प्रभात पुरस्कार - २०१५

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 June, 2015 - 13:23

१ जून, १९२९ रोजी विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी यांनी कोल्हापुरात ’प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. कंपनीचं बोधचिन्ह होतं उगवत्या सूर्याकडे बघत तुतारी फुंकणारी स्त्री. बुद्धिमत्ता, पावित्र्य, धैर्य, सौंदर्य, कलात्मकता असे गुण या बोधचिन्हात एकवटले होते. ’प्रभात’नं निर्माण केलेल्या सर्व चित्रपटांनी आपल्या बोधचिन्हाचा मान राखत विलक्षण सातत्यानं दर्जेदार निर्मिती केली. ’प्रभात’नं चित्रपटाला बोलतं केलं. ’अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट ’प्रभात’चा. भारतीय चित्रपटांत रंग आणण्याचा पहिला प्रयत्न केला गेला ’प्रभात’मध्येच, ’सैरंध्री’ या चित्रपटाच्या वेळी. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’धर्मात्मा’, ’गोपालकृष्ण’, ’माणूस’, ’कुंकू’, ’शेजारी’, ’रामशास्त्री’ असे अप्रतिम चित्रपट ’प्रभात’नं रसिकांसमोर सादर केले. चित्रपटाचं तंत्र आजच्या इतकं विकसित झालेलं नसताना, अद्ययावत यंत्रसामुग्री हाती नसतानाही ’प्रभात’नं जी चित्रनिर्मिती केली, ती विलक्षण आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या भवितव्यास महत्त्वाचा आकार देण्यात अग्रभागी असलेल्या ’प्रभात’ जागतिक पातळीवर नाव मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्तानं ’प्रभात’नं तीन वर्षांपूर्वी मराठी चित्रपटक्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ’प्रभात पुरस्कार’ प्रदान करण्यास सुरुवात केली. ‘प्रभात’ची नाममुद्रा आणि निवडप्रक्रियेतील वेगळेपण व पारदर्शकता, यांमुळे ‘प्रभात पुरस्कारां’नी एक मानाचं स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

मायबोली.कॉम ’प्रभात पुरस्कारांचे’ माध्यम सहयोगी आहेत. ’प्रभात’शी निगडित असण्याचा ’मायबोली’ला सार्थ अभिमान आहे.

prabhat-banner.jpg

यंदाचे ’प्रभात पुरस्कार’ आज जाहीर झाले. या वर्षीच्या पुरस्कारांचं वैशिष्ट्य असं की, हे पुरस्कार आज ऑनलाईन जाहीर झाले. ’प्रभात’ने आपल्या चित्रनिर्मितीच्या काळात उपलब्ध तंत्रद्न्यानानुकुल असे वेगळे प्रयोग केले होते. त्याच परंपरेत बसणारा हा प्रयत्न आहे. गेली दोन वर्षं या पुरस्कारांच्या निमित्तानं मोठे सोहळे आयोजित केले गेले. मात्र यंदा असा एकच सोहळा न करता ३ ते ७ जून, २०१५, या काळात प्रत्येक पुरस्कारविजेत्या स्वतंत्ररीत्या पुरस्कार देण्यात येईल. राष्ट्रीय चित्रपट व टेलिव्हिजन संस्थेत, म्हणजे एफटीआयआयमध्ये हे कार्यक्रम होतील. प्रत्येक विभागातल्या पुरस्कारविजेत्याला एफटीआयआयमध्ये पुरस्कार देण्यात येईल व या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत प्रेक्षक नंतर बघू शकतील. सर्व विजेत्यांना आपलं मनोगत व्यक्त करता यावं, त्यांच्या कामगिरीचं यथोचित कौतुक व्हावं आणि पुरस्काराचा सोहळा फक्त करमणुकीपुरता मर्यादित राहू नये, हा या मागचा उद्देश आहे.

