नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिका, व्हॅनिला इसेन्स किती टाकलास?

परवा फायनली मुहुर्त लागला आइस्क्रीम करण्याचा.. सीझनच पहील आईस्क्रीम मँगो... फोटो नै काढले..

मी दोनदा केलं मँगो आईसक्रिम. कालची बॅच जरा गंडली. म्हणजे फ्रिजने दगा दिला.शनिवारी रात्री आईसक्रिम करून डीपफ्रिजमध्ये ठेवलं होतं, रविवारी सकाळी चांगलं सेट झालं होतं. दिवसभरात बर्‍याचदा फ्रिज उघडला गेला आणि संध्याकाळी पाहुणे आल्यावर तर थंडगार पाण्यासाठी तर फ्रिज आणि डीपफ्रिज दोन्ही अगणित वेळा उघडा बंद करावा लागला. त्यात ते आईसक्रिम मेल्ट झालं. पाहुण्यांना तसंच चिल्ड पातळ आईसक्रिम खायला दिलं. त्यांनी स्मूदी म्हणत बोल्स चाटून पुसून स्वच्छ केले.
आता जांभळाचं आईसक्रिम करायचं आहे.

नाही आशु, तस होईल अस नाही वाटत. कारण जांभळाचा गर बियांना घट्ट चिकटुन असतो... मंजुडी काय करते ते बघु..

याच धाग्यावर मागे कोणीतरी केल होत जांभळाच आईस्क्रीम, तिने चमच्याने गर काढला अस लिहिल आहे...

जांभळाला सुरीने एक चीर देऊन हाताने बी काढून टाकणं सोपं पडतं. म्हणजे तसं वेळखाऊ काम आहे, पण सीताफळापेक्षा जांभळाची बी काढणं सोपं आहे Wink
जांभळाचं साल कशाला काढायचं आशू?

विकांताला दोन प्रकार केले

खरतर कुठला प्रकार करावा ते कळत नव्हतं .केसर-वेलची सिरप दिसलं , दूधात टाकायला गेले पण ते पाकासारख घट्ट झालेलं आणि बाटलीच्या तळाशी चिकटून राहील होतं . जेम्तेम अर्धा चमचा मिळालं मग मी कंटाळून नाद सोडला. मिश्रं तसच सेट करायला ठेवलं . मूठभर काजू आणि काळ्या मनूका वाटीभर दूधात भिजत घातल्या.दूसर्या दिवशी सकाळी आक्री बरोबर मिक्सर मधून काढल्या. काल रात्री खाल्लं . चव वाईट नव्हती पण काजू-द्रक्शाची नव्हती Happy

आणखी एक सेट करायला घेतला . चॉकलेटचे स्लॅब होते. वितळवून घेतले आणि मिक्स केले. नवर्याचं ऐकून व्हाईट चॉकलेट पण टाकलं . चव जाम गोड-मिट्ट झाली. सुदैवाने कोको पावडर होती. ती टाकली एक चमचा . जरा बर लागलं.
काल रात्री खाताना बरचं खारट लागत होतं , का बरं ??

मला असं वाटतंय की ते साल आईस्क्रीम खाताना मधेच फोलपटासारखं येईल की काय. तू प्रत्यक्ष अनुभवच सांग मंजू.

आशिका, व्हॅनिला इसेन्स किती टाकलास? >>> अंदाजे २ टी स्पून

तसेच लिचीचे पण केले. या रेसिपीत पाणी असलेली फळे वापरु नयेत लिहिलंय तरी ट्राय केलं. लिचीची साले काढून सुरीने एक चिर देऊन बिया वेगळ्या केल्या व थोडे दूध घालून मिक्सरमध्ये पल्प केला. मिल्क पावडर व क्रीम थोडे जास्त घातले पातळपणा येवू नये म्हणून. पण मस्त लागत होते.

आशिका लिचीच्या आईस्क्रीमात बर्फ नाही झाला ना? तस असेल तर मग मी पण करुन बघेन.. व्हॅनिला इसेन्स करुन बघेन.. धन्स गो..

नाही. बर्फ झाला नाही. मात्र एक निरिक्षण आहे या पा. कॄ. बाबत कोणतेही फळ वापरले तरी हाच अनुभव आहे की आईसक्रीम छान सेट होते पण फ्री़जबाहेर काढले की लगेच वितळूही लागते. त्यामुळे सेट केलेल्या भांड्यातून सर्विंग बोलमध्ये काढणे ही क्रीया फारच झटपट करावी लागते. कदाचित कसलेही प्रिझर्वेटीव्ह नसल्यामुळे असावे. पण यावर मी शोधलेली युक्ती - आईसक्रीम बोलमध्येच सेट करायला ठेवणे. एक मोठे भांडे ठेवण्याऐवजी ८-१० बोल्स ठेवते व तसेच सर्व्ह करते.

ऑल राईट आशिका.. मी पण करुन बघेन आता लिची फ्लेवर Happy

कदाचित कसलेही प्रिझर्वेटीव्ह नसल्यामुळे असावे. >>>> बहुदा..

मात्र एक निरिक्षण आहे या पा. कॄ. बाबत कोणतेही फळ वापरले तरी हाच अनुभव आहे की आईसक्रीम छान सेट होते पण फ्री़जबाहेर काढले की लगेच वितळूही लागते.>> फळ नाही घातले तरी हेच होते Sad . माझे चॉकलेट आईस्क्रीम पण डब्यातून काढून बाउल बाहेर नेउन हातात देई पर्यन्त वितळायला लागल होत

या वेळच्या भारत भेटीत, के रुस्तम मधे पान फ्लेवरचे आईसक्रीम खाल्ले. चक्क मघई पानाचे तूकडे होते त्यात आणि चव तर अहाहा.... इथे पान मिळणे अशक्य पण भारतात कुणीतरी नक्की ट्राय करून बघा... त्यापुर्वी के रुस्तमकडे जायला विसरू नका !

कोल्हापुरात राजमंदिरमधेही मिळते, अगदी गुलकंद-मसाला वगैरे घातल्यासारखी चव-तुकडे वगैरे.
मला इतके नाही आवडत पण अशोकमामा मात्र चमच्याच्या नव्हे तर डावाच्या हिशेबात खातात Happy

ते पानाच्या चवीच आइस्क्रीम मी पण खाल्लय.. दिनेशदा म्हणतात तस डिट्टो पानाची चव लागते अगदी बडिशेपेसहीत.. या रेसिपीने वाटीभर तांबुल घालुन करुन बघायला हव एकदा..

लागतं चांगलं सरुवातीला पण काही ठिकाणी महा गोड असते. थोड्या वेळाने कसं तरी होतं. खूप गोड आणि ती टीपीकल पानाचा वास बराच वेळ घेवून होइल ना तसच. Happy

पान खायची सवय नसेल तर .. थोडसं खावू शकता.. काही ठिकाणी टीपीकल भणभणीत वास असतो. काय टाकतात कोण जाणे त्या वासासाठी.

Pages