एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकांत - विजयदुर्ग

मराठी साम्राज्यातले किल्ले ह्या सिरीयलमध्ये समाविष्ट करायचे ठरवले तर एक स्वतंत्र सिझन त्याचाच असेल. कारण ह्यातले बहुतेक सगळे किल्ले आता ओसाड एकाकी च आहेत Sad असो.

राजा भोज दुसरा ह्याने हा किल्ला बांधला. तिथून तो बहामनी सल्तनत कडे गेला, मग विजापूरकरांच्या ताब्यात आणि त्यांच्याकडून आपल्या शिवाजी महाराजांकडे. महाराजांनी ज्यांवर आपल्या स्वत:च्या हाताने भगवा फडकावला असे दोनचं किल्ले महाराष्ट्रात - एक विजयदुर्ग आणि दुसरा तोरणा. हा किल्ला त्यांनी आदिलशहाकडून १६५३ मध्ये जिंकला. त्यावेळी हिंदू पंचांगात संवत्सराचं नाव विजय म्हणून हा झाला विजयदुर्ग. समुद्री वर्चस्व गाजवायला हा किल्ला योग्य आहे हे ओळखून महाराजांनी इथे आरमार ठेवलं आणि ५ एकरांचा मूळ किल्ला १७ एकरांपर्यंत वाढवला. ३ चिलखती तटबंदी बांधल्या. २७ बुरुज बांधले. त्यामुळे चारही बाजुंनी टेहेळणी करणं सोपं झालं. इथे कधी काळी राजमहाल, त्यासमोर प्रजेची घरं, बहामनी काळात बांधलेला कोण्या पीरबाबाचा दर्गा, राजाचा दरबार असं बरंच काही होतं. आता ह्यातलं काहीही मागे उरलेलं नाही. त्याबद्दल पुढे येईलच. १८६२ मध्ये ह्या किल्ल्यावर २७८ तोफा आणि बंदुका मिळाल्या.

इथे एक दखनी तोफ होती ती शत्रूवर डागली की तो नेस्तनाबूत झालाच म्हणून समजा अशी तिची ख्याती होती. इथल्या बांधकामात काही खास दगड वापरलेत (दुर्देवाने मला त्याचं नाव कळलं नाही) त्यात गूळ आणि वितळलेले शिसं घालून हे बांधकाम केलं होतं. किल्ल्याजवळ एक गोदी होती त्यात जहाज बांधणी व दुरुस्तीची कामं होत.

१६९८ ते १७२९ हे ह्या किल्ल्याच्या दृष्टीने सुवर्णयुग. कान्होजी आंग्रेना दर्यासारंग ही पदवी मिळाली. त्यांनी विजयदुर्ग वर आपलं प्रमुख ठाणं केलं. भारताच्या कुठल्याच सागरी किल्ल्यावर नाही अशी एक अनोखी व्यवस्था इथे होती. किल्ल्याच्या पश्चिमी बाजूला पाण्याच्या आत एक दगडांची लांब भिंत होती जिच्याबद्दल फक्त मराठ्यांना माहीत होतं. शत्रूचं जहाज ह्या बाजूने आलं की त्या भिंतीवर आपटून फुटे. १६८० मध्ये शिवाजी महाराज मृत्यू पावले. मराठ्यांत भांडणं लागली. औरंगजेबाने संभाजीराजांना मारलं. मग तर यादवी आणखीच वाढली. शाहूमहाराजांनी पेशवेपद निर्माण केलं. पेशव्यांनी हळूहळू मराठी राज्यावर अंमल बसवला.

कान्होजी आंग्रेचा मुलगा संभाजी आंग्रे मरण पावला. त्याच्या वारसांत जायदादीसाठी भांडणं लागली. तुळाजी आणि मानाजी ह्या दोघांत नानासाहेब पेशव्यांनी मध्यस्थी केली. मानाजी ला उत्तरेकडचा भाग तर तुळाजी ला दक्षिणेकडचा (ह्यात विजयदुर्ग होता) देववला. ह्या तुळाजीने इंग्रजांची बरीच जहाजे धरून ह्या बंदरात आणली. पण पुढे त्यामे पेशव्यांना रेव्हेन्यू द्यायला नकार दिला. शाहूमहाराजांसमोर पेशवे आणि आपलं पद एकाच दर्जाचं असं तो मानी. त्यामुळे तो पेशव्यांच्या नजरेतून उतरला. त्यात शाहूमहाराजांनी त्यालाच सरखेल केला. त्यामुळे त्याच्यात आणि पेशव्यात ३६ चा आकडा झाला. शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी त्याच्याविरुद्ध इंग्रजांची मदत घेतली. त्यांच्याशी कराराच केला. त्यानुसार पेशव्याचं सैन्य पायी आणि इंग्रज समुद्रमार्गे असा विजयदुर्ग वर हल्ला झाला. Sad त्यात इंग्रजांनी आपल्या एका जहाजाला मुद्दाम आग लावून ते मराठ्यांच्या जहाजांत सोडून दिलं त्यामुळे आरमार नष्ट झालं.