यंदाच्या ’प्रभात जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची निवड करण्यात आली होती. आज संध्याकाळी एफटीआयआयमध्ये एका हृद्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

DSC_2625.JPG

DSC_2711.JPG

DSC_2769.JPG

***

चित्रपटसृष्टीसाठी भरीव योगदान देणार्‍या काही खास संस्थांना 'प्रभात पुरस्कारा'नं यंदा गौरवण्यात येणार आहे. हल्ली 'स्टुडिओ सिस्टिम' अस्तित्वात नसली, तरी एकेकाळी 'प्रभात', 'राजकमल', 'आर.के', 'फिल्मीस्तान' अशा स्टुडिओंनी चित्रपटनिर्मितीत महत्त्वाची कामगिरी बजावली. 'राजकमल', 'आर.के' आणि 'फिल्मीस्तान' या तीन स्टुडिओंचा गौरव यंदा 'प्रभात पुरस्कार' देऊन करण्यात येणार आहे. या तिन्ही संस्थांना त्यांच्या स्टुडिओत हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येईल.

***

गेल्या दोन्ही वर्षांप्रमाणेच या वर्षीही ’प्रभात पुरस्कारां’साठी चित्रपटकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी २०१४ साली सेन्सॉरसंमत झालेल्या चित्रपटांपैकी तब्बल ५१ चित्रपट दाखल झाले होते. ’एक हजाराची नोट’, ’हॅपी जर्नी’, ’ख्वाडा’, ’नागरिक’, ’सलाम’, ’कॅंडल मार्च’, ’लोकमान्य’, ’पोष्टर बॉइज’, ’रमा माधव’ आणि ’लय भारी’ या चित्रपटांनी सर्वाधिक नामांकनं मिळवली.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून सीमा भानू, स्वप्ना पाटसकर, अनीश प्रभुणे, मंदार जोशी, अभिजीत थिटे यांना काम पाहिलं. या परीक्षकमंडळानं शिफारस केलेल्या चित्रपटांमधून नामांकनं निवडण्यात आली. अंतिम विजेत्यांची निवड समर नखाते, कांचन नायक, सुषमा दातार, नरेन कोंड्रा, केदार पंडित, मिलिंद दामले, अश्विनी गिरी आणि आशुतोष कविश्वर यांच्या परीक्षकमंडळानं केली.

