
सुंदर कविता ..
सुंदर कविता ..