१७५६ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला घेतला पण करारानुसार पेशव्यांना दिला नाही. पुढे बाणकोटच्या किल्ल्याच्या बदल्यात दिला. पण आतली सगळी संपत्ती लुटून आणि किल्ला बेचिराख करूनच. Sad पुढे हा किल्ला सरदार धुळप ह्यांच्या निगराणीत आला पण त्याला पूर्वीची शान राहिली नव्हती.

१८१८ मध्ये पेशवाई खालसा झाली. आणि इंग्रज-मराठा युद्धात मराठी राज्य नष्ट झालं. ह्या किल्ल्यावर पुढे एक ऑब्झर्व्हेटरी होती आणि सूर्याच्या किरणांत हेलियम असतो त्याचा शोध इथेच लागला असं काहीतरी कार्यक्रमाच्या शेवटी सांगितलं पण ते मला नीट ऐकता आलं नाही.

एकांत - बटेश्वर

कालचा एपिसोड थोडा उशिराने लावला त्यामुळे हे ठिकाण नक्की कुठे आहे ते आधी कळलं नाही. पण पुढच्या कार्यक्रमावरून चंबळच्या खोर्यानाजिक कुठेतरी आहे एव्हढा अंदाज आला. तर ह्या ठिकाणी हजार वर्षांहून जुनी मंदिरं आहेत - थोडीथोडकी नव्हेत तर चांगली २०० च्या आसपास. भारतात दुसरीकडे कुठेही एवढ्या संख्येने एकत्र मंदिरं कुठेच नाहीत.

एका गुज्जर ह्या सूर्यवंशातल्या राजाने (त्याचं नाव मला नीट ऐकायला आलं नाही) ही मंदिरं बांधली. हा राजा स्वत:ला लक्ष्मणाचा वंशज माने. ह्या ठिकाणी काही वर्षांपर्यंत नुसते भग्नावशेष होते. इथे कधीकाळी काही मंदिरं होती अशी पुसटशी सुध्दा शंका येऊ नये एव्हढे. पण आज ही मंदिरं उभी आहेत ह्याचं श्रेय ASI म्हणजे भारतीय पुरातत्त्वखात्याला जातं. विशेष करून एका व्यक्तीला - के.के. मोहंम्मद ह्यांना. ते नक्की कुठल्या हुद्द्यावर होते हेही सांगितलं पण मला कळलं नाही. ही मंदिरं पुन्हा बांधून काढेन अशी २००५ मध्ये त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी आणि त्यांच्या टीमने हे काम हाती घेतलं. ते वर्षातून ३ महिने इथे येऊन रहातात. आज अशी स्थिती आहे की काही भाग वगळता इथे कधी काळी भग्नावशेष होते हे सांगायला लागेल. अजूनही काही भागात काम चालूच आहे. त्यांनी ह्या मंदिरांचे शिखरा, मंडपिका असेही प्रकार सांगितले. ९ ते शतक ते १२ वं शतक अशी ३ शतकं इथलं बांधकाम चालू असावं आणि ही मंदिरं खजुराहोच्याही आधीची असावीत असा कयास आहे.

कार्यक्रमाच्या सूत्रधाराने त्यांना विचारलं की ह्या खोऱ्यातल्या डाकूंचा त्रास नाही का झाला. त्यावर मोहंम्मद ह्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली. एकदा ह्या ठिकाणच्या एका मागच्या मंदिरात एका माणसाला त्यांनी बिडी ओढताना पाहिलं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या माणसाचा चेहेरा त्यांना नीट दिसत नव्हता. त्यांनी त्या माणसाला विचारलं की तुला मंदिरात बसून बिडी ओढायला लाज वाटत नाही? त्यांच्या सोबतच्या माणसाने त्यांचा हात धरून मागे खेचत त्यांना म्हटलं की त्याला काही बोलू नका. एव्हढ्यात तो माणूस उठला आणि त्याचा चेहेरा त्यांना दिसला. तो कुविख्यात डाकू निर्भय सिंग गुज्जर होता. मोहंम्मद थोडे घाबरले. पण मग त्याला म्हणाले की ज्या गुज्जर वंशातल्या राजाने ही मंदिरं बांधली त्याच वंशातला तू आहेस. हे लोक काहीतरी चांगलं काम करत आहेत ह्याची जाणीव बहुधा त्या डाकूंना झाली असावी. कारण त्यांचा कधीच काही त्रास ह्या लोकांना झाला नाही.

मग कार्यक्रमाच्या सूत्रधाराने त्यांना विचारलं की ह्या अवशेषांतून मंदिर नेमकं कसं उभारायचं ते तुम्हाला कसं कळतं. त्यावर ते म्हणाले की ते देवळाच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात करतात. ह्या द्वाराला गोपुरम द्वार म्हणतात. मंदिर आणि मानवी शरीर ह्यांच्या भागांत असलेलं साम्य त्यांनी सांगितलं. तसंच कोणत्या देवाचं कुठलं मंदिर आहे ते कळायला कधीकधी त्यांच्या वाहनांची मदत होते जसं शंकराच्या मंदिरापुढे नंदी असतो. तसंच एक संस्कृत मंत्र म्हणूनही त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण दिलं तेही मला नीट कळलं नाही. Sad

ह्या भागात अजूनही काही ठिकाणी उत्खननाचं काम सुरु आहे. एक् जागा आहे Garhi Padavali म्हणून जिथे रामायण महाभारतातील प्रसंग उत्तमरित्या चित्रित केले आहेत आणि दुसरी जागा आहे मितावली म्हणून जिथे ६४ योगिनींचं मंदिर डोंगरावर आहे. भारतात खूप कमी योगिनीं मंदिरं आहेत. त्यातही एव्हढं मोठं कुठलं नाहीच. संसद भवनाची रचना ह्या मंदिरासारखी आहे. इथले खांब आतल्या बाजूने आहेत तर संसद भवनाचे बाहेरच्या एवढाच काय तो फरक.