’प्रभात पुरस्कारां’चे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे -

१. सर्वोत्कृष्ट चित्रपट

चित्राक्ष मुव्हीज - ख्वाडा

prabhatbestfilm.jpg

***

२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

भाऊराव कऱ्हाडे - ख्वाडा

prabhatbestdirector.jpg

***

३. सर्वोत्कृष्ट अभिनेता

सचिन खेडेकर - नागरिक

prabhat_best_actor.jpg

***

४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

उषा नाईक - एक हजाराची नोट

prabhatbestactress.jpg

***

५. सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता

संदीप पाठक - एक हजाराची नोट

prabhatbestsuppactor.jpg

***

६. सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री

स्मिता तांबे - कॅण्डल मार्च

prabhatbestsuppactress.jpg

***

७. सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता

भाऊसाहेब शिंदे - ख्वाडा

prabhatbestdebutmale.jpg

***

८. सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री

सायली सहस्त्रबुद्धे - कॅण्डल मार्च

prabhatbestdebutfemale.jpg

***

९. सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका

अनिल नगरकर - ख्वाडा
निलेश दिवेकर - कॅण्डल मार्च

prabhatbestneg.jpg

***

१०. सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका

हृषिकेश जोशी - पोश्टर बॉईज्

prabhatbestcomic.jpg

***

११. सर्वोत्कृष्ट बालकलाकार

अभिषेक भराटे, विवेक चाबुकस्वार - सलाम

prabhatbestchildartist.jpg

***

१२. सर्वोत्कृष्ट प्रसिद्धी

हॅपी जर्नी

prabhatbestpublicity.jpg

***

१३. सर्वोत्कृष्ट संकलन

गोरक्षनाथ खांडे - नागरिक

prabhatbesteditor.jpg

***

१४. सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकल्पन

रसूल पूकुट्टी, अनिता कुशवाह, अमृत प्रितम - नागरिक

prabhatbestsounddesign.jpg

***

१५. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

देवेंद्र गोलतकर - नागरिक

prabhatbestcinematography.jpg

***

१६. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन

प्रशांत बिडकर - एक हजाराची नोट

prabhatbestartdir.jpg

***

१७. सर्वोत्कृष्ट रंगभूषा

विक्रम गायकवाड - लोकमान्य

prabhat_best_makeup.jpg

***

१८. सर्वोत्कृष्ट वेशभूषा

कल्याणी कुलकर्णी-गुगळे - एक हजाराची नोट

prabhatbestcostume.jpg

***

१९. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन

उमेश जाधव - यारीया - क्लासमेट्स

prabhatbestchoreo.jpg

***

२०. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

टब्बी-परिख - नागरिक

prabhatbestbcgrndscore.jpg

***

२१. सर्वोत्कृष्ट गायक

स्वप्नील बांदोडकर - आकाशाच्या छत्रीखाली - काकण

prabhatbestsingermale.jpg

***

२२. सर्वोत्कृष्ट गायिका

नेहा राजपाल - शीर्षक गीत - काकण

prabhatbestsingerfemale.jpg

***

२३. सर्वोत्कृष्ट संगीतकार

चैतन्य आडकर - प्रियतमा

prabhatbestmusicdirector.jpg

***

२४. सर्वोत्कृष्ट गीतकार

वैभव जोशी - फुंकर - तप्तपदी

prabhatbestlyricist.jpg

***

२५. सर्वोत्कृष्ट संवाद

श्रीकांत बोजेवार - एक हजाराची नोट

prabhatbestdialogues.jpg

***

२६. सर्वोत्कृष्ट पटकथा

श्रीकांत बोजेवार - एक हजाराची नोट

prabhatbestscreenplay.jpg

***

२७. सर्वोत्कृष्ट कथा

श्रीकांत बोजेवार - एक हजाराची नोट

prabhatbeststory.jpg

***

सर्व विजेत्यांचे मायबोली.कॉमतर्फे हार्दिक अभिनंदन!!!

***
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा. त्या सोहोळ्याच्या फिल्म्सची लिंक मिळेल का?
राजदत्त आणि इतर सर्व विजेत्यांचे अभिनंदन :). बरेच पिक्चर माहित न्हवते. शोधतो काय मिळेल बघायला ते.

छान ओळख .. प्रभात पुरस्कारांबद्दल माहितीच नव्हतं .. स्तुत्य उपक्रम ..

उषा नाईक कितीतरी वर्षांनीं दिसली परत .. एक हजाराची नोट काहितरी मस्त दिसत आहे .. (वाचून मात्र ह्या दिवाळी अंकतल्या (?) एका कथेची आठवण झाली ..)

नागरीक चं ट्रेलर बघितलं काल कोर्ट पिक्चर च्या आधी .. एकसे एक बडी नावं आणि ट्रेलर बघून बघावासा वाटत आहे ..

कला, एम् एम् बी ए, आणि ह्या चित्रपट निर्माते/वितरकांनां विनंती की इकडे स्क्रीनींग्ज् आयोजीत करा किंवा मग युट्युब वर वगैरे रेन्ट करता उपलब्ध करून द्या असे चांगले चित्रपट, भारताबाहेर रहाणार्‍या लोकांसाठी ..

छान ओळख. इतर अनेक मीडिया चॅनेल्स च्या सोहळ्यांपेक्षा भारदस्त वाटतात हे पुरस्कार या लेखावरून. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

कला, एम् एम् बी ए, आणि ह्या चित्रपट निर्माते/वितरकांनां विनंती की एकडे स्क्रीनींग्ज् आयोजीत करा किंवा मग युट्युब वर वगैरे रेन्ट करता उपलब्ध करून द्या असे चांगले चित्रपट, भारताबाहेर रहाणार्‍या लोकांसाठी .. >>> सहमत. डीवीडी सेट सुद्धा चालेल.

