लंडन टू नासिक ऑन व्हील्स, ४५ दिवस, १७,००० किमी.

Submitted by संपदा on 27 May, 2015 - 18:29

नासिकचे तीन व्यावसायिक आशिष कटारिया, संजीव बाफना आणि राजीव पारेख "लंडन टू नासिक ऑन व्हील्स" अशी साहसी मोहीम सध्या यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. "A World Without Boundaries" असे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे. या तिघांचा प्रवास ८ मे रोजी लंडनहून सुरू झाला असून १२ देशांतून १७,००० किमी अंतर पार करत नासिक येथे साधारण १८ - १९ जूनपर्यंत त्यांचे आगमन होईल. MH-15-EP-6723 अशा भारतीय रजिस्ट्रेशनच्या टोयोटा फॉर्च्युनरमधून हा सर्व प्रवास करण्यात येत आहे. खालील वेबसाईटवर रोजचे अपडेट्स बघता येतील.
http://www.globewheelers.com/#home_section

या मोहिमेच्या संदर्भात टाईम्स ऑफ ईंडियात आलेली बातमी.

http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Nashik-entrepreneurs-on-r...

पुढील प्रवासासाठी तिघां साहसी मित्रांना, त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा :).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users