पुढे महमूद गझनी ने उत्तर भारतावर हल्ला केला आणि कनौजवर आपला अंमल प्रस्थापित केला. गुज्जर राजांचा पाडाव झाला. कुठल्याही राजाचं संरक्षण न मिळाल्याने बटेश्वरचं सांस्कृतिक महत्त्व लयाला गेलं. इथे झालेल्या भूकंपाने त्यांची पडझड झाली. पण एक बरं झालं की बाजूने बेसुमार जंगल वाढलं त्यामुळे आणि इथल्या डाकूंच्या भयाने हे अवशेष नीट राहिले आणि त्यांचा जीर्णोद्धार करणं शक्य झालं. ह्या काळातल्या बाकीच्या इमारती वाईट अवस्थेत आहेत.

सियासत मध्ये आत्ताचा सलिम कित्ती कित्ती हँडसम आहे.. :डोळ्यात बदाम:

(आत्ता गुगललं.. त्याचं नाव सुधांशु पांडे. आधी पण बरेच वेळा पाहिलंय याला. पण या सलीमच्या पेहेरावात एकदमच भारी दिसतो).

एकांत - हंपी

बंगलोरपासून ३०० किमी दूर असलेलं हंपी हे विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज त्याचे अवशेष २५ किमी च्या क्षेत्रफळात पसरले आहेत. खरं तर विजयनगर साम्राज्यापेक्षाही त्याची ही राजधानी अधिक जुनी. इतकी की इथे अनेक पौराणिक घटना घडल्या असं समजतात. उदा. शंकर तप करत असताना मदनाने फुलाने भरलेला आपला बाण त्याला मारला आणि शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला भस्म केलं. पम्पा उर्फ पार्वतीशी त्याचं लग्नही इथल्या पम्पा पर्वतावर झालं असं म्हणतात. पंपाचा अपभ्रंश म्हणजे हंपी.

मोहम्मद तुघलक ह्याने होयसाला घराण्याच्या शेवटच्या राजाला १३३६ मध्ये मारलं. त्याच्या हरिहर राया आणि बुक्क राया ह्या दोघा अनुयायांनी हे विजयनगर वसवलं. त्याच्या ३ बाजूंना पर्वत आणि चौथ्या बाजूला तुंगभद्रा नदी. एव्हढं कमी म्हणून ७ रुंद दगडी भिंतीचा तट ह्या नगराभोवती बांधला गेला. त्यातली एकचं भिंत आता शिल्लक आहे. ह्या नगराचं स्वर्णयुग १५०९-१५२९ म्हणजेच कृष्णदेवराय ह्याचा काळ (१४७१-१५२९).ह्या काळात इथे इमारती, मंदिरं बांधली गेली. त्यातली अनेक अजून शिल्लक असली तरी सर्वात सुस्थितीत असलेली इमारत म्हणजे लोटस महल. बहुधा हा राजांचा समर पेलेस होता. आजही त्याच्या छतात पाणी वाहून नेणारे पाईप्स दिसतात. कदाचित त्यातून इमारत थंड ठेवायला पाणी फवारलं जात असेल. ह्या राजाचं गजदळ होतं. त्याच्या पशुशालेची इमारत आजही पहायला मिळते. अनेक घोडेस्वारही त्याच्या फौजेत होते. घोडेही अरबी आणि पोर्तुगाली असत. त्यांच्या व्यापाराने हे नगर समृद्ध होतं.त्या काळात किनार्याला लागून सुमारे ३०० बंदरं होती.

हे शहर हिऱ्यांच्या व्यापाराचं मुख्य केंद्र होतं. इथल्या बाजारात हिरे, नीलम, पन्ना, माणिक अशी रत्न आणि दागिने विक्रीस असत. हा बाजार आजही खडा आहे. असं म्हणतात की सूर्यास्ताच्या वेळी बाजार बंद होई तेव्हा ह्या रत्नांवर नुसतं एक फडकं टाकलं जात असे आणि मग दुकान बंद अशी समजूत होती. कसलाही बंदोबस्त नसताना कधी एक मोतीही चोरीस गेला नाही एवढी समृध्दी त्या काळी होती.