अरे वा, मस्त!
सर्व विजेत्यांचे आभिनंदन!

या स्तुत्य उपक्रमात माध्यम सहयोगी म्हणून आणि हि माहिती ईथे दिल्या बद्दल मायबोलीचे पण अभिनंदन Happy

कला, एम् एम् बी ए, आणि ह्या चित्रपट निर्माते/वितरकांनां विनंती की एकडे स्क्रीनींग्ज् आयोजीत करा किंवा मग युट्युब वर वगैरे रेन्ट करता उपलब्ध करून द्या असे चांगले चित्रपट, भारताबाहेर रहाणार्‍या लोकांसाठी .>>

सशल, फा,

कला च्या एका ग्रुप तर्फे बे एरिया मधे नवीन मराठी सिनेमे, रीलीज झाले कि लगेच बे एरिया मधे पण स्क्रीनींग होत आहेत.
कॉफी आणि बरच काही, टाईमपास २, या विकेंड ला "कोर्ट" असे दाखवले गेले.
फेसबुक वर "मराठी सिनेमा बे एरिया" असा ग्रुप आहे. त्यांच्या तर्फे हा उपक्रम चालू झाला आहे Happy

वरील सर्व पुरस्कार विजेते चित्रपट पण लवकरात लवकर ईथे बघायला मिळावेत Happy

मीपु, धन्यवाद .. मी जॉइन करते गृप मग तो ..

कला च्या इमेल्स् येतातच कार्यक्रमांच्या .. एम् एम् बी ए च्याही .. उद्देश एव्हढाच होता की तरीसुद्धा भरपूर चित्रपटांबद्दल ऐकायला येतं आणि सर्वच इथे येतात असं नाही .. तेव्हा काही कालावधीनंतर युट्युब वर रेन्टल, डीव्हीडीज् उपलब्ध करून द्याव्यात .. बे एरिया सारखे अ‍ॅक्टिव्ह मंडळं, कला सारख्या संस्था नसणार्‍या ठिकाणीही लोकांनां आस्वाद घेता येईल त्यायोगे ..

सशल, खरयं!
नवीन मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे, प्रोमोज बघितल्यावर, काही ऐकल्यावर उत्सुकता ताजी आहे तोवर ते बघायला मिळण्यात खरा आनंद असतोच Happy
भारताबाहेर बहुसंख्य लोकांपुढे मराठी सिनेमे येण्यासाठी युट्युब वर रेन्टल चांगला ऑप्शन आहे Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. Happy

मायबोलीकर वैभव जोशी यांना सर्वोत्कृष्ठ गीतकाराचे पारीतोषीक मिळाल्याबद्दल विशेष आंनंद झाला. Happy ब्राहो वैभव.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! पुरस्काराचे नाव आणि विजेत्याचे नाव इंग्रजीत का? मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार आहेत ना?

व्वा! सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
काकणच्या ड्युएट टायटल साँगसाठी फक्त गायिकेलाच पुरस्कार हे जरा खटकले. शंकर महादेवननेदेखील अप्रतिम गायले आहे ते.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
पुरस्कारांमध्ये माध्यम सहयोगी अन प्रभातशी निगडीत असणं ही खरोखरीच अभिमानची बाब आहे. मायबोली.कॉमचे ही अभिनंदन!

अहाहा.... मस्त दर्शन ! धन्यवाद.
सर्व पुरस्कार प्राप्त मानकर्‍यांचे अभिनंदन.
मला पुरस्काराची तुतारी फुंकणारी मूर्ति आवडली Happy

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन.
ही माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मायबोलीचे आभार.
मराठी चित्रपटांशी संबंधित पुरस्कारांसंबंधीची माहिती इंग्रजीत का?

८ सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री
सायली सहस्त्रबुद्धे - कॅण्डल मार्च

आडनाव इंग्रजी व मराठी दोन्हीतही चुकीचे वाटतेय.