राजाची सेना तशीच तुल्यबळ होती. त्यात ३ लाख सैनिक, ६०००० घोडेस्वार आणि १५०० हत्ती होते. कृष्णदेवराय ह्याचा एक मुलगा ८ महिन्याचा असताना वारला आणि दुसर्याला ८ वर्षांचा असताना विषप्रयोग करून मारण्यात आलं. त्याच्या दोन जावयांनी त्याच्यामागे राज्यकारभार सांभाळला - विशेषत: मोठा जावई रामराया ह्याने. तेव्हा बहामनी राज्याचे ५ तुकडे झाले होते. Divide And Rule चा अवलंब करत ह्या रामरायाने त्यांना दूर ठेवलं होतं. पण आपापसातले मतभेद मिटवून ते एक झाले आणि त्यानी ३० जानेवारी १५६५ ला विजयनगर विरुध्द जिहाद पुकारलं. ८० वर्षांच्या रामरायाने सुध्दा युध्दात भाग घेतला. पण त्याचे जे २ मुसलमान सेनापती होते ते ऐनवेळी शत्रूच्या जिहादमध्ये सामील झाले (इथे माजी आजी म्हणाली असती 'वळणाचं पाणी वळणालाच जायचं'!) ह्या अंतर्गत विरोधाने विजयनगर युध्दाट हरलं. पण लोकांचा आपली सेना हरली ह्यावर विश्वास बसेना. राजपरिवार हत्तीवरून खजिना लादून बाहेर गेला तेव्हा त्यांचा विश्वास बसला. शत्रूने मन मानेल तशी लुटालूट केली आणि शेवटी शहराला आग लावून दिली. ६ महिने राजधानी जळत होती म्हणतात.

तरीही त्यातून वाचलेलं खूप आहे. एकदा जाऊन पहावं असं नक्कीच.

आजचा एपिसोड बहुतेक कुलधारावर आहे. निदान कालच्या एपिसोडच्या नंतर प्रोमो दाखवला तो तरी कुलधाराचा होता. ह्यावर एक एपिसोड आधी झालाय. पण माझा मिसला होता.....रिपिट टेलिकास्टमध्ये सुध्दा. आज बघायचा प्रयत्न करेन.

मित Happy

एकांत - कुलधरा

१२ व्या शतकात राजा जैसलने जैसलमेर उभं केलं. ह्यातला 'मेर' हा भाग 'मेरू' म्हणजे पर्वत ह्यावरून आलाय कारण हा पर्वताच्या आतला किल्ला. ह्या जैसलमेरपासून १८ किमी दूर असलेलं गांव म्हणजे 'कुलधरा'. १९९३ पर्यंत हे शहर दगडमातीखाली होतं. आजही हा भाग अगदी सामसूम आहे. जनावर, पक्षी, माणूस, अस्तित्वाची कसलीही खुण कुठे नाही.

पण एके काळी हे शहर अत्यंत प्रमाणबध्दपणे आखलेलं होतं - मोठाले रस्ते, घराबाहेर व्हरांडे, गाईगुरांचे गोठे. अगदी मोहेन्जादरो, हरप्पा सारखं व्यवस्थित आखलेलं नगर. उत्तर-दक्षिण जाणारा रस्ता. त्याला ९० काटकोनात छेदणाऱ्या पूर्व-पश्चिम जाणाऱ्या गल्ल्या पूर्ण शहराला Grid Pattern मध्ये विभागतात. २०० हून अधिक कुटुंब सामावणार नगर. दगड कातून एकमेकात बसवून बनलेली घरं. ना सिमेंट चा वापर, ना पाण्याचा. २०० वर्षांपूर्वी दोन-दोन मजली घरं कशी बरं बांधली असतील?

हे पालिवाल ब्राह्मणांचं गांव. पालीहून पोखरण, बिकानेर, जोधपूर इथे हे लोक स्थायिक झाले. गावातली सगळी कामं तेच करत. खूप श्रीमंत. पण रातोरात धनदौलत, घरदार, गाईगुरं सगळं सोडून निघून जायची वेळ आली त्याम्च्यावर. का? त्याच्याही ३-४ कथा आहेत.

एक कथा इथला राजा गजासिंग ह्याची. १८१५ च्या सुमाराची. हा एक कमजोर शासक होता. सगळी सत्ता त्याचा दिवान सालेमसिंग ह्याच्या ताब्यात. तोच राज्यावर हुकुमत करी. अतिशय जुलमी आणि क्रूर. त्यात मंदिरात सेवा करणाऱ्या १२ सालच्या शक्तीमैय्या नावाच्या पालिवाल ब्राह्मण मुलीवर ह्या सालेमसिंगची नजर गेली. त्याला ती मोठी झाल्यावर तिच्याशी लग्न करायचं होतं. पण तो ब्राह्मण नाही म्हणून पालिवाल ब्राह्मणांचा त्याला विरोध (वयातलं अंतर, तो क्रूर आहे वगैरे चा विधिनिषेध नाही!). त्यानी याला परोपरीने समजावून पहिलं पण तो बधेना. तेव्हा त्यांनी विचार करायला म्हणून मुदत मागितली. एक सभा घेतली अन त्यात ठरवलं की हे आरिष्ट टाळायला इथून निघून गेलेलंच बरं. म्हणून म्हणे ते गांव सोडून गेले.

दुसरी कथा अशी की ज्यादा टेक्स वसूल करायला ह्या सालेमसिंगने अनेक अत्याचार केले. एखादीच्या पायात चांदीचा तोडा आढळला तर तो मिळवायला पाय काप, बोटात अंगठी दिसली तर बोट उडव असले प्रकार सुरु केले. पालिवाल ब्राह्मणांनी राजाला सांगून पाहिलं पण काहीच कारवाई झाली नाही. तेव्हा ज्या ठिकाणी आपली दौलत, संस्कृती, मुलीसुना सुरक्षित नाहीत तिथे का रहावं असा विचार करून ते गांव सोडून गेले.

आता कहानी में ट्विस्ट! ह्या सालेमसिंगचे नातेवाईक (८ वी पिढी) जैसलमेर मध्ये राहतात. पण त्यातही काही लोकांचं म्हणणं आहे की हे त्याचे नातेवाईक असूच शकत नाहीत कारण त्याच्या घराण्यातले सगळे लोक मारले गेले होते (कोणी मारलं ते मला नीट ऐकू आलं नाही). तर ह्या लोकांनी कार्यक्रमाच्या सूत्रधाराला तवारीख म्हणजे राजघराण्याचा लिखित इतिहास दाखवला. त्यानुसार पालिवाल ब्राह्मण कुलधरा सोडून गेले तेव्हा सालेमसिंग हयातच नव्हता. मग तो त्यांच्या जाण्याला कसा कारणीभूत असेल?

लेकिन पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त! किल्ल्याच्या आत रहाणारे लोक म्हणतात की एक प्रेमकथा ह्या सर्वाच्या मुळाशी आहे. त्यातला हिरो एक राजपूत मुलगा. आणि मुलगी पालिवाल ब्राह्मणांची. दोघांचं एकमेकावर प्रेम. पर हाय ये जालीम दुनियावाले! राजपुतांनी मुलीला पळवून न्यायचं ठरवलं. त्याचा वास पालिवाल ब्राह्मणांना लागला. तेव्हा त्यांनी नेसत्या वस्त्रांनिशीच गांव सोडलं.

इतिहास मात्र काही वेगळंच सांगतो. भूजलाची पातळी खाली गेली म्हणून शेतीवर परिणाम झाला. सिंचनाची दुसरी सोय नाही. शेतं ओसाड पडू लागली. संपत्तीला ओहोटी लागली. जुन्या दराने राजाला कर देणं परवडेनासे झालं. आणि म्हणून लोक गांव सोडून गेले.

आता ह्यातलं खरं काय नी खोटं काय ते पालिवाल ब्राह्मण जाणोत, सालेमसिंग किंवा सर्वसाक्षी परमेश्वर! पण १९ व्या शतकाच्या सुरुवातीला हे गाव उजाड झालं हे नक्की.

काही असो पण पुढल्या काळात ओसाड गावांना चिकटतात तश्या भुताखेतांच्या कहाण्या कुलधरालाही चिकटल्या. त्यात न्यूज चेनेल्स च्या डॉक्युमेंटरिज नी भर टाकली. मग इथे राहिलं तर वंशवृद्धी होत नाही (!) किंवा इथल्या वस्तू (एखादा दगडही) नेल्या तर नेणारा मरतो वगैरे किवदंता पसरल्या. आजही इथे कोणी रहायला तयार होत नाही. ह्या कार्यक्रमात आलेला एक अधिकारी (हुद्दा वाचायचा राहिला. कदाचित पुरातत्त्व खात्याचा असेल) असंही म्हणाला की मला इथे काही अनुभव आलेत पण मी आज तुमच्यापुढे जिवंत बसलोय. कसले अनुभव हे काही सूत्रधाराने विचारलं नाही. Sad

अशी जवळपास ४३ उजाड गावं ह्या परिसरात आहेत म्हणे. कदाचित त्यांच्या कहाण्या कुलधराहून अधिक सुरस असतील.

सियासत मध्ये:

अकबर मेला.

बादवे मला निसाचं वागणं अज्जिबातच आवडलं नाहीये गेले काही एपिसोड्स.
निसा-सलीम हि माझी आवडती जोडी होती.
पण निसाने उगाच त्या अळीकुळीचा जीव वाचवला.
आता तो पुन्हा कोणातरी फितुराच्या साहाय्याने सीमेवरुन परत येणार.
निसा खरंच येडपट आहे.

फक्त ते सलीम मोहिमेवर असतांना त्याने स्वतःच त्या जास्मिन का यास्मिन कोण आहे तिला अळीकुळीच्या मागे पाठवले होते आणि मग त्याचा पाय घसरला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला असं काहीतरी निसाला कळालं.
पण हि काही सलीमची खुप मोठी चुक नव्हती. अळीकुळी एवढा धुतल्या तांदळाचा होता तर त्याने तरी का पाय घसरु दिला?

अजुन एक..

सलीमची बायको आणि सलीमचा नवा प्रधानमंत्री झालेला मित्र यांच्यात काही अफेअर वै. आहे का?
त्यांची सारखी नजरानजर दाखवतात.

नाही पियू. अफेअर नाही.
सलिम आणि निसाचं अफेअर असतं, त्याची खबर तो जगतला देत असतो. तिचा नवरा तिच्या मुठीत रहावा यासाठी तिला मदत करतो. कारण, मानबाई महत्त्वाकांक्षी नसल्यामुळे आणि नशा करत असल्यामुळे, जगत कोसैनीचा जास्त तोरा असतो.
आता तर ती पाशा बेगम आहे. या पोस्टला आणि पाशाबेगमच्या शब्दाला खूप मान असल्यामुळे तो तिच्या फेवरेट मध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतोय.
त्याला वजीर व्हायचं असतं, त्यासाठी मला बादशहाकडे रेकमंड करा असं तो तिला म्हणतो आणि त्याबदल्यात त्याने बादशहाला पटवायचं की न मारता अलीकुलीला लांब पाठवायचे म्हणजे निसा तिच्या नवर्‍याबरोबर लांब जाईल.
आणि तसचं होतं, म्हणून ती नजरानजर.

ओके पिनी.. पण मग निसाचं वागणं पटतं का?

कि कितीही खंबीर बाई असली तरी तो (अळीकुळी) बोलुन चालुन नवरा असल्याने तिने आपलं सौभाग्य (?) वाचवायचा शेवटचा प्रयत्न केला?

तिने त्यावर सलीमला दिलेलं स्पष्टीकरण कि "तुम्ही माझ्या नवर्‍याला मारून माझ्याशी लग्न केले तर जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडेल" हे अगदी फालतु कारण होतं. खरं तर अळीकुळीने केलेला गुन्हा (मोहिमेतुन पळ काढणे आणि शत्रुला फितुर होणे) त्वरीत फाशी देण्याच्या लायकिचा होता. त्यामुळे लगेच जनतेच्या मनात काही येण्याचे कारण नव्हते.

मला असं वाटतं की निसा पहिल्यापासून "फेअर" आहे. सगळ्यांशी, प्रत्येक सिच्युएशन मध्ये.

तिचा नोकर जेव्हा म्हणतो की यास्मिनचं अबॉर्शन कर, तेव्हा ती नाही म्हणते. नंतर तिचा मुलगा दत्तक घ्यायलाही नकार देते. आणि हे फक्तं घॄणेतून नाही, तर यास्मिनला आणि त्या न जन्मलेल्याबाळालासुध्दा न्याय देण्यासाठी. तिचा स्वभाव फार ठळकपणे दाखवला आहे या सिरिअल मध्ये.

तसचं, जेव्हा जहांगीर अलीकुलीला मारण्याचं कारण निसाशी लग्न हे देतो, तेंव्हा ती सांगते की जी शिक्षा तू इतरांना देशील, तीच शिक्षा माझ्या नवर्‍याला पण दे. त्याला वेगळी शिक्षा देउ नकोस. त्या संवादात कुठेही तिचा सौभाग्य वाचवण्याचा प्रयत्न मला वाटला नाही.

त्यानंतर जहांगीरचा वजीर त्याला पटवतो की नुकताच बादशाह झाल्यानंतर अकबराच्या मर्जीतल्या खानेखाना, मानसिंग आणि अकबरने गौरविलेल्या अलीकुलीला लगेच मारणे जनतेच्या डोक्यात संशय आणि अविश्वास निर्माण करेल. जहांगीरला ते पटते. आणि तो सगळ्यांनाच माफ करतो. म्हणून अलीकुली सुटतो.

हम्म.. पिनी.. बरोबर आहे.

निसा तिच्या लग्नात (आणि लग्नापुर्वी) किती सुंदर दिसायची. लग्नात तर खुप म्हणजे खुपच.
लग्नानंतर आता हळूहळू तो कोवळेपणा संपल्याचे आणि तिच्या चेहेर्‍यावरचे आनंदाचे रंग उडुन गेल्याचे किती सहज दाखवले आहे. कुठेही बटबटीतपणा न आणता.

मेकपला १०० पैकी १००.

पीनी, तुमचं म्हणणं पटलं. काल का परवाच्या भागात निसाने ती तशी का वागली याचं स्पष्टीकरण दिलं.
(हे लोक्स आपली चर्चा वाचतात क्किक्काय?)

निसाची अख्खी फॅमिलीच गडबड आहे. ती आणि तिचा मोठा भाऊ सोडुन सगळे एकसेएक नग आहेत.
वडील, लहान भाऊ, नवरा..

अळीकुळी आता निसाला तलाक देणार नाही. या सगळ्या प्रकरणात सलीमचा तो गोरा जाडा मित्र मारला जाणार.
निसा आणि सलीमचे एकत्र येणे सगळेचण इन्क्ल्युडिंग जगत कौसेनी होऊ न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार.
या सगळ्याच निसाची अधिकाधिक बदनामी होत राहाणार.

गरीब घरात जन्मली आणि सलीमवर प्रेम जडले यापायी तिच्या आयुष्याचे किती वाभाडे?

आता सलीम तिच्या भाचीचे आणि खुस्रोचे लग्न लावतोच आहे ना?
ती जगत निसाच्या आईला कसले ढोस देते..
निसा जगतला सर्व्ह करतांना मुद्दाम तिच्या पायावर ते ताट पाडते.. सगळंच रोचक.

सियासत भारतीय गेम ऑफ थ्रोन्स सारखे वाटते आहे. मस्त.

ज्यांना चित्रपटावर आधारित विनोदी कंटेंट आव ड्तो त्यांच्या साठी वन्स मोअर विथ जावेद जाफरी हा ए क कार्यक्रम रोज रात्री आठ वाजता बघ ण्या सारखा आहे. कुर्बानी, फर्ज मेरा साया हिम्मत्वाला अश्या सिनेमांची परीक्ष्णे जावेद करतो . काही काही जोक्स फारच मस्त आहेत. झीनत अमान ला फॅशन की फेरारी म्हणतो. मिमिक्री कर्तो. एकदम हहपुवा. फर्झ कुर्बानी रफु चक्कर रिव्ह्यू मस्त आहेत.

मला पन सियासत खुप आवडते. निसा तर विचारायला नको इतकी आवड्ते. प्रत्येक वेळि ती खुप जस्टिफाय वाट्ते. या सिरियल मुळे खुप चान्गला इतिहास कळ्त आहे.

पियू

निसा तिच्या लग्नात (आणि लग्नापुर्वी) किती सुंदर दिसायची. लग्नात तर खुप म्हणजे खुपच.
लग्नानंतर आता हळूहळू तो कोवळेपणा संपल्याचे आणि तिच्या चेहेर्‍यावरचे आनंदाचे रंग उडुन गेल्याचे किती सहज दाखवले आहे. कुठेही बटबटीतपणा न आणता.

मेकपला १०० पैकी १०० >>१

निसा......... हाय अल्ला

सियासत संपली. Sad

पियु, तो अली कुली आहे हो. ळी नाही, ली
>> हो माहितीये. मी आणि नवरा त्याला गमतीने अळीकुळी म्हणायला लागलो नी तेच तोंडात बसले आहे. Happy

आणि जगत गोंसाईं
>> हे माहित नव्हतं पिनीताईंच्याच वरच्या प्रतिसादामुळे मी "जगत कौसेनी" म्हणायला लागले.

निसा तर विचारायला नको इतकी आवड्ते.
>> मला सलीम-निसा जोडी फार म्हणजे फार आवडायची.

शेवटी निसा उर्फ मेहेरुंनिसा चे नाव बदलून 'नूरजहां' ठेवले सलीमने. तिच्या नावाची नाणी सुरु केली.
थोडे गुगलल्यावर असे कळते कि (प्रत्यक्षात) सलीम हा दारु पिऊन पडून असे व जास्तीत जास्त राज्यकारभार पुढे या नूरजहांनेच पाहिला. असेही ती राज्यकारभारात चतुर होती. रझिया सुलतान प्रमाणे.

शेवटचा भागही खुपच मस्त होता.
फक्त निसाच्या अलीकुलीशी लग्नात जो पोषाख दाखवला होता अगदी तोच पोषाख सलीमशी लग्नात दाखवला. Uhoh

सियासत नाही बघितलं. पण दूरदर्शनवर एक सिरीयल लागायची त्यात मिलिंद सोमण सलीम होता, नूरजहाँ गौरी प्रधान होती आणि मृणाल कुलकर्णी पण होती त्यात (सलीमची अजून एक बायको, का अनारकली म्हणून होती ते आठवत नाहीये).

ओह, सियासत संपली का? तरीच आता 'राजा, रसोई और अन्य कहानिया' ९ वाजता दाखवतात. त्या अलीकुलीचं काय झालं मग?

>>पण दूरदर्शनवर एक सिरीयल लागायची त्यात मिलिंद सोमण सलीम होता, नूरजहाँ गौरी प्रधान होती

बाप रे! काय भयानक कास्टिंग! नूरजहा सारखी सगळ्या जगावर उखडून आहे असं वाटलं असेल. त्या गौरी प्रधानच्या चेहेर्‍यावर नेहमी एक चिडका + काय वैताग आहे असा कंटाळवाणा भाव असायचा. काही दिवसांपूर्वी 'मेरी आशिकी तुमसेही' नावाच्या पकाऊ सिरियलमध्ये हिरविणीची आई म्हणून काम करताना पाहिलं तेव्हाही तेच भाव. नशीब तिच्या कॅरॅक्टरला मारून टाकलं.

एपिक चॅनेल आहे मस्त पण या चॅनेलला कोणी स्पॉन्सर नाही का? कारण कमर्शिअल ब्रेक मध्ये काही अ‍ॅड नसतात. एपिकच्याच प्रोग्रॅम्सच्या अ‍ॅड लागलेल्या असतात.

त्या अलीकुलीचं काय झालं मग?

>> निसाच्या वडीलांनी शाही खजान्यात अफरातफरी केली होती स्वत:ची पर्सनल कर्ज फेडण्यासाठी. सलीमने त्यांना माफ करण्याच्या बदल्यात त्यांना निसासाठी तलाक मागवण्याची अट घातली. त्यांनी ती मान्य केली. आणि निसाला तलाक मिळावा यासाठी अर्ज केला.

हा तलाकनामा अलीकुलीकडे सहीसाठी येण्याआधी (बहुतेक फॉर्मॅलिटी म्हणून) निसा माहेरहून पुन्हा पश्चिम बंगाल मधील तिच्या आणि अलीकुलीच्या घरी येते. मग अलीकुली घरी येतो. तिने त्याच्यापुढे तलाकनामा पेश करण्याआधीच त्याचा कोणीतरी मित्र/ खबरी त्याला पत्र लिहुन कळवतो कि त्याच्याकडे जीव वाचवण्याचा शेवटचा उपाय निसाला तलाक देणे हाच आहे. अन्यथा सलीम त्याला मारून टाकेन. इतकं सगळं होऊनही सलीम आणि निसाचं प्रेम पाहून अलीकुली तिला विचारतो कि, "एवढं असेल तर निसा नी सलीम ने आधीच लग्न का नाही केलं?" तेव्हा निसा त्याला सांगते कि निसा आणि अलीकुलीचा या सत्तेच्या खेळात केवळ प्यादे म्हणून वापर झालाय अकबर राजाकडून. हे सारे ऐकुन अलीकुली हताश होतो. आपला सतत वापरच केला गेला हि भावना त्याला संताप आणते.

दुसर्‍या दिवशी कोका (सलीमचा मित्र आणि सेनापती) अलीकुलीशी आधी सामंजस्याने बोलुन तलाक मिळतोय का यासाठी त्याला भेटायला येतो. अलीकुली दगाबाजीने कोका आणि त्याच्या सैन्याला शस्त्रे खाली ठेवायला सांगतो. मग त्याच्या पोटात तलवार खुपसतो नी सोबत आलेल्या त्याच्या सैन्यालाही मारून टाकतो. मग त्या यास्मिन (कि जास्मिन?)लाही मारून टाकतो. तो निसालाही मारणार याआधी उरला सुरला प्राण घेऊन कोका त्याला मारुन टाकतो नी मगच प्राण सोडतो. घाबरलेली निसा स्वतःच्या मुलीला नी यास्मिनच्या मुलाला घेऊन ती जागा सोडते. जगत कौसेनीने निसा जिवंत परत येऊ नये म्हणून तिला शोधायला सैनीक पाठवलेले असतात. प्रसंगी त्यांचाही खुन करून निसा कशीबशी माहेरी येऊन पोहोचते. आणि मग सलीमला भेटते. सलीमच्या आणि तिच्या मनातल्या आशा पुन्हा पल्लवीत होतात.

इकडे जगत कौसेनी आणि महावत खाननी (सलीमचा मित्र आणि मुख्यमंत्री) शेवटचा उपाय म्हणून सर्व दरबारी लोकांना सलीम आणि निसाचे लग्न होऊ नये यासाठी भडकवलेले असतात. हे सर्व मंत्री (निसाचा भाऊ सोडून) सलीमला जाऊन भेटतात आणि निसाशी निकाह केला तर आम्ही सगळे राजिनामा देऊ आणि सध्याची राज्याची स्थिती बघता तुम्हाला ते अजिबात परवडणार नाही अशी धमकी देऊन ठेवतात. त्यामुळे द्बुन जाऊन सलीम निसाला जनानखान्यात सामिल होण्यासाठी विचारतो. निकाह न करताच. निसा मात्र त्याची *खेल बनून राहायला स्पष्ट नकार देते. हताश सलीम वाड्यात परततो.

एकिकडे कोकाच्या मृत्युची बातमी कळल्याने महावत खान प्रचंड दु:खी होतो. शरमिंदा होतो. तो जगत कौसेनीला पुन्हा कोणतीही मदत करण्यास नकार देतो. दुसरीकडे सलीमच्या स्वप्नात कोका येऊन जाब विचारतो कि "मी तुझ्या प्रेमासाठी स्वतःचा जीव दिला आणि तू काही दरबार्‍यांना घाबरून.. दाखवुन दे सर्वांना कि तू जहांगिर आहेस".

मध्येच सलीम सत्तेतली नाणी बदलून 'नूरजहाँ' असं एम्बॉस केलेली नाणी चलनात आणतो.

शेवटी सलीम आणि निसाचा निकाह होतो. या कामी तिला जुनी पाशा बेगम (सलीमची आई आणि अकबराची बायको) शक्य तितकी मदत करते. नंतर निकाह झाल्यावर ती दोघींची (निसा आणि जगत) भेट घडवुन आणते. जगतला 'निसाला नवी बेगम म्हणून काहीतरी भेट दे' असं सुचवते. जगतला खरे तर अशी काहीच इच्छा नसते पण नाईलाजाने ती 'निसाला काय हवे ते माग' असे सांगते. इथेही निसा आपल्या बुद्धीमत्तेची चमक दाखवुन जगतचा पाताळयंत्री नोकर 'होशीयार' तिच्याकडून मागुन घेते.

शेवटच्या शॉटमध्ये निसा अभिमानाने जगतला सांगते.. आता यापुढे माझे नाव मेहेरुंनिसा नाही.. नूरजहाँ आहे.
इथे सियासत संपली.

हुश्श्य !!

सलीमचे काम केले: सुधांशु पांडे
निसाचे काम केले: चारु शंकर

Pages